Last Updated: Saturday, June 9, 2012, 13:35
भारत बंद (व्हिडिओ)
------------------------------

मुंबईत ‘बंद’ला संमिश्र प्रतिसादएनडीएनं पेट्रोल दरवाढीच्या हाकेला मुंबईकरांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय. मुंबईत अनेक ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली. मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मध्य मुंबईतून ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतलंय.
------------------------------
महाराष्ट्रात बंदला हिंसक वळणपेट्रोल दरवाढीविरोधात आज पुकारलेल्या भारत बंदमुळे राज्यातल्या जनजीवनावर परिणाम रात्रीपासूनच जाणवू लागलाय. पाहुयात आज सकाळपासून कुठे कुठे काय काय घडलं... भारत बंदला कसा मिळाला महाराष्ट्रात प्रतिसाद...
------------------------------

देशभरात पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलनदेशभरात पेट्रोल दरवाढीमुळे संताप उसळलाय. याच संतापामुळे एनडीएनं पुकारलेल्या आजच्या एका दिवसाच्या भारत बंदला भारतात काही ठिकाणी सौम्य तर काही ठिकाणी तीव्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. पाहुयात, पेट्रोल दरवाढीवरून देशभरात कसा निषेध केला गेला केंद्र सरकारचा...
------------------------------

इतिहास ‘भारत बंद’चा…पेट्रोल दरवाढीविरोधात आज एनडीएनं संप पुकारलाय. महागाईनं पिचलेल्या जनतेचा मूक का होईना पण त्यांना पाठिंबा मिळतोय. पण, ‘भारत बंद’ची हाक आणि या बंदमुळे होणारं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान भारतीय जनतेला मात्र नवीन नाही... एक नजर टाकूयात याआधी कधी कधी पुकारला गेला होता ‘भारत बंद’...
-------------------------------

भारत बंद : नुकसान केल्यास दंडएनडीएने पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ उद्या ३१ मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे., या बंद दरम्यान काही नुकसान झाल्यास बंदकर्त्या संघटना आणि राजकीय पक्षांकडून दंडाच्या रूपाने होणाऱ्या नुकसानीची वसुली केली जाणार आहे.
--------------------------------

मुंबईत ‘बंद’बाबत संभ्रमपेट्रोलच्या दरवाढीविरोधात एनडीएनं उद्या पुकारलेल्या बंदबाबत मुंबईत संभ्रमाचं वातावरण आहे. मुंबईत उद्या काय होणार याची चर्चा सगळीकडे सुरु असली तरी कार्यालयांना सुट्टी द्यायची की नाही याचा संभ्रम आज दिवसभर सगळीकडे होता.
.
--------------------------------

उद्या ‘भारत बंद’, पेट्रोल दरवाढीचा निषेधपेट्रोल दरवाढीचा भडका देशभर उडाला आहे. उद्या NDAनं भारत बंदची हाक दिली आहे. तर CNGच्या मुद्यावर दिल्लीत रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती घटल्यानं पेट्रोल १.६७ पैशांनी कमी होण्याचे संकेत HPCL नं दिले.
.
.
.
First Published: Saturday, June 9, 2012, 13:35