Last Updated: Wednesday, June 6, 2012, 00:01
www.24taas.com पृथ्वीपासून १५ कोटी किलोमीटर दूर अंतरावर, १५ कोटी डिग्री सेल्सियस तापमान... सूर्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच कोणतीही वस्तू जळून राख होईल... पण, इतकं भयंकर तापमान असलं तरी या ब्रम्हांडात आणखी कोणी तरी आहे जो पृथ्वीच्या तुलनेत सूर्याच्या कितीतरी पट जवळ आहे. शतकातून एकदाच तो पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध उभा ठाकतो आणि थेट सूर्याशी सामना करतो... शतकातील सर्वात सुंदर दृष्यबुधवारी सकाळी सूर्य आणि शुक्र हे आमने- सामने येणार आहेत. पृथ्वी, शुक्र आणि सूर्य हे सरळ एका रेषेत येणार आहेत. पृथ्वी आणि सूर्य यांच्या बरोबरमध्ये शुक्र असणार आहे. हा अनोखा नजारा शतकातून एकदाच दिसणार आहे. तब्बल सात तासापर्यत सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये शूक्र असणार आहे. सूर्याशी सामना करण्याची तयारी शुक्राने केली आहे. सहा जूनच्या सकाळी आकाशातील हा अदभुत नजारा तुम्हाला-आम्हाला पाहाता येणार आहे. सूर्य आणि शूक्र यांच्या भेटीचं चित्र ज्याला ‘व्हिनस ट्रांजिट’ असं म्हणतात असं दृश्य ६ जूननंतर तब्बल ११५ वर्षांनी दिसणार आहे.

यापूर्वीही अशी घटना घडली आहे. २००४ मध्ये शुक्राने सूर्याचा सामना केला होता. त्यावेळी हे दृष्य पाहायला मिळालं होतं. आग ओकणाऱ्या सूर्यासमोर शुक्र एखाद्या काळ्या डागाप्रामाणे भासत होता. जवळपास सहा तास सगळ्या जगातील वैज्ञानिकांनी सूर्य आणि शुक्र यांच्या या भेटीचा अनोखा नजरा याच देही याच डोळा अनुवला होता. या घटनेचा अभ्यास केल्यानंतर अंतराळातील आणखी काही घटनांची माहिती मिळविण्यात वैज्ञानिकांना यश आलंय. त्यामुळेच यावर्षीही हे सात तास खगोल शास्त्रज्ञांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत.
पृथ्वीप्रमाणेच शुक्रही सूर्याभोवती फिरत असतो. पण, पृथ्वीच्या तुलनेत तो सूर्याच्या खूपच जवळ आहे. बुधवारी सूर्याला प्रदक्षिणा घालत असतानाच शुक्र अशा ठिकाणी येऊन पोहचेल जिथं शुक्र, पृथ्वी आणि सूर्य हे तिन्ही ग्रह सरळ एका रेषेत असतील. तसेच शुक्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध असणार आहे. त्यामुळे भारतात जेव्हा सुर्योदय होईल तेव्हा सूर्यामध्ये एक लहानसा काळा डाग पहायला मिळेल. तो डाग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो शुक्र ग्रह असणार आहे. पृथ्वी, शुक्र आणि सूर्य हे तिन्ही ग्रह एका रेषेत येण्याची ही प्रक्रिया असणार आहे. सूर्यग्रहणात चंद्र जवळ आल्यामुळे पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश अडवला जातो. त्यामुळे दिवसा रात्र झाल्याचा भास होतो. मात्र, यावेळी चंद्रा ऐवजी शुक्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणार आहे.
