Last Updated: Wednesday, May 23, 2012, 13:58
www.24taas.com, पुणे पुण्यात येरवड्याच्या निवासी शाळेतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणारा मुख्याध्यापक यादव गायकवाड याला निलंबित करण्यात आलंय. झी २४ तासनं याबाबतचं वृत्त सर्वप्रथम दाखवलं होतं.
झी २४ तासच्या दणक्यानंतर मुख्याध्यापक यादव गायकवाडला निलंबित करण्यात आलंय. त्यानं दोन ते सात वर्षं वयोगटातल्या 7 मुलींशी गायकवाडनं असभ्य वर्तन केल्याचं उघड झालं होतं. समाजकल्याण विभागाने चौकशी समिती नियुक्त केल्यानंतर एप्रिल पासून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली.
आरोपांत तथ्य असल्याचं चौकशी समितीनं दिलेल्या अहवालात मान्य केलंय. गायकवाडला बडतर्फ करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आलीय.
First Published: Wednesday, May 23, 2012, 13:58