Last Updated: Monday, August 13, 2012, 22:13
www.24taas.com ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केलीय. 2 सिल्व्हर आणि 4 ब्राँझ मेडल्स पटकावत रेकॉर्ड 6 मेडल्सची कमाई केली. बीजिंगमध्ये 3 तर आता लंडनमध्ये 6 अशी डबल झेप भारतीय खेळाडूंनी घेतलीय. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने भारत क्रिडा क्षेत्रात महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे असंच म्हणाव लागेल.
ऑलिम्पिक... खेळांचा महाकुंभ... जगभरातील देशांना आपली सत्ता आणि ताकद दाखवण्याची चार वर्षातून मिळणारी एक संधी... अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, जर्मनी या बलाढ्य देशांना तर आपलं वर्चस्व दाखण्याची ही तर पर्वणीच. या विकसित देशांचा खेळांमधील दबदबा निर्विवाद... एकविसाव्या शतकात जगासमोर महासत्ता बनून उभ्या ठकलेल्या भारतानेही लंडनमध्येही आपल्या कामगिरीत लक्षणीय प्रगती केली. लंडन ऑलिम्पिकपूर्वीच्या कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये एखाद्या मेडलची कमाई जरी झाली तरी ते विशेष मानलं जातं. मात्र, लंडनमध्ये भारतीय योद्धांनी जगाला आपली ताकद दाखवलीय. भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासात रेकॉर्ड तोड सहा मेडल्सची कमाई केलीय. मेडलचा श्रीगणेशा केला शूटर गगन नारंगने. 10 मीटर एअर रायफल प्रकारात गगनने ब्राँझ मेडलची कमाई केली आणि भारताचं खातं उघडल. त्यानं 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतालं लंडनमधील पहिलं मेडल मिळवून दिलं. नारंगनंतर आर्मी मॅन विजय कुमारनंही मेडलचा वेध घेतला. त्यानं 25 मीटर रॅपीड फायर पिस्तुल प्रकारात कमाल करत सिल्व्हर मेडलवर आपलं नाव कोरलं.
शूटर्सनंतर भारताला सर्वाधिक अपेक्षा होत्या त्या फुलराणी सायना नेहवालकडून... सायना नेहवालनं चीनी ड्रॅगनच्या मक्तेदारीला जोरदार टक्कर दिली. लंडनमध्ये ब्राँझची कमाई करत सायनाने आपल्या बरोबरच कोट्यावधी भारतीयांचही स्वप्न पूर्ण केलं. भारतासाठी बॅडमिंटनमध्ये पहिलं वहिलं मेडल ठरलं. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताने इतिहास रचत तीन वैयक्तिक मेडल्सची कमाई केली होती. आणि लंडनमध्ये सायनाच्या मेडलने त्याची बरोबरी झाली. सायनाच्या मेडलनंतर भारत बीजिंगपेक्षा सरस कामगिरी करणार हे निश्चित झालं होतं. कारण मेरी कोमनं बॉक्सिंगची सेमी फायनल गाठली होती. ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंग पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय महिलांच्या मनगटाची ताकद मेरीनं जगाला करुन दिली. मेरीनं भारताला अजून एका ब्राँझ मेडलची कमाई करुन दिली. बीजिंगमध्ये भारताला ब्राँझ मिळवून देणारा आणि लंडनमध्ये भारताचा फ्लॅग बेअरर सुशील कुमारकडूनही मेडलची अपेक्षा होतीच. सुशील कुमार आणि टीम कुस्तीत काय कमाल करतात याकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. 60 किलो फ्रिस्टाईल कुस्तीत योगेश्वर दत्तने जबरदस्त कामगिरी केली. आणि भारतला अजून एक ब्राँझ मेडल मिळवून दिलं. योगेश्वरच्या कामगिरीमुळे अपेक्षा वाढल्या आणि त्या पूर्णही झाल्या. लढवय्या सुशीलकुमारनं भारताला दुसरं सिल्व्हर आणि एकूण सहावं मेडल मिळवून दिलं. सुशील कुमारनं 66 किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल मिळवले... भारताचं लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करणारा आणि दोन्हीही ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मेडलची कमाई करणारा सुशील कुमार पहिला आणि एकमेव भारतीय ठरला. ऑलिम्पिकच्या इतिहासात लंडन ऑलिम्पिक हे भारतासाठी सर्वात यशस्वी आणि प्रेरकही ठरलं. खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वच कौतुकाचा वर्षावही होतोय. मात्र, प्रत्येकाला अजूनही एक खंत आहे ती गोल्ड मेडलचीचं.

