रहस्य स्वप्नांचं!, rahasya swapnanch

रहस्य स्वप्नांचं!

रहस्य स्वप्नांचं!

ही दुनियाच मोठी आहे अद्भुत!
इथं कोणतीच गोष्ट नाही वर्ज!
वास्तवाप्रमाणेच येतो अनुभव!
प्रेम, द्वेष, मोह, माया, वेदना सगळं काही आहे तिथं!
अशक्यही शक्य होतं तिथं!
त्या दुनियेला काळाचं नाही बंधन!
पण त्या दुनियेचं वास्तव आहे वेगळं!
प्रत्येक माणसाने केलीय त्या दुनियेची सफर!
ती सफरही मोठी असते अनोखी!
कधी श्वास रोखून धरायला लावणारी!
तर कधी आनंद देणारी!
माणसासाठी ते नेहमीच राहिलंय एक गूढ!
प्राचीन काळापासून होतेय त्यावर चर्चा!
पण आता झालाय त्याचा उलगडा!


कॅनडातील मॉण्ट्रियल विद्यापीठातील एका अभ्यास गटाने तब्बल ११ वर्ष माणसाच्या स्वप्नांचा अभ्यास करुन स्वप्नांच्या दुनियाचा उलगडा करण्यात यश मिळवल्याचा दावा केलाय. स्वप्न... एक असं विश्व जे नेहमीच माणासासाठी गूढ बनून राहिलं आहे. कारण स्वप्नंचं जगच निराळं आहे. झोप हा माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण मनुष्य निद्रीस्त होताच ती व्यक्ती एका अनोख्या विश्वात प्रवेश करते आणि ते विश्व असतं स्वप्नांचं... तिथली प्रत्येक घटना वास्तवाप्रमाणे भासते. त्यामुळे स्वप्न पाहणा-या व्यक्तीला वास्तव आणि स्वप्न यांच्यात फरक करणं अवघड होऊन बसतं. जोपर्यंत मनुष्य स्वप्नात असतो तोपर्यंत त्याला वास्तवाचं भान रहात नाही. ती व्यक्ती स्वप्नालाच वास्तव मानत असते. मात्र, जेव्हा स्वप्न भंग होतं तेव्हा मणुष्याला वास्तवाची जाण होते. पण तोपर्यंत ज्या विश्वाचा अनुभव माणसाला येतो ते काही वेगळंच असतं. गेली अनेक वर्षांपासून या अनोख्या विश्वाचा अभ्यास केला जात आहे. स्वप्नांचं गूढ जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वप्न हे माणसाला सुख, दु:खाचा अनुभव देतात. वास्तवाचा क्षणिक अनुभव देणारी स्वप्नांची दुनिया स्त्री-पुरुषांसाठी एक सारखीचं आहे. प्रत्येक व्यक्तीला पडणारं स्वप्न हे वेगळं असतं. पण, जेव्हा शेकडो व्यक्तींच्या स्वप्नांचा अभ्यास केला गेला तेव्हा काही स्वप्न हे कॉमन असल्याचं समोर आलं. मॉण्ट्रियल विद्यापीठातील अभ्यास गटाने स्वप्नांचं रहस्य उलगडण्यासाठी शेकडो लोकांच्या दैनंदिन स्वप्नांचा अभ्यास केला आहे. लोकांना वारंवार कोणती स्वप्न पडतात, याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्यांची वर्गवारी केली. या अभ्यासादरम्यान त्यांनी स्वप्नांची ५६ विभागात वर्गवारी केली आणि त्यानंतर आपला निष्कर्ष मांडला आहे. त्या निष्कर्षातून स्वप्नाविषयाच्या काही महत्त्वाच्या बाबींचा उलगडा करण्यात आल्याचा दावा त्या गटाने केला आहे. सर्वसामान्यपणे लोकांना कोणती स्वप्न पडतात? त्यातील वारंवार पडणारी स्वप्न कोणती? पुरुषांना कोणती स्वप्न पडतात? स्त्रियांच्या स्वप्नांचा विषय कोणता असतो? अशा काही प्रश्नांचा उलगडा करण्यात आल्याचा दावा मॉण्ट्रियलच्या अभ्यास गटाने केलाय.

रहस्य स्वप्नांचं!

