Last Updated: Friday, August 17, 2012, 16:05
www.24taas.com,मुंबईआज गृहनिर्माण सोसायटीत राहणा-यांची संख्या वेगाने वाढतेय ...पण तिथंल्या रहिवाशांच्या सुरक्षिततेकडं गांभिर्यानं बघीतलं जात नाही...गेल्या अनेक प्रकरणातून ते उघ़ड झालं आहे ..आणि त्यामुळेच सोसायटीतील रहिवाशांची सुरक्षितता धोक्यात आलीय...सोसायटीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्या सेक्युरिटी गार्डवर असते त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं..आणि त्यामुळेच आपण खरंच सुरक्षित आहोत का, असा प्रश्न आता रहिवाशांना पडल्याशिवाय राहत नाही...खासगी सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या सुरक्षेवरच आहे.. प्रश्न आहे तो..रक्षक की भक्षक ?
सोसायटीतील रहिवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सेक्युरिटी गार्डवर असते....पण गेल्या आठवड्यात मुंबईतील वडाळ्यात जी घटना घडलीय ती पहाता रक्षकचं भक्ष्यक बनल्याचं पाहायला मिळालंय.
मुंबईच्या वडाळ्यातील याच हिमालय हाईट्स इमारतीत ती भयंकर घटना गेल्या आठवड्यात घडली होती.
तारीख : 9 ऑगस्ट 2012
वेळ : पrहाटे 4.30 वा.
हिमालय हाईट्सच्या १६व्या मजल्यावर २५ वर्ष वयाची पल्लवी पुरकायस्त रक्ताने अक्षरश: न्हाऊन निघाली होती. मदतीसाठी तिने १६व्या मजल्यावरच्या प्रत्येक फ्लॅटची बेल वाजवली होती...पण दुर्दैवाने तिच्यासाठी एकानेही दरवाजा उघडला नाही...पल्लवी बाहेर शेवटच्या घटका मोजत होती आणि शेजारी मात्र गाढ झोपले होते..कोणीच मदतीला येत नसल्याचं पाहून शेवटी पल्लवी आपल्या फ्लॅटमध्ये परतली...आणि त्यानंतर तिने शेवटचा श्वास घेतला. पहाटे पल्लवीच्या खूनाची खबर तिच्या मित्रामार्फत पोलिसांपर्यंत पोहोचली.
पल्लवीचे वडील दिल्लीत आयएएस अधिकारी असून पल्लवी मुंबईत वकीली करत होती..तसेच एका फिल्म प्रॉ़डक्शन कंपनीसाठी ती विधी सल्लागर म्हणूनही काम पहात होती..गेल्या दोन वर्षांपासून पल्लवी अलोक सेनगुप्ता या मित्रासोबत या फ्लॅटमध्ये राहात होती....धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून पल्लवीचा खून करण्यात आला होता. ज्या पद्धतीने तिचा खून करण्यात आला होता ते पहाता एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने हे कृत्य केलं असावं असा पोलिसांना संशय होता..कारण पल्लवीच्या फ्लॅटमधून एकही वस्तू चोरीला गेली नव्हती...पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा त्यांची शंका खरी ठरली. पल्लवीचा घात एका ओळखीच्या व्यक्तीनेच केला होता.
पल्लवीच्या खूनाचा तपास पोलीस करत होते..आरोपी कोण असावा याचा त्यांना अंदाजही आला होता..ओळखीच्या व्यक्तीने ते निर्दयी कृत्य केलं असावं असा संशय होता आणि त्यांचा तो संशय खरा ठरला...सोसायटीच्या सेक्युरिटी गार्डनेच पल्लवीचा घात केला होता. पल्लवीचा खून तिच्या ओळखीच्या व्यक्तीनेच केला असावा असा संशय पोलिसांनी आला होता...कारण चोरीच्या उद्देशातून खून झाला असता तर फ्लॅटमधील मौल्यवान सामानाची चोरी झाली असती...पण पोलिसांनी तसं काहीच आढळून आलं नव्हतं..त्यामुळे पोलिसांनी ओळखीच्या व्यक्तीवर लक्ष केंद्रीत केलं होतं...पल्लवीचा मीत्र अलोकचीही चौकशी केली होती..पण संशयाची सूई सोसायटीचा सेक्युरिटी गार्ड सज्जाद अहमद मंसूर याच्याकडं वळली...कारण घटनेनंतर तो गायब होता....पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आणि पल्लवीच्या खूनाचं रहस्य उलगडलं...पल्लवीने काही दिवसांपूर्वी आपला अपमान केल्यामुळे त्याचा सूड घेण्यासाठी आपण तिचा खून केल्याची कबुली सज्जादने दिली...पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या घटनेने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे..
