कैद्यांची तुरुंगातील बडदास्त ! - Marathi News 24taas.com

कैद्यांची तुरुंगातील बडदास्त !

www.24taas.com, मुंबई/नाशिक
 
सात निष्पाप नागरिकांना आपल्या आलिशान कार खाली चिरडून ठार करणा-या ऍलिस्टर परेराला कोर्टाने तीन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलीय..पण परेराचा नाशिकच्या तुरुंगात राजेशाही थाट असल्याचं झी 24 तासनं उघड केल्यानंतर तुरुंगातील सत्य जगासमोर आले..धनदांडग्यांसाठी कायदा वाकवला जात असल्याचं या प्रकरणातून उघड झालंय..ऍलिस्टर परेराची नाशिकच्या तुरुंगात कशा प्रकारे शाही बडदास्त ठेवली जातेय ?...कोण पुरवतं कैद्यांना या सुविधा ? भ्रष्ट यंत्रणा याला कारणीभूत तर नाही ना ? या आणि अशा विविध पैलूंचा वेध घेतला आहे, प्राईम वॉचमध्ये ....तुरुंगातील बडदास्त !
 
गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला व्हावी म्हणून तुरुंग उभारण्यात आलेत...पण या उद्देशालाच तिलांजली देण्याचा प्रयत्न केला जातोय...ऍलिस्टर परेरा सारख्या कैद्यांना घरच्याप्रमाणे सुविधा पुरवल्या जाताहेत...ही बाब चित्रफितीत कैद झालीय...खरं तर त्याला कोर्टानं सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली असतांना, त्याची राजेशाही बडदास्त ठेवली जातेय...
 
काय आहेत अलिशान बाबी..
 
नाशिक तुरुंगात कायदा धाब्यावर
तुरुंगात कैद्याची आलिशान बडदास्त
कैद्याने भागवली कार चालविण्याची हौस
 
चित्रफितीत दिसत असलेला हा आहे ऍलेस्टर परेरा ... नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगात तो तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा भोगतोय...पण इतर कैद्याप्रमाणे त्याला इथं वागणूक दिली जात नाही...तर एखाद्या पाहुण्याप्रमाणे त्याची नाशिक तुरुंगात बडदास्त ठेवली जातेय...तुरुंगात शिक्षा भोगणा-या ऍलेस्टर परेराला चक्क आपली आलिशान कार चालविण्याची मुभा देण्यात आल्याचं या चित्रफितीतून उघड झाले आहे.
 
तरूंगातील चित्रफीत बघितल्यानंतर नाशिकच्या तुरुंगात एलिस्टर परेररा सारख्या धनदांडग्यांना राजेशाही वागणूक दिली जातेय हे वेगळं सांगण्याची गरज आता राहिली नाही... झी 24तासने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर गृहखात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ऍलिस्टरच्या या कारनाम्यांची आणि पर्यायानं नाशिक तुरुंगातील बेकायदा कारभाराची डीआयजी मार्फत चौकशी सुरू झाली आहे.
 
एकीकडं या प्रकरणाची चौकशी सुरु झालीय तर दुसरीकडं ऍलिस्टर परेराचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे... एका कुख्यात गुंडाने ऍलिस्टर विरोधात तक्रार दाखल केली होती...ती तक्रार झी 24 तासच्या हाती लागलीए.   गेल्या मार्च महिन्यात एका कैद्यानं जिल्हा न्यायदंडाधिका-यांकडे जेल प्रशासनाची तक्रार केलीय.सुप्रीम कोर्टानं सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली असताना ऍलिस्टरला टेलरिंगचं काम देण्यात आलयं....पण ते कामही तो करत नसून एका गोडावूनच्या रखवालीचं काम तो करत असल्याचं तक्रारीत नमुद करण्यात आलंयय...ऍलिस्टर परेरा तुरुंगातील एका क्लार्कच्या मदतीनं कॉम्प्युटर रुममध्ये बसून असतो... तसेच तो तासनतास मोबाईलवर बोलत असल्याचं तक्रारदारानं म्हटलं. ऍलिस्टरसाठी दररोज खास जेवणाचा डबाही तुरुंगा बाहेरुन येत असल्याची तक्रार जिल्हा न्यायदंडाधिका-याकडे करण्यात आलीय...परेराने जो गुन्हा केलाय त्याला तो अंगावार काटा आणणारा आहे.
 
