बुद्धगयेचं राजकारण politics of Bodhigaya

बुद्धगयेचं राजकारण

बुद्धगयेचं राजकारण
बिहारमधलं बुद्धगया मंदीर रविवारी साखळी स्फोटाने हादरलं. या मंदिरात झालेल्या स्फोटानं सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. या स्फोटाची पूर्वसुचना आयबीनं दिली होती अशी माहिती आता समोर आलीय. पण हा इशारा देऊनही स्फोट का रोखता आले नाहीत हा प्रश्न कायम आहे.

बुद्धगया.. शांततेला लाभलेले अलौकिक अनुभूतीचं स्थान म्हणजे बुद्धगया.. पण हेच बुद्धगया साखळी स्फोटानं किचींत भयकंप झालय.. जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं बुद्धगयाचं मंदिर रविवारी पहाटे साखळी स्फोटानं हादरुन गेलं. पहाटे साडेपाचच्या आसपास या मंदीराच्या परिसरात झालेल्या स्फोटानं सुरक्षा व्यवस्थेच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड झाल्या. रविवारपर्यत असणारा स्फोटाचा आकडा सोमवारी दहा झालाय.. बुद्धगया इथं दहा साखळी स्फोट झाल्याची माहिती बिहारचे डीजीपी अभयानंद यांनी दिलीय... दहाव्या स्फोटाचा आज उलगडा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.. स्फोट घडवून आणण्यासाठी अमोनियम नायट्रेडचा वापर करण्यात आल्याचं बिहार पोलिसांचे म्हणणे आहे.

या स्फोटानंतर आता धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. बुद्धगया येथील स्फोटाचा इशारा गुप्तचर संघटनांनी यापूर्वीच दिला होता. बिहारमध्ये विदेशी दहशतवादी लपल्याची माहिती आयबीनं दोन आठवड्यापुर्वीच बिहार सरकार आणि बिहार पोलिसांना दिली होती. तसंच बुद्धगया मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा इशारा दिल्ली पोलीसांनीही यापुर्वी दिला होता. सुरक्षा यंत्रणेने दिलेले हे सर्व इशारे व्यर्थ ठरले. या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांची रविवारची प्रतिक्रिया सरकारी पठडीतलीच होती.

रविवारी घडलेल्या स्फोटानंतर आणि त्यानंतर देशभरातून झालेल्या टिकेनंतर सोमवारीही ठोस कारवाई दिसलीच नाही. सरकारी यंत्रणेची ही निष्क्रीयता म्हणायची की जराश्या गाफिलपणाचा दहशतवाद्यांनी उचलेला फायदा म्हणावा हा चिंतनीय प्रश्न आहे.. पण मु्द्दा कुठलाही असो राजकारण मात्र या विषयावरहुनही रंगले..विरोधकांनी या हल्ल्यानंतर जोरदार हल्लाबोल केलाय.

दहशतवाद्यांनी रविवारी सकाळी साडेपाच आणि पाच अठ्ठाव्वन ही वेळ साधत भगवान गौतम बुद्धांच्या ऐतिहासीक मंदिराला टार्गेट केलं. नऊ स्फोटातील चार स्फोट महाबोधी मंदिराच्या संकुलात झाले, तर तीन स्फोट या मंदिरातील तेरेगा विहाराजवळ झाले. पण यानिमित्तानं एक गोष्ट मात्र पुन्हा अधोरेखित झाली... या देशात आपण कुठल्याही ठिकाणी हल्ला करु शकतो हे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. स्फोटाचा इशारा दिला होता, या हल्ल्यातल्या दोषींची गय केली जाणार नाही आणि हा हल्ला म्हणजे सरकारी अपयश या सर्व पठडीतल्या उत्तरांची आज पुन्हा उजळणी झाली. पण या सर्व महाभारतानंतरही हे हल्ले रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा कधी निर्माण होणार याचं उत्तर कुणाकडेच नाहीय..


घटना कुठलीही घडो.. मग ती आपत्ती असो वा बॉम्बस्फोट, त्यावर उपाययोजना मदत पुनर्वसन नाही झाले तरी चालेल पण राजकारण मात्र व्हायलाच पाहिजे.. गेल्या काहि दिवसात प्रत्येक दुर्घटनेनंतर राजकारण होतच.. आणि यावेळी सुरुवात केलीय ती कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यानी...

