मोबाईलचा नवा अवतार, prime watch

मोबाईलचा नवा अवतार

मोबाईलचा नवा अवतार
www.24taas.com, मुंबई

लवकरच बदलणार तुमचा मोबाईल फोन !

कशामुळे होणार आहे हा बदल ?

कोणी घेतलाय हा निर्णय ?

तुमचा फायदा होणार की तोटा ?

मोबाईलचा नवा अवतार


मोबाईल फोन बदलल्यास, तुम्ही कॅन्सरपासून तुमचा बचाव करु शकता हे तुम्हाला माहित आहे का ? जर तुम्हाला याबद्दल माहित नसेल, तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.. एक सप्टेंबरपासून केंद्र सरकारने एक नवं धोरण लागू केलं आहे...त्यामुळे मोबाईल फोनच्या रेडिएशनपासून तुमचं रक्षण होणार आहे.. मोबाईलमुळे जग पार बदलून गेलंय..जगाच्या कोणत्याही कानकोप-यात अवघ्या काही सेकंदात तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी सहज संपर्क करु शकता..मोबाईलचे फायदे अनेक आहेत...

पण मोबाईलचे जेव्हडे फायदे आहेत तेव्हडाच तो धोकेदायकही आहे....त्यामुळेच आता तुमचा मोबाईल बदलणार तर नाही ना ? आज पर्यंत तुम्ही मोबाईलचे अनेक फायदे बघीतले आहेत पण मोबाईलमधून बाहेर पडणा-या रेडिशनची तुम्हाला जाण आहे का ? त्याविषयी कदाचीत तुम्हाला माहिती नसेल पण सरकारच्या ती गोष्ट लक्षात आली आहे..तो धोका लक्षात घेऊनच मोबाईलचे नियम बदलण्यात आले आहेत.. मोबाईलमुळं नेमका कोणता धोका होवू शकतो हे आता आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत..तसेच तुम्हाला तुमचा मोबाईल फोन बदलावा लागणार आहे का याचीही उलगडा करणार आहोत..

मोबाईल फोनच्या रेडिएशनचे माणसाच्या मेंदूवर गंभीर परिणाम होत असल्याचं आज पर्यंत देश विदेशात करण्यात आलेल्या अनेक संशोधनातून उघड झालं आहे..मोबाईलचा सिग्नल देणारे टॉवरही धोकादायक असल्याचं जानकारांचं म्हणनं आहे..मानवी वस्तीत उभरण्यात आलेले मोबाईल टॉवर धोकेदायक ठरु लागले आहेत..मोबाईल टॉवर परिसरात राहणा-या नागरिकांना कॅन्सर सारखा गंभीर आजार जडल्याचं आढळून आलंय...या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर आता भारतातही मोबाईल संबंधीचे नियम बदलण्याची तयारी सुरु झालीय..



देशात वाढती मोबाईल धारकांची संख्या आणि मोबाईलमुळे होणारा धोका लक्षात घेता सरकारने मोबाईलच्या रेडिएशनची तीव्रता कमी करण्याचा निर्णय घेतलाय. मोबाईलच्या रेडिएशनची तीव्रता कमी केल्यामुळे लोकांच्या आरोग्याला त्याचा फायदा होणार आहे..पण त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल बदलावा लागणार आहे.. रेडिएशनचा धोका लक्षात घेऊन सरकारने मोबाईलच्या स्पेसिफिक एब्जॉर्बशन सेट अर्थात एसएआर २.० वरून १.६ वर आणला आहे...त्यामुळे मोबाईलधारकाचं रेडिएशनच्या धोक्यापासून संरक्षण होणार आहे.. या सगळ्यामुळे आपला मोबाईल फोन बंद तर पडणार नाही ना अशी जर शंका तुम्हाला आली असेल तर ती साफ चूक आहे..तुमचा मोबाईल फोन पूर्वीप्रमाणेच काम करील. कमी रेडिएशन मानांकनावर आधारीत मोबाईल फोन हॅन्डसेट लवकरच बाजारात उपल्बध होतील..


मोबाईल फोनच्या रेडिएशन विषयी आम्ही वारंवार तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे..मोबाईल फोन जवळ येताच रेडिएशनची तीव्रता वाढते आणि त्याचा तुमच्या ह्रदयावर तसेच मेंदूवर परिणाम होतो..मोबाईलमुळे होणा-या धोक्याविषयी आजही मतभेद आहेत..पण मोबाईलचं रेडिएशन कमी करण्याची आवश्यकता असल्याच सरकारने संसदेत सांगीतलं आहे....पण ९० कोटी जनतेचा विचार करता या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.. म्हणजेच २०१३मध्ये जे मोबाईल फोन बाजारात उपलब्ध असतील ते नव्या नियमांवर आधारीत असणार आहेत. रशिया , चीन आणि पोलंड या देशांमंध्ये मोबाईलच्या रेडिएशनची तीव्रता अत्यंत कमी आहे..आता भारतही त्या देशांच्या यादीत सहभागी होणार आहे.

मोबाईल रेडिएशनच्या नव्या नियमावलीनुसार आता मोबाईल कंपन्याना तब्बल 3 हजार 300 नवे टॉवर उभारावे लागणार आहेत.. आणि यासाठी त्यांना खर्च करावा लागणार आहेत तब्बल एक हजार कोटी रुपये.. आपल्या जवळच्या व्यक्तिशी संपर्क साधण्याशाठी मोबाईलधारकाला मोबाईल टॉवरची जेव्हडी गरज असते तेव्हडाच त्याला त्यापासून धोकाही असतो..कारण मोबाईल टॉवरमधून बाहेर पडणारं रेडिएशन जर जास्त तीव्रतेचे असेल तर त्यामुळे तुम्हाला आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही......
टॉवरमधून निघालेल्या रेडिएशनमुळे आजारांना बळी प़डलेल्यांची अनेक उदारहरणं जगभरात समोर येतायत.. टॉवरच्या परिसरात राहणा-या नागरिकांना कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला बळी पडावं लागलय.. आणि विशेष म्हणजे सरकारलाही या गंभीर धोक्याची पुर्ण कल्पना आहे... आणि म्हणूनच आता सरकारनं या गंभीर रेडिएशनच दखल घेतलीय..

