Last Updated: Friday, March 1, 2013, 23:39
www.24taas.com, मुंबईशंभर वर्षापूर्वी टायटॅनिक का बुडालं ? नेमकी कुठं चूक झाली?कोणत्या गोष्टीची काळजी घेतली असती तर टायटॅनि्क वाचवता आलं असतं?तसेच टायटॅनिक - २ समोर कोणती आव्हानं आहेत? हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पुन्हा भेटण्याची त्यांना खात्री होती पण हा आपला शेवटाचा प्रवास ठरेल याची त्यांना जराही कल्पना नव्हती. जगातील सर्वात आलिशान जहाजाने तीन तासात १५ एप्रिलच्या पहाटे याच ठिकाणी जलसमाधी घेतली. पण खरचं ती दुर्घटना रोखता आली असती का हाच खरा प्रश्न आहे...कदाचित ते शक्य होतं...टायटॅनिकच्या बांधणीचं काम १९०६मध्ये सुरु झालं..त्यानंतर तीन वर्षांनी टायटॅनिकची बांधणी पूर्ण झाली...पण त्याची बांधणी करतांना काही बाबतीच निष्काळजीपणा झाल्याचं बोललं जातंय..टायटॅनिकवर संशोधन करणा-यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहत..त्यांच्या म्हणण्यानुसार टायटॅनिक विषयी अनेक दावे करण्यात आले होते..कधीच बुडू न शकणारं जहाज हा त्यापैकीच एक दावा होता..पण टायटॅनिक तयार करतांना मजबुतीकडं लक्ष दिलं गेलं नाही..टायटॅनिकला बुडण्यापासून वाचवता आलं असतं असं आता संशोधनाअंती पुढं आलं आहे..टायटॅनिकमध्ये दोन स्टेअरिंग व्हील होते..धडकेनंतर एक व्हील डावीकडं फिरलं असतं तर जहाज बर्फाच्या त्या मोठ्या तुकड्यापासून दूर गेलं असतं.. पण गडबडीत ते व्हिल विरुद्ध दिशेनं फिरवलं गेलं..आणि त्यामुळे जहाज त्या बर्फाच्या भल्यामोठ्या तुकड्या लगत गेलं...संशोधकांच्या मते जहाजाच्या कॅप्टनने टायटॅनिक योग्य दिशेनं नेहण्याचा प्रयत्न केला..पण तो पर्यंत फार उशिर झाला होता..धडक झाल्यानंतर टायटॅनिक त्याच ठिकाणी थांबवलं असतं तर त्यामध्ये वेगाने पाणी शिरलं नसतं..टायटॅनिकच्या बांधणीत ज्या वस्तूंचा वापर केला गेला होता त्या विषयी संशोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत..ती दुर्घटना घडली त्यावेळी टायटॅनिकचा वेग नेहमीपेक्षा खूपच जास्त होता..आणि त्यामुळेच समोर बर्फाचा कडा दिसल्यानंतरही जहाजाची दिशा बदलं शक्य झालं नाही..पण टायटॅनिक - २ मध्ये या समस्या उद्भवू नयेत साठी विशेष प्रणाली तयार करण्यात आलीय..अत्याधुनिक नेव्हिगेशन प्रणाली बसवण्यात आलीय..तसेच विशिष्ट पद्धतीचा धातू जहाजाच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलाय..
२ची बांधणी केली जात असली तरी शंभरवर्षापूर्वीच्या टायटॅनिकचं बात काही औरचं होतं..त्याकाळचं ते अतिशय भव्य़दिव्य आणि अलिशान असं जहाज होतं..टायटॅनिकच्या लक्झरी क्लासचं तिकीट किती होतं? टायटॅनिकच्या अधू-या प्रवासातील सर्वात महत्वाची गोष्ट कोणती होती? आणि ते जहाज कस बुडालं ? ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत...
