महाकुंभमेळा Mahakumbhmela

महाकुंभमेळा

महाकुंभमेळा
www.24taas.com, मुंबई

१२ वर्षानंतर येणारं कुंभपर्व, आणि १२ कुंभापर्वानंतरचा महाकुंभमेळा या मुळे अवघ्या देशभर आध्यात्मिक वातावरण पसरलय... एका अनामिक श्रद्धेमुळे देशाच्या कानाकोप-यातून येणारे भाविक महाकुंभपर्वात मोक्षाची एक डुबकी घेतात.. आणि हजारो वर्षाचा हा महाकुंभाचा वारसा चिरंजीव बनून जातो..

बारा पुर्णकुंभानंतर येणा-या महाकुंभमेळ्यास मकरसंक्रातीपासून अलाहाबादच्या गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या नद्याच्या त्रिवेणी संगंमावर सुरुवात झाली. साधुसंताच्या उपस्थितीत सुमारे दोन महिने चालणा-या महाकुंभ मेळ्याची सांगता ही १० मार्चला म्हणजे महाशिवरात्रीला होईल.. यंदाचा महाकुंभ म्हणजे जगातील आजवरचा सर्वाधिक गर्दीचा धार्मिक सोहळा ठरणार असल्याचं पहिल्या शाही स्नानास जमलेल्या जनसमुदायावरुन स्पष्ट झालयं.. कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे केवळ दर्शन नाही तर संतसंग देणारे आध्यात्मिक संमेलन म्हणूनच ओळखलं जातय.. हिंदू धर्मातील एका पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रामंथनावेळी इंद्राचा मुलगा जयंतच्या कलशातून अमृताचे चार थेंब भारतात अनुक्रमे हरिद्वारमधल्या गंगा नदीत, उज्जैनमधल्या क्षिप्रा नदीत, नाशिकमधल्या गोदावरीत, प्रयाग येथील गंगा-यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पडल्याचे सांगण्यात येत. अमृतमंथनावेळी ग्रहांची जी अवस्था होती तशीच स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येतं.. प्रत्येक तीन वर्षानंतर एक असे बारा वर्षात चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर चार कुंभमेळ्याचे आयोजन होत असते. अर्धकुंभ मेळा प्रत्येक सहा वर्षात हरिद्वार आणि प्रयाग इथे भरतो तर पुर्णकुंभ बारा बारा वर्षाच्या अंतराने केवळ प्रयाग येथे भरतो. बारा पुर्ण कुंभमेळ्यानंतर येणारा हा महाकुंभमेळ्यासाठी अलाहाबाद नगरी आता सजलीय. अलाहाबादच्या या महाकुंभमेळ्यात ५५ दिवसांत सहा शाही स्नान होतील.. महाकुंभमेळ्यातल्या मकरसंक्रातीच्या पहिल्या शाही स्नानासाठी देशभरातून एक कोटींपेक्षा जास्त भाविक आले होते. हा सोहळा आता प्रशासनासाठीही अतिशय महत्वाचा ठरलाय.. यावेळच्या महाकुंभासाठी सुमारे १ हजार २०० कोटींचे बजेट असून महसूबल आणि करांच्या रुपाने सरकारच्या तिजोरीत पडणारी रक्कम ही तेवढीच असल्याचे मानण्यात येतेय.. अलाहाबादमध्ये क़डक सुरक्षा आणि सुलभरित्या प्रवास यांची काळजी घेण्यात आलीय.. पुढच्या दोन महिन्यात १० कोटी यात्रेकरुच्या गर्दीत सुमारे १० लाख परदेशी पर्यटकही सामावतील असं सांगण्यात येतय... १४ जानेवारी पासून १० मार्चपर्यंत चालणा-या या महाकुंभमेळ्यात १२ हजार कोटीची उलाढाल होण्याची शक्यता आहे..भारतीय संस्कृतीचा उदघोष जगभर पोहोचवणारा हा महासोहळा अवघ्या जगासाठी एक कुतुहल बनून गेलाय.

