New Inning

नवी इनिंग!

नवी इनिंग!

www.24taas.com, मुंबई

एक जगातली महान क्रिकेटर ...तर दुसरी बॉलीवूडमधील एक दिग्गज अभिनेत्री...आपल्या क्षेत्रात त्यांनी वेगळ स्थान निर्माण केल असून आता एका वेगळ्या क्षेत्रात त्यांनी नव्याने पाऊल टाकलंय..देशातील जनतेच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत..पण जनतेच्या आशा अकांक्षा ते दोघे पूर्ण करु शकणार आहेत का हाच खरा प्रश्न आहे...

खासदार सचिन तेंडूलकर आणि रेखा यांची नवी इनिंग सुरु झालीय..बुधवारी जवळपास दिड तास ते सभागृहात होते..पण त्या वेळी काही खासदारांनी राज्यसभेत जोरदार गोंधळ केला..त्यामुळे ते दोघे तो गोंधळ पाहून चांगलेचं अचंबित झाले होते...
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे बुधवारी राज्यसभेत खासदारांनी गोंधळ घातला. सभागृहात उपस्थित असलेल्या खासदारांना या गोंधळाची पुरेपूर कल्पना होती...पण त्यातील दोन खासदार मात्र त्या गोंधळामुळे चांगलेच हैराण झाले होते..कारण राज्यसभेत त्यांचा पहिलाच दिवस होता..आज पर्यंत संसदेची कार्यवाही त्यांनी केवळ टीव्हीवरच बघितली होती..पण आता ते स्वता त्या सभागृहात बसले होते पण त्यांच्यासाठी हा पहिलाच अनुभव होता...


राज्यसभेतील तो गोंधळ पाहून हैराण झालेले ते दोन खासदार दुसरे तिसरे कोणी नसून क्रिकेटचा बेताज बादशाह सचिन तेंडूलकर आणि बॉलिवूडची अभिनेत्री रेखा हे दोघे होते..१०३ क्रमांकाच्या सीटवर बसलेल्या सचिनच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते...सभागृहात काय सुरु आहे याचा त्याला अंदाज येत नव्हता...त्यामुळे सचिनने शेजारी बसलेले खासदार विजय मल्ल्या यांना त्या विषयी विचारलं..विजय मल्ल्या हे १०४ क्रमांकाच्या सीटवर बसले होते..
सचिन प्रमाणेच रेखासाठीही हा एक वेगळाच अनुभव होता...सभागृहातील गोंधळ पाहून तिला काही सुचेनासं झालं होतं...एव्हड्या गोंधळातही रेखा मात्र शांत होती...सगळी कार्यवाही ती पहात होती... आपल्या अनोख्या आदाकारीने रेखाने रुपेरी पडदा गाजवला आहे..

क्रिकेटच्या मैदानावरचा गोंधळ सचिनने बघीतला आहे...पण राज्यसभेतील खासदारांनी घातलेला गोंधळ त्यांच्यासाठी अगदी नवा होता..बुधवारचा दिवस त्यांच्यासाठी पहिला दिवस होता..आगामी सहा वर्षात त्यांना अनेक वेळा या अनुभवला सामोरं जावं लागणार आहे...
सभागृह सुरु होण्यास केवळ १५ मिनिट बाकी होते...त्याचवेळी निळ्या रंगाच्या एका अलिशान कारमधून एक व्यक्ती उतरली. आणि तिच्याकडं सगळ्यांच्या नजरा वळल्या...कॅमे-याचे फ्लॅश चमकू लागले...प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याच्याकडं धाव घेतली....ती व्यक्ती होती गॉड ऑफ क्रिकेट अर्थात सचिन रमेश तेंडूलकर...राज्यसभेत एक खासदार म्हणून सचिन पहिल्यांदाच सभागृहाच्या कार्यवाहीत सहभागी होण्यासाठी आला होता....या खासदाराकडून इतर खासदारांना मोठ्या अपेक्षा आहेत...
सचिन संसद परिसरात दाखल झाल्यानंतर काही वेळेतच अभिनेत्री रेखी सभागृहाच्या कार्यवाहीत सहभागी होण्यासाठी आली...तिच्या समवेत संसदीयकार्यमंत्री होते...तिथ आल्यानंतर रेखा सरळ सभागृहात गेली..सभागृहातील ९९ क्रमांकाच्या असनावर ती स्थानपन्न झाली..

