Memorable Rajiv Gandhi, 24taas.com

आठवणीतले राजीव

आठवणीतले राजीव
कसा झाला पायलट ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास ?

राजकारणापासून का दूर होते राजीव गांधी ?

काय होतं राजीव गांधींचं स्वप्न ?

आठवणीतले राजीव

राजीव गांधी... एक अशी व्यक्ती... ज्या व्यक्तीच्या बरोबर देशाची राजकिय भवितव्यही जोडल गेल होत.. त्यांना ठावूक नव्हतं की आपल्या हातून नियती नेमकं काय करुन घेणार आहे ते....राजीव गांधी राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते पण राजकारण मात्र त्यांचा पिछा सोडायला तयार नव्हतं.. इंदिरा गांधींच्या निधनामुळे राजीव गांधींवर अचानकपणे मोठी जबाबदारी येवून पडली होती.... इंदिरा गांधींवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची खबर मिळताच राजीव गांधी पश्चिम बंगालहून दिल्लीत दाखल झाले..दिल्लीच्या एम्स रुग्णालयात इंदिरा गांधींचं पार्थीव ठेवण्यात आलं होतं..राजीव गांधी दिल्लीत पोहोचताच त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गराडा घातला...त्यावेळी सोनिया गांधीही त्यांच्या सोबत होत्या...काँग्रेसच्या संसदीय दलाचा नेता म्हणून राजीव गांधींची निवड करण्यात आल्याचं त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी राजीव गांधींना सांगितलं होतं. इंदिरा गांधींच्या निधनामुळे सोनिया गांधींना मोठा धक्का बसला होता....

राजीव गांधी त्यावेळी सोनियांना समजावण्याच्या प्रयत्न करत होते... माझ्या आईनं पंतप्रधान व्हावं असं असंख्य लोकांना वाटतंय. पण तसं होऊ नये अशी मी आशा करतो.कारण राजकारणामुळे त्यांचा घात होईल अशी मला भीती वाटतेय. अशीच काहीशी भिती त्यावेळी सोनिया गांधींनाही सतावू लागली होती...राजीव गांधी आपल्या आईला पंतप्रधान होण्यापासून रोखू शकले नाहीत त्याच प्रमाणे सोनिया गांधीही राजीव गांधींना देशाची सूत्र हाती घेण्यापासून रोखू शकल्या नाहीत..आपल्या आईचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच राजीव गांधींनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. भारतीय राजकारणावर राजीव गांधींनी आपला वेगळा ठसा उमटवलाय...

त्यांच्या राजकारणावर नेहरु - गांधी घराण्याची छाप होती..राजीव गांधींना हा वारसा ज्यांच्याकडून मिळाला होता त्या व्यक्ती भारताच्या राजकारणातील दिग्गज व्यक्ती होत्या. 15 ऑगस्ट १९४८.... जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून तिरंगा फडवात होते त्याचवेळी लाल किल्ल्यापासून काही अंतरावर असलेल्या कश्मीरी गेटावर त्यांचा नातू राजीवरत्न गांधी यांच्या हातात झेंड्याची दोरी होती.. चार वर्ष वयाच्या राजीवसाठी बहुतेक सत्तेचा हा पहिलाच अनुभव असेल..पण पुढे राजीव गांधींनी सत्तेपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न केला.. १९४४मध्ये मुंबईत जन्मलेल्या राजीव गांधींसाठी जीवन एखाद्या सुंदर स्वप्नापेक्षा काही कमी नव्हतं..

आठवणीतले राजीव

सरोजनी नायडूंचे पत्र

माझ्या प्रिय राजीव, दिवाळीच्या या प्रसंगी तुझ्यासाठी शुभेच्छाचा एक असा दिप प्रज्वलीत केलाय कि, ज्याला कुठलही वादळ विझवू शकणार नाही. तुला एका उज्वल पंरपरा आणि वारसा लाभला आहे. या पुढे अवघं विश्व हे तुझ्यासाठी एक देश असेल, आणि मानवता हेच तुझं घर असेल.

सरोजीनी नायडूंच्या या पत्रातील प्रत्येक शब्द ना शब्द राजीव गांधींनी जणू आपल्या आचरणात आणला होता..तसेच आजोबांसोबत ग्लायडिंग क्लबमध्ये गेल्यानंतर आकाशाला गवसणी घालण्याच्या त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाले होते....त्यामुळेच शाळेत ठेवलेलं हे विमान त्यांचा जणू मित्रच बनलं होतं... दून स्कूलमध्ये शिकणारा हा लाजाळू मुलगा आता मोठा झाला होता...मुलाने भारतातचं रहावं असं इंदिरा गांधींना वाटत होतं...पण राजीव गांधींच्या मनात काहीच होतं..१९६२च्या ऑक्टोबर महिन्यात राजीव गांधींना घेऊन इंदिरा गांधी केम्ब्रिज विद्यापिठात दाखल झाल्या..त्यानंतर ऑगस्ट महिन्यात राजीव गांधींनी केम्ब्रीजची परिक्षा पास झाले...

