Last Updated: Saturday, February 9, 2013, 00:50
डायनोसॉर.. मानवजातीला कुतूहल असलेले एक अवाढव्य प्राणी.. चित्रपट, डॉक्युमेंटरी, रिसर्च अशा अनेक माध्यमातून माहीती समोर येऊनही डायनोसॉर बद्दलच कुतूहल हे शमत नाही.. पण आता मात्र डायनोसॉर भारतात पुन्हा चर्चेत आलेयत.. आणि यावेळी कारण ठरलय ते डायनोसॉरच्या अंड्याची होत असलेली तस्करी.. जगाच्या बाजारात कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या या डायनोसॉरची अंडी भारतात बेकायदेशीर पणे विकली जातात ती अवघ्या पाचशे रुपयात.. विश्वास बसत नाही तर पहा हा रिपोर्ट..
ज्याच्यात दडलाय डायनासोरच्या अस्तित्वाची कहाणी.या अंड्याची किमत कोट्यवधी रुपयांची कशी असेल हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.. पण ही गोष्ट विचारापलीकडची का आहे याचं उत्तर दडलय ते अंड कुणाचे आहे या प्रश्नात हे अंड आहे डायनासोरचं.. कोट्यवधी रुपये किमतीच्या या अंड्याची भारतात अज्ञानामुळे कवडीमोल भावानं विक्री होतेय.. मध्यप्रदेशात ही अंडी केवळ पाचशे पाचशे रुपयांना विकली गेलीय
भारत - पाचशे रुपये
आंतरराष्ट्रीय बाजार - १ करोड रुपये
जगाच्या बाजारात या डायनोसोरच्या अंड्य़ाची किमत कोटीच्या घरात आहे. कारण ही अंडी केवळ त्या डायनासोरचा नाही.. तर काळाच्या प़डद्याआड गेलेल्या डायनासोरच्या युगाच्या अस्तित्वाची कहाणी जगासमोर नव्यानं सांगणार आहेत.. आणि हिच कहाणी जगाला सांगेल मानवाच्या जन्माअगोदरचंही पृथ्वीच वास्तव...
होय एक काळ असा होता, कि ज्या वेळी या संपुर्ण पृथ्वीवर फक्त डायनोसोरचं राज्य होतं.. जिथ आज आपण जाण्याचा विचारही करु शकत नाही तिथं फक्त त्यांचा वावर होता.. जिथं आज आपल्या वास्तव्याच्या निशाणी आहेत , त्याच प्रदेशावर फक्त डायनासोरची सत्ता होती.. असं असताना अचानक नेमकं काय घडलं की, हे सत्ताधिश अचानक जगाच्या नकाशावरुन लुप्त झाले.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील या डायनासोरच्या अंड्यामधून..
ही अंडी साडे सहा करोड वर्षापासून ते साडे चौदा वर्षापर्यंत पुरातन असू शकतात.. तुमच्या मनात प्रश्न हा ही असेल की या अंड्याचे आणि डायनासोरचं भारताशी नात आहे.. त्याचं कारण आहे की, ही अंडी मध्यप्रदेशच्या काही भागांमध्ये ही अंडी वारंवार मिळतात.. मध्यप्रदेशच्या आबोहवा भागातच प्राचीन काळात ही अंडी नेमकी का मिळतायत ?..भारताच्या भुपृष्ठावर नेमके कोणकोणते डायनोसॉर्स असायचे..? आणि भारतातूनही का नष्ट झाले डायनोसॉर्स ? याच प्रश्नांच्या शोधात संशोधक संशोधन करतायत.. आणि म्हणूनच कोट्यवधीच्या डायनोसॉर्सच्या अंड्याची लूट सुरु आहे. मध्यप्रदेशातील ही किमती अंडी आणि डायनोसॉर्सच्या हाडांची कळत नकळत विक्रीचे प्रमाण वाढत चाललय..