12 नोव्हेंबर  2006.
पहाटे 3 वाजून 45 मिनिटं.
ठिकाण कार्टर रोड वांद्रे.
 
दक्षिण मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये पार्टी आटोपून निघालेल्या ऍलिस्टर परेरानं दारुच्या नशेत वांद्र्यातल्या कार्टर रोडच्या फुटपाथवर झोपलेल्या 15 जणांना उडवलं होतं... त्यामध्ये 7 जण जागीच ठार झाले तर आठ जण गंभीर जखमी झाले होते...याप्रकरणी ऍलेस्टर परेराला अटक झाली पण महिनाभरातच ऍलिस्टर जामीन मिळाला. पुढं मुंबई हायकोर्टानं त्याला दोषी ठरवलं. त्यानंतर त्यानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं.पण सुप्रीम कोर्टानं तीन वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं...तेव्हापासून ऍलिस्टर परेरा तुरुंगात आहे...सात निष्पाप लोकांचा जीव घेणा-या एलिस्टर परेराला धडा मिळावा म्हणून न्यायालयाने त्याला सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलीय...पण तुरुंगात त्याची शाही ब़डदास्त ठेवली जातेय. त्यामुळे न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या उद्देशालाच तिलांजली देण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.
 
 
अँलिस्टर परेराला तुरुंगात कशाप्रकारे शाही वागणूक दिली जातेय, हे आताच आपण बघितलंय...पण तुरुंगात गुंड टोळ्यांचा असलेला दबदबा आता लपून राहिलेला नाही..तुरुंगात वर्चस्वातून गुंड टोळ्यांमध्ये अनेक वेळा संघर्ष झालाय...मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातही अशा घटना घडल्या आहेत... कुख्यात डॉन गँगस्टर अबू सालेमवरही अशाच प्रकरणातून हल्ला झाला होता...
 
 
मुंबईतील हे अर्थररोड तुरुंग..... अंडरवर्ल्डमधील अनेक कुख्यात गँगस्टर या तुरुंगाच्या चार भिंतीआड कैद आहेत.... मुंबईतील सर्वात सुरक्षीत तुरुंग म्हणून अर्थररोडची ओळख असली तरी कधी कधी गुंडांना रोखणं तुरुंग कर्मचा-यांनाही शक्य होत नाही...गुंड टोळ्यांमधली वर्चस्वाची लढाई तुरुंगातही पहायला मिळते....
 
24 जुलै 2010ला अर्थररोड तुरुंगात कुख्यात गँगस्टर अबू सालेम आणि मुस्तफा डोसा हे दोघे सकाळी न्याहरी घेण्यासाठी आले असता त्यांच्यात जोरदार भांडण झालं...भांडणाचं पर्यावसन हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचलं... मुस्तफाने सालेमवर चमच्याने वार केला...त्यावेळी तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे भांडण मिटलं...त्या हल्ल्यात सालेमच्या मानेला तसेच चेह-याला किरकोळ दुखापत झाली होती....मुस्तफा डोसा आणि अबू सालेम हे दोघेही 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी आहेत.
 
एकेकाळी हे दोघेही कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत होते...पण 1997 नंतर अबू सालेम दाऊद इब्राहिमपासून फारकत घेतली ...आणि त्याने आपली स्वतंत्र गँग तयार केली...परदेशात राहून सालेम आपली टोळी चालवीत होता...बॉलीवूडवर त्याचा मोठा दबदबा होता...सिने तारे-तारका आणि निर्माता , दिग्दर्शाकांकडून सालेम खंडणी वसूल करत असे.....पण पोर्तुगालमध्ये सालेमला अटक झाली..त्यानंतर त्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं.....सालेमला अर्थररोड तुरुंगात असतांना मुस्तफा डोसाशी त्याचं बिनसलं होतं... त्यातूनच सालेमवर हल्ला झाल्याची चर्चा होती.. सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यात झालेल्या संघर्षानंतर दोघांनाही अर्थररोड तुरुंगाबाहेर पाठविण्यात आलं होतं.
 
