ब्रँड, शाहरूख आणि वाद - Marathi News 24taas.com

ब्रँड, शाहरूख आणि वाद

www.24taas.com, मुंबई
 
वानखेडेच्या वादाचा किंग खानला बसणार का फटका ?
वादामुळे ब्रँड व्हॅल्यू वाढणार की घटणार ?
किंग खानच्या साम्राज्याला लागलीय उतरती कळा ?
ब्रँड, शाहरुख आणि वाद
 
बुधवारी वानखेडे स्टेडियमवर जो प्रकार घडला त्यामुळे बॉलीवूडचा किंग खान पुन्हा एका चर्चेत आला. पण यावेळी चर्चा जरा वेगळी होती. रुपेरी पडद्यावर सभ्यतेचे धडे देणारा बादशाह वेगळ्याच रुपात पहायला मिळाला. आणि त्यामुळेच आता त्याला पुढचे पाच वर्ष वानखेडेवर पाऊल ठेवता येणार नाही.
 
तारीख : १६ मे २०१२
वार : बुधवार
ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई
 
 
 
रुपेरी पडद्यावर सभ्यतेचे धडे देणा-या  शाहरुखचं हे रुप पाहून त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. किंग खानने वानखेडे स्टेडियमवर सभ्यतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या. क्रिकेट ग्राऊंडवर जाण्याचा प्रयत्न शाहरुखने केला.. पण त्याला रोखण्याचा प्रयत्न करणा-या स्टेडियमवरच्या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर तो धावून गेला.. त्यानं धक्काबूक्कीही केली. त्याच्या तोंडातून शिव्यांचा भडीमार होत होता. ही घटना घडली तेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी तिथं उपस्थित होत...त्यांनी शाहरुखला समजावण्याचा प्रयत्न केला...पण तो ऐकायच्या मूडमध्ये नव्हता...त्याने स्टेडियम डोक्यावर घेतलं होतं...या प्रकारानंतर एमसीएनं शाहरुख विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली. एमसीएने कठोर भूमिका घेतल्यानंतर शाहरुख आणखीच भडकला आणि त्याने सगळा दोष एमसीएच्या माथी मारला..
 
घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागण्याचा प्रश्नचं येत नसल्याचं शाहरुखने स्पष्ट केल्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळणार यात शंका नव्हती....शाहरुख प्रकरणावर एमसीएने शुक्रवारी तातडीची बैठक घेतली आणि पुढील पाच वर्षासाठी शाहरुखला वानखेडे स्टेडियमचे दरवाजे बंद करण्याचा महत्वापूर्ण  निर्णय घेतला...शाहरुख हा आयपीएलच्या कोकात्ता नाईट रायडर टीमचा मालक आहे...पण  त्याला मालक म्हणून तर नाहीच नाही पण क्रिकेटप्रेमी म्हणूनही  स्टेडियममध्ये पाय ठेवता  येणार नाही. शाहरुखवर बंदी घालत अशा घटना भविष्यात घडू नये असा संदेशचं  MCA नं दिला आहे. वानखेडे स्टेडियमवर  शाहरुखनं घातलेल्या गोंधळ आणि त्यानंतर निर्मण झालेल्य़ा या  सगळ्या प्रकारामुळे क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ उडालीय...
 
पण क्रिकेट प्रमाणेच बॉलीवूड आणि जाहिरात क्षेत्रातही   या प्रकरणीची मोठी चर्चा सुरु झालीय... कारण किंग खान हा अनेक  उत्पादनाच्या जाहिरातीत पहायला मिळतोय. शाहरुख जसा बॉलीवूडचा बेतजा बादशाह आहे तसाच तो एडवर्ल्डमध्येही अव्वल आहे...पेनापासून ते कार पर्यंत आणि टूथ पेस्ट पासून ते घड्याळापर्यंत सगळ्याच प्रकारच्या जाहिरातीत किंग खान छोट्या पडद्यावर पहायला मिळतोय...पण त्याच्या  या वादाचा ब्रँड व्हॅल्यूवर तर काही परिणाम होणार नाही ना अशा शंका आता व्यक्त केली जात आहे. किंग खानने बॉलीवूडमध्ये आपलं  वेगळ  स्थान निर्माण केलं आहे...त्याच्या प्रत्येक सिनेमाला गर्दी करणारा एक मोठा प्रेक्षक वर्ग आहे...आणि त्यामुळेचं बॉलीवूडमध्ये त्याचा दबदबा  आहे... गेल्या काही वर्षात बॉलीवूडमध्ये  मिळालेलं यश आणि पैशामुळेच शाहरुख खान आज आयपीएलच्या एका टीमचा मालक बनला आहे.....
 