गेल्या तीन वर्षांपासून सज्जाद हिमालयन हाईट्समध्ये कामाला होता..पण सोसायटीने त्याची माहिती ना पोलीसांना दिली होती ना पोलिसांकडून त्याच्या विषयी माहिती मिळवली होती...आरोपी सज्जादने आपलं आडणाव तसेच काश्मीरमधील आपला पत्ताही चूकीचा दिला होता.
ज्या इमारतीत पल्लवीचा खून झाला त्या इमारतीतील एका फ्लॅटची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे..पल्लवी आपल्या फ्लॅटचं ५५ हजार रुपये भाडं देत होती...ही इमारत अलिशान असली तरी या सोसायटीत असलेल्या चार सीसीटीव्ही कॅमे-यापैकी एकही कॅमेरा सूरू नव्हता..तसेच इमारतीततील इंटर कॉमही बंद होता...ही सगळी परिस्थिती पहाता ज्यावेळी पल्लवीचा खून करण्यात आला त्यावेळी सोसायटीतील सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचं आढळून आलं...जर सीसीटीव्ही कॅमेरे सुरु असते तर आरोपीचं कृत्य कॅमे-यात कैद झालं असतं....सोसायटीच्या सुरक्षेकडं दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आलं आहे.
सेक्युरिटी गार्ड नेमतांना काही गोष्टींची काळजी घेतली असती तर मुंबईतील वडाळ्याची घटना टाळता आली असती..त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही नाशिकमधील काही सोसायट्यांचा आढावा घेतला तेव्हा तिथंही सेक्युरिटी गार्ड आणि सेक्युरिटी एजन्सी बाबात फारसं कोणाला गांभीर्य नसल्याचं आढळून आलं.
वेगानं वाढणारं शहरीकरण ... आणि त्यामुळे निर्माण होणा-या गरजा या चक्रात शहरं सापली आहेत.... कधीकाळी शांत असलेले नाशिक शहर आता वेगाने विकसीत होत आहे.... नाशिकमध्यल्या वाडे-बंगले-हवेल्या आता हळूहळू इतिहासजमा होऊ लागल्यात.. त्याच्या जागावर सोसायटी आणि अपार्टमेंट उभारु लागल्यात.. नाशिक शहराचा विकास वेगानं होतोय.. पण त्याचबरोबर गुन्हेगारीचा आलेखही वाढत असून तो चिंतेचा विषय ठरला आहे.. अनेक मोठमोठ्या सोसायट्या आणि अपार्टमेंटची सुरक्षा केवळ एका वॉचमनवर अवलंबून असते... आणि धक्कादायक बाब म्हणजे जो सेक्युरिटी गार्ड सोसायटीचं रक्षण करतो त्याच्याशी सोसाय़टीतील रहिवाशांची साधी ओळखही नसते.....वॉचमन म्हटलं की पूर्वी टोळ्यासमोर येत असे एक भारदस्त व्यक्तीमत्व...पण आता ते अपवादानेच पाहायला मिळतं.
आम्ही नाशिकमधील सोसायट्यांच्या सुरक्षेचा धांडोळा घेतला असता समोर आलं एक धक्कादायक वास्तव... नीट पहा या व्यक्तीला.. वय वर्ष बावन्न आणि प्रकृती जेमतेम असल्या या व्यक्तीवर एका सोसायटीच्या रक्षणाची जबाबदारी आहे....त्यासाठी त्याला साडे तीन हजार रुपये पगार मिळतो ...आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली जुजबी माहीतीही या सेक्युरिटी गार्डकडं नाही.
