नेत्यांचा आखाडा,Parliament ruckus on politics in the Hall, Netyancha Akhada

नेत्यांचा आखाडा

नेत्यांचा आखाडा
www.24taas.com,मुंबई

दिल्लीतील संसद असो की राज्यातील विधिमंडळ या जनतेच्या हितीचे निर्णय घेण्याची जबाबदारी घटनेनं या सभागृहांना दिली आहे. त्यामुळेच या सभागृहांना लोकशाहीत महत्वाचं स्थान आहे. पण कधी-कधी हेच सभागृह जणू कुस्तीचा आखाडा असल्या सारखे वाटतात. बुधवारी राज्यसभेत हाच अनुभव देशातील जनतेला आला. देशाच्या सर्वोच्च सभागृहात बसतांना लोकप्रतिनिधी संसदीय सभ्यता का विसरतात ? आणि मुद्दे सोडून ते गुद्द्यांवर का येतात? लोकशाहीचं मंदिर का बनत चाललंय कुस्तीचा आखाडा ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे, नेत्यांचा आखाडा या विषयावर.

उत्तरप्रदेशच्या विधानसभेत बजेट सत्राच्या पहिल्याच दिवशी हातघाईची परिस्थीती होती.. हातात बॅनर आणि डोक्यावर टोप्य़ा घालुन बसपाचे आमदार निषेध करत होते. राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान बसपाच्या आमदारांचा राग अनावर झाला आणि त्यांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली.सभागृहात आमदारांना बसण्यासाठी असलेल्या टेबल खुर्च्यांवर चढून आमदार जोरजोरात निदर्शनं करत होते.

हळूहळू घोषणा बाजी वाढत गेली.. आणि पुढं त्याला हुल्लडबाजीचे स्वरुप आलं .. बसपाच्या आमदारांचा गोंधळ काही थांबता थांबता नव्हत..त्या गोंधळी आमदारांनी थेट सभापतींच्या आसनांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.. मार्शलनी त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला..पण बसपा आमदारांचा गोंधळ काही थांबता थांबत नव्हता.. त्यांनी थेट राज्यपालांच्या आसनाकडे कागद फेकायलाही सुरुवात केली...आपल्या क़ृत्या बद्दल त्यांना कोणताच खेद वाटला नाही. सभागृहात झालेला हा गोंधळ संसदीय कार्यपद्धतीला जराही शोभणारा नव्हता..या गोंधळानंतर बसपाच्या आमदारांनी सभात्यागही केला.. या गोंधळानंतर सत्ताधारी पक्षाने बसपा विरुद्ध हल्लाबोल केला.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी हे एकमेकांचे कट्टर वैरी आहे. दोन्ही पक्षाचे नेते नेहमी एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतांना दिसतात..त्या दिवशीही तोच प्रकार घडला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बसपानं सत्ताधारी समजवादी पार्टीला आपली ताकद दाखवून दिली होती..मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारच्या विरोधात हल्लाबोल करण्यासाठी बसपानं आक्रमक भूमिका घेतली , पण त्यावेळी आपण रस्त्यावर नाही तर सभागृहात याचं भान त्यांना उरलं नव्हतं.
नेत्यांचा आखाडा

संसद आणि विधिमंडळ ही लोकशाहीचे मंदिरं आहेत..आणि त्याचं पावित्र्य जपलं गेलं तरच लोकशाही टिकणार आहे...पण कधी कधी लोकप्रतिनिधींना त्याचा पुरता विसर पडतो...महाराष्ट्राच्या विधीमंडळातही असाच प्रसंग घड़ला होता त्याला आता तीन वर्ष उलटून गेलीत...मराठीतून शपत घेण्याच्या मुद्दावरुन मनसे विरुद्ध सपा आमदार अबु आझमी यांच्यात तो वाद रंगला होता...आणि हिंदीतून शपत घेण्याचा अट्टहास करणा-या आझमींना त्याची किंमतही मोजावी लागली होती.

