Last Updated: Thursday, May 31, 2012, 11:25
. .
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, एैश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
दिव्य संदेश"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"
दिव्य शिकवणया जगात 'शहाणपण' हे खरे अमृत होय. आपण दुसरयांना जे सुख किंवा दुःख देतो ते सुख-दुःख आपणाकडे बुमरँग होवून न चुकता परत येते, हा निसर्गाचा अटळ नियम नीट लक्षात घेऊन जीवन जगणे हेच खरे 'शहाणपण' होय.
संकल्पशुभ चिंतावे, शुभ ईच्छावे, वचनी शुभ बोलावे
शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने
परमेश्वराची व्याख्यानिसर्गनियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. हा परमेश्वर कृपा किंवा कोप करीत नाही तर माणूसच स्वतःच्या कर्मांनी स्वतःवर कृपा किंवा कोप करीतअसतो.
.
वामनराव पै यांचा जीवनप्रवासजीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. पै यांनी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे बोधवाक्य जनसामान्यांच्या मनावर बिंबवलं. एक नजर टाकूयात सदगुरु वामनराव पै यांच्या जीवनप्रवासावर.
..
.
‘जीवनाचा शिल्पकार’ हरपलाजीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. पै यांनी 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे बोधवाक्य जनसामान्यांच्या मनावर बिंबवलं. आजारपणामुळे त्यांच्यावर गेल्या काही काळापासून कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
.
.
व्हिडिओ पाहा....
..

‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या थोर उपदेशातून घरोघरी पोहचलेले सदगुरू वामनराव पै यांच्या निरूपणामधून पिंपरी-चिंचवडचे भाविक नादमय झाले होते. पिंपरी-चिंचवडमधील नागरिक सध्या अनुपम भक्तीरसात न्हाऊन निघाले आहेत.
.
.
व्हिडिओ पाहा....
.
.
.
First Published: Thursday, May 31, 2012, 11:25