कुष्ठधाम की मृत्यूधाम ? - Marathi News 24taas.com

कुष्ठधाम की मृत्यूधाम ?

www.24taas.com, मुंबई
 
भिक्षेका-यांची भिक मागण्याची वृत्ती नाहीसी व्हावी म्हणून भिक्षेकरी गृह उभारण्यात आलेत...पण सोलापूर जिल्ह्यातील केडगावचं कुष्ठधाम  जणू नरक बनलंय़...पुढचा आर्धातास आम्ही त्या  कुष्ठधाममधील  अनेक धक्कादाय घटनांचा तपशीलवर खुलासा प्राईम वॉचमध्ये ...कुष्ठधाम की मृत्यूधाम ?
 
सोलापूहर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात केडगावचं कुष्ठधाम हे पंचक्रोशीत सर्वांच्या परिचयाचं आहे...भिक्षेकरी सुधारावेत म्हणून इथं भिक्षेक-यांना ठेवलं जातं....पण प्रत्यक्षात इथं जे काही सुरु आहे ते अंगाचा थरकाप उडवणार असं आहे...आमच्या स्टिंग ऑपरेशनमुळे या कुष्ठधाममधलं सत्य जगासमोर आले आहे.
 
हे आहे सोलापूर जिल्ह्यातील  केडगावचं शासकीय कुष्ठधाम...राज्य सरकराने मोठ्या उदात्त हेतून 1964साली हे कुष्ठधाम उभारलं..पण इथं  त्या उदात्त हेतूलाच मुठमाती देण्याचा प्रयत्न केला जात आहे....सरकारी अनास्था आणि अधिकारी - कर्मचा-यांच्या मनमानीमुळे हे कुष्ठधाम मृत्यूधाम बनण्याच्या मार्गावर आहे...आमच्या छुप्या कॅमे-याने इथलं भीषण वास्तव कैद केले आहे.
 
 अंगावर काटा आणणारं  आहे...
 केडगावच्या कुष्ठधामची अवस्था जनावरांच्या गोठ्यालाही लाजवेल अशी आहे...अस्वच्छतेचं साम्राज्य तिथं पसरलं होतं....प्रसाधनगृहाची अवस्थातर अत्यंत वाईट होती...बाहेरची परिस्थितीपाहून आतमधली स्थिती काय असेल याचा अंदाज आम्हाला आला होता...आम्ही आतमध्ये पोहोचलो तेव्हा अंधा-या खोलीत भिक्षेकरी आशाळभूत नजरेनं आमच्याकडं पाहात होते....भूकनं जणू त्यांच्या शरिराचा ताबा घेतला होता...केळी घेण्यासाठी आधाशा सारखे हात प्रत्येकजण पुढे करत होता...ते दृष्य ह्रदय पिळवटून टाकणारं होतं...आम्ही दुस-या खोलीत प्रवेश केला तेव्हा तिथही चित्र काही वेगळं नव्हतं..क्षीण झालेल्या शरिराला कपड्यांचंही ओझं वाटावं अशी काहींची अवस्था होती..... काहींच्या कपड्यावर  मळाचे थर साचले होते...तर काही अर्धनग्न अवस्थेत बसले होते..आमच्या प्रतिनिधीने एका भिक्षेक-याशी संवाद साधला तेव्हा एकएक धक्कादाय माहिती बाहेर येत गेली....
 
 
इथं भिक्षेक-यांना कपड्याचा एकच जोड दिला जातोय....सरकारकडून खाण्यापिण्याच्या वस्तू कागदोपत्री उपलब्ध करुन दिल्या जात असल्या तरी त्या भिक्षेक-यांपर्यंत पोहोचत नसल्याचं एका भिक्षेक-याने सांगितलं. भिक्षेकरी आजारी पडल्यास त्यांच्या उपचारासाठी दवाखाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलीय...पण त्याचीही अवस्था भिक्षेकरीगृहपेक्षा काही वेगळी नाही. भिक्षेक-यांच्या मनोरंजनासाठी टीव्हीची व्यवस्था करण्यात आलीय...पण गेल्या अनेक महिन्यांपासून इथला टीव्ही बंद आहे. भिक्षेक-यांसाठी सरकार वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करतंय़...पण ते  त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचं  आमच्या छुप्या कॅमे-यात कैद झालंय....भिक्षेकरीगृहातली भिक्षेक-यांची अवस्था कत्तलखान्यातील जनावरांपेक्षाही भीषण होती...
 
केडगावच्या कुष्ठधाममध्ये भिक्षेक-यांची काय अवस्था आहे हे आताच आपण बघीतलंय..खरं तर या भिक्षक-यांसाठी 16 अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलीय..पण इथला कारभार एक चतुर्थश्रेणी कर्मचा-याच्या हातात  आहे..
 
केडगावच्या या कुष्ठधाममधील भिक्षेक-यांची अवस्था अत्यंत बिकट बनलीय..आणि त्याला कारणीभूत आहेत कुष्ठधामचे अधिकारी आणि कर्मचारी. तीनशे भिक्षेक-यांची क्षमता असलेल्या या कुष्ठधाममध्ये आज 121 भिक्षेकरी आहेत...या केंद्रासाठी   25 अधिकारी आणि कर्मचा-यांची सरकारने नियुक्ती केली असून त्यापैकी 16 कार्यरत आहेत.त्यामध्ये डॉक्टर आणि परिचारीकांचाही समावेश आहे...ही नियुक्ती कागदोपत्री असली तरी प्रत्यक्षात चित्र काही वेगळंच आहे....आद या कुष्ठधाममध्ये 121 भिक्षेकरी आहेत...मात्र त्या सर्वांची देखभाल करतोय एक चतुर्थश्रेणी बॅरॅक बॉय....इथला सगळा कारभार मोहम्मद सिद्धीकी बालेच्या देखरेखीखाली चालवला जात आहे.
 
