जंक फूड; मुलांचा शत्रू , junk food; child`s enemy

जंक फूड; मुलांचा शत्रू

जंक फूड; मुलांचा शत्रू
www.24taas.com, मुंबई

तुमची मुलं घरच्या जेवणाला नाक मुरडतात?
शाळेत डबा नेहण्यास कंटाळा करतात?
शाळेत अर्धा डबा खाऊन उरलेलं जेवण घरी आणतात?
जादा पॉकेटमनीची मागणी केलीय?
या सगळ्या प्रश्नांच उत्तर जर होय असेल तर...
सावधान !



शाळांच्या आजूबाजूला ‘जंक फूड’वर बंदी
तुमची मुलं तुमच्याकडून पॉकेटमनीच्या नावाखाली पैसे घेऊन जातात आणि त्या पैशातून ते असे काही पदार्थ खातात त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येवू शकतं. बालवयातचं मुलं लठ्ठपणाचा शिकार होतात. लिव्हर आणि पोटाचे आजार त्यांना जडतात. हे सगळं काही त्या खाद्य पदार्थामुळे घडतंय. तेव्हा वेळीच सावध व्हा. हे तर रोजच्या आहारातील खाण्याचे पिण्याचे पदार्थ आहे असं तुम्हाला वाटलं असेल, पण तो तुमचा गैरसमज आहे. कारण हे असे पदार्थ आहेत ज्याला डॉक्टरांनी ‘जंक फूड’ असं नाव दिलंय. सरकारही या जंक फूडबद्दल आता गंभीर बनलंय. कारण, या जंक फूडमुळे शाळकरी मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून तो संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने शाळेच्या परिसरात जंक फूड तसंच कार्बनेटेड ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याची तयारी केली आहे.

जंक फूडचा संभावीत धोका आता सरकारच्याही लक्षात आला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारनेही पावलं उचलायला सुरुवात केलीय. शाळेच्या परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी घालण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. शाळेच्या परिसरात बिनदिक्कतपणे विकले जाणारे घातक खाद्यपदार्थ... मात्र, याच पदार्थांमुळे तुमच्या मुलांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. या पदार्थांमुळे शाळकरी मुलांना अनेक रोग जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आहारतज्ज्ञ तसेच सरकारनेही याविषयी आता गांभीर्याने विचार सुरु केला आहे. शाळेच्या परिसरात जंक फूड आणि कार्बनेटेड ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी आणण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी सरकारने आवश्यक तयारी केली आहे. शाळा परिसरात जंक फूड विक्री विषयी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर आपलं म्हणनं मांडतांना सरकारने हे संकेत दिले आहेत. केंद्र सरकारने ‘फूड सेफ्टी एन्ड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया’ अर्थात एफएसएसएआय या संस्थेला देशभरातील शाळेच्या कँटिनमध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची चाचणी घेण्यास सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजीव मेहरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती दिलीय. शाळेपासून १५०० फूटाच्या परिघात जंक फू़ड विक्रीवर बंदी घालण्यासंदर्भात नियमावली तयार करण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यातच दिला होता. शाळा परिसरातील निकृष्ठ दर्जाच्या खाद्यपदार्थामुळे शाळकरी मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचं केंद्र सरकारने मान्य केलंय. शाळा परिसरात जंक फूडच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे शाळकरी मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. जंक फूडमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून डॉक्टरही पालकांना नेहमीच जागृत करत आले आहेत. शाळा परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका २०१० मध्ये दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. जंक फूडमध्ये पौष्टिक तत्त्वांचा आभाव असल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच त्याच्या विक्रीवरही बंदी घालण्याची मागणी केली आहे.

जंक फूड; मुलांचा शत्रू

का आलीय ही वेळ?
शाळेच्या परिसरात जंक फू़ड विक्रीवर बंदी घालण्याची तयारी सरकारने सुरु केलीय. मात्र सरकारवर ही वेळ का आलीय. याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आज रोजच्या आहारात जंक फूडचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यामुळे बिगरसंक्रमाणामुळे होणाऱ्या रोगांचं प्रमाण वाढलं आहे. लठठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ह्रदयरोग या आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे रोजच्या खान्यापिन्याच्या सवईतून या रोगांना आमंत्रण दिलं जातंय. जंक फू़ड केवळ शाळकरी मुलांनाच नाही तर मोठ्या माणासांच्या आरोग्यालाही घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्गर, न्यूडल्स, समोसा, चाट, टिक्की आणि तेलात तळलेल्या पदार्थामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी सीएई या संस्थेने जंक फूड विषयी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. तो अहवाल जंक फूड खाणा-यांच्या डोळ्यात आंजन घालणारा आहे. २००५ - २००६ साली झालेल्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार प्रत्येक आठ भारतीयांमागे एक व्यक्ती लठ्ठपणाचा शिकार झाला आहे. शहरी भागात ही संख्या प्रत्येक पाच अशी आहे. लठठपणा हा शरिरासाठी अत्यंत घातक आहे. लठ्ठपणामुळे शरीरात रक्ताच्या गाठी, मधुमेह आणि ह्दय विकाराचा धोका संभवतो. भारतात २००५ मध्ये झालेल्या एकूण मृत्यूंपैकी जवळपास ५० टक्के मृत्यू हे असंक्रमीत रोगांमुळे त्यामध्ये मधुमेह आणि लठ्ठपणाचा समावेश असल्याचं उघड झालं आहे. २०३० सालापर्यंत हे प्रमाण दोन त्रितियांश टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जंक फूडमध्ये असलेलं ट्रान्स फॅट्स शरिरातील धमन्यांमध्ये जमा होतं आणि त्यामुळे धमन्यांचा आकार आतून कमी होत जातो. मीठाचं प्रमाण अधिक असल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि त्याचा परिणाम ह्रदयावर होतो. डब्यूएचओच्या म्हणण्यानुसार शरीराला रोज ५ ग्रॅम मिठाची आवश्यकता असते. मात्र न्यूडल्सच्या ८० ग्रॅम वजणाच्या पाकिटात ४ ग्रॅम इतकं मिठ असतं. भारतातील अनेक बड्या कंपन्या आपल्या उत्पादनाबाबत ग्राहकांना योग्य माहिती देत नसल्याचा आऱोप सीएई या संस्थेने केला आहे. त्यामुळेच या संदर्भातला कायदा आणखी कडक करण्याची मागणी सीएईने केली आहे. जंक फूड तयार करणा-या कंपन्यांवर निर्बंध आणण्याची गरज असल्याचं सीएईचं म्हणनं आहे. आज बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या जंक फूडमुळे शरीराला पौष्टीक तत्व मिळण्य़ाऐवजी एक प्रकारचं स्लो पॉईझनचं दिलं जात आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

