बिबट्याचा संघर्ष Leopard in town

बिबट्याचा संघर्ष

बिबट्याचा संघर्ष
www.24taas.com, मुंबई

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या वाढलीय ही एक चांगली बाब आहे..पण भविष्यात माणसाशी त्याचा संघर्ष वाढणार तर नाही ना ? अशी शंका व्य़क्त केली जातेय..आणि हे रोखण्यासाठीच मुंबईकर्स फॉर एस.जी.एन.पी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे..कारण यापूर्वी अनेक वेळा बिबट्या आणि माणूस यांच्या सामना झाला आहे..

गेल्या काही दिवसांत मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात बिबट्या आणि त्याचे माणसावर झालेले हल्ले यामुळे पुन्हा एकदा बिबट्या चर्चेत आला आहे. गेले वर्षभर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि स्वसंयेसवी संस्था ह्यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात बिबट्यांची संख्या वाढवल्याचं आढळून आलं आहे. आता ही संख्या २१ पर्यंत पोहचली आहे. तेव्हा नुकत्याच झालेल्या हल्ल्यामागे वाढती संख्या कारणीभूत आहे का,

मायानगरी मुंबईमध्ये वसलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. जगात मुंबई हे एकमेव महानगर आहे की जिथे चक्क एक राष्ट्रीय उद्यान शहरातच वसलेलं आहे. आता या उद्यानाला मानवी वस्तीचा , वाहनांच्या रहदारीचा विळखा पडलेला आहे. तेव्हा कृत्रिम कुंपणाने वेढलेल्या या उद्यानात बिबट्यांची संख्या आहे तरी किती याचा कॅमे-याच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न गेली वर्षभर सुरु होता. यामुळे सुमारे २१ बिबटे असल्याची माहिती समोर आली आहे. एक बिबट्याचा साधारण १० ते १२ चौ किमी परिसरात फिरतो. त्यामुळे १०४ चौ किमी आकार असलेल्या उद्यानामध्ये हा आकडा अर्थात जास्त आहे. तेव्हा संख्या वाढल्यानेच बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तेव्हा हा निष्कर्ष साफ चूकीचा असल्याचं उद्यानाचे संचालक सुनील लिमये ह्यांचं म्हणणं आहे.

उद्यानाच्या भोवती आरे कॉलनी, कांदिवली, गोरेगांव, बोरीवली, पवई,मुलुंड,भांडूप अशा उपनगरांचा घट्ट विळखा आङे. त्यामुळे अनेकदा बिबट्याचे दर्शन उद्यानाच्या बाहेर या भागात अनेकदा होते. तेव्हा बिबट्यांच्या संख्येबरोबर बिबट्यांचा हालचालीचा अभ्यास, तसंच उद्यानाच्या परिसरातील वस्तीमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्नही गेली वर्षभर सुरु होता. बिबट्या घुसखोर नसून माणुसच त्याच्या हद्दीत घुसखोरी करत आहे. तेव्हा दुस-यांच्या घरात घुसलेल्या माणसाने स्वतःच्या सुरक्षेसाठी काही पथ्य पाळणं आवश्यक असल्याचं मत उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे माहिती अधिकारी जगदीश वाकळे ह्यांनी स्पष्ट केलंय.

तेव्हा बिबट्याचं अस्तित्व सुरक्षित रहाण्यास पावलं उचलली गेली तर आपोआप अख्ख्या अन्नसाखळीचं संरक्षण होणार आहे. यामुळे उद्यानातील ३५ सस्तन प्राणी, ८० उभयचर प्राणी, १५० जातीची फुलपाखरे, २७४ जातींचे पक्षी आणि मुख्य म्हणजे १५०० जातींची विविध वनस्पती ह्यांचे अस्तित्व टिकून रहाणार आहे. यामुळे नुसते जंगलच वाचणार नाही तर मुंबईला शुद्ध ठेवणा-या फुफ्फुसे सुरक्षित रहातील, मुंबईची तब्बेत यामुळे चांगली रहाणार आहे.

थोडक्यात काय बिबट्याला पकडून, बिबट्याच्या मारून, जंगलावरवर अतिक्रमण करुन हा प्रश्न सुटणार नाहीये. तर उद्यानाच्या परिसरात रहाणा-या नागरीकांनी समजूतपणा दाखवला तर बिबटेही सुरक्षित रहातील, जंगल सुरक्षित राहील आणि मनुष्यही या परिसराच निर्भयपणे राहू शकणार आहे.


मुंबईच्या मध्यवर्ती भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे..१०३ चौरस किमी क्षेत्रफळात पसरलेले हे उद्याने म्हणजे मुंबई शहरासाठी शुद्ध हवा पुरवणारं फूफ्फूसचं म्हणावं लागेल..पण गेल्या काही वर्षात त्याला काँक्रीटच्या जंगलाचा विळखा पडला आहे..त्यामुळेच त्या परिसरातील वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे..

First Published: Thursday, March 7, 2013, 23:43


comments powered by Disqus