बॉलीवूडमधल्या आपल्य़ा स्टारडमचा त्याने जाहिरात क्षेत्रातही पुरेपूर वापर करुन घेतला आहे. आणि त्यामुळेच तो कारपासून  टुथपेस्टच्या जाहिरातीत  पहायला मिळतोय....जाहिरात हे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं एक अत्यंत प्रभावी माध्यम असून विविध वस्तूंच  उत्पादन करणा-या कंपन्यांकडून या माध्यमाचा पद्धतशीरपणे   वापर केला जातोय़..जाहिरात क्षेत्रातील उलाढालीचा आकडा सतत वाढत आहे....त्यामुळेच आजचं युग हे जाहिरात युग मानलं जात असून बॉलीवूड प्रमाणेच ऍडवर्ल्डमध्ये ( जाहिरात विश्वात ) शाहरुख खानचा मोठा बोलबाला आहे. कार, घड्याळ,पेन,  हेअर ऑईल आणि शेव्हिंग क्रीम , मोबाईल फोन सर्विस,बिस्कीट, तयार कपडे,पेंट, अंतरवस्त्र अशा विविध प्रकारच्या जाहिरातीत किंग खान सध्या चमकतोय....शाहरुख भोवती असलेल्या वलयामुळेचं कंपन्याही  जाहिरातीसाठी त्याची निवड  करतात..आजच्या घडीला शाहरुख सर्वप्रकारच्या जाहिराती करतांना दिसतोय...
 
महिला ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून उत्पादित केलेल्या  अंघोळीच्या साबनाच्या  जाहिरातीत एरव्ही  महिला अभिनेत्रींना  प्रधान्य दिलं जात असे...पण  त्या जाहिरातीतही  शाहरुख झळकला होता.... पुरुषांच्या अंतरवस्त्रांच्या जाहिरातीत रफटफ इमेज असलेल्या कलाकांरांना प्राध्यान्य दिलं जातं... पण रोमॅन्टीक इमेज असलेल्या शाहरुखने तिथही प्रवेश केला....डॉन सारख्या एक्शनपटातून किंग खानने आपली इमेज बदलण्य़ाचा प्रयत्न केला.... आणि त्याचं प्रतिबिंग त्या जाहिरातीतून दिसलं...आजच्या घडीला शाहरुख अनेक जाहिरातीत दिसतोय..पण वानखेडेवर निर्माण झालेल्या वादामुळे किंग खान चांगलाच वादात सापडलाय...शाहरुखच्या या वादाचा  त्याच्या ब्रँड व्हॅल्यूवर तर काही परिणाम होणार नाही ना अशा शंका आता व्यक्त केली जात आहे... शाहरुख खान हा केवळ बॉलीवुडचा किंग नाही तर ऐड जगतातही त्याचा दबदबा आहे..त्याला कारणीभूत आहे  त्याची लोकप्रियता...
 
