विद्यावती आश्रमावर अखेर गुन्हा दाखल - Marathi News 24taas.com

विद्यावती आश्रमावर अखेर गुन्हा दाखल

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
पुण्यातल्या विद्यावती आश्रमातल्या गैरप्रकारप्रकरणी संचालक राजेश गुप्ताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर गुप्ता आश्रम परिसरातून गायब झालाय. झी २४ तासनं य़ा गैरप्रकाराचा सातत्यानं पाठपुरावा केल्यानं पोलीस आणि प्रशासनाला गुन्हा दाखल करणं भाग पडलंय.
 
पुण्यातल्या कामशेतच्या विद्यावती आश्रमाचा संचालक राजेश गुप्ताच्या विरोधात वडगाव- मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आश्रमातल्या गैरप्रकारांचा झी २४ तासनं सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यानंतर अखेर गुप्ताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आश्रमातल्या १४ वर्षाची मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आश्रमावर अगोदरच गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर आता राजेश गुप्ताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
मात्र हा गुन्हा कोणत्या स्वरुपाचा आहे याची माहिती द्यायला कोणीही तयार नाही. तर या प्रकरणी  महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्यात. शिवाय या प्रकरणाचा चौकशी अहवाल उघड करण्याची मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेनं केली आहे.

First Published: Tuesday, December 6, 2011, 05:06


comments powered by Disqus