बुद्धगयेतील स्फोटाच्या कानठळ्यातून सावरतो न सावरतो तोच आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यायत.. देशात कुठलाही घटना घडूदेत.. परिस्थीती कितीही गंभीर असो, त्यावर आरोप प्रत्यारोपावरुन खालच्या पातळीवर गेलंच पाहिज अस चित्र गेल्या काही वर्षात नेहमीच पहायला मिळतं.. प्रत्येक गोष्टीवर ट्विट करण्याची स्पर्धाच जणू या राजकारण्यांमध्ये पहायला मिळते.. आणि या सर्वात आघाडीवर असतात ते कॉंग्रेसचे प्रवक्ते दिग्वीजय सिंग.. प्रत्येक गोष्टीचे अपोझिशन कनेक्शन करुन मुद्दा राजकारणाच्या पातळीवर कसा वळवायचा याच कसब दिग्गीराजाकडे पुरेपुर आहे.. बुद्धगयेच्या स्फोटानंतरही त्यानी ट्विट केल आणि स्फोटांच राजकारण सुरु झाल..

मोदींच्या जवळचे अमित शहा अयोध्येत जाऊन राम मंदिराचा मुद्दा काढतात. मोदी आपल्या भाषणात नितीशकुमार यांना धडा शिकवण्याबाबत बोलतात. याच्या दुस-याच दिवशी बुद्धगयेत बॉम्बस्फोट होतात. या गोष्टीचा आपसात काही संबध आहे का ?

दिग्वीजय यांच्या या ट्विटनंतर स्फोटाचे राजकारण व्हायला सुरुवात झाली. कितीही टिका झाली तर दिग्वीजयांनी या मुद्यावरुन पुन्हा विरोधकावर टिकास्त्र सोडलय.. दिग्विजय कुठल्याही मुद्यावरुन मोदी आणि भाजपला टार्गेट करतात अशी तिखट प्रतिक्रीया भाजपच्या गोटातून येतेय. भाजपने या ट्विटवरुन दिग्वीजय सिंघावर प्रतिहल्ला चढवलाय..


स्फोटानंतरचे राजकारण केवळ आरोप प्रत्यारोपपुरत मर्यादित राहिल नाही. बिहारचे मुख्यमंत्र्याना अडचणीत आणण्यासाठी राजदही सरसावलीय.. लालूप्रसाद यादव यानीही थेट नितीशकुमारांना टार्गेट केलय. राजद पाठोपाठ लोकजनशक्ती पार्टीच्या रामविलास पासवान यांनीही नितीशकुमारांनाच टार्गेट केलय..

कधी ट्विटरवरुन तरी कधी पुतळे जाळून एकमेकांना कोंडीत पक़डण्याचे राजकारण सुरु झालय.. पुढची एखादी अप्रिय घटना होईपर्यंत जबाबदारी ढकलण्याचा आणि विरोधकांच्या उखाळ्यापाखळ्या काढण्याचा कार्यक्रम चालूच राहील.. सद्यघडीला कुठल्याही दुदैवी घ़टनेनंतर सुरु होणारं राजकारण आणि त्यांचे आरोप प्रत्यारोपाचे राजकारण हे घटनेचे गांभिर्य भरकटवत नेतात हे मात्र नक्की..


बुद्धगया साखळी स्फोटांप्रकरणी मकबूल कनेक्शन उघड झालंय... पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील संशयित मकबूल या आरोपीनं याबाबत रेकी केल्याची माहिती आता समोर येतेय... झी मीडियानं हा धक्कादायक खुलासा केलाय..

रविवारी पहाटे एकामागून एक झालेल्या साखळी स्फोटांनी पवित्र बुद्धभूमी हादरली.. या स्फोटाच्या मॉड्युलवरुन संशयाची सुई इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेकडं गेली.. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी मकबूलनं बुद्धगयाची रेकी केल्याची धक्कादायक माहिती झी मीडियाच्या हाती लागलीय.. पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटांप्रकरणी मकबूलला अटक करण्यात आली होती.. त्यानंतर चौकशी दरम्यान मकबूलनं तपासयंत्रणांना ही माहिती दिल्याचं समोर आलंय...