शाहरुखच्या स्टारडममुळे कंपन्या त्याला जाहिरातीसाठी निवडतात...पण कंपन्यांना कोणताच  वाद नको असतो... कारण अशा वादाचा ब्रँड व्हॅल्यूवर परिणाम होत असल्याचं काही एड मेकर्सचं म्हणनं आहे..  अँग्री मॅन अमिताभ बच्चन असो की मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान... लाखो तरूण तरुणींच्या ह्दयाची धडकन ऐश्वर्या राय असो की ड्रीम गर्ल हेमामालिनी... बॉलीवूड असो की हॉलीवूड... ही सगळी मंडळी त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेएत... मात्र या स्टार्समंडळींना घराघरात पोहचवण्याचं काम केलयं ते स्मॉल स्क्रीनवरच्या जाहीरातींमुळे... रुपेरी पडद्यावर  सिनेतारेतारकांचे चित्रपट सुपरहिट होवो की फ्लॉप ... टीव्हीसी अर्थात टेलीव्हीजन कमर्शियलच्या माध्यमातून ही मंडळी स्मॉल स्क्रीनवर आपल्याला मिनिटा-मिनिटांला भेटत असतात....
 
किंबहुना अशा जाहीरातींमध्ये झळकण्यासाठी बड्या बड्या स्टार्समध्ये सुरू असलेली स्पर्धा आता काही लपून राहीलेली नाही... ज्या बॉलीवूड स्टारकडे जास्त ब्रँड तो या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट  असं जणू समीकरणचं बनलयं. अनेक बड्या कंपन्या आपल्या वस्तूंची जाहीरात करण्यासाठी बॉलीवूड स्टार किंवा क्रिकेटर्सची ब्रँड अँम्बॅसिडर म्हणून निवड करतात...  सतत प्रसिद्धीच्या झोतात असणा-या व्यक्तीची ब्रँड अँम्बॅसिडर म्हणून निवड करण्याकडं त्यांचा कल असतो.. मात्र ब्रँड अँम्बॅसिडर निवडताना केवळ प्रसिद्धी हाच निकष महत्वाचा नसतो... कंपन्यांनी आपला ग्राहकवर्ग निश्चित केल्यानंतर ब्रँड अँम्बॅसिडर निवडीला सुरूवात होते... या प्रक्रियेतील सर्वात पहिला टप्पा म्हणजे ज्या उत्पादनाची जाहीरात करायची आहे त्या उत्पादनाचं पर्सोनिफिकेशन केलं जातं.. पर्सोनिफिकेशन म्हणजे जाहीरातीतील वस्तूला काल्पनिक मानवी रूप देऊन त्याची गुणवैशिष्ट्ये ठरवणं... पर्सोनिफिकेशनच्या प्रक्रियामध्ये निश्चित करण्यात आलेल्या गुणवैशिष्ट्यांना लक्षात घेऊन ब्रँड अँम्बॅसिडरची रुपरेखा आखली जाते... आणि त्या रूपरेखेला साजेशी अशी व्यक्ती  अखेर जाहीरातीसाठी निवडली जाते.
 
जाहीरातीमध्ये वापरलं जाणार इमोशनल अपील हा निकष देखील ब्रँड अँम्बॅसिडर निवडताना लक्षात घ्यावा लागतो... जाहीरात क्षेत्रातील व्यक्ती आपल्या सर्जनशीलतेनुसार ब्रँड अँम्बॅसिडरची निवड करतात आणि यशस्वी जाहीरातीची निर्मीती करतात... किंग खान जाहिरातीच्या या सगळ्य़ा कसौट्यांवर उतरल्यामुळेचं तो आज विविधि कंपन्यांच्या जाहिरातीत पहायला मिळतोय...  पण आय़पीएलच्या मॅचनंतर वानखेडे स्टेडियमवर त्याने घातलेल्या गोंधळामुळे  त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढणार की घटणार ?यावर आता चर्चा सुरु झालीय.. शाहरुख वादात सापडला असला तरी  वादामुळे ब्रँड ब्हॅल्यू वाढत नसून कोणत्याही कंपनीला वाद नको असतो एड मेकर्सचं म्हणनं आहे. वादात सापडलेला ब्रँड अँम्बेसडर कंपन्यांना नको असतो....आता शाहरुखही वादात सापडल्यामुळे त्याच्या बाबतीतही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
 
 
 
 

First Published: Friday, May 18, 2012, 23:39


comments powered by Disqus