Last Updated: Tuesday, November 27, 2012, 21:14
www.24taas.com, मुंबई येत्या काही महिन्यात तुमच्या घरी लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही..काहींच्या मते आगामी काळात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे..
होय...सोन्याचा भाव किती वर जाईल याची खात्री कोणीच देवू शकत नाही..सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या किंमतीने ३१ हजार रुपयांचा आकडा पार केला होता..काहींच्या मते सोनं ३५ हजाराचा आकडा लवकरच पार करणार आहे...
आजच्या परिस्थितीत स्टॉक एक्स्चेंजच्या तुलनेत सोन्यातून चांगला लाभ होतोय..
- गेल्या दहा वर्षात सेन्सेक्समधून १९.३२% रिटर्न मिळाले तर सोन्याने २१.६८ % व्याजदराच्या हिशोबाने रिटर्न मिळाला
- तुम्ही २००२मध्ये शेअर्स आणि सोन्यात एक - एक हजार रुपये गुंतवले असते तर शेअर्समधून तुम्हाला ५८४९ रुपये मिळाले असते तर सोन्यातून ७११५ रुपये मिळाले असते पण गुंतवणूक बाजारात भविष्याची कोणतीच खात्री घेता येत नाही..त्यामुळे सोन्याची ही चमकही धोका देवू शकते असं काहींच म्हणण आहे..
आज बाजारातील परिस्थिती पहाता गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं सर्वात वरच्या स्थानवर असल्याचं दिसून येईल..त्यामुळेच आगामी काळात सोनं आणखीच भाव खाणार यात कोणालाच शंका नाही..
................
दिवस सणासुदीचे आहेत.. तुम्ही सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करायचं ठरवलं असेल..तर थोडं थांबा...कारण सोनं खरेदी करतांना थोडी सावधानगिरी पाळणं महत्वाचं आहे..हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेची गॅरेंटी देते.. म्हणूनच प्रत्येक वेळी सोन्याची खऱेदी करताना हॉलमार्कचे दागिने खरेदी करण्यावर भर द्या...
लग्नसमारंभ आणि सणासुदीमुळे सध्या सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढलीय.....पण सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करताना सावधान.. कारण तुमची आयुष्यभराची कमाई पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..
सोनं खरेदी करताय ? फसवणूकीपासून सावधान !
जर तुम्ही केवळ सराफाच्या शब्दावर विश्वास ठेवून सोन्य़ाचे दागिने खरेदी करणार असाल तर सावधान..
सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतेवेळी पक्की पावती घ्या.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करा..
शुद्धतेची निशाणी हॉलमार्कचे दागिने
हॉलमार्कची खूण ही सोन्याच्या शुद्धतेची गॅरंटी देते.. या निशाणीवरच तुम्ही तुमच्या सोन्याची पारख करु शकता..
24 कॅरेट सोनं हे शुद्ध मानलं जातं.. 24 कॅरेटला जर 1000 संख्या मानली तर 23 कॅरेटमध्ये 958 सोनं असेल.. हेच कारण आहे, की 23 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 958 असं लिहिलं जातं..याच आधारावर हॉलमार्कच्या दागिन्यांवर हॉलमार्कचा त्रिकोणी लोगो आणि संख्या लिहीलेली असते..
अंकावरुन ओळखा सोन्याची शुद्धता
हॉलमार्क दागिन्याच्या शुद्धतेवरुन त्याला अंक दिले जातात..
23 कॅरेट शुद्ध असणा-या सोन्याच्या दागिन्यावर 958 अशी संख्या लिहीली जाते. या प्रमाणेच 22 कॅरेट दागिन्यांवर 916 , 21 कॅरेट दागिन्यांवर 875, 18 कॅरेट दागिन्यांवर 750 , 17 कॅरेट दागिन्यांवर 708 अस लिहीण्यात येतं..
शुद्धतेची निशाणी हॉलमार्कचे दागिने सोने खरेदी करणा-या ग्राहकांमध्ये हॉलमार्क संदर्भात आजून म्हणावी तेव्हडी जागरुकता आली नाही... शहरात हॉलमार्कच्या दागिन्यांची विक्री होत असते.. पण अजुनही ग्रामीण भागात शब्दावर विश्वास ठेवून दागिन्यांची खरेदी करतात.
देशभरात फक्त 9 हजार 300 सराफांकडेच गोल्ड हॉलमार्कची लायसन्स आहेत.. देशभरातील छोट्या दुकांनाचा विचार केला तर त्याची संख्या 17 लाखाच्या घरात आहेत.. याचाच अर्थ देशभरात जास्त ग्राहक हे आज शुद्धतेकडे लक्ष न देताच सोन्याच्या दागिन्याची खरेदी करतात..
................
जर तुम्ही गुंतणूकीच्या दृष्टीनं सोनं खरेदी करणार असाल तर गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड हे पर्य़ाय चांगले आहेत..कारण ईटीएफमध्ये ना तुम्हाला दागिने घडवण्यासाठी मजूरी द्यावी लागते ना वॅट आणि अन्य टॅक्सचा भार तुमच्या खिशावर पडण्याची शक्य़ता असते..