इंडियन मुजाहिदीनकडून बुद्धगयेत हल्ले होण्याचा इशारा गुप्तचर विभागानं दिला होता. त्या बाबत बिहार सरकारला सावध करण्यात आलं होतं. ही बाब जरी दिल्ली पोलिस सांगून जबाबदारी ढकलत असले.. तरी ही इंडियन मुजाहिदच्या कारवाया डोळेझाक करण्यासारख्या नक्कीच नाहीयत..

मकबूल हा इंडियन मुजाहिद्दीनचा आयईडी एक्सपर्ट असून नांदेडचा रहिवासी आहे.. 1999 मध्ये त्यानं इंडियन मुस्लिम मोहमद्दीन नावाची संघटना बनवली.. समाजसुधारणेच्या बुरख्याआड तो देशात दहशतवादी कारवाया करत होता.. 2000 साली हैदराबाद इथं झालेल्या स्फोटात मकबूलचा हात होता.. पुणे जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी तो संशयित आरोपी आहे...

बुद्धगया स्फोटात मकबूलचं कनेक्शन उघड झाल्यानं आता त्याची पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता आहे.. मकबूलकडून रेकी केल्याची माहिती मिळाल्यानंतरही केंद्र आणि बिहार सरकारनं कारवाई का केली नाही असे सवाल आता यानिमित्ताने उपस्थित होतायत...

शांती, अहिंसा आणि मानवतेचा खरा संदेश जगाला देणा-या सिद्ध पुरुष गौतम बुद्ध...जगाला एक नवीन मार्ग दाखवणा-या भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाण म्हणजे बुद्धगया... आज बुद्धगया तिथे झालेल्या स्फोटांमुळे जरी चर्चेत आलं असलं तरी त्याची खरी ओळख ही जिथे सिद्धार्थाचा बुद्ध झाला अशीच होय...

बिहारची राजधानी पटनाच्या दक्षिणपूर्वेकडे अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर असलेलं बोधगया, हे गया जिल्ह्यातील एक छोटंसं शहर...भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्त झालं तिच ही अदभूत जागा...जीवनातील दु:ख, यातना, लोभ, अहंकार या आणि या सारख्या सर्वच गोष्टींपासून दूर जाऊन जगण्याचा आणि जीवनाचा खरा अर्थ ज्या ठिकाणी बुद्धांना गवसला तेच हे दैवी ठिकाण...भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी बोधगया हे सर्वात महत्वपूर्ण ठिकाण आहे. या जागेची दखल आणि महत्व यूनोस्कोनं ओळखली आणि 2002 मध्ये या ठिकाणाला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं... इसवीसन पूर्व 500मध्ये आपल्या वैभवाचा राज्याचा त्याग करुन गौतम बुद्ध फाल्गु नदीच्या किनारी पोहोचले. येथेच असलेल्या या बोधी झाडाखाली ते तपस्या करायला बसले. सलग तीन दिवस-रात्र तपस्या केल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. या घटनेनंतरच त्यांना बुद्ध म्हणून ओळखलं जाऊ लागलं. यानंतर त्यांनी पुढील 7 आठवडे वेगवेगळ्या ठिकाणी बसून ध्यान केलं आणि सारनाथ येथे जाऊन प्रचार सुरु केला. हळूहळू त्यांची शिकवण आणि मार्ग जगाने मान्य करायला सुरुवात केली. जगाला जगण्याचा नवा मार्ग दाखवणा-या बुद्धाची ख्याती पंचक्रोशीत पोहोचली.. आत्मशांती आणि निर्वाणासाठी फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोकं या ठिकाणी येतात. बौद्ध समाजात बोधगया एखाद्या तिर्थक्षेत्राप्रमाणेच पुजनिय आहे. बोधगयाचं महाबोधी मंदिर आणि या मंदिरातील भगवान बुद्धाची मुर्ती यांचा संबंध स्व:त भगवान बुद्धांशी असल्याचं म्हंटलं जात. येथील गांवक-यांनी जेव्हा मंदिर बांधण्याची योजना आखली तेव्हा त्यांनी भगवान बुद्धांची मुर्ती बनवण्यासाठी शिल्पकाराचा शोध सुरु केला मात्र ब-याच प्रयत्नांनतरही त्यांना भगवान बुद्धांची आकर्षक मुर्ती बनवणारा शिल्पकार मिळाला नाही. अचानक एक दिवस एक माणूस त्या गावी आला आणि त्यानं आपण मूर्ती बनवू अशी इच्छा व्यक्त केली. हा मूर्तीकार दूसरा तिसरा कोणी नसून भगवान बुद्धच असल्याचं म्हंटलं जातं. भगवान बुद्धची ही मुर्ती बौद्ध जगात सर्वाधिक प्रतिष्ठित मुर्ती होय. वेगवेगळ्या धर्माचे, संप्रदयाचे लोक आत्मशांतीसाठी या मंदिरात येतात. आज जगाच्या कानाकोप-यात बौद्ध धर्म आणि भगवान बुद्धांची ख्याती पोहोचलीय. इतकंच काय तर जगातील प्रत्येक देशात बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. जगात वेगवेळ्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या मूर्त्या आणि मंदिरांची स्थापना करण्यात येत असून त्यांनी सांगितलेला मार्ग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शांती, अहिंसा, परोपकार आणि साध्या जीवनातूच निर्वाणाचा मार्ग दाखवणा-या भगवान बुद्धांच्या या तीर्थस्थळी आजही बुद्ध ध्यान मग्न होऊन बसल्याची अनुभूती होते...

