तुमच्या अकाऊंटवर दरोडा, May have on the bank robbery Account

सावधान, तुमच्या अकाऊंटवर दरोडा

सावधान, तुमच्या अकाऊंटवर दरोडा
www.24taas.com,मुंबई

तुम्ही ज्या गोष्टीकडे डोळेझाक करता त्याच गोष्टीवर समाजातल्या काही लोकांची बारकाईन नजर असते. तुम्ही अनेकवेळा बॅंकेत जाता किंवा पैशाचे व्यवहार करता. पण जेवढी काळजी नोटांच्या सुरक्षिततेबाबत वापरता तेवढी काळजी चेकबद्दल नसल्याचे वारंवार दिसून आलं आहे. आपल्या याच बेफिकीरीमुळे तुम्हाला फार मोठ्या संकटाला सामोरं जाण्याची वेळ नाकारता येत नाही. य़ावरच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न, अकाऊंटवर दरोडा.

दोन वेगवेगळ्या चेकचे तुकडे जोडून बँक खात्यातून रक्कम काढली जाऊ शकते का ? हे शक्य वाटत नसलं तरी काही ठकसेन टोळ्या ही शक्कल लढवून तुमच्या खात्यातून रक्कम लंपास करू शकतात. तुमच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेण्यासाठी ही टोळी चेक मिळवतात. त्यानंतर ब्लेडच्या सहाय्याने त्या चेकचा आर्धा भाग अलगद कापला जातो. चेकवर जिथ रक्कम भरली जाते आणि त्याखाली चेकधारकाची सही असते तो भाग वेगळा केला जातो.त्यानंतर तशाच पद्धतीच्या एका को-या चेकचा तेव्हडाच भाग कपून त्याला हा चेकचा भाग चिकटवला जातो. अत्यंत चलाखीने दोन वेगवेगळ्या चेकचे भाग एकत्रीतपणे जोडले जातात...त्यामुळे नवीन तयार झालेल्या चेकवर तुमची सही असते पण त्यावर वेगळ्याच व्यक्तीचं नाव असतं.वरवर पाहाता हा चेक सामान्य चेक प्रमाणेच भासतो त्यामुळे कोणाला त्यावर शंका येत नाही.

चेकच्या माध्यमातून हेराफेरी करणारे लोक श्रीमंतांना सावज बनवतात. त्यामगचं कारण म्हणजे त्यांच्या खात्यात मोठी रक्कम असते..त्या खात्यातून काही हजार रुपये चेकच्या माध्यमातून काढून घेतल्यास त्याकडं कुणाचं फारचं लक्ष जात नाही. चेकमध्ये फेरफार करुन फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे.चेकमध्ये हेराफेरी आणि बँक फसवणुकीच्या घटनांमुळे दरवर्षी बँकांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय.. जर अशा प्रकारे फसवणूक करणा-या टोळ्यांवर वेळीच लगाम लावण्यात यश आलं नाही तर कदाचित पुढच्यावेळी तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही..

एक साधं दिसणार पेन तुमची कष्टाची कमाई एका क्षणात लंपास करु शकतं ?.. बँकेचा चेक तुम्ही स्वत: लिहिता.. पण बँकेत गेल्यावर तुम्ही चेक भरण्यासाठी तुमच्याजवळचं पेन वापरता ? कि चेक भरण्यासाठी त्यावेळी बँकेत काऊटर जवळ उभा असलेला एखादा अनोळखी व्य़क्ती तुम्हाला पेन ऑफर करतो.. अस जर कधी घडलं असेल तर हा घटनाक्रम तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

सामान्य पेनाप्रमाणेच हे पेन दिसत असलं तरी हे काही साधंसुधं पेन नाही...हे पेन तुमच्या बँक खात्यातून तुमच्या कष्टाची कमाई एका क्षणात लंपास करु शकतं.होय.या पेनच्या सहाय्याने काही लोक तुमच्या अकाऊंटवर दरोडा घालण्य़ाच्या तयारीत आहे. कारण हे आहे एक मॅजिक पेन.
सावधान, तुमच्या अकाऊंटवर दरोडा

जिथे 2 सप्टेंबरला एक संशयास्पदरित्या सही केलेला एका बँकेचा चेक तपासणीसाठी आला होता. चेकवरच्या सहीची सत्यता पडताळण्यासाठी लॅबमधील तज्ज्ञांनी काम सुरु केलं. जेव्हा फॉरेंन्सीक लॅबमधील एका मशिनमध्ये अल्ट्रा व्हायलेट प्रकाशात तो चेक ठेवण्यात आला तेव्हा एक धक्कादायक बाब समोर आली.