घाबरू नका; वैज्ञानिकांचं आवाहनसुर्यावर शुक्राचा डाग दिसणार म्हटल्यावर अंधश्रद्धाळूंच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही. पण, यामध्ये घाबरण्यासारखं काहीही नसल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलंय. कारण ही ब्रम्हांडातील एक अदभूत घटना असून तिला विज्ञानाच्या दृष्टीकोणातून पाहण्याची आवश्यकता असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या घटनेतूनच सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर मोजण्यात खगोलतज्ज्ञांना यश आलंय. सर्वात आधी केपलरने १६३१ आणि १६३९ मध्ये व्हिनस ट्रांझीटविषयी अंदाज व्यक्त केला होता. ६० वर्षांच्या कालावधीत दोन वेळा शुक्र सूर्याजवळून गेल्याचं केपलरने म्हटलं होतं. २४ नोव्हेंबर १६३९ रोजी पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधोमध शुक्र आला होता. ही घटना जेरेमिया हॉरेक आणि विलियम क्राँब्ट्री या ब्रिटनमधील दोन वैज्ञानिकांनी नोंदवली होती. १७६१मध्ये, शुक्र हा पृथ्वीपासून जवळपास ५९४ लाख किलो मीटर अंतरावर असल्याचं खगोल शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा शोधून काढलं. या शोधादरम्यान संशोधकांनी शुक्र आणि सूर्य यांच्यातल्या पुढचं ट्रांझीट १७६९मध्ये होणार असल्याचे ठोस पुरावेही यावेळी शास्त्रज्ञांनी दिले होते. यावेळी शुक्राभोवतीचं वातावरण, त्याच्यावरची जमीन आणि तापमानाविषयीची माहिती वैज्ञानिकांनी गोळा केली. या संशोधनाच्या आधारेच एस्ट्रॉनॉमिकल यूनिटचा शोध लागला. त्यामुळेच पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर निश्चित करता आलं. यानंतर व्हीनस ट्रांझीटचा हा अनोखा नजारा अनुभवायला मिळाला १८७४ आणि १८८२मध्ये... हा नजारा पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी दोन दशकं तयारी केली होती. १८७४ मध्ये एका बेटावर खास दुर्बिन बसविण्यात आली होती. त्या बेटावरुन वैज्ञानिकांनी व्हिनस ट्रांझिटच्या प्रत्येक भागाचा वेगवेगळ्या अंतरावरुन अभ्यास केला. व्हिनस ट्रान्झीटचं ते दृष्य बघितल्यानंतर तसेच त्याचा अभ्यास केल्यानंतर वैज्ञानिकांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आणि ती म्हणजे एखादा ग्रह जेव्हा ताऱ्यासमोरुन जातो तेव्हा दूर अंतरावरुन तो एखाद्या डागाप्रमाणे भासतो...
अभ्यासकांसाठी महत्त्वाचा क्षणयाच सिद्धांताच्या आधारे आजही लाखो- कोटी प्रकाशवर्ष दूर अंतरावरच्या ग्रहांचा शोध घेतला जातोय. तसेच कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे, याचा अंदाज बांधणंही याच ट्रांझिटमुळे शक्य होणार आहे. ब्रम्हांडाच्या अनेक जटील रहस्यांचा उलगडा होऊ शकतो, सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराचा अंदाज घेता येऊ शकतो.

