सरबजीत कोण होता, त्याची कहाणी!, Sarabjit Singh`s death

सरबजीत कोण होता, त्याची कहाणी!

सरबजीत कोण होता, त्याची कहाणी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पाकिस्तानच्या तुरुंगात कैद्यांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर सरबजीतला उपचारासाठी जिन्ना रुग्णालायता भरती करण्यात आलं...गेले सहा दिवस एक आशा होती की सरबजीत या दुर्देवी संकटातून सहिसलामत वाचतील.. पण सा-या आशा, अपेक्षा प्रार्थना निष्फळ ठरल्या.

सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेवटी सरबजीत सिंह यांनी मृत्यूसमोर हार पत्करली. त्यावेळी पाकिस्तानात रात्रीचे एक वाजले होते...जिन्ना रुग्णालयातील डॉक्टरांनी सरबजीत सिंग यांना मृत घोषीत केलं..सरबजीत सिंग यांचा मृत्यू ह्रदयविकारामुळे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

सरबजीतचा झाला मृत्यू
पाकिस्तानच्या रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास
६ दिवस दिली मृत्यूशी झुंज
कोणी केला सरबजीतचा खून ?
कोणी रचलं खुनाचं षडयंत्र ?
का केला सरबजीतचा खून ?

२६ एप्रिलला पाकिस्तानातील कोट लखपत तुरुंगात सरबजीत सिंग यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्यानंतर त्यांना जिन्ना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं..मात्र रुग्णालयात त्यांची प्रकृती आणखीच खालावत गेली...सरबजीत सिंग यांची शुध्द हरपली आणि त्यानंतर त्यांना शुध्द आलीच नाही..

सरबजीत सिंग यांच्या प्रकरणात पाकिस्तानने सुरुवातीपासूनच आ़डमुठी भूमिका स्विकारली..मानवीदृष्टीकोणातून सरबजीतसिंग यांना उपचारासाठी भारतात पाठविण्याची विनंती भारताने केली होती...तसेच सरबजीत सिंग यांच्या कुटुंबानेही तशी विनंती केली होती..मात्र पाकिस्तानने त्याकडं साफ दुर्लक्ष केलं त्यामुळेच बुधवारी सरबजीत सिंगचे कुटुंबिय निराश होवून भारतात परतले होते...मात्र त्यानंतर सरबजीत सिंगच्या मृत्यूची खबर येवून धडकली.

पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगातून सरबजीतने आपल्या कुटुंबाला काही पत्र लिहिली होती..त्या पत्रात त्याने तुरुंगात आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली होती...आणि ज्याची भिती त्याने व्यक्त केली होती दुर्देवाने तेच घडलं. गेल्या २३ वर्षांपासून सरबजीत सिंग पाकिस्तानातील तुरुंगात कैद होते..त्यांचा आक्रोश तुरुंगाच्या चार भिंतीपलिकडे पोहचत नव्हता. कुटुंबा व्यतिरिक्त त्यांच्या वेदनेची दखल घेण्याची तसदी कुणी घेतली नाही.

सरबजीतची बहिण दलबीर कौर यांनी सर्वप्रथम या प्रकरणाला वाचा फोडली.. सरबजीतच्या दोन मुलींना घेऊन तिने थेट दिल्ली गाठली..दिल्लीतील प्रत्येक महत्वाच्या राजकीय व्यक्तींचा उंबरठा तिने झिजवला..सरबजीतला न्याय मिळावा यासाठी तिने राष्टपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांना साकडं घातलं..तसेच युपीएच्या अध्यक्षा सोनीया गांधीनांही विनंती केली होती.
सरबजीत कोण होता, त्याची कहाणी!

त्यानंतर ख-याआर्थाने अवघ्या देशाला सरबजीत सिंग यांची ओळख झाली..सरकारमधील लोकांनी सरबजीत सिंगच्या सुटकेसाठी आवाज उठवला खरा मात्र त्यांच्या सुटकेसाठी केल्या जाणा-या प्रयत्नांचं वास्तव काही वेगळचं होतं...भारत सरकारकडून सरबजीतच्या कुटुंबियांना केवळ आश्वासन दिलं जातं होतं आणि तिकडं पाकिस्तानच्या तुरुंगात सरबजीत सिंग यांना यातना सहन कराव्या लागत होत्या...तीन वर्षांपूर्वी सरबजीत सिंग यांनी आपल्या कुटुंबाला एक पत्र लिहिलं होतं...त्या पत्रात त्यांनी आपली वेदना मांडली होती.

सुटकेच्या आशेवर दिवस घालवणं किती कठीण असतं, हे माझ्यापेक्षा दुसरं कोण बंर सांगू शकेल ? पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी मी मंजित असल्याचं सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सगळ्या जगाला माहित आहे.तुरुंगातील कर्मचारीही त्यात सहभागी आहेत.मी बॉम्बस्फोट केले असल्याचं काही कैदी देखील सांगतात.
दिवस महिन्यात रुपांतरीत झाले आणि महिने वर्षात...आणि एक दिवस ती बातमी येवून थडकली.

