कोणाची अग्निपरीक्षा? - Marathi News 24taas.com

कोणाची अग्निपरीक्षा?

www.24taas.com, मुंबई
 
शिस्तबद्ध भाजपला बेशिस्तीचे ग्रहण
महत्वाकांक्षा आणि मतभेदांच्या चक्रव्युहातून कशी होणार सुटका  ?
बंडखोर नेत्यांना आवरण्यासाठी काय असेल रणनीती ?
२०१४ च्या रणसंग्रामासाठी कोण असेल सेनापती ?
अग्निपरीक्षा !
 
मुंबईत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीला सुरुवात झालीय. दोन दिवस चालणा-या या बैठकीत पुढच्या दोन वर्षासाठीची रणनीती प्रामुख्यानं ठरवली जाणार आहे.तसेच  गडकरींच्या नेतृत्वाखाली  2014 च्या निवडणूका लढवण्यास पक्ष कितपत सक्षम आहे याचीही चाचपणी केली जाणार आहे..पण या बैठकीत काही नेत्यांच्या उपस्थितीवर संभ्रम निर्माण झाला होता.. अलिकडच्या काळात अंतर्गत वादामुळे भारतीय जनता पक्ष चंगलाच बेजार झालाय. अशातच  मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात झालीय..या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हजर राहणार  की नाही हे बैठक सुरु होई पर्यंत स्पष्ट झालं नव्हतं...त्यामुळे मोदींच्या उपस्थितीवरुन बरेच तर्कवितर्क लावले जात होते...मोदी दोन तासांसाठी बैठकीला हजेरी लावतील असाही एक तर्क लावला जात होता...
 
पण अखेर मोदींनी बैठकीला हजेरी लावली आणि भाजप नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मोदींप्रमाणेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस येदियुरियप्पांनी पक्षाला खुलेआमपणे आव्हाण दिलंय...पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत सहभागी न होण्याचं येदियुरियप्पाने पूर्वीच जाहीर करुन टाकलं  आणी त्याप्रमाणे ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत....भाजप वरिष्ठ नेत्या वसुंधराराजे यांच्या बाबतीतही अशीच शंका उपस्थित केली जात होती...पण वसूंधरा राजे यांनी बैठकीला हजेरी लावून सगळ्या सगळे तर्क वितर्क फोल  ठरवले...पण हा वाद एक दोन नेत्यांपूर्ताच मर्यादीत नाही.... तर  नितीन गडकरींच्या पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपदी निय़ुक्तीवरुनही  मतभेद आहेत...
 
गडकरींची पुन्हा अध्यक्षपदी  नियुक्ती करण्यासाठी भाजपला आपल्या घटनेत दुरुस्ती करावी लागणार आहे...पण ती दुरुस्ती इतक्या सहजासहजी होईल का ?नुकतेच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचं कमळ कोमेजून गेल्याचं पहायला मिळालं......त्यामुळे गडकरींच्या कामगीरीवर पक्षातील नेत्यांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं  जाऊ लागलंय. देशात सार्वत्रीक निवडणुका दोन वर्षानंतर होणार आहेत...मात्र त्यापूर्वीच पेट्रोल दरवाढीच्या निमित्ताने  भाजपच्या हाती आयताच मुद्दा मिळाला आहे...विरोधपक्ष म्हणून भूमिका बजावण्याची जबाबदारी भाजपच्या खांद्यावर असली तरी अंतर्गत वादामुळे भाजप आतून पोखरली गेली आहे...कर्नाटक असो की राजस्थान , राज्यातील  नेत्यांचा संघर्ष आता लपून राहिला नाही...तसेच दिल्लीतील तख्ताच्या लढाईवरुनही भाजप नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहे...  2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत वाद संपविण्यात जर नेत्यांना यश  नाही तर हेच वाद  पक्षाला घातक ठरण्याची शक्यात आहे...
 
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना एवढी प्रसिद्धी मिळाली की, त्यांच नाव थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जावून पोहोचलं.. पण दिल्लीचं तख्त गाठण एवढं सोप नाहीय याची जाणीव मोदीना आहे.. कारण मोंदीचा सामना विरोधकाबरोबरच पक्षातल्या मोठ्या नेत्यांबरोबरदेखील आहेच. भाजपच्या मिशन 2014साठी पंतप्रधान पदाचा दावेदार कोण असेल ? या प्रश्नावर जेव्हा जेव्हा प्रसार माध्यमांकडून कयास लावला जातो तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचं नाव प्रामुख्याने पुढं येतं...या विषयी  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींनीही पंतप्रधान पदासाठी अनेक दावेदार असून नरेंद्र मोदी त्यापैकीच एक असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलंय. पंतप्रधान पदासाठी इच्छुक असलेल्यांची भाजपमध्ये मोठी यादी आहे.
 

भाजपने 2009ची सार्वत्रिक निवडणुक लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली लढवलीय ..यापार्श्वभूमीवर आगामी 2014ची निवडणुक अडवाणींच्याच नेतृत्वाखाली लढवली जाणार  का ? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे....पण आजकाल भाजपमधील सर्व महत्वाचे निर्णय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली घेतले जात असल्याचं बोललं जातंय..या निर्णयांमध्ये केवळ नितीन गडकरींना पुन्हा पक्षाध्यक्ष करण्याचाच निर्णय नाही तर, नरेंद्र मोदींच्या विरोधानंतरही संजय जोशींना भाजपात पुन्हा घेण्याचा निर्णय़ही त्यापैकीच एक आहे... तसेच संजय जोशींवर उत्तरप्रदेशच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली होती...
 