विज्ञानात केवळ अंदाज बांधून चालत नाही आणि म्हणूनच १९६६ साली शुक्राच्या अभ्यासासाठी मानवनिर्मित ‘वेरना-३’ हा रोबो पाठविण्यात आला होता. शुक्राच्या अतिउच्च तापमानापुढे ‘वेरना-३’ निकामी ठरला. मात्र, दुस-या दिवसापासून ‘मॅरिनेर’ नावाच्या उपग्रहावरून शुक्रासंबंधीची माहिती मिळू लागली. खगोल शास्त्रज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा शुक्राचं तापमान अधिक असल्याचं उघड झालंय. या तेजस्वी ग्रहाचं तापमान ४६० सेल्सिअस डिग्री इतकं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एवढं जास्त तापमान असूनही शुक्राभोवती वायूमंडळ आहे. ‘वेरना मिशन’दरम्यान शुक्रासंबंधी महत्त्वाची माहिती मिळवल्यानंतर मानव आता शुक्रावर पाऊल ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. शुक्राबद्दल बरीच माहिती अद्याप गुलदस्त्यातचं आहे. ही रहस्यमय माहिती गोळा करण्यासाठी वैज्ञानिक सज्ज झालेत. २०१४ मध्ये युरोपीयन स्पेस एजन्सी बुध ग्रहाकडे एक विशेष मिशन पाठविणार आहे. या मिशनदरम्यान ते शुक्राच्या अगदी जवळून जाणार असून शुक्रासंबंधीची महत्त्वाची माहिती गोळा केली जाणार आहे. याशिवाय शुक्राचा अभ्यास करण्यासाठी नासाकडून एका विशिष्ट रोबोची निर्मिती केली जात आहे. हा रोबो शुक्राच्या भूपृष्ठावरचा तसेच वायूमंडळचा अभ्यास करणार आहे. ‘व्हिनस इन एक्सप्लोरर’ नावाचं मिशन तयार करण्यात आलं असून दोन रोबो रॅकेटच्या साहाय्याने शुक्राच्या पृष्ठभागावर पाठविण्यात येणार आहेत. दोन रोबोपैकी एक रोबो रॅकेटपासून वेगळा झाल्यानंतर तो शुक्राच्या अत्यंत गरम वायुमंडळात प्रवेश करून आणि तिथल्या वातावरणाची माहिती गोळी करेल. शुक्रच्या वातावरणात कोणकोणते घटक आहेत, याची तपासणी त्या रोबोद्वारे केली जाईल. त्यानंतर आणखी एक एक्सप्लोरर रोबो धाडण्यात येईल. हा रोबो पॅराशूटच्या माध्यमातून शुक्राच्या गरम वातावरणात उतरविला जाईल. त्यासाठी विशिष्ट प्रकारची स्टर्लिंग कुलिंग प्रणाली तयार केली जात आहे. त्या प्रणालीमुळे ५०० डिग्री पर्यंतचं गरम तापमान सहन केलं जाऊ शकतं. तसेच रोबोमध्य़े असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरनांचं संरक्षण करता येईल. शुक्रावर रोबो पाठवून त्यावरच्या वातावरणाचा अभ्यास करण्याचा वैज्ञानिकांचा मानस आहे.
देशभरात उत्सुकता...शुक्र आणि सूर्य यांच्यातील ही अनोखी भेट पाहाण्यासाठी जगभरातील खगोल शास्त्रज्ञ आणि खगोलप्रेमींनी तयारी केलीय. खगोलशस्त्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही दिल्लीपासून मुंबईपर्यंत विशेष व्यवस्था करण्यात आलीय. तसंच दिल्लीच्या नेहरु तारामंडल केंद्रात खास यासाठी डार्करुम बनवण्यात आलीय. तिथं असलेल्या खास टेलिस्कोपवरुन इतरांनाही हा नजारा पाहता येईल. पुर्वोत्तर राज्यातील नागरिकांना हे सर्वप्रथम पाहता येईल. गुवाहाटीमध्ये सकाळी ४.३० वाजता हे दृष्य दिसणार आहे. सुर्योदयानंतर सुरुवातीचे १० ते १५ मिनिटांपर्यंत दुर्बिनीशिवाय आकाशातील हा अनोखा सोहळा अनुभवता येणार आहे. पण, दुर्बिनीशिवाय हे दृष्य पहाताना काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सुर्योदयानंतर काही वेळातच सूर्याच्या किरणांची तीव्रता वाढत जाते. त्यामुळे सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढल्यानंतर ते दृष्य पाहण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या किंवा विज्ञान शिक्षकांच्या मदतीने पीनहोल कॅमेरा तयार करुन एका साध्या कागदांवर सुर्यावरची शुक्रसावली आपण पाहू शकतो.
.
First Published: Wednesday, June 6, 2012, 00:01