सचिन तेंडूलकर हे क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव आहे..तर रेखाही बॉलीवूडची एक बडी हस्ती आहे..हे दोघेही आपआपल्या क्षेत्रात केवळ यशस्वी झालेत असं नाही तर त्यांनी आपलं वेगळ स्थान निर्माण केलं आहे..पण आता ते दोघे खासदार म्हणून भूमिका पारपाडणार आहेत..पहिल्या दिवशी ते दोघे दिडतास सभागृहात बसले असले तरी...आगामी काळात मोठी इनिंग खेळण्याचा त्यांचा इरादा आहे...क्रिकेट प्रेमींनी सचिनला क्रिकेटचं देवत्व दिलं आहे...आणि त्यामागचं कारण म्हणजे त्याचा खेळ आणि क्रिकेटवर असलेलं त्याचं प्रेम...क्रिकेट हा त्याचा श्वास आहे...आणि तो कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचा श्वास बनलाय...क्रिकेट जगतात सर्वोच्च स्थानावर असलेल्या हा मास्टर ब्लास्टर खासदार म्हणून यशस्वी होणार का असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही..

तो जेव्हा क्रिकेटच्या मैदानात उतरतो तेव्हा क्रिकेटप्रेमींच्या अंगात जणू उत्साह संचारतो. तो जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघातील बॉलरच्या काळजात धडकी भरते. त्याच्यासाठी कोट्यवधी भारतीयांचा श्वास रोखला जातो .. तो खेळतो तेव्हा धाव फलकावर धावांचा डोंगर उभा रहातो...तो क्रिकेटचा विक्रमादित्य आहे....

क्रिकेट जगतात मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणा-या सचिन तेंडूलकरणे क्रिकेटचं एव्हरेट गाठलं आहे...धावांचे अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.....पण हाच विक्रमादित्य आता नवी भूमिका बजावणार आहे...राज्यसभेत खासदार म्हणून तो नवी जबाबदारी पार पाडणार आहे.. पण क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे त्याने यश मिळवलंय त्याच प्रमाणेच त्याला खासदारकीत यश मिळेल का ? क्रिकेट प्रमाणे तो संसदेतही मोठी खेळी खेळणार का ? सचिन खेळणार मोठी खेळी ? सचिन खासदार म्हणून चोख भूमिका निभावणार ?सामान्य जनतेचे प्रश्न राज्यसभेत सचिन मांडणार का ?

बुधवारी सचिनने राज्यसभेच्या कार्यवाहीत सहभाग घेतला... पण पहिल्याच दिवशी गप्प का बसला सचिन ? पहिल्या दिवशी सचिनने एखादा प्रश्न विचारील अशी जनतेला आशा होती...पण आता आगामी काळात तरी तो जनतेचे प्रश्न विचारील अशी आशा आहे... ग्राफिक्स इन -पण त्याला लोकांच्या मुलभूत प्रश्नांची आहे का जाण ? असा सवालही केला जात आहे...लोकपालच्या मुद्द्यावरुन देशात रान पेटलं होतं त्या लोकपालबाबत सचिनच काय मत आहे ?
असे अनेक प्रश्न आज जनतेच्या मनात असले तरी त्याचं उत्तर जनतेला मिळणार आहे पण त्यासाठी त्यांना काही काळ वाट पहावी लागणार आहे..

नवी इनिंग!