कैदी तुरुंगात शस्त्र घेऊन जाऊ शकत नाही...पण असं असतांनाही काही कैदी चोरी-छुपे धारदार वस्तू तुरुंगात घेऊन जातात...कैदी त्या वस्तूंची कशा पद्धतीने तस्करी करतात, यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट..
 
गुन्हेगाराला आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप व्हावा म्हणून त्यांना शिक्षा देऊन तुरूंगात ठेवलं जातं... पण काही कैदी चौरी-छुपे तुरूंगातही शस्त्र घेऊन जाण्यास मागे पुढे पाहत नाही... अनेक वेळा असे प्रकार उघडकीस आलेएत.. पण गेल्या काही वर्षात या तस्करीच्या पद्धतीत बराच फरक पडलाय.. ही पद्धत आता आणखीनच हायटेक झालीय.. तुरूंगात आपला दबदबा कायम रहावा यासाठी काही कैद्यांकडून तुरुंगात शस्त्रांची तस्करी केली जातेय..
 
जेलची सुरक्षा भेदण्यासाठी शोधली नवी शक्कल
 
 
कैद्यांच्या घशामध्ये ब्लेड
घशात ब्लेड लपवण्याची एक अनोखी शक्कल कैद्यांनी शोधून काढलीय..शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरल्या जाणा-या सर्जिकल  ब्लेडच्या एका टोकाला दोरा बांधला जातो... दो-याचं दुसरं टोक दातामध्ये अडकवलं जातं... त्यानंतर ते ब्लेड घशात सोडलं जातं... दो-याचं एक टोक दातात अडकल्यामुळे ब्लेड घशात अडकून रहातं.. तुरूंगात जाताना तपासणी दरम्यान घशात अडकलेलं ब्लेड सुरक्षा रक्षकाच्या नजरेस पडत नाही..
 
नाकात लपवलं जातं सर्जिकल ब्लेड
सर्जिकल ब्लेड कापडाच्या तुकड्यात गुंडाळून नंतर ते नाकात खोलवर ढकललं जातं... लहान-लहान वस्तू लपविण्यासाठी कैद्यांकडून नाकाप्रमाणेच केसांचाही वापर केला जात असल्याचं आढळून आलंय...केसातही ब्लेड आणि पीन लपवलं जातं असल्याचं काही घटनांमध्ये उघडकीस आलयं.. पीन किंवा ब्लेडच्या एका टोकाला दोरा बांधला जातो आणि त्याचं दुसरं टोक केसाला बांधलं जातं..
 
तुरूंगाची सुरक्षा भेदण्याचा अनोखा मार्ग - च्युइंगमध्ये सीम कार्ड
तुरूंगात कैद्यांकडून मोबाईल फोन वापरला जात असल्याचं अनेक प्रकरणांमध्ये उघड झालयं.... मोबाईल फोनसाठी आवश्यक असलेलं सीम कार्ड तुरुंगात घेऊन जाण्यासाठी कैद्यांकडून या पद्धतीचा अवलंब केला जातो... मोबाईल फोनचं सीमकार्ड लपविण्यासाठी कैद्यांकडून च्युईंगमचा वापर केला जातो.. च्युईंगममध्ये सीमकार्ड लपवून ते तोंडात ठेवलं जातं.. अशा पद्धतीने कैदी च्युंईंगम सोबत सीमकार्ड घेऊन जातात...
 
तुरूंगाची सुरक्षा भेदून आतमध्ये ड्रग आणि शस्त्र घेऊन जाण्याचा हा प्रकार तसा जुनाचं आहे.. पण काळानुरूप त्यांच्या पद्धतीत बदल होत गेलाय... तुरूंगात ड्रगची तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते... कैद्यांकडून वापरण्यात येणा-या तस्करीच्या पद्धतीचा शोध घेण्यासाठी तुरूंग प्रशासनाकडून प्रयत्न केला जातो खरा... पण चलाख कैदी त्यावरही तोडगा शोधून काढत असल्याच वारंवार सिद्ध झालयं..
 
