खेळ मांडियेला... Olympics

खेळ मांडियेला... 'रिओ दि जनेरो' सज्ज!

खेळ मांडियेला... 'रिओ दि जनेरो' सज्ज!
www.24taas.com, मुंबई

एखाद्या राष्ट्रीय किवा आंतरराष्ट्रीय सोहळ्याच्य आयोजनाची जबाबदारी म्हणजे केवळ सोहळा तो यशस्वी करण एवढच मर्यादित नसतं. तर त्या सोहळ्यासाठी अनेक पुरक सोयीसुविधा निर्माण कराव्या लागतात.. त्या पु-या करतानाचा अनेक पायाभुत सुविधांची नव्यान बांधणी करावी लागते.. बीजीग ऑलिम्पिकने चीनची ताकद जगाला दाखवून दिली आणि आता लक्ष लागलय़ ते 2016 च्य़ा ऑलिम्पिक सोहळ्याची..

2008 ला चीनने ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकांची लयलुट केल्यावर अवघ्य़ा जगभर चीनने क्रिडाक्षेत्रात आपल्य़ा यशाची आणि आयोजनाचा डंका पिटला होता.. भौगोलिकदृष्ट्या मोठ पण गरीबीनं त्रस्त असलेले शहर अशी 2008 पर्यंत चीनची ओळख पसरलेली होती.. पण 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत चीननं ओपनिंग सेरमनिलाच जो धमाका केला होता. त्या शक्तीशाली प्रदर्शनानं अवघ्या जगाचे डोळे दिपले गेले होते.. एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन आणि त्याच यशस्वी नियोजन करताना चीनने केलेले संधीचे सोन केल होत.. एव्हाना 2012 सालच्या ऑलिम्पिक लंडनने आपल्या नियोजनची तयारीही सुरुवात केली होती.. म्हणूनच आता लक्ष लागले होते ते 2016 कडे.. 2016 साली अनेक देशानी आपली आपली मक्तेदारी ठोकली होती.. त्या सर्वाची कसोटी घेत, ऑलिम्पिक संयोजन समितीच्या अंतिम निकालाचा दिवस अखेर उजाडला..

इच्छुक मान्यवर देशांच्या प्रतिनिधीसमोर नव्या यजमानाची घोषणा होणार होती... अंतिम फेरीत चार देश टक्कर देण्यास सज्ज होती.. रिओ दि जानेरो, माद्रिद, टोकीयो, आणि शिकागो.. चारही देशानी आयोजनाचा मान मिळावा म्हणून पक्की कंबर कसली होती.. आणि अखेर आयओसीचे अध्यक्ष जेक्वसे रॉजे यांनी 2016 च्या ऑलिम्पिंक सोहळ्यासाठीच्या यजमानानी घोषणा केली..

अंतिम फेरीत माद्रीदला मात देत 2016 साठी ब्राझीलमधील रिओ दि जानेरोची निवड झाली.. कोपेनहेगनेची ही बातमी रिओ दि जानेरोच्या किनारपट्टीवर पसरली आणि मग मऊशार वाळूवर मौजमजा मस्तीनं जणू ठाणच मांडल.. अवघ्या जगाला आपली नव्यानं ओळख देण्याची संधी मिळाली रिओ दि जानेरो ला मिळाली होती.. गेली पाच वर्ष रिओच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात आता एकच ध्येय आहे ते म्हणजे 2016 चे ऑलिम्पिक.. निसर्गाच्या कुशीत वसलेल्य़ा रिओचा आता चेहरा बदलत चाललाय.. ओपनिंग सेरेमनीला अजुन तीन वर्ष असली तरी रिओनं तयारी मोठ्या विलक्षण वेगानं सुरु केलीय.. कामाच्या झपाट्यात कुठलाही संथपणा नाहीय.. खेळ अवघ्या देशाचे चित्र कसं पालटतो त्याच उत्तम उदाहरण म्हणजे रिओ दि जानेरो...

ऑलिम्पिक समितीन 2016 साली रिओ दि जानेरोची निवड झाली आणि सगळ्याचं लक्ष वेधलं ते ब्राझीलच्या या शहरावर.. ब्राझीलची राजधानी असलेल्या या शहराचा निसर्गरम्य वारसा आणि त्यात भर पडणारी ऑलिम्पिकच्या आयोजनाची जबाबदारी यामुळे सा-या जगाची नजर आता रिओ दि जानेरोवर खिळलीय..