एका अंड्याची किंमत एक कोटी रुपये.. याच कारण आहे ते अंडे.. डायनोसॉरच्या अंड्याला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांची किंमत आहे. मध्यप्रदेशमधील त्य़ा घटनेनं सारेच जण हादरुन गेलेत.. जबलपूरमध्ये सापडलेली डायनोसॉरच्या अंड्याची केवळ पाचशे रुपयात विक्री करण्यात आलीय. तस्करानी आता मध्यप्रदेशाच्या जंगलात याची शोधाशोध सुरु केलीय. पण असं नेमक काय होत मध्यप्रदेशाच्या मातीत, की ज्यामुळे डायनोसॉरचे अवशेष तिथ सापडतायत..
मध्यप्रदेशचं आणि कोट्यवधी रुपये किमतीच्या या डायनोसॉरच्या अंड्याचं नेमकं नातं काय आहे? डायनोसॉरचं जबलपुर, धार भागात खरचं वास्तव्य होतं का..अशी नेमकी काय कारणं आहेत कि ज्यामुळे नर्मदेच्या आसपासच्या भागात डायनोसॉरचे अवशेष आणि अंडी सापडतायत..
जबलपूरच्या या खडकाळ भागाला लम्हेटा फॉर्मेशन नावानं ओळखलं जातं.. या बरोबरच या भागामध्ये डायनोस़ॉरच्या वेगवेगळ्या प्रजाती राहत असल्याचं संशोधनात समोर आलयं. डायनोसॉरचे युग संपल असलं तरी त्याच्या अस्तित्वाची कहाणी आजही समोर येतायत.. डायनोसॉ़रची अंडी आजही मध्यप्रदेशात मिळतात.. आणि म्हणूनच देशाविदेशातून अनेक पर्यटक आणि संशोधक या ठिकाणी येतात आणि अगदी खुलेआमपणे ही अंडी परदेशातून नेली जातायत..
संशोधकानी केलेल्या अभ्यासानुसार, जबलपूर आणि आसपासच्या भागांमध्ये डायनोसॉरला आवश्यक असणारा जलवायु मोठ्या प्रमाणात होता..
एकाद्या पुराश्म खडकाप्रमाणे दिसणारे ही अंडी आणि डायनोसॉरची अंडी.. संशोधकाना अतिशय महत्वाची ठऱणारी आहेत..
मध्यप्रदेशमीधील धार जिल्ह्यातील धर्मपुरीच्या जंगलात उत्खनन करताना हे अवशेष सापडलेत ज्याचा आकार डायनोस़ॉरशी मिळताजुळता आहे.. आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अंड्याची स्थानिकांकडून विक्री केवळ पाचशे रुपयात होतेय.. खुलेआम होत असलेला हा प्रकार वनविभागाचे अधिकारी मात्र नाकरतायत..
मध्यप्रदेश सरकारनं या जिवाश्माचे संवर्धन करण्यासाठी अनेक कायद्याची घोषणा केलीय.. पण त्या कायद्याची अमंलबजावणी मात्र होत नाहीय..आणि म्हणूनच आज या अंड्यांची खुलेआम विक्री होतेय..
डायनोसॉरच्या या अंड्याची काळजी घेतली जात नाहीय उलट त्या अंड्याच्या विक्रीकडेही दुर्लक्ष केलं जातय.. आणि त्याचाच फायदा आता तस्कर घेतायत..
मध्यप्रदेश आणि आणि दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये डायनोस़ॉर आणि अवशेष उत्खननात मिळाले आहेत. आणि यावरुन हे स्पष्ट होतं की, भारतातही डायनोसॉरच वास्तव्य होतं. आणि म्हणूनच अनेकांना हा प्रश्न पडतो की भारतात असणारे डायनोसॉर हे नेमके कसे होते.. अर्थात याचं उत्तरही भूगर्भवैज्ञानिकांनी शोधलय...