काय पडतात पुरुषांना स्वप्न...
स्वप्न सर्वांनाच पडतात. त्यात महिला-पुरुष असा भेद नाही. पण त्यांना जी स्वप्न पडतात त्यांचा विषय मात्र वेगवेगळा असतो. पुरुषांना तसेच स्त्रियांना वारंवार पडणा-या स्वप्नांचा उलगडा आता झाला आहे. पुरुषांना कोणती स्वप्न वारंवार पडतात त्यावर आता एक नजर टाकणार आहोत. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हटलं जातं. मनात दडपलेल्या इच्छांच प्रतिबिंब स्वप्नात उमटतं असं नेहमीच सांगितलं जातं. पण, त्यावरही वेगवेगळे मत प्रवाह आहेत. स्वप्न पहाण्यासाठी माणूस स्वप्नाळू असण्याची आवश्यकता नसते. स्वप्न अपोआप पडतात. त्याचा विषय कधी कोणता असेल हे आधी ठरवता येत नाही. त्याला स्थळ- काळाचं बंधन नसतं. पण त्याचा विषय मात्र अनेकांच्या बाबातीत एक सराखाच असू शकतो. कॅनडाच्या मॉण्ट्रियल विद्यापीठातील एका अभ्यास गटाने स्त्री-पुरुषांच्या स्वप्नांविषयी सखोल अभ्यास केला असून स्त्री- पुरुषांना सर्वाधिक कोणती स्वप्न पडतात याचं विश्लेषण केलं आहे. पुरुषांना पडणाऱ्या स्वप्नांमध्ये केवळ कामविचारांवर भर असल्याचं पहायला मिळालं आहे. टक्केवारीत विचार केल्यास हे प्रमाण जवळपास ८५ टक्के इतकं असल्याचा दावा मॉण्ट्रियलच्या अभ्यास गटाने केलाय. पुरुषांची स्वप्न ही याच विषयाने सजलेली असतात. आठवड्यातून वारंवार पडणाऱ्या स्वप्नांमध्ये हाच याच विषयाचा समावेश असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. पुरुषांच्या मनाची अर्धजागृत अवस्था ही त्या नाजूक विषयावर केंद्रीत असल्याचं पहाणीतून उघड झालं आहे. अनेक पुरुषांच्या स्वप्नांचा अभ्यास केल्य़ानंतर हा उलगडा झाला आहे. पुरुषांच्या स्वप्नांचा हा सर्वाधिक विषय असला तरी या विषया व्यतिरिक्तही पुरुषांच्या स्वप्नांचे आणखी काही विषय असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. आपण हवेत उडत असल्याचं स्वप्न अनेक पुरुषांनी बघितल्याचं सांगितलंय. पक्षाप्रमाणे आपल्याही हवेत उडता यावं अशी अनेकांची इच्छा असते आणि त्याचंच प्रतिबिंध स्वप्नात उमटतं. हवेत उडण्याप्रमाणेच आपल्याला जादुई शक्ती प्राप्त व्हावी अशी इच्छा असते. त्यामुळेच जादुई शक्ती प्राप्त झाल्याचं स्वप्न अनेक पुरुषांनी बघितलं असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांच्या स्वप्नांचाही उलगडा करण्यात यश आल्याचा दावा मॉण्ट्रियलच्या अभ्यास गटान केलाय.



रहस्य स्वप्नांचं!

काय पडतात स्त्रियांना स्वप्न…
पुरुषांना जी स्वप्न वारंवार पडतात ती महिलांना पडत नाहीत. त्यांना एक सतावणारं स्वप्न वारंवार पडतं. मात्र, ते स्वप्न त्यांना झोपेतून जागं करण्यास पुरेसं असतं. ते स्वप्न आहे तरी काय? स्त्री असो की पुरुष प्रत्येकाच्या स्वप्नांचा विषय वेगवेगळा असू शकतो. कुणाला कोणतं स्वप्न प़डेलं याचा काही नेम नाही. पण कॅनडातील मॉण्ट्रियल विद्यापीठात स्वप्नाविषयी जे संशोधन करण्यात आलंय त्यातून पुरुषांप्रमाणेच महिलांच्या स्वप्नांचाही उलगडा झाला आहे. महिलांना जी स्वप्न पडतात त्यात सर्वाधिक स्वप्न हे कुणीतरी आपला पाठलाग करत असल्याची असतात. या संशोधनात शेकडो महिलांच्या स्वप्नांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यांमध्ये महिलांना सतत पडणाऱ्या स्वप्नांची एक वर्गवारी करण्यात आली होती. त्यामध्ये ही बाब समोर आली आहे. कुणी तरी पाठलाग करत असल्याचं स्वप्न बघितल्याचं जवळपास ८३ टक्के महिलांना सांगितलंय.