१ सप्टेंबरपासून लागु करण्यात आलेल्या मोबाईल फोन टॉवरच्या नव्या नियमावलीनुसार मोबाईल फोन रेडिएशनच्या तीव्रतेवर मर्यादा आणण्याचे प्रयत्न सरकारनं सुरु केलेयत...या नव्या नियमानुसार मोबाईल टॉवरमधून निघणारी रेडिएशन फ्रिक्वेन्सी ९० टक्क्या पर्यंत कमी करावी लागणार आहे.. टॉवरच्या परिसरात राहणा-या लोकांवर त्याचा परिणाम होवू नये म्हणून हे नवीन नियम घालून देण्यात आले आहेत..

मोबाईल टॉवर्समधून निघणारं रेडिएशन कमी करण्यासंदर्भात मोबाईल तज्ञांनी फॉर्म्यूला तयार केला आहे..तसेच मोबाईल कंपन्यांनीही रेडिएशन कमी करण्यासाठी काम सुरु केलं आहे..टॉवर्सचं रेडिएशन कमी केल्यास मोबाईल फोनच्या कनेक्टीव्हीटीची समस्या निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे..पण त्यावर तोडगा काढण्यासाठी जवळपास ३३०० नवीन मोबाईल टॉवर्स उभारावे लागणार आहेत. रेडिएशन पासून जनतेचं संरक्षण करण्यासाठी सरकारने मोबाईल कंपन्यांना नव्या सुचना दिल्या आहेत..पण मोबाईल फोन कंपन्यांचा खर्च वाढल्यास त्याचा कॉल रेटवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही...आगामी काळात मोबाईल फोन किती महाग होईल? आणि तो वापरणं खिशाला परवडेल काय?


हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. मोबाईल कंपन्याच्या सिग्नल टॉवर्सपासून ते हँण्डसेटपर्यंत रेडिएशन कमी करण्यासाठी नवी प्रणाली अंमलात आणली जाणार आहे...पण या सगळ्या बदलाला कारणीभूत कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल...त्याचं उत्तर दडलंय , मोबाईलमधून बाहेर पडणा-या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये ...या रेडिएशनचा माणसाच्या शरिरावर गंभीर परिणाम होत असल्यांचा दावा इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकलने केलाय...


मोबाईल हॅन्डवर नेटवर्कचा फुल्ल सिग्नल पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होत असेल पण त्या सिग्नलमागे दडलेला धोका तुम्ही कधी लक्षात घेतलाय का ?.... मोबाईलच्या स्क्रिन वर जेवढा पॉवरफुल्ल सिग्नल तेव्हडं तुमच्या जवळ असलेल्या मोबाईल टॉवरचे रेडिएशन घातक ठरु शकतं..पॉवरफुल सिग्नलचा तुमच्या मेंदूवर गंभीर परिणाम होवू शकतो... देशभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर दूरसंचार खात्यानं ही बाबत उघड केलीय..मोबाईल फोनच्या अति वापरामुळे सुमारे 100 कोटी लोकांना कॅन्सरचा धोका तब्बल ४०० पटींनी वाढलाय.

मोबाईलच्या रेडिएशनचे विपरीत परीणाम होत आल्याचं संशोधनातून समोर आलं आहे... प्रामुख्यानं मोबाईलच्या रेडिएशनचे महिला आणि मुलांवर अतिशय झपाट्यानं दुष्परिणाम होत असल्याचं आढळून आलय.. शाळा आणि निवासी परिसरात असलेल्या मोबाईल टॉवरमुळे धोका अधिकच वाढलाय.. मोबाईलचं संकट केवळ ब्रेन ट्युमरपर्यंत मर्यादित राहीला नाहीय तर त्याचे शरीरातील इतर अवयवावरही दुष्परिणाम दिसून आलेयत.. दूरसंचार मंत्रालयाच्या अहवालानुसार मोबाईलच्य़ा अतिवापरामुळे स्मृतीभ्रंशाचा धोका संभवतो.. त्याचप्रमाणं ऐकण्याची क्षमता कमी होण्याचे प्रकारही वाढले आहेत... मोबाईलच्या अतिवापरानं त्वचारोगालाही आमंत्रण मिळतंय. अहवालात समोर आलेल्या माहीतीनुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदूखी आणि अशक्तपणा वाढल्याच्या तक्रारीतही वाढ झाल्याचं अहवालातून उघड झालं आहे.. मोबाईलच्या सतत वापरामुळे एकाग्रता नष्ट होत चाललीय..

मोबाईलमधून निघणा-या रेडिएशनचे केवळ माणसावरच नाही तर प्राण्यांवरही त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.... मोबाईलच्या रेडिएशनमुळेच शहरातून चिमन्यांचं प्रमाण घटत चाललं आहे....मोबाईमुळे निर्माण झालेल्या या सगळ्या प्रश्नांना तोंड देण्यासाठीच सरकारने 1 सप्टेंबरपासून टॉवरच्या रेडिएशनवर मर्यादा आणण्याचे निर्देश दिले आहेत..

First Published: Saturday, September 8, 2012, 00:13


comments powered by Disqus