ईटीएफच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करा
सप्टेंबर महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणूकीचा आकडा ११ हजार कोटीच्या घरात गेला आहे..गेल्या वर्षी मे महिन्यात हाच आकडा ५००० कोटीच्या घरात गेला होता..याचाच अर्थ दिड वर्षापेक्षा कमी कालावधीत गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक दुप्पटीपेक्षाही वाढला आहे..
सोन्याच्या फंडमध्ये गुंतवणूक वाढण्याची काही कारणे आहेत..
किंमत, शुद्धता, सुरक्षीतता आणि किती किंमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केले आहेत ही त्यापैकीच काही कारणं आहेत..
गोल्ड ईटीएफ आणि किंमत
कोणत्याही गुंतवणूकीसाठी किंमत महत्वाची ठरते...गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून सोनं खरेदी करणा-याला दागिने घडण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही..साधारणपणे सोन्याची दागिने तसेच सुवर्णमुद्रा तयार करण्यासाठी दहा टक्क्यांपर्यंत घडणावळ द्यावी लागते..त्या तुलनेत गोल्ड इटीएफच्या माध्यमातून सोनं खरेदी करण्यासाठी कमी पैसे लागतात....
गोल्ड ईटीएफ आणि शुद्धता
गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून सोनं खरेदी करतांना काळजी करण्याचं कारण नसतं...त्यामध्ये सोन्याची शुद्धता ९९.५ टक्के असते..पण सराफाकडून खरेदी केललेल्या सोन्याच्या दागिण्याच्या शुद्धतेविषयी शंका असते..हॉलमार्कचे दागिने खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागते..बँकेतून विकल्या जाणा-या सुवर्णमुद्रांमध्ये सोन्याची शुद्धता पहायला मिळते...पण त्या मुद्रेसाठी घडणावळ द्यावी लागते..
गोल्ड ईटीएफ आणि सुरक्षा
घरात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच सातवत असतो..चोरांची नजर पडल्यास दागिने हातचे जाण्याची भीती असते...पण गोल्ड ईटीएफमध्ये कोणतीच भीती रहात नाही..
गोल्ड ईटीएफ आणि खरेदीची क्षमता
सोन्याची किंमतीत वेगाने वाढ होत आहे..त्यामुळेच एक ग्रॅम सोन्याच्या खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते...दुकानातून तुम्ही शंभर दोनशे रुपयात सोनं खरेदी करु शकत नाही..पण गोल्ड ईटीएफच्यामध्यमातून तुम्ही १०० रुपयांचं सोनही खरेदी करु शकता..
गोल्ड ईटीएफ आणि टॅक्सचा फायदा
गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक केल्यास सेल्स टॅक्स , वॅट आणि सिक्युरिटी ट्रांन्जॅक्शन टॅक्स द्यावा लागत नाही..
तसेच गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्नस मिळतात..त्यामुळेच मोठ्या कालावधीसाठी होल्ड फंडात गुंतवणूक केल्या फायदा होऊ शकतो असं तज्ज्ञांच मत आहे...
.............
सोन्य़ाची किंमत आकाशाला भि़डल्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणा-यांना सोनं खुणावू लागलंय...पण आजच्या परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक योग्य आहे का यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...
सोन्याचा भाव गगनाला भिडल्यामुळे सगळ्यांच्याच नजरा सोन्यावर खिळल्या नाही तर नवलंच..
जागतीक बाजारात सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झालीय...सोन्याने आजपर्यंत सगळेच विक्रम मोडीत काढले आहेत..लग्नसराई सुरु झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं बोललं जातंय..पण आगामी काळातही सोनं आणखी भाव खाणार का? असा प्रश्न सोन्यात गुंतवणूक करणा-यांना पडला आहे.... शेअर मार्केट तज्ज्ञांच्या मते आज अतंरराष्ट्रीय पातळीवर डॉलर कमजोर झाल्यामुळे सोन्याला मागणी वाढली आहे...
भारत तसेच एशियन देशात प्राचिन काळापासून सोन्याला महत्व आहे..त्यामुळे भारतात सोन्याला सतत मागणी असते...सोन्याशी अनेक परंपरा जोडल्या असल्यामुळे ठरावीक सणासुदीला लोक सोनं खरेदी करतात..पण जे लोक आज गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहे त्यांनी विचारपुर्वक तो निर्णय घ्यावा असा सल्ला शेअरमार्केट तज्ज्ञांनी दिलाय..
गेल्या काही वर्षात सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत आहे..त्यामुळे सोन्यातील गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला बराच फायदा झाला आहे..पण भविष्यात हीच परिस्थिती कायम राहिल याची खात्री देता येत नसल्याचं शेअर मार्केट तज्ज्ञांच म्हणणंआहे..
आज डॉलर कमजोर आहे आणि इक्विटी मार्केटची परिस्थीत कठीण असल्यामुळे लोक सोन्यात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत...पण पुढच्या काळात परिस्थीती बदलायला वेळ लागणार नाही असं काहींना वाटतंय...त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करतांना सर्वबाबींचा विचार करुनच गुंतवणूक करावी असा सल्ला शेअर मार्केट तज्ज्ञांनी दिलाय.
First Published: Tuesday, November 27, 2012, 21:11