इंदिराजींचे पत्र

एका आईसाठी हा क्षण खुप हळवा असतो , ज्यावेळी तिचा मुलगा एक मोठा ..
तो आता तिच्यावर अवलंबून नसतो...
यापुढे तो जे काही करेल ते दृष्टीस पडणार नाही
नवीन मित्र होतील ,नवीन संबध होतील आणि नव प्रेमही होईल

राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना पुढचे चार वर्ष एकत्र राहण्याचा क्वचित योग आला असेल....राजीव गांधी एका वेगळ्या विश्वात रमले होते..नवं कॉलेज ...नवा अभ्यासक्रम... नवीन मित्र... आणि एक सेकंडहॅन्ड कार...असं त्यांच विश्व होतं..आपण भारतातील एका मोठ्या राजकीय घरण्याशी संबंधीत आहोत हे राजीव गांधींनी केम्ब्रिजमध्ये शिकत असतांना कधीच उघड होऊ दिलं नाही....


मित्रांसोबत ते पार्टीला जात.... सुट्टीत फिरायला जात असतं...राजीव गांधी आपल्या नजरेतून जगाचा अनुभव घेत होते...फोटोग्राफीचा त्यांचा छंद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता...त्यामुळेच निसर्ग सौंदर्य त्यांना आपल्याकडं आकर्षीत करत असे....पण त्यांचा लाजाळू स्वभाव जराही बदलला नव्हता...होस्टेलच्या जेवणाचा कंटाळा आला की राजीव गांधी आपल्या मित्रांसोबत लंडनमधील या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा अस्वाद घेण्यासाठी येत असतं...आणि याच रेस्टॉरंटमध्ये राजीव गांधींच्या जीवनातील एक महत्वाची घटना घडणार होती...

केम्ब्रिजमध्ये येवून राजीव गांधींना आता तीन वर्ष झाले होते..१९६५मध्ये तो जानेवारीचा महिना होता..अनेक महिन्यांच्या शोधा नंतर १८ वर्ष वयाच्या एका तरुणीला एक रेस्टॉरंट सापडलं होतं जिथ इटालियन भोजन मिळण्याची सोय होती...आणि विशेष म्हणजे हेच व्हर्सिटी रेस्टॉरंट राजीव गांधींच आवडतं रेस्टॉरंट बनलं होतं..लंडनमध्ये पेईंटगेस्ट म्हणून राहणा-या सोनीयांनाही या रेस्टॉरंटमध्ये आपलेपणाचा अनुभव आला.....त्याच दरम्य़ान राजीव गांधी आणि त्यांच्या मित्रांवर त्यांची नजर गेली..


त्या ग्रुपमध्ये एक तरुण पुर्ण वेगळा होता. दिसण्यातही आणि बोलण्यातही तो मृदू आणि सौम्य वाटत होता. त्याच्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यातून मैत्री आणि निरागसत्वाचे भाव झळकत होते. आणि जेव्हा माझी नजरानजर झाली तेव्हा माझे ह्रदय जणू बंदच प़डल्यासारखे वाटलं आणि त्याच वेळेस मला समजलं की हे पहिल्या नजरेतील प्रेम आहे ... त्यानंतर दोन महिन्यांनी राजीव गांधींनी इंदिरा गांधींना एक पत्र लिहिलं...

राजीव यांचे इंदिराजीना पत्र

माझ्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती आली असले यावर तुम्ही कधी विश्वासच ठेवला नाही.. पण आता माझ्या आयुष्यात जी खास व्यक्ती आलीय..तिच्याबद्दल मला ठाम विश्वास आहे कि हे फक्त आकर्षण नाही .. पुन्हा एक महिन्यानंतर राजीव गांधींनी इंदिरा गांधींना एक पत्र लिहिलं..

राजीव यांचे इंदिराजीना पत्र

माझी आता ठाम खात्री झालीय की, मी प्रेमात पडलोय... त्यानंतर राजीव गांधी आणि सोनिया यांचा विवाह झाला... राजीव गांधींशी विवाह झाल्यानंतर सोनिया गांधी दिल्लीत आल्या...आणि हळूहळू दिल्लीच्या वातावरणाशी एकरुप झाल्या..पुढचे १५ वर्ष त्यांच आयुष्य एकदम सुखात गेलं.. सोनिया गांधी यांच्या आजच्या कर्तबगारपणामागे अर्थातच राजीव गांधीनी दिलेल्या आत्मविश्वासाचा आणि त्या काळच्या आठवणींचा अंतर्भाव करणं आवश्यक ठरते..