बुद्धगया.. खरतर कितीही अंहिसक माणूस असला तरी या संपुर्ण परिसरात आला की तोही शांततेच्या प्रेमात पडून जातो.. आणि म्हणूनच स्फोटाचे बॉम्ब ठेवायला कदाचित रात्रीची वेळ ठेवण्यात आली असेल.. पण नेमक या मागची कारण काय हा प्रश्न अनेक नव्या प्रश्नांना जन्म देतोय..

जगाला शांतता आणि अंहिसेचा संदेश देणा-या भगवान गौतम बुद्धांच्या मंदिर परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानी अवघा देश हादरुन गेलाय.. तो स्फोट नेमका कसा झाला याचं सीसीटिव्ही फूटेजही आता समोर आलय.. पण अनेक शक्यता असणारा प्रश्न हा आहे की, या हल्ल्यामागचे नेमकं कारण तरी काय..

या हल्ल्यामागच्या अनेक कारणांचा आणि शक्यताचा आता धांडोळा घेतला जातोय. म्यानमारमधील बौद्ध आणि रोहिंग्या मुस्लीम यांच्यातील दंगलीचा बदला घेण्यासाठी हे स्फोट घ़डवल्याचा आयबीचा प्राथमिक अंदाज म्हणतोय.. म्यानमधील मुस्लीमावरील अत्याचारासाठी भारताकडून मदत मिळत असल्याचा आरोप लष्कर - ए - तैय्यबाचा प्रमुख मोहम्मद हाफिज सईद यांने काही दिवसापूर्वीच केला होता. त्य़ानंतर हैदराबाद आणि बुद्धगया ही ठिकाण रडारवर असल्याची माहिती गुप्तचर संस्थानी दिली होती. त्यामुळे या सगळ्याला दहशतवादी किनार असल्याचं स्पष्ट होतय.. पण या बुद्धगयाच्या स्फोटानंतर आता या प्रश्नाकडे गांभिर्यानं पाहण्याची वेळ आलीय... भारतात आजवर अनेक हल्ले, स्फोट करण्यात आले.. पण दहशतवाद्यांनी आजपर्यंत कधीही गौतम बुद्धांच्या स्थळांना हात लावला नव्हता.. म्यानमार,आणि बांगलादेशात सध्या मुस्लीम विरुद्ध बौद्ध असा संघर्ष सुरु आहे.. खरतर याची झळ भारताला बसली नव्हती.. पण आता दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी वेळीच सावधगिरीची पावले उचलण्याची वेळ आलीय हे सांगायला आयबीच्या रिपोर्टची गरज नाही आहे हे मात्र नक्की..