महिलांना सतावणारं हे स्वप्न पुरुषांनीही बघितलं असून त्यांचं प्रमाण जवळपास ७८ टक्के असल्याचं पहाणीत आढळून आलं आहे. कामविचारांना प्रोत्साहन देणारी स्वप्न केवळ पुरुषांनाच पडतात असं नाही तर महिलाही स्वप्नात कामुक होतात. स्वप्नांविषयी केलेल्या अभ्यासात ७३ टक्के महिलांनी त्या नाजूक स्वप्नांची कबुली दिली आहे. पुरुषांना ही स्वप्न वारंवर पडतात मात्र स्त्रियांच्या बाबतीत हे प्रमाण फारच अल्प आहे. आयुष्यात केवळ एकदाच स्वप्न पडल्याचं ७३ टक्के महिलांनी सांगितलंय. साप आणि मकडी हे महिलांच्या स्वप्नांत नेहमी दर्शन देत असतात. या स्वप्नांव्यतिरिक्त आणखी काही स्वप्न आहेत जे महिला तसेच पुरुषांना झोपेतून जागे करतात. त्यामध्ये उंचावरुन पडणे, पाण्यात अडकणे, पाठलाग करणे, साप दिसणे, दात तुटणे, पुरात अडकणे अशा काही स्वप्नांचा समावेश आहे. माणसाला अनेक स्वप्न पडतात त्यातली काही स्वप्न झोपेतून जागे करतात तर काही विस्मृतीत जातात. तर काही कायमची लक्षात राहतात. पण या स्वप्नांना काही अर्थ असतो का? हा प्रश्न प्राचीन काळापासून माणसाला सतावत आला आहे.

रहस्य स्वप्नांचं!

स्वप्न म्हणजे नेमकं काय

स्वप्न आहे तरी काय? त्याचा काही अर्थ असतो का? हा प्रश्न अनेक काळापासून माणसाला सतावत आला आहे आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला गेला आहे. मानशास्त्रीय दृष्ट्या स्वप्नांचं महत्व आणि त्याचा अर्थ आता आपण जाणून घेणार आहोत.

स्वप्न आहे तरी काय? असा प्रश्न अनेक काळापासून मानवाला सतावत असून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून केला गेला आहे. मानसशास्त्र अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार झोपेतील मनाच्या अर्धजागृत अवस्थेला स्वप्न म्हटले जाते. स्वप्नामध्ये माणसाला विविध प्रकारचे प्राणी तसेच वस्तू दिसतात. स्वप्नाची तुलना ही काही प्रमाणात दिवा स्वप्नाशी केली गेलीय. पण दिवास्वप्न पहाणाऱ्या व्यक्तीला आपण कोणतं स्वप्न पहात आहोत याची माहिती असते. पण स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला त्याची कल्पना नसते. प्राचीन काळी स्वप्नांना मोठं महत्त्व होतं. कारण त्याचा अर्थ लावला जात असे. स्वप्नातून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न त्याकाळी केला जात असे. मात्र, आजच्या काळात तो अंधविश्वास मानला जातोय. दिवसभरातील घडामोडींचा स्वप्नांत प्रतिबिंब उमटत असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बाहेरच्या वातावरणाचा माणसाच्या स्वप्नांवर परिणाम होत असल्याचं संशोधनात आढळून आलं आहे. एखाद्या झोपी गेलेल्या व्यक्तीच्या पायावर थंड पाणी ओतल्यास त्याला नदीतून चालत असल्याचं किंवा अंघोळ करत असल्यंच स्वप्न पडतं... झोपेत असतांना शरिरावर पडणा-या विविध प्रभावामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडतात. आजारपणात पडणाऱ्या स्वप्नांचाही अभ्यास केला गेला आहे. आजारपणात भयंकर स्वप्न पडतात तर सामान्य अवस्थेत चांगली स्वप्न पडतात. स्वप्नांच्या संशोधनात सर्वात मोठं योगदान हे सिग्मन फ्राईड यांचं आहे. माणसाचं मन जाणून घेण्यासाठी त्याची स्वप्न जाणून घेण आवश्यक असल्याचं फ्राई़ड यांनी आपल्या अध्ययनातून जगासमोर मांडलं.

First Published: Monday, September 24, 2012, 21:54


comments powered by Disqus