सरबजीतची सुटका करण्यात येणार असल्याचं ते वृत्त होत...पाकिस्तानचे राष्ट्रपती जरदारी यांनी सरबजीत सिंगची शिक्षा माफ केली होती..ते वृत्त ऐकताच सरबजीत सिंगच्या गावात आनंदाचं वातावरण पसरलं ..पण त्यांचा तो आनंद काही तासच टिकला...कारण दगाबाज पाकिस्तानने घुमजाव करत सरबजीत ऐवजी सुरजीतची मुक्तता करण्यात आल्याचं सांगितलं..वास्तवात पाकिस्तान सरकारकडून नावात कोणतीच चूक झाली नव्हती..तर हे सगळं सरबजीत सिंग विरोधात एक षडयंत्र होतं.

सरबजीतची मुक्तता केल्यास सरकारला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल अशी सरकारला भिती वाटत होती...आणि त्यामुळे पाकिस्तान सरकारने आपला निर्णय फिरवला..पण त्यानंतरही सरबजीतची मुक्तता होईल अशी त्याच्या कुटुंबीयांना आशा होती.. पण त्याच दरम्यान पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमिर कसाब आणि अफजल गुरुला फाशी देण्यात आली..त्यामुळे सरबजीतच्या अडचणी वाढल्या...पाकिस्तान तुरुंगात त्यांचा छळ होवू लागला..हे बाब त्यांनी नुकतेच आपल्या कुटुंबाला पाठिवलेल्या पत्रात नमुद केली होती.
सरबजीत कोण होता, त्याची कहाणी!

मला गेल्या ३-४ महिन्यांपासून जेवणातून काही तरी दिलं जात आहे.त्यामुळे माझ्या शरीरात त्राण रहात नाही. माझ्या डाव्या हातामध्ये वेदना होत आहेत. तसेच माझा डावा पाय कमजोर झाला असून चालतांना त्रास होतो. वेदनेमुळे मी रात्रभर रडत असतो. जेव्हा मी वेदनेनं तळमळत असतो तेव्हा मला औषध देण्याऐवजी तुरुंगातील कर्मचारी माझी चेष्टा करतात. तुझ्या शरीराचं एक हाड देखील भारतात जाणार नाही अशी धमकी मला दिली जातेय. ज्याची भीती सरबजीत सिंगने व्यक्त केली होती अखेर ते घडलं..तुरुंगात कैद असलेला सरबजीत सिंग एका षडयंत्राचा बळी ठरला.

सरबजीतला लाहोर बॉम्बस्फोट प्रकरणात अडकवण्यासाठी पाकिस्तानी तपास यंत्रणांनी अटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी खोटी साक्षीदार उभे केले होते. त्यांच्याकडून खोटे जबाब लिहून घेतले...कसं अडकवण्यात आलं होत सरबजीत सिंगला या प्रकरणात हे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे..

पाकिस्तानच्या त्याषडयंत्रा मागचं हेच सत्य आहे..सरबजीत सिंगला बॉम्बस्फोटप्रकरणात अडकवण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आलं होत..पाकिस्तानी तपास यंत्रणांनी बनावट साक्षिदार तयार केले. सत्य लपवण्याचा प्रयत्न केला..ज्या साक्षिदारांच्या जबाबाच्या आधारे पाकिस्तानी तपास यंत्रणांनी सरबजीत हा मंजित असल्याचं सिद्ध केलं होतं. त्या साक्षिदरांमध्ये मोहमद अली सलीम शौकत हा एक आहे...ज्या बॉम्बस्फोटाचा सरबजीत सिंगवर आरोप होता त्या बॉम्बस्फोटात शौकतच्या वडिलांचा मृत्यू झालाय..झी मीडियाने शौकतला शोधून काढलं ..मात्र शौकत यांनी जी माहिती दिलीय ती अत्यंत धक्कादायक आहे.

काही वर्षांपूर्वी ही माहिती शौकतने झी मीडियाला दिली होती..आपण ज्यावेळी साक्ष दिली होती तेव्हा आपण अल्पवयीन होतो असं शौकत यांनी सांगितलं होतं. सरबजीत सिंगला पाकिस्तानातील बॉ़म्बस्फोट प्रकरणात विनाकारण अडकवण्यात आल्याचं सरबजीत सिंगचे वकील राणा अब्दूल हमीद यांनीही स्पष्ट केलंय..

सरबजीतला बॉम्बस्फोट प्रकरणात अडकवण्यासाठी पाकिस्तानातील तपास यंत्रणांनी कशा प्रकारे ष़डयंत्र रचलं होतं हे लपून राहिलं नाही. आज सरबजीत सिंग हयात नाही..त्याला कट रचून ठार करण्यात आलं...पण तो पाकिस्तानात पोहण्यामागची कहाणी मात्र एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे..एका लहान चूकीमुळे तो पाकिस्तानात पोहोचला आणि त्याचं पुढचं आयुष्य तुरुंगाच्या चार भींतीआड कैद झालं.
सरबजीत कोण होता, त्याची कहाणी!


