Last Updated: Thursday, October 10, 2013, 13:28
www.24taas.com, झी मीडिया, पुणे सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त अशी जगातील पहिली सोलार सीसीटीव्ही कार पुण्याच्या आयुबखान पठाण यांनी बनवलीय. कारच्या छतावरती चारही बाजूला सीसीटीव्ही बसवल्यामुळे कार रस्त्यावर धावताना आजूबाजूच्या चारही दिशांवर ५० मीटरपर्यंत सर्व घडामोडी यामध्ये कैद होत जातील.
मुंबईत आले असताना पठाण यांनी या अनोख्या कारबद्दल ‘झी २४ तास’ला माहिती दिली. सोलार पॅनेलच्या साह्याने सर्व कॅमेरे सौरऊर्जेवर चालणार आहेत. ४० दिवसांचे रेकॉर्डिंग साठवण्याची क्षमता बसवण्यात आलेल्या डिव्हाईसमध्ये आहे. हे सर्व तयार करण्यासाठी आयुबखान यांना ९८ हजार रुपयांचा खर्च आलाय.
रात्री तसंच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चार्ज कंट्रोलरच्या सहाय्यानं बॅटरी स्टोअर करुन वापरता येऊ शकते. असे सीसीटीव्ही सर्व गाड्यांवर लावल्यास देशातील गुन्हेगारी कमी होईल, अशा विश्वास आयुब खान यांनी व्यक्त केला.
व्हिडिओ पाहा - •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, October 10, 2013, 13:28