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदकांची कमाई केलीय. गेल्या ऑलिम्पिकच्या तुलनेत हा आकडा दुप्पट असला तरी भारताच्या लोकसंख्याच्या तुलनेत हे यश फारच मर्यादीत आहे.
देश – भारत, लोकसंख्या - 125 कोटी, लंडन ऑलिम्पिकमध्ये 6 मेडल्स - 0 गोल्ड, 2 सिल्व्हर, 4 ब्राँझ
देश – ग्रेनेडा, लोकसंख्या - 1 लाख 5 हजार, लंडन ऑलिम्पिकमध्ये 1 गोल्ड मेडल,
देश – जमैका, लोकसंख्या - 27लाख 05, 827, लंडन ऑलिम्पिकमध्ये 12 मेडल्स, 4 गोल्ड, 4 सिल्व्हर, 4 ब्राँझ
देश – लिथुआनिआ, लोकसंख्या - 31लाख 87हजार, लंडन ऑलिम्पिकमध्ये 5 मेडल्स, 2 गोल्ड, 1 सिल्व्हर, 2 ब्राँझ
देश – लॅटव्हिया, लोकसंख्या - 20 लाख 70 हजार, लंडन ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल्स, 1 गोल्ड, 1 ब्राँझ
यांपैकी बऱ्याचशा देशांची नावं कदाचीत तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असतील. ग्रेनेडासारखा देश जागाच्या नकाशावर सहजासहजी शोधणंही काठीण आहे. मात्र, जेमतेम एक लाख लोकसंख्येच्या देशानं लंडन ऑलिम्पिकमध्ये चक्क गोल्ड मेडलची कमाई केलीय. 400 मीटर शर्यतीत किरानी जेम्सनं गोल्ड मेडल मिळवल्यानंतर अनेकांना या देशाबद्दल प्रथमच माहित झालं. पुणे किंवा नागापूरपेक्षाही लहान असलेल्या जमैका आणि त्रिनिदाद टोबॅगोसारख्या देशांनी तर लंडनमध्ये कमालच केली. जमैकानं तब्बल 4 गोल्डसह 12 मेडलची कमाई करताना मेडल टॅलित 18 स्थानावर झेप घेतली. एकूणच काय काही लाखांत लोकसंख्या आणि आकारानं तर जागाच्या नकाशावर एखाद्या टिंबाप्रमणे भासणाऱ्या या देशांनी ऑलिम्पिकमध्ये मात्र गोल्ड मेडलची कमाई करत आपल्या पेक्षा आकाराने कितीतरीपटीने मोठ्या असलेल्या देशांना मागे टाकलंय. भारतानं लंडनमध्ये बीजिंगपेक्षा दुप्पट मेडलची कमाई केली. ऑलिम्पिकच्या इतिहासात 6 मेडल्स ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असली तरी 120 कोटींच्या देशाला गोल्ड मेडल मात्र मिळू शकलं नाही. एकीकेड अमेरिका, चीन, रशिया, ग्रेट ब्रिटनं या विकसीत देशांनी मेडल्सचा वर्षाव केला तर महासत्ता होण्यासाठीचा दावा करणाऱ्या भारताचं सुवर्णस्वप्न मात्र अपूर्णच राहिलं. गेल्या ऑलिम्पिकच्या तुलनेत लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीयांनी आपल्या कामगिरीत नक्कीच सुधारणा केलीय. मात्र, आपल्याला अजून बरिच महनत करावी लागणार आहे.

ट्रेनिंग की टॉर्चर ? लंडन ऑलिम्पिकमध्ये चीनने ८७ मेडल्स मिळवून जगात दुसरा क्रमांक पटकावलाय. पण कसे घडवले जातात हे चॅम्पियन्स? कसे मिळवतात गोल्ड मेडल? किती कठीण आणि कठोर असते या प्रवासाची सुरुवात? याचा कधी विचार केलाय?
