Last Updated: Saturday, May 19, 2012, 16:12
दिनेश पोतदार, www.24taas.com, मुंबई शेअर बाजाराशी संबंधित मूलभूत संकल्पनाशेअर बाजारात गुंतवणूक करण्याची अनेकांची इच्छा असते, पण त्याबद्दल प्रत्येकाला माहिती असेलच असे नाही. अपु-या किंवा चुकीच्या माहितीअभावी केलेली गुंतवणूक जोखमीची असते. ती टाळण्यासाठी या कार्यक्रमातून दर आठवड्याला शेअर बाजाराशी संबंधित मूलभूत आणि महत्त्वाची संकल्पना आम्ही आपल्याला समजाऊन सांगणार आहोत. आता आपण सेन्सेक्स आणि इतर निर्देशांक म्हणजे काय? हे जाणून घेणार आहोत. इंडेक्स किंवा निर्देशांक म्हणजे बाजारातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीतील चढउतार सांगणारा अंक. सेन्सेक्स हा वेगवेगळ्या निर्देशंकापैकी एक निर्देशांक..सेन्सेटीव्ह इंडेक्सचा शॉर्ट फॉर्म म्हणजे सेन्सेक्स..संवेदनशील अशा 30 कंपन्यांच्या किंमतीवर सेन्सेक्स आधारलेला असतो. या 30 शेअर्सची बाजारात सर्वाधिक उलाढाल होते. आणि त्यामुळे ते बाजाराची दिशा ठरवतात. आणि बाजाराच्या विशिष्ट वेळेची स्थिती सांगतात.
बाजाराच्या सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडेतीन या वेळात ठराविक वेळेच्या अंतराने सेन्सेक्स मोजला जातो. बाजारातल्या 13 सेक्टर्सचही तो प्रतिनिधीत्व करतो. ज्यावेळी आपण सेन्सेक्स वर गेला असं म्हणतो, त्यावेळी शेअर्सच्या किंमती किंवा भाव वाढलेले असतात. वाढलेले शेअर्स त्या कंपनीची भविष्यातील चांगली कामगिरी सूचित करतात. निफ्टी राष्ट्रीय शेअर बाजारातला एक निर्देशांक आहे. निफ्टी म्हणजे नॅशनल फिफ्टीचा शॉर्ट फॉर्म..राष्ट्रीय शेअर बाजारातील 50 शेअर्सचे चढउतार तो सांगतो. बीएसई 100, बीएसई 500 हे अधिक सर्वसमावेशक निर्देशांक आहेत. बॅकेक्स हा बॅकींग सेक्टरचा तर बीएसई आयटी हा आयटी सेक्टर्सचे निर्देशांक आहे. मिडकॅप, स्मॉल कॅप हे भांडवलावर आधारीत निर्देशांक आहेत.
शेअर बाजारातील या आठवड्यातील चढ-उतारमहिन्यातल्या सलग चौथ्या आठवड्यात शेअर बाजारात मंदी दिसून आली. या आठवड्यात, ग्रीसमधल्या राजकीय अस्थिरतेमुळे ग्रीस युरोमधून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आणि पाठोपाठ युरो कर्जाचं संकट अधिक गंभीर बनलं. सरत्या आठवड्यात त्याचा प्रभाव जागतिक स्टॉक्सवर राहिला. भारतीय शेअरबाजारवरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. आठवड्याच्या सुरूवातीला सोमवारी बाजारात 77 अंशांची घट पहायला मिळाली. एप्रिल महिन्यातल्या वाढत्या चलनवाढीमुळे सोमवारी बाजारात घसरण होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी केल्यामुळे बाजारात मंगळवारी सकारात्मक बदल दिसून आला. मंगळवारी बाजार 112 अंशांनी वधारला होता.