जंक फूड; मुलांचा शत्रू

काय परिणाम होतो आरोग्यावर?
जंक फूड बघितल्यानंतर जिभेला अक्षरश: पाणी सुटतं आणि कधी एकदा आपण तो पदार्थ तोंडात टाकतो असं होतं. पण त्यापासून कोणते रोग होण्याची शक्यता असते याचा कधी तुम्ही विचार केलाय का? मुलांनी वारंवार जंकफुडचे सेवन केल्यांन अनेक गंभीर आजाराला सामोरं जावं लागतं. जंक फुडवर संशोधन करणा-या सीएसई संस्थेने अतिशय धक्कादायक अस संशोधन जगासमोर मांडलय. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतात विकले जाणारे बहुतांश डबाबंद खाद्यपदार्थामध्ये आंतरराष्ट्रीय मानंकानाच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आलयं. डब्लुएचओच्या म्हणण्यानुसार दररोजच्या खाण्यात जास्तीत जास्त केवळ एक टक्के ट्रान्स फॅट किंवा अनसेचुरेटेड फॅट असण्याची गरज असते. पण हे प्रमाण मानवी शरिरानुसार बदलतं. एका वयस्क पुरुषासाठी हे प्रमाण २.६ पर्यंत ग्राम असू शकते. स्त्रियांसाठी हे प्रमाण २.१ ग्रॅम पर्यंत वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी हे प्रमाण २.३ पेक्षा जास्त असू नये. पण वास्तव काही वेगळचं आहे. लहान मुलं रडलं कि त्याचा आवता पदार्थ त्याला दिला जातो. मसालेयुक्त वेफर्स किंवा नुडल्स त्याला दिले जातात. हे पदार्थ देतांना मुलाचं रडू थांबवणं हाच उद्देश असतो. मात्र त्याच्या आरोग्याची कोणतीही काळजी घेतली जात नाही. १०० ग्रॅम्सच्या पाकीटात ०.७ ग्रॅम ट्रान्स फॅटस असतात तर चिप्सच्या एका पाकिटात ३.७ ग्रॅम ट्रान्स फॅटस असतात. मोठ्या आव़डीनं खल्ल्या जाणा-या भुजिया सेवच्या पॅकेटमध्येही २.५ ग्रॅंम ट्रान्स फॅटस असतात. हे पदार्थ ट्रन्स फॅट फ्री असल्याचा दावा कंपन्यांकडून नेहमीच केला जातो. मात्र, हे ट्रान्स फॅटस शरीराला हानीकारक ठरतात.

आज जगभर जंक फूडविषयी चर्चा सुरु आहे. जंक फूड शरिरराला घातक आहे का या विषयी मतभेद आहेत. पण आहार तज्ज्ञांच्या मते जंक फू़डमुळे शरीराला नुकसानचं होतं. रोजच्या जीवनात समोसा आणि फ्रेंच फ्राईझ खाण्याकडं लोकांचा कल असतो. पण त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असतं. कोलेस्ट्रॉलमुळे लिव्हरवर विपरीत परिणाम होतो याची अनेकांना जाणीवच नसते. जंक फू़डमुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते, जंक फूडमध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास संभवतो. माणसामध्ये चिडचिडेपणा वाढतो तसेच स्वभाव रागीट बनतो, जंक फूडमुळे माणसाच्या पचनसंस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो, सतत जंक फूड सेवनामुळे तोंड आणि आतड्यांना फोड येतात, आहारातील जंक फ़ूडचं प्रमाणा वाढल्यास लठ्ठपणा येतो, जंक फु़डमुळे थकवा जाणवतो, तसेच माणसाची एकाग्रता कमी होते, माणसाच्या शरिरावर जंक फूडमुळे एव्हडे दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याचं आहार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुलांना त्यापासून दूर ठेवण्यातच शहानपणा आहे.

First Published: Friday, September 7, 2012, 16:51


comments powered by Disqus