Last Updated: Thursday, June 14, 2012, 23:37
www.24taas.com, मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी मुंबईतील अनेक पब, बार आणि पार्ट्यांवर कारवाई केलीय. त्यांच्या या कारवाईमुळे मुंबईतील पब आणि बार मालकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच रात्रभर पब आणि डिस्कोथेकमध्ये रमणा-या धनदांडग्यांनी ढोबळेंचा पुरता धसका घेतलाय.
गुंडांची यथेच्छ धुलाई करणारा सिंघम तुम्ही रुपेरी पडद्यावर बघितला असेल. पण वास्तवातही असाच एक पोलीस अधिकारी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. कुठेही छापा मारायला तो अधिकारी मागे पुढे पहात नाही. खबर मिळताच तो आपल्या सहकाऱ्यांसबोत घेऊन धडक कारवाई करतो. त्यामुळे अवैध धंदे करणा-यांनी त्याचा चांगलाच धसका घेतला असून त्याचं नाव आहे.
मुंबई पोलीस दलात ढोबळे हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी डान्सबारपासून ते पब आणि श्रीमंतांच्या आलिशान पार्ट्यांवरही छापा कारवाई केलीय. त्यामुळेच चोरीछुपे डन्साबार चालविणा-यांचे धाबे दणाणले असून ढोबळेंच नाव ऐकताच पब आणि डिस्कोथेकमध्ये मदीरेच्या कैफात मस्ती करणा-या धनदांडग्यांची झिंग क्षणात उतरल्याशिवाय राहात नाही. एसीपी ढोबळेंच्या धडाकेबाज कारवाईमुळे मुंबई पोलीस दलात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे...ढोबळेंची कारवाई करण्याची खास पद्धत आहे...पोलीस कारवाईसाठी काठीचा वापर करतात...पण एसीपी ढोबळे कारवाईसाठी हॉकी स्टीकचा वापरतात...एखाद्या ठिकाणी कारवाई केल्यानंतर ते तिथ असलेल्या सर्वांना थेट पोलीस स्टेशन दाखवतात....कुणाचाही निरोप आला तरी ते मागे हाटत नाहीत...आणि त्यांची कारवाई थांबत नाही...
डान्सबार, हुक्का पार्लर आणि पबवाल्यांनी जसा ढोबळेंचा धसका घेतलाय तसचं वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही धास्ती वाटतेय.....मात्र अशा कार्यपद्धतीमुळेच ते अनेक वेळा वादात सापडलेयत.गेल्या वर्षी 11 मार्चला ढोबळे यांनी मुंबई पोलीस दलाच्या समाज सेवा शाखेची सूत्र हाती घेतली आणि त्यानंतर शहरात धाडसत्र सुरु झालं...ढोबळेंनी आज पर्यंत तब्बल 500 पेक्षा जास्त ठिकाणी छापे मारलेत.....आणि या छाप्यात 5000 पेक्षा जास्त जणांवर कारवाई केलीय.. यावरुन ढोबळेंच्या कार्यपद्धतीचा अंदाज तुम्हाला आला असेल...
मुंबईतील समाज सेवा शाखेच्या पथकाने वांद्र्यातील एका हुक्का पार्लरवर छापा मारला होता. या छाप्यात पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचा मुलगा क्षितीजचाही समावेश होता. य़ा हुक्का पार्लरमध्ये हे तरुण-तरुणी हुक्का पित असतांना पोलिसांना आढळून आले होते...
आरोग्यमंत्र्यांनी मात्र आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला होता.दोन महिन्यापूर्वी हुक्का पार्लरवर करण्यात आलेली ही कारवाई एसीपी वसंत ढोबळेंच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. या कारावईनंतर ढोबळेंच्या नावाची बरीच चर्चा सुरु झाली. कारण त्यांनी हुक्का पार्लवर बेधकपणे कारवाई केली होती. मंत्र्यांचा मुलगा छाप्यात सापडला असतानाही त्यांनी कारवाई करण्यात कुचराई केली नाही...हुक्का पार्लर असो की बार ढोबळे थेट कारवाई करायला कचरत नाहीत..