हिंदु संस्कृतीवर विश्वास असणारी आणि संस्कृती जपणारी भाविक माणसं महाकुंभासाठी जमलीयत.. पण साधु आणि भाविकांच्या या महामेळ्यात काही असेही चेहरे आहेत की जे थेट परदेशाहून आलेत. केवळ हे जगणं समजावून घ्यायला आणि आपलं आयुष्य समृद्ध करायला..

अलाहाबाद संगमावर उभारलेल्या या तंबुत असलेल्या या परदेशी पाहुण्यांचे नाव आहे मॅथ्य़ू बोईस्वर्ट आणि जॅकब बोईस्वर्ट.. मॅथ्यू हे प्राध्यापक आहेत.. कॅनाडाट् मांट्रीयल युनिवर्सिटी गेल्या 24 वर्षापासून कुंभमेळ्यातल्या वेगवेगळ्या पैलूंचा शोध घेतायत..1989 ला पहिल्यांदा आलेल्या मॅथ्यूनी हा कुंभमेळ्यातल्या भक्तीसंगमाचे दृष्य पाहिलं आणि त्याचवेळी त्यानी आपल्या अभ्यासाचा हा विषय बनवला.

1989 मध्ये भरलेल्या त्या कुंभाचे दृष्य पाहून मॅथ्यू भारावून गेले आणि त्यांनी आपल्या सहका-यांना घेऊन संशोधन करायचं ठरवलं... साधुसंताची मोहमाय़ा त्यागलेली ही दुनिया म्हणजे आयुष्याचा खरा अर्थ असल्याचं आजच्या जनरेशनमधल्या मुलांनाही वाटतय. साधुसंताच्या जगण्याचा शोध घेणा-या या माणसांनी त्यांच्यासारखच जगण पसंद केलय..

कॅनाडाहून आलेल्या अभ्यासपथकानं कुंभमेळ्यातल्या सांस्कृतिक वैभव जाणून घेण्यासाठी त्यांनी गंगासंगमावर तसाच अनुभव आणी आयुष्य अनुभवण्याच ठरवलय.. कारण तस केल्यावरच त्यांच संशोधन हे ख-या अर्थानं पुर्ण होणार आहे..

या महाकुंभमेळ्यात साधु संत, योगी, ऋषी, मुनी, हठयोगी अशा अनेक योग्यांची मांदियाळी असते.. प्रत्येकाचं अध्यात्म एकच असलं तरी त्याची त-हा निरनिराळी असते.. कुणी फक्त एका पायावर चालाणारा, तर कुणी फक्त पाण्यावरच जगणारा... प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत..

महाकुंभमेळा म्हणजे संतसंगाचा महामेळा.. खरतर नाशिकमध्ये दशकभरापुर्वी भरल्या गेलेल्या कुंभमेळ्यात साधुसंताचे आखाडे आणि त्यांचे सांधुसंत, योगी यांच्यावर सा-यांचे लक्ष केंद्रीत झालं होत.. कुंभमेळा, अर्धकुंभ, पुर्णकुंभ आणि महाकुंभ या सा-यात अमृत स्नानाबरोबरच साधुसंत हठयोगी याना पाहण म्हणजे एक सांस्कृतिक संचित असते.. भारताच्या हिंदू संस्कृतीचा आणि भौगोलिक रचनेचा विचार करता या सा-याचं प्रातिनिधीक स्वरुपात या हठयोगीमध्ये दिसते... प्रत्येक हठयोगीची एक वेगळीच अदा असते.

कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वात मोठी धार्मिक यात्रा.. कुंभमेळा म्हणजे एक आध्यात्मिक संमेलनच असते.. प्रत्येक साधूचा संस्कृती जपताना योगीत्व प्राप्त करण्यासाठी हठयोग हा त्याला जगण्याच्या स्वच्छंद शैलीला आवाहन करत असतो.. मनासारखं आयुष्य़ जगताना संस्कृती जोपासली जाते.. या कुंभमेळ्यास केवळ भाविकच नव्हे तर ऋषी, संत, योगी, साधू.. देवदेवातांची तीर्थे कुंभपर्वास येतात हे सारं आज जगाच्या दृष्टीनं अद्वितीय ठरतंय.

First Published: Tuesday, January 22, 2013, 23:32


comments powered by Disqus