भिक्षेक-यांना जेवण कधी आणि किती द्यायचं याचा निर्णयही तोच घेतोय. खऱंतर भिक्षेक-यांसाठी सरकारकडून सकस आहार पुरवला जातो...पण तरीही लोकांच्या लग्नकार्यात उरलेलं अन्न भिक्षेक-यांच्या ताटात वाढलं जातंय..तुमचा विश्वास बसत नसेल तर कुष्ठधाममधील हा मोहम्मदने धक्कादायक बाब सांगितली, ती अशी बाहेरचं अन्न चालतं..? इतर समाजातील लग्नात जेवण शिल्लक राहतं ते आम्हाला आणून देतात.
 
सरकारकडून खाण्यापिण्याची व्यवस्था केली असतांनाही  भिक्षेक-यांना दानाच्या अन्नावर जगावं लागतंय. या कुष्ठधामवर गेल्यावर्षभरात  79 लाख 81 हजार रुपये खर्च करण्यात आलाय...कुष्ठधाममधील 121 भिक्षेक-यांचा हा आकडा गृहित जरी धरला तरी एका भिक्षेक-यावर वर्षाला  साधारणत: 65हजार 958 रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.  पण इथल्या भिक्षेक-यांची अवस्था बघीतल्यानंतर अनेक खरंच हा खर्च केला गेला असेल का असा  प्रश्न उपस्थित  झाल्याशिवाय राहात नाही. आणि जर हा खर्च केला गेला असेल तर मग इथल्या  भिक्षेक-यांची एव्हडी दयनीय अवस्था का झालीय?  त्यांच्या या अवस्थेला   जबाबदार कोण  ?या  भिक्षेक-यांची उपासमार का होतेय  ?
 
भिक्षेक-यांवर अर्धनग्न राहण्याची वेळ 
प्रत्येक भिक्षेक-याला कपड्यांचे  दोन जोड दिले जात असतांना काही भिक्षेक-यांवर अर्धनग्न राहण्याची वेळ का आली ? आजारीपडल्यानंतर  भिक्षेक-यांना गरजेची औषधे का दिली जात नाहीत   ? असे अनेक प्रश्न आजुनही अनुत्तरीतच आहेत..तसेच सरकारचा दावा किती फोल आहे हेच यावरून स्पष्ट होतंय..
 
'आई जेवू घालीना,बाप भिक मागू देईना' आणि  अशी मराठीत म्हण आहे पण मायबाप सरकारने तर या निराधार भिक्षेक-यांच्या  जीवावर उठलंय... आणि याला जबाबादार आहेत मढ्याच्या टाळूवरचे लोणी खायलाही चाटावलेले निगरगट्ट अधिकारी आणि कर्मचारी....
 
 कुष्ठधाम भिक्षेकरी गृहात (सोलापूर) पाच वर्षात मृत्यू पावलेल्या भिक्षेक-यांची संख्या 150 आहे.  हे सत्य आहे...करमाळा तालुक्यातील केडगावच्या या कुष्ठधाममध्ये गेल्या पाच वर्षात 150जणांचा जीव गेलाय....आजही या केंद्रात 121 भिक्षेकरी आहे.....भिक्षेक-यांची भिकमागण्याची वृत्ती नाहीसी व्हावी म्हणून पोलिसांकडून भिक्षेक-यांवर कारवाई केली जाते...
 
 ऐकलं कोणता आहार भिक्षेक-यांना दिला जातोय ते?...पण कुष्ठधाममधल्या भिक्षेक-यांची अवस्था बघीतल्यानंतर त्यांना रोज हा आहार दिला जात असेल यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का ? कुष्ठधाममधल्या भिक्षेक-यांच्या आंगावर मांस राहिल नाही तसेच त्यांच्या हाडांची काडं झाली आहेत...पण सरकार दरबारी त्यांना सकस आहार दिल्या जात असल्याचा दावा अधिका-याकडून केला जातोय..भिक्षेक-यांच्या देखभालीसाठी अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
कुष्ठधाममध्ये 16 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त असल्याचं जिल्हा महिला व बालकल्याण अधिका-यांनी सांगितलं खरं पण प्रत्यक्षात केवळ एक चतुर्थश्रेणी कर्मचारी हा सगळा कारभार चालवत असल्याचं आमच्या स्टींग ऑपरेशनमुळे उघडकीस आलंय..हा धक्कादायक प्रकार जिल्हा महिला व बालकल्याण अधिका-याच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे सरकारी पठडीतील उत्तर दिले. जिल्हा महिला व बालकल्याण अधिका-यांनी कारवाईचं आश्वासन दिलं असलं तरी दोषींवर खरंच  कठोर कारवाई होणार का हाच खरा प्रश्न आहे.
 
 
व्हिडिओ पाहा...
 

 

 

 
 

First Published: Monday, June 11, 2012, 22:40


comments powered by Disqus