ही अवस्था केवळ या सेक्युरिटीगार्डची आहे असं नाही तर नाशिकमध्ये अनेक सोसायट्यांच्या सेक्युरिटीगार्डची हीच अवस्था आहे..आपल्या परिसरातील पोलिस स्टेशनचा साधा फोन नंबरही त्याना ठावूक नसतो..पण त्याकडं कुणाचंच लक्ष नसल्यानं सर्वच रामभरोसे चाललय.. नाशिकमध्ये अशा अनेक इमारती आहेत की ज्याला सुरक्षारक्षकच नाहीय... गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली असून घरफोडी आणि चोरीच्या घटनाचं प्रमाण अधिक आहे...त्या घटनांना सुरक्षारक्षकांच्या बाबतीतली बेफिकीरीच जास्त जबाबदार असल्याचं आढळून आलय..वाढत्या चोरीच्या घटनांमुळे अनेक सोसायटीतील रहिवाशी त्रस्त झालेत
आपल्या सोसाय़टीच्या वॉचमनबद्दल जुजबी माहीतीही अनेक सोसायटीतील रहिवाशांना नसल्याचे समोर आलं.. आपल्या वॉचमनबद्दल बहुतांश सोसायट्यानी पोलीसदफ्तरी कुठलीही नोंद केली नसल्याचं समोर आल.. यावर पोलिसांनी मात्र विशेष लक्ष देत सर्वच ठिकाणी चौकशी सुरु केलीय. शहरातील विविध निवासी परीसरातील वाढते गुन्हे लक्षात घेऊन शेजारी खरा पहारेकरी ही योजना सुरु केलीय.. सुरक्षारक्षकांबरोबरच आता नागरीकांनीही सजग राहण्याचे आवाहन करत पोलिसांनी शहरात जागर अभियान सुरु केलय.
वाढती महागाई, कर्जाचे हफ्ते आणि त्यातच मेटनेन्सचा खर्च या सारख्या अनेक खर्चाचा मेळ साधत फ्लॅटधारक मेटाकुटीला येतोय.. आणि म्हणूनच सोसायटीच्या गेटवरचा सुरक्षारक्षक कोण आहे, तो काय करतोय याचा विचारच केला जात नाही. पण या दुर्लक्षामुळे मोठं संकट ओढवू शकतं याचं मात्र कुणालाच भान नाही.
वडाळ सेक्युरेटी रक्षकाने रहिवासी तरुणीचा खून केल्याची घटना घडल्यामुळे रक्षकाच्या विश्वासर्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं असलं तरी काही बाबींची काळजी घेतल्या अशा संभाव्य घटना टाळता येऊ शकतात. वडाळ्यातील खूनाच्या घटनेनंतर सेक्युरिटी गार्ड विषयी सोसायटीत राहणा-या रहिवाशांच्या मनात शंकेनं घर केलंय. कारण अशी घटना आपल्या बाबतीत तर घडणार नाही ना असा संशय त्यांना सतावू लागला आहे.
पण असं असतांनाही सेक्युरिटी गार्ड नियुक्त करण्याशिवाय सोसायट्यांसमोर दुसरा पर्यायही नाही. या पार्श्वभूमीवर सेक्युरिटी गार्ड नियुक्त करतांना काही गोष्टींची खबरदारी घेतल्यास अशा घटनांना आळा घातला जाऊ शकतो. विशेषता सेक्युरिटी एजन्सीमार्फत गार्ड नियुक्त करतांना एजन्सीकडं परवाना आहे की नाही याकडं कोणी लक्ष देत नाही.
मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातली परिस्थिती काही वेगळी नाही...आपल्या सोसायटीचा सेक्युरिटी गार्ड कोणा आहे हे अनेक रहिवाशांना माहिती नसतं ...आणि आपल्या सोसायटीत कोण राहातं य़ाची गार्डला माहिती नसते...अशी जर अवस्था असेल त त्या सोसायटीची सेक्युरीटी रामभरोसेच म्हणावी लागले.
सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी ही सेक्युरिटी गार्डवर असते....आज शहरीकरण वाढल्यामुळे सोसायट्यांची संख्या वाढली असून त्यामुळे सेक्युरिटी गार्ड्सना मागणी वाढलीय...पण सुशिक्षित तसेच प्रशिक्षित सेक्युरिटी गार्ड मिळणं आवघड होऊन बसलं आहे...त्यामागची करणं अनेक असली तरी सोसायटीतील रहिवाशीही त्याला तेव्हडेच जबाबदार असल्याचं तुमच्या लक्षात येईल...सोसायटीच्या सुरक्षेसाठी सोसायटीकडून एखाद्या सेक्युरेटी एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं..पण ते कॉन्ट्रॅक्ट देतांना त्या सेक्युरिटी एजन्सीची वैधता तपासली जात नाही...सेक्युरिटी एजन्सीवर डोळे झाकून विश्वास ठेवला जातो.