ग्रीसमधली राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे युरो कर्जाच्या वाढती चिंता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची नीचांकी घसरण आणि परदेशी फंडांच्या मोठ्या विक्रीमुळे बाजार बुधवार साफ कोसळला. बाजारात नीचांकी 298 अंशांची घट पहायला मिळाली आणि बाजार धोक्याच्या 16 हजार पातळीच्या किंचीत वर बंद झाला. गुरुवारी बाजार 40 अंशांनी वधारला. ब-याचश्या शेअर्सचे भाव कमी झाल्यामुळे, त्यांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि त्यामुळे बाजार काहीसा सुधारला. शुक्रवारीही बाजारात 87 अंशांची वाढ झाली. मंदीसदृष्य वातावरणात स्टेट बॅक ऑफ इंडियानं तिमाही अहवालात नफा नोंदवल्यामुळे शुक्रवारी बाजार काहीसा वधारला होता. बाजारावर प्रभाव टाकणा-या 30 प्रमुख कंपन्यांपैकी 22 कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. तर 8 कंपन्यांचे शेअर्स वधारले होते.
विविध सेक्टर्सची कामगिरीया आठवड्यात, अस्थिर बाजारात एकूण 13 सेक्टर्सपैकी 10सेक्टर्सचे स्टॉक घसरले होते तर फक्त 3 सेक्टर्सचे स्टॉक्स वधारले होते. , आठवड्यात ऑटो स्टॉक्समध्ये घट दिसून आली. सेन्सेक्स पॅकपैकी ऑटोतील प्रमुख कंपनी टाटा मोटर्स ही घसरणा-या कंपन्यांच्या यादीत अव्वल स्थानी होती. टाटा मोटर्सच्या वाहनांची विक्री समाधानकारक नसल्यामुळे स्टॉक्स घटले होते. बजाज ऑटोच्या स्टॉक्समध्येही घट पहायला मिळाली. वळू या बॅंकांच्या स्टॉक्सकडे..ब-याचश्या बॅकांचे स्टॉक्स घटले होते. पण शुक्रवारी स्टेट बॅंक ऑफ इंडियानं तिमाही अहवाल नफा नोंदवल्यामुळे स्टेट बॅकेचे स्टॉक्स वाढले होते. युरो झोन कर्जाच्या चिंतेपायी मेटल स्टॉक्सपैकी टाटा स्टीलचे स्टॉक्स घसरले होते. तर स्टर्लाईट इंडस्ट्रीचे स्टॉक्स वधारले होते. ऑईल आणि गॅस सेक्टर्समध्ये गेलनं 52 आठवड्यातला नीचांक नोंदवला.
नफ्यात वाढ झाल्यामुळे भारताची सर्वात मोठी इंजिनियरींग आणि कन्स्ट्रक्शन फर्म एल एण्ड टीचे स्टॉक्स वधारले होते. भांडवली वस्तू उत्पादक क्षेत्रात या आठवड्यात घट झाली. प्रमुख कंपनी भेलनं 52 आठवड्यातल्या नीचांक नोंदवला. भारतातील सर्वात मोठी उर्जा उत्पादक कंपनी एनटीपीसीच्या स्टॉकमध्ये घट झाली होती. या आठवड्यात भेल, गेल, हिंडाल्को आणि एनटीपीसी या मोठ्या कंपन्यांनी नीचांक नोंदवला. आता नजर टाकू या बाजारावर प्रभाव टाकणा-या 30कंपन्यांच्या सेन्सेक्स पॅककडे..सेन्सेक्स पॅकपैकी इन्फोसिस, जिंदाल स्टील आणि आयटीसी या कंपन्यांचे स्टॉक्स या आठवड्यात वधारले होते. तर सेन्सेक्स पॅकपैकी मारूती सुझुकी, हिंडाल्को, कोल इंडिया, भारती एअरटेल आणि विप्रो या कंपन्यांचे स्टॉक्स वधारले होते. या आठवड्यात ऑटो, बॅंक, कन्झ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुड्स, मेटल, ऑईल एण्ड गॅस, पॉवर, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, रियॅलीटी आणि टेक के या 10 सेक्टर्सचे स्टॉक्स घसरले होते तर FMCG, हेल्थ केअर, आय टी हे 3 सेक्टर्स वधारले होते.
First Published: Saturday, May 19, 2012, 16:12