दहशतवादी किवा आतंकवादी असो.. त्याना कुठल्याही धर्माची किवा विचारांची बांधलकी नसते.. त्यांचा एकच उद्देश असतो.. केवळ दहशत माजवणे.. दहशतवाद्यांच्या आजपर्यंतच्या हल्ल्यांचा विचार केला तर सर्वच धर्माच्या प्रार्थनास्थळांना लक्ष केल्याचं उघड झालयं..

बुद्धगयामध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि त्यानंतर प्रार्थनास्थळावर आजपर्यत झालेले हल्ले या सगळ्याचा विचार करण्याची वेळ आलीय..


दिनांक ८ डिसेंबर २०००

जम्मू आणि काश्मीरच्या पुलावामा जिल्ह्याच्या शोपीआन येथील जामा मशीदीतून भाविक बाहेर पडत असताना अतिरेकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन पोलिस आणि ४२ नागरिक ठार झाले होते..

दिनांक ८ जून २००१

मध्य काश्मीरमधील चरार- ए -शरिफ मशीद परिसरातील शेख नुरुद्दीन नूरानी या प्रार्थनास्थळावर बॉ़म्बफेक करण्यात आली. या स्फोटात चार महिला ठार तर साठपेक्षा जास्त जण जखमी झाले..

दिनांक ३० मार्च २००२

जम्मूतील रघुनाथ मंदिरावर आत्मघाती हल्ला झाला.. या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या तीन जवानांसह सातजण ठार तर २५ जण जखमी झाले.

दिनांक २४ सप्टेंबर २००२

गुजरातच्या प्रसिद्ध अशा अक्षरधामवरचा हल्ला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानण्यात येतो. सशस्त्र अतिरेक्यांच्या या हल्ल्यात तीस जण ठार तर शंभरपेक्षा जास्त जण जखमी झाले.. य़ाच हल्ल्यानंतर धार्मिक स्थळाच्या सुरक्षेवर जास्त लक्ष देण्यात आलं..

दिनांक २४ नोव्हेंबर २००२

जम्मूच्या रघूनाथ मंदिरावर पुन्हा दहशतवादी हल्ला चढवण्यात आला.. सुरक्षारक्षकासह भाविकही या हल्ल्यात ठार झाले होते. तर प्रत्युत्तरात एक दहशतवादीही ठार झाला होता.

दिनांक ९ जानेवारी २००४

जम्मू शहरातील अल हदिस मशीदीवर चिनी बनावटीचे दोन बॉम्ब फेकले. .यात अठराजण जखमी झाले..

दिनांक ९ मे २००५



दोडा जिल्ह्यातील चक्का गावात एका मशिदीतून बाहेर पडणा-या भाविकावर बेछूट गोळीबार करण्यात आला.. या बेछूट हल्ल्यात तीनजण ठार झाले.

दिनांक ५ जुलै २००५

अयोध्येच्या राम मंदिरावर सहा अतिरेक्यानी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

दिनांक ७ मार्च २००६

उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे संकटमोचन मंदिरात बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात १० जण ठार झाले.

दिनांक १६ ऑगस्ट २००६

इंफाळच्या इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा सोहळा रंगलेला असताना अतिरेक्यांनी बॉम्ब फेकला.. पाच ठार आणि पन्नासपेक्षा जास्त जण जखमी झाले..

दिनांक ८ सप्टेंबर २००६

मालेगावच्या नूरानी मशिदीवर बॉम्बफेक करण्यात आले. ४० ठार तर १०० जण जखमी झाले.

दिनांक ११ ऑक्टोंबर २००७

राजस्थानच्या अजमेर येथील ख्वाजा मोईन्नुद्दीन चिश्ती दर्ग्यावर बॉम्बहल्ला झाला. देशभरात प्रार्थनास्थळावरील हल्ल्याचे प्रमाण वाढत चाललय.. आणि म्हणूनच आता देशभरातल्या धार्मिकस्थळाची सुरक्षा वाढवण्याची मागणी होतेय..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, July 9, 2013, 00:01


comments powered by Disqus