खाद्यपदार्थातून चक्क अमली पदार्थांची तस्करी 
घरचं जेवण मिळावं म्हणून काही आरोपी कोर्टाकडं अर्ज करतात आणि कोर्टाकडून तशी परवानगी मिळवतात...पण काही आरोपी खाद्यपदार्थातून चक्क अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचं आता उघड झालंय. दिल्लीच्या तिहार तुरुंगात असे धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, तुरुंग प्रशासनानं काही खाद्यपदार्थ तुरुंगात आणण्यावर बंदी घातलीय.. ते पदार्थ कोणते, ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
 
दिल्लीच्या तिहार तुरूंगात कोणताही गैर प्रकार घडू नये यासाठी तुरूंग प्रशासनाकडून तुरूंगातले कैदी आणि त्यांना भेटण्यासाठी येणा-या नातेवाईकांवर करडी नजर ठेवण्यात येते... तसचं तुरूंगात ड्रग्ज पोहचू नये यासाठी तपासणीच्या नवनवीन पद्धतीचा अवलंब केला जातो... पण तुरूंग प्रशासनाला चकवा देण्यात ड्रग्ज तस्कर नेहमीच आघाडीवर राहीलेएत.. तस्करीची पद्धत उघड होत न् होते तोच कैद्यांकडून नवीन पद्धत शोधून काढली जाते.... कैद्यांसाठी त्यांचे नातेवाईक नेहमीच डब्यात शिमला मर्ची घेऊन येतात.. पण काही कैद्यांसाठी शिमला मिरची म्हणजे तुरूंगात ड्रग्ज मिळण्याचं महत्वाचं साधन आहे.. शिमला मिरचीतून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तुरूंगात पाठवलं जातं.
 
 
ड्रग्जची तस्करी करण्यासाठी  शिमला मिरची
तुरूंगात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी फक्त शिमला मिरचीचाच वापर केला जातो असं नाही.. तर कारल्यातूनही तुरूंगात ड्रग्ज आणि नोटा पोहचवल्या जातात.. कैद्यांसाठी नातेवाईकांनी आणलेले हे खाद्य पदार्थ तुरूंग रक्षक आणि तुरूंगातील सीसीटीव्ही कॅमे-यांपासून दूर ठेवले जातात.. आणि त्यामुळेच ते सहज कैद्यांपर्यंत पोहचतात.. हे सँडविच जरा बारकाईने पहा...या सँडविचमधील ड्रग्जची पूढी अगदी सहज लपवली जाऊ शकते..तसेच यात नोटाही सहज लपविता येतात.वरवर पाहता या सँडविचमध्ये भाजी भरल्याचं कुणालाही वाटेल... पण खरतर या सँडविचच्या माध्यमातून थेट तुरूंगात ड्रग्जची तस्करी केली जाते.. तुरूंगात कैद्यांना ड्रग्ज पुरविण्यासाठी अशा पद्धतीचा अवलंब केला जात असल्याची कल्पना तुरूंग प्रशासनालाही आहे...दिल्लीच्या तिहार तुरुंगात असे प्रकार यापूर्वी उघड झाले आहे...त्यामुळे अशा पदार्थांची बारकाईने तपासणी केली जातेय....
 
तुरूंगात कैद्यांना ड्रग्ज पुरवण्यासाठी फक्त फळभाज्यांचा वापर केला जातोय असं नाही... तर आता चक्क पनीरच्या माध्यमातून ही तस्करी केली जातेय.. पनीरच्या मोठ्या तुकडयात खाच पाडून त्यात ड्रग्जची पुडी लपवली जाते... पण या पाश्वभूमीवर आता तिहार तुरूंग-प्रशासनानं असे खाद्य पदार्थ तुरूंगात आणण्यावर बंदी घातलीय...
 
तुरूंगाची सुरक्षा भेदून फक्त ड्रग्ज आणि नोटा पाठवल्या जातात असं नाही .. तर गुप्त पद्धतीने शस्त्र आणि मोबाईल फोन तुरूंगात पोहचवण्याचा कैद्यांनी वारंवारं प्रयत्न केल्याच उघड झालयं.. कैद्यांकडून तुरूंगात करण्यात येणाया या तस्करीला आळा घालण्यासाठी तुरूंग प्रशासनाला कठोर पाऊल उचलणं आवश्यक आहे.
 
 
व्हि़डिओ  पाहा...
 

 

 

 

First Published: Monday, June 4, 2012, 22:32


comments powered by Disqus