वय वर्ष २६ ..खरं तर हे वय तरुणाईचं...आणि याच वयात सरबजीत सिंगकडून नशेच्या अवस्थेत आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली...नशेच्या अस्थेत सरबजीत सिंगने भारत-पाकिस्तानची सीमा रेषा पार केली आणि पुढचं सगळं आयुष्य तुरुंगाच्या चार भीतींत कैद झालं..सरबजीत हा रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचा एजंट असल्याचा ठपका पाकिस्तानने ठेवला..३० ऑगस्ट १९९० रोजी सरबजीतला पंजाब सीमीवर अटक करण्यात आली..आणि पुढे त्याच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप लावण्यात आला.

१८ मे १९९०ला लाहोरच्या एका चित्रपटगृहात झालेल्या बॉम्बस्फोटाचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला...पंजाबच्या तरनतारनमधील भिखीविंड गावात जेव्हा सरबजीतला अटक करण्यात आली तेव्हा त्याची ओळख पूर्णपणे बदलली होती..सरबजीत सिंग हा मंजीत सिंग असल्यांच सांगण्यात आलं. मंजीत ज्याने लाहोर बॉम्बस्फोटाचं षडयंत्र रचलं होतं..

पाकिस्तानातील सर्व कागदपत्रांवर सरबजीत आता मंजीत सिंग बनला होता..त्याच्यावर खटला चालविण्यात आला आणि १९९२ मध्ये लाहोर कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली....नावामुळे काय फरक पडतो ,सरबजीत सिंगने आपला गु्न्हा कबुल केला आहे असं सांगून लाहोर कोर्टाने सरबजीत सिंगला फाशीची शिक्षा सुनावली...सरबजीत सिंगच्या वकीलांच्या म्हणण्यानुसार ज्या जबाबाच्या आधारे लाहोर कोर्टाने सरबजीतला फाशीची शिक्षा सुनावली होती त्या जबाब सरबजीतने आपण दारुची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानात आल्याचं सांगितलं होतं..२९ ऑगस्ट १९९०मध्ये तो जबाब त्याने दिला होता..तसेच त्याने आपण पाकिस्तानात बॉम्ब तयार करण्यासाठी आलो नव्हतो असंही त्याने जबाबात म्हटलं होतं.

सरबजीत सिंगने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली पण त्याच्या नशिबी आली कोट लखपत तुरुंगाची कोठडी..त्याची प्रत्येक याचिका फेटाळण्यात आली..त्यामुळे तुरुंग हेच त्यांच आयुष्य बनलं होतं..पण २२ वर्ष आणि एक दिवसांनी त्याच्यासाठी तुरुंगाचा दरवाजा उघडला मात्र त्यावेळी तो अत्यवस्थ होता..

सरबजीत सिंगला तुरुंगात मारण्याचा कट आखला गेला होता...आणि त्यासाठी कैद्यांचा वापर करण्यात आला...सरबजीतच्या खुनामागचं षडयंत्र मात्र कुणी वेगळ्याच व्यक्तीने रचलं होतं..गेल्याच आठवड्यात कोट लखपत तुरुंगात काय घडलं होतं ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.. सरबजीतचं जे झालं ते काही विधी लिखीत नव्हतं..लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात २२ वर्षांपासून कैद असलेल्या सरबजीतच्या आयुष्यातील तो काळा दिवसा होता..

अजमल आमिर कसाब आणि अफजल गुरुच्या फाशीनंतर सरबजीत सिंगच्या जीवाला धोका वाढला होता..तुरुंग कर्मचारी आणि कैदी त्याला सतत धमकावत होते..फाशीची शिक्षा झालेल्या आमीर आफताब नावाच्या पाकिस्तानी कैद्याने तर त्याला जीवे मारण्याची धमकीच दिली होती..२२ एप्रिलच्या सकाळी सरबजीत सिंग आपल्या कोठडीतून बाहेर आला..मात्र काही कैदी त्याची बाहेर वाटच पहात होते...सरबजीत सिंग चहा पित होता..त्याचवेळी सहा कैद्यांनी त्याला गराडा घातला..दोघांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली..आणि अचानकपणे सर्वांनी त्याच्यावर हल्ला केला..सरबजीत सिंगच्या डोक्यावर वीटांचा मारा केला..हल्लेखोर एव्हड्यावरच थांबले नाही तर त्य़ांनी सरबजीतची मान आणि पोटावर ब्लेडने वार केले..

कोट लखपत तुरुंग अधिका-यांच्या म्हणण्यानुसार दोन कैद्यांनी सरबजीतवर हल्ला केला होता..त्या दोन कैद्यांची ओळख पटली आहे..पण हे सगळं प्रकरण एव्हडं साधं सोप नाही..आपल्याला धमकावलं जात असल्याचं सरबजीतने तुरुंग अधिका-यांना सांगितलं होतं..तसेच २० दिवसांपूर्वी त्याने धमकावणा-या कैद्यांची नावं लिहून दिली होती..पण असं असतांनाही सरबजीतच्या सुरक्षेकडं लक्ष दिलं गेलं नाही.. आणि त्यमुळेच सरबजीतला आपला जीव गमवावा लागला.

First Published: Thursday, May 2, 2013, 23:37


comments powered by Disqus