हॉस्पिटलचं झालं तळ, रुग्णांना धोका, rain water in gandhi hospital

हॉस्पिटलचं झालं तळ, रुग्णांना धोका

हॉस्पिटलचं झालं तळ, रुग्णांना धोका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत सुरु असलेल्या पावसाचा फटका परळच्या महात्मा गांधी हॉस्पिटलला बसलाय. या पावसामुळे हॉस्पिटलच्या वॉर्डात पाणी शिरलंय. हॉस्पिटलमध्ये शिरलेल्या या पाण्यामुळे रुग्णांची मोठी तारांबळ उडालीय.

हॉस्पिटलच्या इलेक्ट्रीसिटी बोर्डातही पाणी गेल्य़ानं बेस्टनं वीजपुरवठाही खंडीत केलाय. हॉस्पिटलच्या ICU वॉर्डातही पाणी शिरले आहे. त्यामुळे सगळ्या रुग्णांचे प्रचंड हाल होतायत.

गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे या हॉस्पिटलची स्थिती आधिकच खचली. आधीच डबघाईला आलेल्या या हॉस्पिटलच्या या स्थितीमुळे सगळ्या रुग्णांची रवानगी विविध हॉस्पिटलमध्ये करण्यात आलीय. झी 24 तासची टीम दाखल होताच रुग्णालय प्रशासनानं पेशंट्सना हलवण्याचं आश्वासन दिलंय.
या अपु-या सुविधा, त्यात स्वच्छतेचे वाजलेले तीनतेरा यामुळे हास्पिटल रुग्णांना बरे करते की आणखीनच आजारी करते या बाबत मोठं प्रश्नचिन्ह उभं ठाकलयं.


मागील तीन दिवस पेशंट्सचे जे हाल झाले त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित झालाय. दरम्यान ही बातमी लावून धरत आवाज उचलल्याबद्दल इथल्या रुग्णांनी आणि स्टाफनं झी 24 तासचे आभार मानलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 17, 2013, 15:21


comments powered by Disqus