ही घटना आहे तीन वर्षांपूर्वीची.महाराष्ट्राच्या विधीमंडळात मनसे विरुद्ध समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी असा सामना रंगाला होता....सा-या देशानं तो सामना बघितला खरा. पण या संघर्षाचं रणशिंग फुंकलं होतं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर विधिमंडळात काय होणार याचा सर्वानाच अंदाज आला होता.. मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे आमदार सभागृह डोक्यावर घेणार याची चुनूक ते विधिमंडळ परिसरात दाखल होताच दिसून आली होती. कारण घोषणा देतच मनसे आमदारांनी विधिमंडळ सभागृहात प्रवेश केला होता....मराठीतून शपत घेण्याचं राज ठाकरेंनी केलेलं आवाहन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी धुडकावून लावत हिंदीतून शपत घेण्यास सुरुवात केली.पण त्यांचा तो हट्ट त्यांना चांगलाच महाग पडला.

मराठीतून शपत न घेतल्यास माझे आमदार काय करतील ते विधिमंडळ भवन पाहील असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता...आणि त्यांचा तो इशारा त्यांच्या आमदारांनी खरा करुन दाखवला...मनसे आमदारांनी विधानभवांनाचा अक्षरश: आखाडा करुन टाकला होता.. अबु आझमी हिंदीतून शपत घेत असतांनाच दिवंगत आमदार रमेश वांजळेंनी त्यांचा पोडियम पाडून टाकला तसेच आझमींच्या हातात असलेला माईक हिसकावून घेतला..त्यामुळे भडकलेल्या आझमींनी मनसे आमदारांना चप्पल दाखवली.पण त्यानंतर जे काही घडलं ते मोठं धक्कादायक होतं.. मनसेचे आमदार राम कदम यांनी अबु आझमींच्या श्रीमुखात लगावली...त्यावेळी मनसे आमदार शिशिर शिंदे आणि रमेश वांजळेही आघाडीवर होते...तो प्रकार पहून सगळ सभागृह हाबकुन गेल होते.. मराठी विरुद्ध हिंदी हा सामना विधान भवनापर्यंत येवून पोहोचला होता...मनसे आमदारांनी जेव्हा अबु आझमींना घेरलं होतं तेव्हा सभागृहातील ज्येष्ट आमदारांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला खरा पण तोपर्यंत बरचं काही घडून गेलं होतं..

मराठीत शपत घेण्याचं आवाहन राज ठाकरेंनी सर्व आमदारांना केलं होतं...पण अबु आझमींनी राज ठाकरेंच्या आव्हानाला भीक न घालता हिंदीतून शपत घेण्याचा अट्टाहास कामय ठेवला आणि विधानभवनात रणकंद माजलं.
नेत्यांचा आखाडा

संसदेतला गदारोळ आता नित्याचा झालाय.. वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणा-याना त्यावेळी सारी जनता पाहत असते याच भान राहत नाही.. गेल्या काही वर्षात अनेक राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात असाच गोंधळ घातल्याचे प्रकार पाडलेत.. प्रातिनिधीक स्वरुपात तीन विधानसभामधील गोंधळाचे हे चित्र पाहील तर ही अराजकाता लक्षात येईल.

२००४ मध्ये ओडिशा विधानसभेत जो गदारोळ झाला तो पाहून सरा देश अचंबित झाला होता..सभागृहात गोंधळ घालणा-या आमदारांना संसदीय सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. ते दृश्य मोठं धक्कादायक होतं...नवीन पटनायक सरकार विरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी आमदारांनी हा मार्ग अवलंबला होता....सभागृहात आमदार एकमेकांवर तुटून प़डले होते...सरकार विरोधातील असंतो व्यक्त करण्यासाठी आमदार महोदयांनी मुद्दांवर चर्चा करण्याऐवजी चक्क गुद्यांचा आधार घेतला होता...संसदीय लोकशाहीत विधिमंडळाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे कारण जनतेच्या हिताचे निर्णय याच सभागृहातून केले जातात..पण इथं चर्चेतून मार्ग काढण्याऐवजी हाणामारीचा मार्ग अवलंबण्यातच आमदारांनी धन्यता मानली होती.