होय़.. भारतातही डायनोसॉरचं वास्तव होत.. भारतात असलेले डायनोसॉर हे शाकाहारी होतं. पंजाब विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनानुसार भारतात असेलेल डायनोसॉर हे आक्रमक आणि हिंसक प्रजातीत मोडणारे नव्हते. डायनोसॉरच्या बाबतीत आता संशोधन झाल्यावर जी माहीती समोर येतेय ती अंचबीत करणारी आहे. डिसेंबर २००८ मध्ये सायन्स या विज्ञानपत्रिकेच्या दाव्यानुसार लहान डायनोसॉर आणि अंड्याना सांभाळण्याचे काम हे मादी डायनोसॉरच्या एवजी नर डायनोसॉर करायचे. जीवशास्त्राच्या अभ्यासकांनी केलेल्य़ा रिसर्चनुसार डायनोसॉरचं हे वागणं काही पक्ष्याच्या वागण्याशी मिळतजुळतं आहे. कारण नव्वद टक्के पक्षी असे असतात की ज्यामध्ये लहान पिल्लांना सांभळण्याची जबाबदारी ही नर पक्ष्यांवर असते.. डायनोसॉरचं वागणही असच असल्याच अभ्य़ासात समोर येतय... मुंटाना विश्वविद्य़ालयचे संशोधक प्राध्यापक डेव्हिड यांनी याचा विशेष अभ्यास केलाय. आणि याला विशेष आधार मिळालाय डायनोसॉरच्या या अंड्याच्या अभ्यासानं... त्याचप्रमाणं डायनोसॉरच्या अस्थी अवशेषावरुन मादी डायनोसॉरमधील मेडलडी ही आढळून येत नसल्याच स्पष्ट झालय.. कारण अंड्याजवळ सापडलेली डायनोसॉरचे अवशेष हे नर डायनोसॉरचे आहे. आणि यावरुन हे स्पष्ट होतं की, अंड्याचा आणि लहान डायनोसॉरचा सांभाळ करायचं काम नर डायनोसॉर करायचे.. त्याचप्रमाणे भारतात आढळलेल्या डायनोसॉरच्या अवशेषावरुन त्यांच्या भ्रमतीबद्दलही समज येते.. कारण भारतातील आढळेलेले डायनोसॉरचे अवशेष आणि युरोपमधील डायनोसॉरचे अवशेष हे मिळतेजुळते आहेत. युरोपमधून भटकंती करत करत हे डायनोसॉर भारतात आल्याचं उघड झालयं.. त्याचप्रमाणे डायनोसॉर हे समुहानं फिरत असल्याचही अभ्यासात समोर आलय.. या डायनोसॉरमध्ये काही डायनोसॉर हे आक्रमक स्वभावाचे पण होते.. प्रामुख्याने यात शाकाहारी डायनोसॉरवर आक्रमक डायनोस़ॉर हल्ला चढवायचे.. पण एकूणच यावर अजूनही संशोधन होणं गरजेचं आहे..
एक असा काळ होता की डायनोसॉरचे पृथ्वीवर राज्य होतं.. हेच कारण आहे की ज्यामुळे आज पृथ्वीवरच्या अनेक भूभागावर डायनोसॉरचं अस्तित्व असल्याच्या खुणा सापडतात. कारण याच भूगर्भातल्या उत्खननातून एका कालखंडाची माहीती ही जगासमोर येतेय.. आणि या सगळ्याला आधार मिळतोय ती मध्यप्रदेशात सापडलेली अंडी.. या अंड्यामुळेच भारतातही डायनोसॉर होते का या प्रश्नाचही उत्तर मिळालय..
पृथ्वीवरचा हा भूभाग म्हणजे उत्तर अमेरिका म्हणून ओळखला जातो.. घनदाट जंगल..दूर दर पर्यंत पसरलेल्या या पर्वतरांगामध्ये डायनोसॉरचा जन्म व्हायचा. त्या वेळी पृथ्वीचे वातावरण आजच्या पेक्षाही तप्त असायचं.. ड्रॅगनसारखे अवाढव्य पक्षांपासून ते जमिनीवरच्या डायनोसॉरपर्यंत इथली जीवसृष्टी ही त्या काळाशी सुसंगत होती.. त्यावेळी डायनोसोरचे राज्य होतं. डायनोसोर्सचं युग संपल असल तरी त्यावेळच्या अस्तित्वाच्या खुणा आजही दिसतात.. डायनोसॉरच्या अंड्यात या त्या काळाच्या खुणा लपल्या आहेत. या अंड्याचे महत्व, आजच्या काळातील किमत हे संशोधकाना ठावूक आहे. आणि संशोधकाना मागील दोन वर्षापासून या डायनोसोर्ससंदर्भातील अतीशय महत्वाची माहीती मिळालीय
ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते डायनोसॉर्सचं पक्ष्यांशी साधर्म्य असेलेलं नातं.. वैज्ञानिकांच्या संशोधनातून हे समोर आलयं की, पक्ष्यांची अशाही काही जमाती आहेत ज्या डायनोसोर्सपासून उत्पन्न झाल्यायत..