उमा भारतींना भाजपात पुन्हा प्रवेश देण्याचा निर्णयही संघाच्या सूचनेवरुनच  घेण्यात आल्याचं   जानकारांच म्हणनं आहे. 2014च्या निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी भाजप  पुन्हा एकदा अडवाणींचं नाव पुढं करणार  का ?  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..तसेच आरएसएसच्या सहमती सोबतच स्वताच्या प्रकृतीचं आव्हाणही अडवाणींसमोर उभं असणार आहे..भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठी अरुण जेटलींचं नाव सर्वात वरच्या स्थानवर असल्याचं मानलं जातंय..संसदेत फर्डावक्ता म्हणून भलेही त्यांनी ओळख निर्माण केली  असली तरी पंतप्रधान पदासाठीचा जनाधार  त्यांच्याकडं नाही..शिवाय संघाप्रमाणेच  भाजपातील काही मोठ्या नेत्यांचा  जेटलींच्या नावाला विरोध आहे.
 
सुषमा स्वराज यांच्याकडं चमत्कार घडवून आणण्याची ताकद आहे...मात्र दिल्ली-हरियाणा या आपल्या होम ग्राऊंडवर  त्यांना भाजपचं कोमजलेलं कमळ  फुलवता आलं नाही..लोकसभेत जाण्यासाठी त्यांना जनसंघाचा गढ मानल्या जाणा-या विदिशातून निवडणुक लढविण्याची वेळ आली. पण या सगळ्या पार्श्वभूमिवर नरेंद्र मोदी  2014च्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणार का हाच खरा प्रश्न आहे...यंदा गुजरातमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहे..मोदी  दिल्लीला जाणार की गुजरातमध्येच राहणार हे त्या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असणार आहे.....तसेच मोदींच्या कार्यशैलीवर  संघ आणि भाजपमधील बड्या नेत्यांना अक्षेप आहे. भाजप राष्ट्रीय पक्ष असला तरी विविध राज्यातील भाजपचे  अनेक नेते केंद्रीय नेतृत्वापेक्षा मोठे झाले आहेत.
 
त्यामुळे अशा नेत्यांवर अंकुश ठेवण्यात पक्ष नेतृत्वाला म्हणावं तेव्हडं यश येतांना दिसत नाही.... आता पुन्हा एकदा गडकरी पक्षाची सूत्र हाती घेणार आहेत...त्यामुळे आगामी काळात  त्यांच्या समोर मोठ आव्हान असणार आहे. दोन दशकानंतर भाजप एक राष्ट्रीय पक्ष उभा राहीला कारण देशातील मोठ्या राज्यांमध्ये त्यांनी सत्ता हस्तगत केली होती....मात्र त्या काळात भाजपमध्ये नरेंद्र मोदी,येदियुरयप्पा, शिवराज सिंह चौहान, रमन सिंह, अर्जून मुंडा आणि प्रेमकुमार धूमल या सारखं राज्यातील नेतृत्वही उभं राहिलं...आजच्या काळात हे नेते इतके मोठे झाले आहेत की त्यांच्यासमोर केंद्रीय नेतृत्व खुजं भासू लागलंय.
 
आणि भाजपं खरं दुखनं हेच आहे. काही वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी , लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या नेत्यांसमोर राज्यातील भाजपचे इतर नेते लहान वाटत असतं..त्या काळातही आरएसएसचा भाजपला मोठा आधार होता..तसेच संघाचं नेटवर्क आणि शिस्तीचा भाजपला फायदाही झाला होता..पण आजच्या परिस्थितीत नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्यातील नेत्यांसमोर खुपचं लहान भासतंय...गडकरींची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यामागे संघाने महत्वाची भूमिका बजावल्याचं आता लपून राहिलं नाही..गडकरी आणि संघ यांच्यात ताळमेळ असतांनाही राज्यातील भाजप नेत्यांना अद्यापही  पर्याय  नाही.
 
त्यामागचं कारण म्हणजे आज संघाच्या ताकदीविषयीच प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. भाजपचं केंद्रीय नेतृत्व कर्नाटकपासून हिमाचल प्रदेश पर्यंत आणि झारखंडपासून गुजरातपर्यंत निष्प्रभ ठरल्याचं दिसून आलंय. कर्नाटकात येदियुरप्पांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतरही भाजप नेतृत्वाने त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचं धाडस दाखवलं नाही..कर्नाटकाचा वाद मिटविण्यासाठी पक्षाकडून तारीख पे तारीखचा खेळ करण्यात आला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या बाबतीतही पक्ष नेतृत्वाने बचावात्मक पवित्रा घेतला होता. नरेंद्र मोदींच्या नाराजीवर भाष्य करण्यास दिल्लीतील भाजप नेते धजावत नव्हते.
 
मात्र त्याच वेळी भाजप नेते केशूभाई पटेल यांनी नरेंद्र मोदीवर सडकून टीका केली होती...केशूभाईंच्या टीकेवरही केंद्रीय नेतृत्वाने मुगगिळून गप्प राहण्याची भूमिका बजावली. राजस्थानमध्ये वसुंधराराजेंच्या बंडा बाबातही पक्षाने हीच भूमिका घेतली होती...झारखंडमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला..पण त्यावरही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने कोणतीच कारवाई केली नाही. खरं तर एकीकडं युपीए सरकारचा जनाधार ढासळत असतांना 2014ची निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसण्याची आवश्यकता आहे. पण पक्षांतर्गत वादातच भाजप गुरफटून गेलं आहे.
 
 
 

First Published: Thursday, May 24, 2012, 23:35


comments powered by Disqus