अप्रशिक्षित सेक्युरिटी गार्डमुळे रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं...सेक्युरेटि एजन्सीकडून रोज नवा गार्ड पाठवला जातो..त्याला सोसायटी विषयी फारशी माहिती नसते...तसेच रहिवाशांनाही सेक्युरिटी गार्ड विषयी फारशी माहिती नसते.खरंतर सोसायटी जवळचं पोलीस स्टेशन आणि अग्नीशमन दलाचे फोन नंबर सेक्युरिटी गार्डकडं असणे अपेक्षीत आहे...पण अनेक सोसायट्यांमधील सेक्युरिटी गार्ड्स त्या बाबतीत अनभिज्ञ असल्याचं आम्ही घेतलेल्या आढाव्यात आढळून आलंय..
आज मुंबई आणि ठाण्यात जवळपास हजार दिड हजार सेक्युरिटी एजन्सी कार्यरत असून त्यापैकी केवळ ५० त ६० एजन्सीजकडं परवाना असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....अनेक एजन्सीकडून अशिक्षित लोकांना कामावर ठेवलं जातं...त्यांना कमी पगारात राबवून घेतलं... पण याच बाबींचा गुन्हेगारांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचं काही प्रकरणात उघड झालं आहे...सेक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळवून गुन्हेगारी गुन्हा करुन फरार झाल्याचं काही प्रकरणातून उघड झालं आहे....या सगळ्या पार्श्वभूमिवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केलीय..
पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली असली तरी सोसायटीच्या पदाधिका-यांनी सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे..
वाड्यांचा शहर म्हणून ऐकेकाळी पुण्याची ओळख होती...पण आता ते सोसायटींच शहर बनलंय...सोसाय़ट्यांची संख्या मोठ्य़ा प्रमाणात वाढत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे...अलिकडच्या काळात तशा घटनाही घडल्या आहे...पुण्यात काय परिस्थिती आहे त्यावर आता आपण एक नजर टाणार आहोत.
पुणे... वाडे आणि पेठांचे शहर अशी कधीकाळी ओळख असणा-या पुण्याचा चेहरा बदलत चाललाय..पुणे आता टॉवर आणि सोसायट्यांच शहर बनलंय....पण त्या सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे... आमच्या टीमने पुण्यातील सोसायट्यांच्या सुरक्षा रक्षकांविषयी माहिती घेतली असता अनेक धक्कादाय बाबी समोर आल्या... पुणे शहरात आजघडीला पाच हजारांपेक्षा जास्त सिक्युरीटी एजेन्सीस आहेत. नोंदणी नसलेल्या आणि जागोजागी दुकानं थाटलेल्या सिक्युरटी एजन्सीची संख्या त्यामध्ये जास्त आहे. त्याचप्रमाणे त्या एजन्सीकडं सिक्युरटी गार्डसची संपुर्ण माहितीही नसल्याचं उघड झालय.
सेक्युरीटी एजन्सीत काम करणारे गार्डस हे परप्रांतीय असून त्यांच्या वैयक्तीक माहीतीबद्दल एजन्सीजही फारशा गंभीर नाही... एजन्सीकडून कमी पगारात मिळत असल्यामुळे सुरक्षारक्षक वारंवार एजन्सी बदलत असतात.. अत्यल्प पगारावर नेमणुक होत असल्यानं या एजन्सीसही त्या रक्षकांची केवळ नेमणुक हाच निकष ठेवतात..सेक्युरिटी एजन्सी आणि सेक्युरिटी गार्ड विषयी सोसायटीही गंभीर नसल्यामुळे हा धंदा फोफावला असून एखाद्या गंभीर प्रकरणात त्याचा फटका मात्र रहिवाशांना सहन करावा लागतो.
इमारतीच्या सिक्युरटी गार्डनेच महिलेवर चाकुने हल्ला करुन जबरी चोरी केल्याची घटना सिहंगड रोडवर महिन्याभरापुर्वी घडली होती. एवढच नाही तर सिक्युरटी गार्डसकडून लैगिंक अत्याचाराच्या घटनाही घ़डल्या आहेत. त्यामुळे इमारतीमध्ये सिक्युरटी गार्डस कोण आहेत आणि कसे असावेत यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलीय.
First Published: Thursday, August 16, 2012, 21:48