निरागस मुलांचा आक्रोश… कोवळ्या मुलांचं दु:ख... चिमुरड्यांची वेदना... डोळ्यात अश्रू... चेहऱ्यावर असहायता आणि वेदनांनी क्षीण झालेलं शरीर... हे चित्रं आहे चीनमधलं एक स्पोर्ट स्कूल... किंवा त्याला तुम्ही ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याचा कारखानाही म्हणू शकता. या स्पोर्ट स्कूलमध्ये चार वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना खेळाचं ट्रेनिंग दिली जातंय. पालकांच्या अनुमतीनंतरच या स्कूलसाठी मुलांची निवड केली जाते. एकदा मुलाची निवड झाली की मग मुलांची शारिरिक क्षमता तपासली जाते. त्यानंतर तो मुलगा किंवा मुलगी कोणत्या खेळासाठी योग्य आहे याचा निर्णय घेतला जातो. एकदा स्पोर्ट स्कूलमध्ये मुलांना प्रवेश दिल्यानंतर त्या मुलांची सर्वस्वी जबाबदारी ही स्पोर्ट स्कूल प्रशासनावर असते. इथेच त्याला सर्वप्रकारचं शिक्षण दिलं जातं तसेच खेळाचं ट्रेनिंगही इथंच दिलं जातं. इथलं ट्रेनिंग हे अत्यंत कडक आणि कठोर मानलं जातंय.
जिम्नॅस्टिक प्रकारात आजही चीनचा दबदबा आहे. चीनच्या जिम्नॅस्टची बरोबरी करणं काही सोपी गोष्ट नाही. लंडन ऑलिंम्पिकमध्ये चीनने याप्रकारात ४ गोल्ड,३ सिल्वहर आणि १ ब्रँन्झ मिळवलंय...पण हे यश काही सहजा सहजी मिळवलं नाही... एक चांगला जिम्नॅस्ट तय़ार करण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतं. चीनमधील खेळाचं वास्तव सांगणारी दोन दृश्यं... एकीकडं खेळात मिळणारी सफलता तर दुसरीकडं आक्रोश... एकीकडं मेडल तर दुसरीकडं चिमुरड्यांच्या वेदना...
जिम्नॅस्टिकमध्ये कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं त्याचं धगधगत वास्तव बघीतल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल. पहा कशा पद्धतीने या चिमुरड्यांचं शरिर लवचिक बनवलं जातंय. कोच या कोवळ्या मुलाच्या पाठिवर बसायला मागेपुढे पहात नाही. चार वर्ष वयाच्या कोवळ्या जीवाला किती वेदना होत असतील याची कोचला जराही फिकीर नाही. कोच कशा पद्धतीने या कोवळ्या जीवाला ट्रेनिंग देतात. आगामी काळातील स्पर्धांसाठी या मुलामुलींची तयारी करुन घेतली जाते. चीनमध्ये तर काही ठिकाणी यापेक्षाही भयंकर पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं असून ते पाहण्य़ाची तुमची हिंमत्त होणार नाही. ज्या वयात आपण आपल्यामुलांना फुलांप्रमाणे सांभाळतो त्या वयात चीनमध्ये पालक आपल्या मुलांना अत्यंत कठोर ट्रेनिंगसाठी स्पोर्ट स्कूलमध्ये पाठवतात. १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ या कोवळ्यांना लटकत ठेवलं जातं. या कोवळ्या हातांना संपूर्ण शरिराचा भार सहन करावा लागतो. कोचनं ठरवून दिलेल्या वेळे पर्यंत मुलामुलींना तसंच लटकत रहावं लागतं पण जर का एखाद्याने मध्येच हात सोडले तर कोचच्या कठोर शिक्षेला सामोरं जावं लागतं. या स्पोर्ट स्कूलमध्ये अत्यंत कठोर पद्धतीने कोवळ्यामुलांना प्रशिक्षण दिलं जातं. खरं तर अशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं जावं की जाऊ नये यावर मतभेद असले तरी कठीण प्रशिक्षणाशिवाय कोणत्याही स्पर्धेत यश मिळत नाही हे कोणीही नाकारु शकणार नाही.
First Published: Monday, August 13, 2012, 22:13