रिओ दि जनेरो.. जगातल्या सुंदर शहरापैकी एक मन लुब्ध करणारं शहर.... दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझीलमधलं हे शहर आता सगळ्या जगाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलय.. रियो दि जनेरो ही ब्राझीलची राजधानी आहे.. दक्षिण अमेरिकेतलं तीस-या क्रमाकांचे शहर अशी ही रिओची ओळख आहे.. ब्राझीलची आणि रिओची तशी राजधानी म्हणून नात घट्ट आहे.. 1763 पासून 1822 पर्यंत या पहिल्या टप्यात आणि 1822 ते 1960 या पर्वापर्यंत.. इतिहासाच्या पानावर नजर टाकल्यास हे दोन टप्पे रिओ दि जानेरो साठी अतिशय महत्वाचे ठरतात.. पोर्तुगाल साम्राज्याच्या खुणा सांगणारं हे शहर आजही जगाच्या दृष्टीनं एक कुतुहल म्हणून पाहिलं जातं.. एकाचवेळी अथांग सागर आणि उंच पर्वत रांगाचे सानिध्य लाभलेले पर्यटनस्थळ.. उंच पठारावर असलेली क्रिस्टो रिंडेटॉर पाहण्यासाठी नेहमीच पर्यटकांच्या रांगा लागलेल्या असतात.. क्रिस्टो रिंडेटॉर पाहण हा एक नित्यनवा अनुभव असतो.. अनेक कारणांमुळेच जगभरातल्या पर्यटकांचे रिओ दि जनेरो आवडत स्थळ बनलय.. रिओ दि जनेरो मधील अनेक समुद्रकिनारे हे नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले असतात.. या शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्यानं पर्यटनावरच अवलंबुन आहे.. आल्हाददायक वातावरणामुळे नेहमीच हे ठिकाणी हॉटस्पॉट राहीलाय... आता हे शहर नव्या आव्हानाला सामोर जातय.. 2016 च्या ऑलिम्पिकसोहळ्याच्या आयोजन पर्वाला..


खर तर या शहराला स्वप्न पाहण्याचा आणि स्वच्छद जगण्याचा शौक आहे.. छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधणं ही रियोवासियांची आता सवयच बनलीय़.. आणि या मऊशार वाळूत, हिरव्यागार पठारात आपसूकच रुजलीय ती क्रिडासंस्कृती..

पठारावरच्या करामती करता करता त्यातच त्वायकांदो दिसतो...

कधी कधी जगता हाता-पायानं झटका, न कळत बनून जातो पोलो किवा हॉकीही..

सागरतटावरच्या वाळूच साद घालते बीच हॉलीबॉलला..

अथांग सागरातली माशासारखी लयबद्ध चाल पोहणं शिकून जातं..

बॅटमिंटनची रिओ शैली..

तलवारबाजीची थरारक कसरत..

सरकन भिरभरणारी जिम्नॅस्टीकची अदा.. सगळ सगळ सामावलय रिओच्या मातीत.. आणि या सगळ्याला घेऊन रिओ द जनेरो नियोजनबद्ध वाट पाहतय ती 2016 च्या ऑलिम्पिकची..

रिओ द जनेरो म्हणजे पर्यटकांचे हॉट डेस्टीनेशन.. निळाशार समुद्राची खोलाई, क्रिस्टो रेंडॉटॉरची भव्य़ता.. सांबा नृत्याचा नाद आणि कार्नीवलची मॉजमस्ती या सारख्या पांरपारिक वातावरणात आय़ुष्य़ जगणा-या रिओवासियांची जीवनशैली आता मात्र बदलणार आहे.. 2016 साली होत असलेल्य़ा ऑलिम्पीकसाठी रिओ द जानेरोत अनेक पायाभूत गोष्टी नव्यानं बाधण्य़ात आल्यायत.. आणि या सगळ्याची निर्मीती करताना पर्यावरणाचा विचार, शहराच्या सौदर्यांत भर आणि भविष्यकालीन विचार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नव्या अर्थव्यवस्थेचा विचार या सगळ्याचा गोष्टींचा विचार केला जात असल्यानं रिओच्या नव्या ऑलिम्पिकनगरीचा बारकाईन विचार करण महत्वाचं ठरतय..

मुळातच निसर्गरम्य असणा-या रिओ द जानेरोच्या शिरपेचाता2016 साली आलिम्पिंक आयोजनाचा तुरा खोवला जाणार आहे.. आम्ही तुम्हाला घडवणार आहोत या जादूई नगरीची सफर.. अथांग निळ्याशार सागराच्या आणि उंच हिरव्यागार पहाडाच्या कुशील पहुडलेले हे आहे रिओ दि जानेरो.. या मातीतच जगण्याचा आनंद रुजला आहे.. आणि त्याचाच प्रत्यय देणारे हे ब्राझीलवासी..