तारीख फेब्रुवारी २००५
आंध्रप्रदेश विधानसभेत गदारोळ

आंध्रप्रदेशातील विधानसभेत संसदीय लोकशाहीच्या इतिहासात हा काळा दिवस मानला जाईल..जनतेनं निवडून दिलेल्या आमदारांनी सभाहगृहात त्या दिवशी जे वर्तन केलंय ते पाहून देशातील प्रत्येकाची मान शरमेनं खाली गेली होती..आपल्या आमदारांनी केलेला तो कारनामा पाहून आंध्रप्रदेशातील जनतेला तर मोठा धक्काच बसला होता..आमदारांनी प्रचंड गदारोळ केल्यानंतर मार्शलनी त्यांना सभागृहा बाहेर काढलं.

जुलै २०१० बिहार विधानसभेत गोंधळ

विधानसभेत गोंधळ घालण्याची जणू परम्पराच बिहारच्या आमदारांनी सुरु केली आहे..कथीत ट्रेझरी घोटाळ्यावरुन २०१०मध्ये बिहारच्या सभागृहात आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला होता...यामध्ये तत्कालीन विरोधीपक्षाचे आमदार आघाडीवर होते...पाच आमदार विधानसभेच्या गेटवर रात्रभर धरणं देवून बसले होते..त्यानंतर दुस-या दिवशी खुर्च्या तोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली..केवळ खुर्ची आणि टेबलच नाही तर विधिमंडळ परिसरात ठेवलेल्या कुंड्यांचीही आमदारांनी तोडफोड केली. बिहारच्या विधिमंडळात झालेला हा गदारोळ लोकशाहीवर एक प्रकारे प्रहारच होता.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना सरकारी नोक-यांमध्ये पदोन्नतीत आरक्षण देणारं घटनादुरुस्तीचं विधेयक मांडण्याचा प्रयत्न राज्यसभेत दुपारी झाला खरा पण त्यानंतर जो प्रकार घडला तो संसदीय सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडणारा असाच होता...समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाच्या दोन खासदारांमध्ये चक्क सभागृहातच जुंपली होती.
नेत्यांचा आखाडा

कोळसा खाण प्रकरणी विरोधकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यामुळे सलग ११व्या दिवशी सभागृहाचं कामकाज सुरु होताचं दुपार पर्यंत तहकुब करण्य़ात आलं. दुपारी बारा वाजता पुन्हा राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.पण सभागृहात विरोधकांचा गोंधळ मात्र कायम होता. त्याच गोंधळात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना सरकारी नोक-यांमध्ये पदोन्नतीत आरक्षण देणारं घटनादुरुस्तीचं विधेयक मांडण्याचा प्रयत्न झाला. आणि अवघ्या सभागृहाचं लक्ष त्या घटनेकडं वेधलं गेलं.

समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल आणि बसपाचे खासदार अवतार सिंग यांच्यात चांगलीच झोंबाझोंबी सुरु झाली होती. देशाच्या सर्वोच्च सभागृहात हा प्रकार सुरु होता आणि देशाची सव्वाशे कोटी जनता तो सगळा प्रकार टीव्हीवर पहात होती. जनतेचं प्रतिनिधित्व करणारे खासदार सभागृहात कशा पद्धतीने वागतात हे पुन्हा एकदा अवघ्या देशानं बघीतलं होतं.
समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल सभागृहाच्या वेलमध्ये जाऊन विरोध करणार होते...पण बसपाच्या अवतार सिंग यांनी अग्रवाल यांना मध्येच आडवलं...आणि तिथच त्यांच्यात जुंपली. तो प्रकार पाहून सभागृह आवाक झालं होतं. हा सगळा वाद अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना सरकारी नोक-यांमध्ये पदोन्नतीत आरक्षण देणारं घटनादुरुस्तीचं विधेयकावरुन सुरु झाला होता.या विधेयकावरून समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव आणि बसपाच्या मायावती एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत..समाजवादी पार्टीने य़ा विधेयकाला विरोध केलाय तर बसपाने विधेयकाचं समर्थन केलंय...हे दोन्ही पक्ष उत्तरप्रदेशाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोध असून तोच विरोध बुधवारी राज्यसभेतही दिसून आला.

