Last Updated: Monday, August 12, 2013, 11:54
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे ‘क्लाईम्बथॉन’ स्पर्धेत ४० गिर्यारोहकांपैंकी महाराष्ट्रातून निवड झालेल्या ठाण्यातील २० वर्षीय प्रशांत नंदीने हिमालयाला कवेत घेत ६२५० मीटर उंचीवर तिरंगा रोवला. हा जागतिक विक्रम असून चढाई केलेल्या शिखरास नियमानुसार त्याचे नाव जोडलं जाऊ शकतं. प्रशांतच्या या विक्रमामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून स्तूतीसुमनांचा वर्षाव होतोय.
ठाण्यातील पाचपाखाडी भागात राहणाऱ्या प्रशांतनं हिमालयाला कवेत घेत ६२५० मीटर उंचीवर तिरंगा रोवला. हा जागतिक विक्रम ठरलाय. हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये होणाऱ्या ‘क्लाईम्बथॉन’ या प्रतिष्ठेच्या आणि खडतर गिर्यारोहण स्पर्धेत त्याला हे यश मिळालंय. या स्पर्धेसाठी देशभरातून ४० गिर्यारोहकांची निवड करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील एकमेव प्रशांतचा समावेश करण्यात आला होता. समुद्रसपाटीपासून सहा ते साडे सहा हजार मीटर उंचीवर असलेली शिखरे सर करण्याचे आव्हान या गिर्यारोहक समोर होते. प्रशांतनं हे आव्हान पेललं. तेथील हवामानाशी आणि भौगोलिक समस्यांशी दोन हात करीत त्याने ९ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता उंच शिखरावर पाऊल ठेवत तिरंगा झेंडा रोवला.
प्रशांतच्या या कामगिरीमुळे त्याच्या घरच्यांचा आनंद द्विगुणीत झालाय. प्रशांतला लहानपणापासूनच शिखर पादाक्रांत करण्याची आवड होती. जिद्द आणि चिकाटीमुळेच प्रशांतनं आकाशाला गवसणी घातल्याचं त्याच्या घरच्यांना वाटतंय. प्रशांतला भारतीय सैन्यात दाखल व्हायचंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, August 12, 2013, 10:35