अशाच या आनंदशहरात 2016 चे ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येतय.. चार प्रमुख ठिकाणी आलिम्पिकचा महाकुंभ रंगणार आहे.. डेओडारो, मरक्काना, कोपाकब्बाना, बारा चार ठिकाणी अनेक स्पर्धा रंगणार आहेत.. तुम्ही पाहत असलेली ही शहर हायपरलिंकने आणि ऑलिम्पिक मार्गाने जोडली गेली आहेत..

सुरुवात करुया बारामध्ये होत असलेल्या इव्हेंटपासून.. या 16 प्रशस्त इमारती आहेत ऑलिम्पिक आणि प्रिऑलिम्पिक व्हिलेज.. जगभरच्या खेळाडूंना आदरातिथ्याची एक वेगळी ओळख या ठिकाणी मिळेल.. त्यानंतर समोर दिसतायत त्या वेटलिफ्टीग हॉल, बॅडमिंटन कोर्ट, बॉक्सीग हॉल आणि टेबलटेनिस कोर्टच्या वास्तू... या आंतरराष्ट्रीय सोहळ्यासाठी जगभरचे प्रतिनिधी येणार आणि म्हणून त्यांच्यासाठी असलेलं हे मिडीया व्हिलेज.. मिडीया व्हिलेजनंतर दिसतायत त्या आयबीसी आणि एमपीसी पार्क.. त्या लगत असतील त्या हॉकी ग्राऊंड, बास्केटबॉल ग्राऊंड, टेनिस कोर्ट आणि सायकलिंग ट्रॅक... या निळ्याशार सागराच्या साक्षीन रंगेल..स्विमिंग, सिंक्रोनाईज स्विमिंग, जिम्नॅस्टीक, डायव्हींग आणि वॉटरपोलो खेळाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येईल..

पर्यावरणाला कुठलाही छेद न देत, मार्गाची रचना करण्यात आलीय.. आणि याच प्रशस्त मार्गावरुन असेल ऑलिम्पिकचा उत्साह.. सहालेन हायवे हाही जगभरच्या क्रिडारसिकांना आपल्या आदरातिथ्याची ओळख करुन देईल.

बारानंतर जाऊयात देओडोरो भागात.. सुरुवातीला दिसतय ते हे इक्वेट्रीयन ग्राऊंड.. त्यानंतर हे मॉडर्न पेट्रोलेशन, शुटींग आणि फेन्सीगचे ग्राऊंड.. आणि या हिरव्यागार डोंगराच्या कुशील खेळले जातील, माऊंटन बाईक, कानोए कयाम सलाम आणि बीएमएक्सचे क्रिडाप्रकार...

मरक्कानामध्ये सर्वात जास्त आकर्षणाचा केंद्रबिदू असलेले एथलिटिक्स गेम खेळले जातील.. फुटबॉल ग्राऊंड आणि त्याचबरोबर याच मैदानात सेरेमनीनं आतषबाजी केली जाईल.. अगदी बाजूला व्हॉलीबॉलच्या स्पर्धा रंगेल.. आणि या भव्य पॅव्हेलियनमध्ये रंगतील, मॅरेथॉन आणि आर्चरीच्या स्पर्धा...

कोपानकबानाला सेलिंगच्या स्पर्धा रंगतील.. दूरवर दिसणा-या या ट्रॅकवर रोड सायकलिंग आणि रेस वॉक होईल.. निसर्गरम्य किना-याच्या या रिओ दि जानेरोत सगळ्यात आकर्षण असेल ते बीच व्हॉलिबॉलचे.. या निळ्याशार सागरात मॅरेथॉन स्विमीग आणि ट्रायथलॉनच्या स्पर्धा होतील.. त्याचप्रमाणे या किना-यावर रोईंग आणि क्नोईंग कयामचे खेळ होतील...


निसर्गानं वरदहस्त उधळण केलेले हे अप्रतिम शहर 2016 साठी सज्ज होतय.. जबरदस्त नियोजनात कुठलीही कसर राहू नये यासाठी सारेच झटतात.. आजपर्यत रिओ दि जानेरोची ओळख ही या स्टॅच्यूएवढीच होती... क्रिस्टो रिडेंटॉर बरोबरच आता रिओ दि जानेरो आता सज्ज होतेय ती जगाच्या स्वागताला... 2016 च्या ऑलिम्पिक सोहळ्याला...

First Published: Tuesday, January 29, 2013, 00:02


comments powered by Disqus