सर्वसाधारण प्रकाशात नेहमीच्याच चेकसारखा दिसणा-या या चेकमध्ये हेराफेरी करण्यात आली होती..वरवर पाहाता असं काही केलं असेल याची कोणालाही शंका येणार नाही. पण अल्ट्रा व्हॉयलेट प्रकाश किरणांनी ती हेराफेरी बरोबर पकडली होती. चेकवर रक्कम भरण्यासाठी जी जागा सोडलेली असते त्याजागी ओव्हरलॅपिंग करण्यात आलं होतं. फॉरेंसिक मशीनमध्ये तो चेक टाकल्यानंतर एका क्षणात सत्य समोर आलं होतं. दुस-याच्या चेकवर बेमालूमणे खाडाखोड करण्यात आल्याचं उघड झालं होतं.

मॅजिकपेनच्या सहाय्याने चेकवर रक्कम भरण्याच्या जागेवर मॅजिक पेनचा वापर करुन नवी आकडा टाकण्यात आला होता.. मॅजिक पेनच्या वापर करुन चेकवर भरण्यात आलेली रक्कम काही क्षणात नाहीशी होते..मॅजिक पेनने लिहिलेली रक्कम नाहीशी झाल्यानंतर दुस-या पेनने ही रक्कम लिहिली गेली होती...अशा प्रकारे चेक धारक आणि बँकेला गंडवण्याचा प्रयत्न केला गेला होता.. अशा प्रकारे फसवणूक करणा-या अनेक टोळ्य़ा आज देशभर कार्यरत असून मुंबईपासून दिल्लीपर्यंत त्यांचं नेटवर्क पसरलं असल्याचं आता हळूहळू उघड होवू लागलं आहे.

पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली... आणि या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आता पोलीस लागले आहेत.. आज देशाची राजधानी दिल्लीत अशा प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे वाढत असल्याचं चित्र पहायला मिळतंय. तुमच्या बँक खात्यावरही अशाच पद्धतीने दरोडा घातला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही...त्यासाठी त्या चलाख टोळ्यांकडून वेगवेगळ्य़ा पद्धतींचा अवलंब केला जात आहे.
सावधान, तुमच्या अकाऊंटवर दरोडा

काय घ्याल काळजी
- कोरा बँक चेक इतरांना देऊ नका
- चेक लिहिण्यासाठी स्वत:चं पेन वापरा
- बँकेत किंवा घरी चेक घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने चेक लिहिण्यासाठी पेन दिल्यास त्याने चेक लिहू नका
- चेकवर रक्कम लिहून बिना सहीचा चेक अनोळखी व्यक्तीला देऊ नका
- रक्कम न भरता सही करुन चेक देऊ नये
- तुमच्या बँक खात्यातून परस्पर व्यवहार झाल्यास तात्काळ बँक खातं बंद करा
- तसेच पोलिसांकडं तक्रार करा

चेक लिहितांना किंवा एखाद्याला तो देतांना या किरकोळ वाटणा-या पण अत्यंत महत्वाच्या बाबींवर लक्ष दिल्यास त्या ठकसेन टोळीली तुम्ही दूर ठेवू शकता..जर तुम्ही या बाबींकडं दुर्लक्ष केल्यास तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वसामान्य माणूस खातेदार म्हणून पैशाचे ट्रान्झेक्शन करताना नेहमीच भांबावलेला असतो.. तुमच्या याच भांबावलेपणावर कुणाची तरीनजर असते.. ठकसेन टोळ्यांना आता मात्र लगाम लागणार आहे.. कारण आता नव्या प्रणालीत क्लिअऱन्सला येणा-या चेकमधील एकादीही फेरफारी ही आता नजरेतून सुटू शकणार नाही.

देशात चेक फसवणुकीचे गुन्हे
- २०१०- २०११ मध्ये १९,८३४ गुन्ह्यांची नोंद
- ३७९९ कोटी रुपयांचं नुकसान
- २०११-२०१२ मध्ये १४,७२७ गुन्ह्यांची नोंद
- ४४४८ कोटी रुपयांचे नुकसान

दिल्लीत चेकच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना
- २०११मध्ये २४ गुन्ह्यांची नोंद
- २०१० मध्ये ३४ गुन्ह्यांची नोंद

बँक चेक आणि ड्राफ्टमध्ये खाडाखोड करुन फसवणूक करण्याच्या घटना वाढत असून अशी फसवणूक करणा-या टोळ्यांवर वेळीच लगाम करण्याची आवश्यकता आहे..अन्यथा अशा फसवणूकीच्या घटना वाढत जाण्य़ाची शक्य़ता नाकारता येत नाही.

First Published: Friday, October 26, 2012, 23:21


comments powered by Disqus