रेखाने रुपरी पडदा गाजवला आहे...अनेक सिनेमातील भूमीका अजरामर केली आहे...आजच्या पिढीवरही तिच्या अभिनयाचा जादू कायम आहे...पण अभिनयाच्या क्षेत्राप्रमाणे खासदार म्हणून तिला यश मिळेला का हाच खरा प्रश्न आहे..
कोट्यवधी सिनेरसिकांच्या मनावर मोहिनी घालणारी अभिनेत्री ....रेखा .... एक मुर्तीमंत सौंदर्य आणि उत्तम अभिनयाचा वारसा तिला लाभला आहे...बॉलिवूडच्या अनेक सिनेमातून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजच्या पिढीवरही तिच्या अभिनयाची जादू कायम आहे..बॉलिवूडमध्ये यशस्वीपणे करीअर केल्यानंतर आता रेखा खासदार म्हणून नवी भूमिका पेलण्यास सज्ज झालीय...

रुपेरी पडद्यावरचा हा सुंदर चेहरा थेट राजकारण्यांच्या पंक्तित जावून बसल्यामुळे आता अनेक प्रश्नाना जन्म मिळालाय.. कारण हे प्रश्न आहेत रेखा नावाशी जोडल्या गेलेल्या आत्मयितेशी आणि तिच्याक़डून असलेल्या अपेंक्षाविषयीचे...
रुपेरी पडद्यावरच्या यशाची राजकारणात रेखा पुनरावृत्ती करणार का ? एक खासदार म्हणून सामान्यांच्या अपेक्षा रेखा पूर्ण करणार का रेखा ? लोकांच्या प्रश्नांना रेखा वाचा फोडणार का ? जनतेला भेडसवणा-या प्रश्नांची रेखाला आहे का जाण ? तसेच लोकपालवर रेखाचं मत काय ?

असे अनेक प्रश्न जनतेच्या मनता आहे...पण बुधवारी रेखाने पावसाळी सत्राच्या पहिल्याच दिवशी हजेरी लावून आपण खासदारकीच्या भूमिकेला योग्य न्याय देणार असल्याचं दाखवून दिलं आहे...
आपली अदांनी घायाळ करणा-या रेखानं बॉलीवूडमध्ये अनेक यशस्वी चित्रपटांचा सिलसिला दिलाय.. आता खासदार बनल्यावर आता याच यशाची पुनरावृत्ती होण्याची आशा पल्लवित झाल्यायत..
या देशात बॉलीवुड आणि सिनेकलावंत हे एक सर्वसामान्यासाठी नेहमीच औत्सुक्याचा विषय राहीलाय.. दररोजच्या जगण्यात असणा-या सर्वसामान्यांच्या अनेक अपेक्षा आहेत. या अपेक्षा पुर्ण करण्यात रेखा कितपत यशस्वी होते याकडे सा-यांच लक्ष लागलय

सर्वसामान्याना भ्रष्टाचारापासून महागाईपर्यंत अनेक प्रश्नांना पावलोपावली सामोरं जावं लागत.. सर्वसामान्याचा आवाज बनून राज्यसभेत गेलेली रेखा या प्रश्नांना वाचा फोडणार का हा सवाल अतिशय महत्वाचा आहे..मितभाषी अशी एक ओळख असणा-या रेखांच समाजासाठी योगदान काय असा नेहमीच सवाल विचारला जातोय.. या निमित्तानं हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालाय..उंची आयुष्य जगणा-या आणि नेहमीच सर्वांपासून दुर राहणा-या रेखाला लोकांना भेडसावणा-या समस्यांची रेखाला जाण आहे का हा प्रश्नही विचारला जातोय..अवघ्या देशात भ्रष्टाचारावरुन काहूर माजलय.. या परिस्थीतीत लोकपालाचा मुद्दा आता संसदेत चर्चेला येणार आहे. त्यावेळी रेखाची भूमिका काय असेल..

First Published: Friday, August 10, 2012, 23:11


comments powered by Disqus