आठवणीतले राजीव

1966मध्ये राजीव गांधी पायलट बनले होते...भारतातील सर्वात मोठ्या राजकारणी घराण्यातील एक व्यक्ती चक्क राजकीय सत्तेपासून दूर आकाशाला गवसणी घालीत होता..दिल्लीत आल्यानंतर राजीव गांधींनी इंडियन एअर लाईन्समध्ये वैमानिकाची नोकरी पत्करली..त्याचवेळी राजीव गांधींचं कुटुंब वाढलं होतं..ते कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होते..तर त्यांचे लहान बंधू संजय गांधी हे आईला राजकारणात मदत करत होते..दिल्लीच्या १ सफदरजंग रोडवरून इंदिरा गांधी राजकीय आव्हानांचा समाना करीत होत्या तर त्याच घरातून राजीव गांधी नवीन जबाबदारी सांभळत होते..राहुल आणि प्रियंका या दोन मुलांची त्यांच्यावर जबाबदारी होती..

इंडियन एअर लाईन्सची नोकरी करतांना त्यांनी आदर्श पित्याचं कर्तव्य पार पाडलं..मुलांच्या शाळेतील वर्षीक समारंभ असो की घरातील छोटामोठा कार्यक्रम राजीव गांधी वेळात वेळ काढून कुटुंबासोबत वेळ घालवीत असत...सगळं काही सुरळीत सुरु असतांनाच जणू काही त्यांच्या सुखी कुटुंबाला दृष्ट लागली...आकाशाला गवसणी घालणा-या संजय गांधीचं एका दुर्घटनेत निधन झालं....संजय गांधीच्या अचानक जाण्यामुळे इंदिरा गांधी राजकारणात एकाकी झाल्या होत्या...आणि तिच बाब राजीव गांधींना सतावत होती..

संजय गांधीच्या निधनानंतर ११ महिन्यांनी राजीव गांधींनी इंडियन एअर लाईन्सची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला....खरं तर तो काळ राजीव गांधीच्या जिवणातील अत्यंत कसोटीचा काळ होता..एकीकडं कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेहण्याचा निर्णय होता तर दुसरीकडं सोनीया,राहूल आणि प्रियंकाची जबाबदारी त्यांच्यावर होती. 15 वर्षात पहिल्यांदाच राजीव आणि माझ्यात तणावाचे संबध निर्माण झाले होते. माझी लढाई त्यांच्यासाठी होती, माझी लढाई माझ्या मुलांसाठी होती, कुटूंबाच्या स्वातंत्र्यासाठी होती, जे आम्ही अतिशय प्रेमानं जममा केलं होतं..

आठवणीतले राजीव

त्या बाबीवर बरेच दिवस खल झालं..पण मग एके दिवशी सगळं काही शांत झालं...तसं पहायला गेलं तर राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एका नव्या राजकीय युद्धाची ती सुरुवात होती..राजीव गांधींनी राजकारण जाण्याचा निर्णय घेतला होता आणि सोनिया गांधींनी त्याला सहमती दर्शवली होती..

ते माझे राजीव होते. आमचं एकमेकांवर खूप होते.. आपल्या आईची मदत करावी असं जर त्यांना वाटलं असेल तर त्यांना साथ देणं हे माझही कर्तव्य होतं..

राजीव गांधींसाठी राजकारणातील हा पहिलाच अनुभव होता..त्यांनी अमेठी मतदार संघातून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली...त्या निवडणुकीत खरा भारत जवळून पहाण्याचा त्यांना योग आला..तसेच भारताची जनताही एका नव्या युगातील नेत्याकडं मोठ्या आशेनं पहात होती...


अमेठीत आल्यानंतर राजीव गांधींनी सर्वप्रथम अमेठीच्या विकासाचं एक मॉडेल तयार केलं..विमान टेकऑफ करण्यापूर्वी एक वैमानिक म्हणून जी काही तयारी करावी लागते तशीच तयारी त्यांनी आपल्या मतदारसंघाबाबात केली होती..


राजीव गांधींनी आपल्या मतदार संघाची प्रत्येक माहिती गोळा केली होती..तसेच भारतीय राजकारणात पहिल्यांदाच कॉम्प्यूटरचा वापर करण्यात आला होता..

भारताला २१ शतकाकडं नेहण्यासाठी राजीव गांधींनी पहीलं पाऊल उचललं होतं... आधुनिक भारताला कॉम्प्यूटरची गरज असून ती राजीव गांधीनी त्याकाळीच ओळखली होती...आणि त्यामुळेच त्यांनी कॉम्प्यूटरचा आग्रह धरला होता.. राजीव गांधींनी कॉम्प्यूटरच्या मदतीने अमेठीचा डेटाबेस तयार केला होता....विशेष म्हणजे आपल्या वाढदिवसापूर्वी दोन दिवस आधी राजीव गांधींनी खासदारकीची शपथ घेतली होती...

First Published: Monday, August 20, 2012, 23:08


comments powered by Disqus