हिमनगामुळे टायटॅनिक तुटून समुद्राच्या तळाशी गेले.. टायटॅनिकची दृष्य पाहिल्यावर वाटतं की ते जहाज नव्हतं, तर एक शहर होतं.. जगभरातील सगळी सुख-सुविधा एकवटल्याचं हे असीम दृष्य पाहिल्यानंतर कधीकाळी ते तुटून नष्ट होईल याची कुणी कल्पनाही केली नसेल. १० एप्रिल १९१२ ला टायटॅनिक न्युयॉ़र्ककडे २२२३ प्रवाशांना घेऊन रवाना झाले होते.. सारं काही आलबेल असं चाललं होतं. जहाजावर उपस्थित असणा-या प्रत्येकासाठी तो प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. पुढचे तीन दिवसही रम्य असेच होते. टायटॅनिकवर ते सर्व काही होतं जे केवळ कल्पनेत रंगवलं जायचं... स्विमींगपूल, जीम, स्क्वॅश कोर्ट, महागड फर्नीचर, आलिशान एक्सेसीरीज, जनरेटर, लिफ्ट, रेडिओ, लायब्ररी, बार्बर श़ॉप, प्रत्येक सुविधा या जहाजावर होती.. सुमारे १०० वर्षापुर्वीही त्याच तिकीट ८०० पाऊंड होतं याचा अर्थ आजच्या काळात ४३ लाख रुपये होते. आलीशान शब्द ही या वैभवापुढे फिका पडावं एवढ सारं भव्यदिव्य होतं. पण अवघ्या काही क्षणात हे सारं काही नष्ट झालंय..१४ एप्रिल १९१२ ला रात्री ११ वाजून ४० मिनीटांनी अटलांटिक महासागरात ती भीषण दुर्दैवी घटना घडली. ही टक्कर समुद्रात तरंगत असलेल्या भव्य हिमनगात आणि टायटॅनिक जहाजात झाली होती.. या धडकेनंतर टायटॅनिकच्या एका भागातून पाणी येवू लागलं.. आणि विषासारखं हळूहळू टायटॅनिकच्या एका एका भागात पाणी घुसू लागलं.. सगळी कडे हलकल्लोळ माजला.. मदतीची याचना सुरु झाली पण त्या विशाल समुद्रात टायटॅनिक एकटं होतं.. मदतीला वेळी कुणीच आलं नाही आणि टायटॅनिकचे दोन तुकडे झाले.. जहाजावर लाईफ बोट फार कमी होत्या.. आणि त्यामुळे फार मोठं नुकसान झालं.. लाईफ बोटच्या सहाय्यानं महिला आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न झाला.. पण पुरुष प्रवाशांना आपले प्राण गमावावं लागले.. २२२३ लोकांसाठी केवळ २० लाईफ बोट होत्या.. महिला आणि मुलांसाठी अनेक पुरुषांनी आपली कुर्बानी दिली. शिकस्त करत ७०६ लोकांना वाचवण्यात आलं. १५१७ लोक हे मृत्युमुखी पडले... समुद्रही एवढा भीषण बनला होता की,त्यावेळी समुद्रात प्राण वाचवत असणारे प्रवाशांपैकी १५ मिनीटाच्या वर कुणीही जीवंत राहू शकलं नाही..
टायटनिक - २ची पहिली सफर २०१६मध्ये सुरु होणार आहे..पण ऑस्ट्रेलियातील पाचव्या क्रमांकाचे अब्जाधीश प्रोफेसर क्लाईव्ह यांनी टायटॅनिक - २चं प्रमोशन आतापासूनच सुरु केले आहे..त्यामुळेच त्यांचा हा प्रमोशन फंडा अनेकांना रुचला नाही
टायटॅनिक आजही जिवंत आहे..आजही त्याची सफर सुरु आहे..त्या अलिशान जहाजाची जागा आजूनही कोणीच घेऊ शकलं नाही..तसेच त्याचा सफरही कोणी रोखू शकलं नाही..टायटॅनिक बुडालं खरं पण त्याच्या स्मृती आजही कायम आहे..अशातच टायटॅनिक - २ येवू घातलं असून १९१२च्या टायटॅनिकच्या त्या कटू आठवणी पुन्हा जाग्या होणार आहेत..टायटॅनिक २ चे निर्माते प्रोफेसर क्लाईव्ह पामर यांच्या म्हणण्यानुसार टायटॅनिक - २ हे जहाज १९१२मध्ये टायटॅनिक दुर्घटनेत ठार झालेल्या प्रवाशांना श्रद्धांजली ठरणार आहे. प्रोफेसर क्लाईव्ह यांच हे मत असलं तरी टायटॅनिक दुर्घटनेत मध्ये ठार झालेल्यांच्या नातेवाईकांच काही वेगळच म्हणणं आहे..त्यांच्या म्हणण्यानुसार टायटॅनिक - २ म्हणजे कटू आठवणींच्या जखमेवरची खपली काढण्यासारखं आहे. टायटॅनिक - २ हे कुणासाठी श्रद्धांजली तर कुणासाठी व्यवसाय आहे..तर कुणासाठी कटू आठवणी... ठरणार आहे. शंभर वर्षांनंतर टायटॅनिक पुन्हा जिवंत होणार आहे. कारण टायटॅनिक - २ येत आहे...आणि ऑस्टेलियातील एका अब्जाधिशाने टायटॅनिक -२च्या पहिल्या समुद्र सफरीची तारीख निश्चित केलीय..पाण्यावर लिहणं शक्य नाही असं आज पर्यंत म्हटलं गेलंय.. पण आजही काही लोक पाण्यावर आठवणींच्या खुणा करुन 14 एप्रिल 1912 च्या त्या काळ रात्रीची खोली मोजण्याचा प्रयत्न करत आहेत..तिथ आजही टायटॅनिकचे अवशेष पडलेले आहेत.. हे जहाज कधीच बुडणार नाही असं लोक सांगत होते...पण जशी मोठ मोठी स्वप्न धुळीस मिळतात तसेच टायटॅनिकचंही झालं..