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी जमा झालेल्या अंडी आणि डायनोसॉर्सच्या अवशेषामध्ये एक खास प्रोटीन सापडलय.. डायनोसोर्सच्या प्रजातीचा नामशेष हा मेक्सीकोजवळ आदळलेल्या एस्टरॉयडमुळे झालं होतं. स्पेनमध्ये मिळालेल्या ८ कोटी वर्षापुर्वीच्या एक अंड्यामुळे डायनोसोर्सच्या गुणसुत्रांची माहीती मिळण्यास मदत झालीय.. आणि त्याचवरुन हे स्पष्ट झालय की, त्यांची संरचना ही पक्ष्यांसारखी होती..
एस्टेरॉय़डच्या १८ मिनिटाच्या टक्करीमुळे पृथ्वीवरील सुमारे ९० टक्के डायनोसॉर नष्ट झाले होते..
अतिशय महत्वाची माहीती ही संशोधकानी जगासमोर आणलीय. पण एवढं असूनही भारताला आता य़ा सगळ्याचं महत्व समजून घेऊन डायनोसोरच्या अंड्याची तस्करी रोखण गरजेचं बनलय...
डायनॉसोरचे अखेरचे दिवस कसे होते...कशी आणि का झाली डायनॉसोरसारख्या महाभंयकर प्राण्याची एक प्रजाती नष्ट त्या काळात... त्या महाभंयकर दिवसांच्या आठवणींना उजाळा देणार आमच्या या खास रिपोर्टमध्ये....
डायनोसॉरचा अंत ही पृथ्वीवरील घटनाच्या इतिहासामधील मृत्युची रेषा ओढणारी एक सर्वात महाभंयकर घटना होती. ज्या घटनेमुळे डायनोसॉरची प्रजाती नष्ट झाली होती, त्या महाभंयकर वादळाचं नाव होतं `एस्टेरॉयड`.... साडे सहा कोटी वर्षांपूर्वी एस्टेरॉयडची भीषण टक्कर पृथ्वीशी झाली होती. ती टक्कर म्हणजे शेकडो अणूबॉम्बच्या स्फोटाएवढी दाहक आणि भिषण होती. मेक्सिको शहराजवळ एस्टेरॉयडची टक्कर पृथ्वीशी झाली आणि पाहाता पाहाता महाभयंकर हानी झाली. या टक्करीतून निर्माण झालेल्या उष्णतेचा 99 टक्के भाग पृथ्वीच्या पृष्ठ भागावरच राहील्यानं पृथ्वीवरील तापमान 600 डिग्री सेल्सीयसच्यावर गेलं. पृथ्वीवर चारही बाजूला भयंकर आग लागली. प्रचंड तापमान आणि धूरामुळे डायनोसॉरला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. समुद्रातील पाण्याला उकळी फुटली होती. डायनोसॉरांना उकळत्या पाण्यात जात येत नव्हतं तर पृथ्वीवर प्रचंड तापमान असल्यान त्यांना जमिनीवरही राहता येत नव्हतं. त्यामुळे बहुसंख्य डायनोसॉरचा अंत हा त्यावेळीच झाला. टक्करीमुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. आकाशातून आगीचे गोळे पृथ्वीवर पडत होते. जमिनीच्या पोटातही खळबळ माजली होती. त्यामुळे ११ रिक्टल स्केल तीव्रतेचा भूकंप आला. चारही बाजूने आग येत असल्यानं डायनोसॉरसमोर जिवंत राहण्यासाठीचा दुसरा पर्याय शिल्लक राहीला नव्हता. एस्टेरॉयडच्या टक्करीमुळे डायनोसॉरची प्रजाती नष्ट झाली. साडे सहा कोटी वर्षांपूर्वी झालेल्या पृथ्वीवरील या सर्वात मोठ्या विध्वंसाला मास मर्डर किंवा सामूहिक हत्याकांड म्हणून सुध्दा ओळखला जातं...
First Published: Saturday, February 9, 2013, 00:50