उत्तर प्रदेशचे राजकारण गेल्या काही वर्षात वादळी बनलय.. निवडणुकामंधील रणधुमाळी आमदारांपाठोपाठ चोरपावलानी सभागृहातली घुसलीय.. सभागृहाच्या गोंधळ घालत विरोधी पक्षानी आपली आणि त्याला मुहतोड उत्तर देत सत्ताधा-यानी आपलं शक्तीप्रदर्शन केल.. हे शक्तीप्रदर्शन एवढ भिषण होतं की त्याला कुरुक्षेत्राची उपमा द्यावी तरी कमी.... देशातल्या संसदीय इतिहासातील सर्वात भीषण गोंधळावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

तारीख २२ ऑक्टोबर 1997

उत्तरप्रदेश विधानसभेत रणकंद. ही घटना आहे २२ ऑक्टोबर 1997ची.... उत्तर प्रदेश विधानसभेत कायद्याच्या तरतुदीवरुन झालेली हा गदारोळ आजपर्यंतच्या संसदीय इतिहासातील सर्वात भयंकर दिवस मानला जातोय..
त्यादिवशी नेहमीप्रमाणे सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. पण सभागृहात बसलेल्या आमदारांच्या मनात काही वेगळचं होतं.. सभापतींनी कामकाजाला सुरुवात करताच विरोधीपक्षाचे आमदार वेलमध्ये जमा झाले....जणू काही सगळ अगोदर ठरवण्यात आलं होतं.

आपल्या पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य माणून आमदारांनी वेलमध्ये जमण्यास सुरुवात केली..तर काहीजण सभापतींच्या आसनाकडे धावले. सभागृहात एव्हांना गोंधळ वाढू लागला होता.. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी सभागृहात एकच गोंधळ केला..पण तो गोंधळ तेव्हड्यावरच थांबला नाहीतर आमदारांनी सारे विधीनिवेश विरसुन हाणामारी सुरु केली. वेलमध्ये आपल्या बाजुला असनावर बसलेल्या सन्माननीय आमदाराला झोडपून काढण्यास सुरुवात केली.

कोणीही कुणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.. सभागृहात गोंधळ,हणामारी, गदारोळ, शिव्या, घोषणाबाजी सगळं काही सुरु होता. उत्तरप्रदेशातील विधिमंडळ जणू कुरुक्षेत्र बनलं होतं.एकमेकांवर हल्ला करण्यासाठी माईकचा अस्त्र म्हणून वापर करण्यात आला होता. सभागृह दोन गटात विभागलं गेलं होते. एकमेकावर जोरदार मारा केला जात होता. या हाणामारीत सभापतींना कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी प्रचंड संरक्षण देण्यात आले.

जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ज्या सभागृहावर असते तिथचं हा लाजिरवाना प्रकार घडला होता..सभागृहाची असवस्था अत्यंत दयनीय बनली होती... सभागृहाला जणू युद्धभुमीचं रुप आलं होतं..... एकमेकांवर हल्ला केल्यानंतर आमदार लपण्यासाठी आसरा घेत होते... हातात मिळेल ती वस्तू विरोधकांवर फेकली जात होती... खुर्च्यांपासून ते माईक आणि उशीपर्यंत सगळ्याचा वापर केला गेला.... या हणामारीत अनेक आमदार जखमी झाले.. सभागृहाचं प्रचंड नुकसान झालं.... तो दिवस लोकशाहीच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवसच म्हणावा लागले.

First Published: Wednesday, September 5, 2012, 22:16


comments powered by Disqus