अटलांटिक महासागरात 18000 फुटापेक्षाही खोल तळाशी गेल्यावर नजरेस पडतात टायटॅनिकचे अवशेष , जे अनेक प्रेम कहाण्यांचे साक्षिदार आहेत....त्याने समोरुन येतं असलेला हिमनग रुपी मृत्यू पाहिलं होता..दोन हजारांपेक्षा जास्त लोकांचा आक्रेश त्याच्या कानात आजही घुमतोय......काही वर्षानंतर तो सगळा थरार रुपेरी पडद्यावर पहायला मिळाला.. आतापर्यंत टायटॅनिक ही एक अशी सफर ठरलीय जी कधीच पूर्ण होवू शकली नाही... पण आता वाटू लागलय, की टायटॅनिकची ही सफर पुर्ण होईल. टायटॅनिक 2 ची ब्लुप्रिंटही तयार झालीय....
ऑस्ट्रेलियातील अब्जाधीश प्रोफेसर क्लाईव पामर यांची कंपनी ब्लू स्टार लाईनने टायटॅनिक -2 चं एनिमेटेड प्रेंझेटेशन नुकतचं सा-या जगासमोर मांडलंय.. चीनची कंपनी सीएससी जीन्लींग शिपयार्डकडून टायटॅनिक 2 ची निर्मीती केली जातेय.
प्रोफेसर क्लाईव्ह पामर हे टायटॅनिक 2 ला पहिल्या टायटॅनिक प्रमाणेच आलिशान बनविणार आहेत. फर्निचर, सुख-सुविधा, एटींक शो पीस, तावदानं, हॉल, दारं..सगळं काही टायटॅनिक प्रमाणचे किंवा त्यापेक्षाही आकर्षक असणार आहे..आणि त्यासाठी पामर पाण्यासारखा पैसा खर्च करतायतं.. या जहाजाच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीतही काही साम्य आहे.या जहाजातील तंत्रज्ञानाचा विचार केल्यास काही बाबतीत दोन्ही टायटॅनिकमध्ये समानता असणार आहे...मात्र सॅटेलाईट नेविगेशन, रडार आणि अल्ट्रा मॉडर्न सेफ्टी बोटस याबरोबरच 21 व्या शतकातील सर्व प्रगत तंत्रज्ञानाचा यात अंतर्भाव असेल...
टायटॅनिक 2 मध्ये एकाच वेळी 1680 प्रवासी प्रवास करु शकतील. आणि ही सफर 1912 च्या त्या प्रवासाची आठवण करुन देणारी असेल. टायटॅनिक 2 चं वेगळंपण म्हणजे या जहाजाचं इंजिन डीझलवर चालणार असेल. आणि त्यातून बाहेर पडणारा धुर बाहेर जाण्यासाठी चार चिमण्या असणार आहेत... टायटॅनिक 2 मधील यंत्रही अद्ययावत आहेत. ज्याच्याद्वारं कुठल्याही परिस्थीतीत नियंत्रण ठेवणं सुलभ बनणारं आहे. टायटॅनिक 2 ची तयारी आता सुरु आहे. आणि याची पहिली सफर 2016 मध्ये इंग्ल़ड ते न्युयॉर्क या दरम्यान होणार आहे..
First Published: Friday, March 1, 2013, 23:39