Last Updated: Saturday, May 19, 2012, 21:53
www.24taas.com, मुंबई 
आयपीएल मॅचनंतर सुरु होते मस्ती, बेधुंद खेळाडू, बेफिकीर वर्तन आणि मद्याची झिंग. हे सगळं पाहिलं की आयपीएलच्या मायाजालात सहभागी झालेल्या चेहऱ्यांचा संबंध जन्टलमेन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटशी असेल असं आपण म्हणू शकू का?
अय्याशीचे अड्डे ठरलेल्या पार्ट्या, असल्या पार्ट्यांबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले. तरीही ना हे प्रकार थांबले, ना काही बदल झाले. आता तर आणखी एक शरमेची घटना घडली ती एका परदेशी महिलेची छेडछाड काढल्याची. या घटनेनं क्रिकेटच्या सभ्य खळाला कलंक लागला आहे.
मॅच फिक्सिंग, लेट नाईट चालणाऱ्या पार्ट्या, अश्लील वर्तवणूक यासारख्या घटनांमुळे आयपीएल चागंलच ढवळून निघालं आहे. त्यामुळे आयपीएल मात्र चागलंच चर्चेत आलं आहे. पण या आयपीएलच्या अशा घटनांमुळे क्रिकेटच्या खऱ्या खेळाला मात्र कुठेतरी त़डा गेला आहे हे मात्र नक्की.
First Published: Saturday, May 19, 2012, 21:53