कथा..सोलापुरातील अदृश्य किल्ल्याची - Marathi News 24taas.com

कथा..सोलापुरातील अदृश्य किल्ल्याची

www.24taas.com, संजय पवार (सोलापूर)
 
कथा आहे, सोलापूरमधील एका अदृश्य किल्ल्याची. शनिवारवाड्यापेक्षा मजबूत असणारा किल्ला अचानक दिसू लागलाय. तो चक्क पाण्यात. झी 24 तासनं सातशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा दिलेला स्पेशल रिपोर्ट.
 
सोलापूरमधला हा केगावचा भूईकोट किल्ला... तब्बल ३६ वर्षांनंतर या किल्ल्यानं गावक-यांना दर्शन दिलंय. ऐकून आश्चर्य वाटलं ना?...पण हो....हे खरंय...गेली ३६ वर्ष हा किल्ला उजनी धरणाच्या पन्नास फूट खोल पाण्यात बुडाला होता. मात्र आता धरणातलं पाणी कमी झाल्यानं पुन्हा वर दिसू लागला.
 
शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजेंच्या काळात हा किल्ला बांधला गेला. दोन एकरात बांधलेला हा किल्ला निजामशाहीच्या सैन्याला रसद पुरवण्यासाठी आणि खजिना लपविण्यासाठी उपयोगात येत असे. शनिवार वाड्यापेक्षा मोठा आणि नियोजनबद्ध असा हा मजबूत किल्ला होता. १९७८ साली नवीन बांधलेल्या उजनी धरणाच्या पाण्यात बुडालेला हा किल्ला ३६  वर्षानंतर पुन्हा दिसू लागल्यामुळे किल्ल्यात लहानपणी फिरलेल्यांच्या त्यावेळच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्यात.
 
सातशे वर्षांपूर्वींचा हा किल्ला अनेक जुन्या आठवणींना उजाळा देतोय. मात्र या किल्ल्याची नीट जपणूक झाली असती तर इतिहासकालीन वास्तू म्हणून स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना जगासमोर आजही असती यात शंका नाही.
 
व्हिडिओ पाहा...
 

First Published: Friday, June 1, 2012, 11:02


comments powered by Disqus