15 एप्रिल रोजी विले पार्ल्यातल्या एका हॉटेलवर त्यांनी अशाच पद्धतीने कारवाई केली होती...या कारवाईत त्यांच्या खास स्टाईलचा अनुभव हॉटले चालकाला आला...साध्या कपड्यात त्यांनी कारवाई केली होती...हॉटेल समोरच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा दावा ढोबळेंनी केला होता. हॉटेल बंद करण्याची वेळ टळून गेल्यानंतरही हॉटेल मालकाने हॉटेल सुरु ठेवल्यामुळे ती कारावाई करण्यात आल्याचं पोलिसांकडून त्यावेळी सांगण्यात आलं होतं..

मुंबईत चोरी छुपे डान्साबार चालविणा-यांवरही ढोबळेंनी धडक कारवाई केलीय..त्यासाठी त्यांनी खब-यांच नेटवर्क तयार केल्याची पोलीस दलात चर्चा आहे...ढोबळेंच्या या कारवाई सत्रामुळे चोरीछुपे डान्सबार चालविणा-यांनी त्यांचा चांगलाच धसका घेतलाय. पण अशा बेधक कारवाईमुळे त्यांच्यावर आरोपही झालेत...
एसीपी ढोबळेंवरील आरोप एसीपी ढोबळेंनी वर्षभरात 500 ठिकाणी छापे मारले असले तरी त्यांची कारवाई करण्याच्या पद्धतीमुळे ढोबळेंवर आरोपही झाले आहेत...एका हॉटेल मालकाने त्यांच्या मारहाणीचाही आरोप केलाय....विशेष म्हणजे ढोबळे यांची कारवाई करण्याची ती खास पद्धतही हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्याचा दावा हॉटेल मालकाने केलाय..
एसीपी वसंत ढोबळे यांनी आपल्या कर्मचा-यांना मारहाण केल्याचा आरोप या हॉटेलच्या मालकाने केला..हॉटेल मालकाच्या म्हणण्यानुसार ढोबळे जेव्हा कारवाईसाठी आले त्यावेळी ते साध्या कपड्यात होते...हॉटेलमधील कर्मचा-यांनी त्यांना न ओळल्यामुळे ढोबळे चिडले आणि त्यांनी कर्मचा-यांना मारहाण केली असा आरोप हॉटेल मालकाने केलाय.. याप्रकरणी हॉटेल मालकाने ढोबळें विरोधात वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडं तक्रार केलीय..
पण हॉटेल चालकांच्या या तक्राराची दखल, ना मुंबई पोलिस आयुक्त अरुप पटनायक यानी दखल घेतली ना गृहमंत्री आर आर पाटील यानी घेतली. याप्रकरणी ढोबळे य़ांचं म्हणणं काही वेगळं आहे...हॉटेलसमोर ग्राहकांनी वाहाने उभी केल्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता.. आणि वांरवार सूचना देऊनही हॉटेल उशिरापर्यंत सुरु असल्यामुळे ती कारवाई करण्यात आल्याचा दावा ढोबळेंनी केलाय...पण असं असले तरी कर्तव्यदक्ष असणारे ढोबळे हॉकी स्टीक का वापरतात आणि मारहाण करुन कायदा का हातात घेतात या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांच्याक़डं नाही..
चोरी छुपे चालणा-या अनेक डान्स बारवर एसीबी ढोबळेंनी कारवाई केलीय. त्यामुळे डान्सबार मालकांनी त्यांची धास्ती घेतलीय पण नुकतेच एका रेस्टॉरंटवर केलेल्या कारवाईमुळे त्यांच्यावर दोन महिलांनी थेट मानहानीचा दावा ठोकलाय..
4 जूनच्या रात्री मुंबईच्या अंधेरी परिसरात समाज सेवा शाखेनं धडक कारावाई केली होती....पण त्या कारावाईमुळे ढोबळे वादाच्या भोव-यात सापडले आहेत... एसीपी वसंत ढोबळेंच्या पथकाने त्या रात्री एका रेस्टॉरंटवर छापा मारला होता....त्या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन महिलांनीच वसंत ढोबळेंवर एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे... 4 जूनच्या रात्री आपण त्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेले असतांना पोलिसांनी आपलं म्हणणं ऐकून न घेता आपल्याला थेट महिला सुधार गृहात धाडलं होतं असं त्या पीडित महिलांचा दावा आहे..या प्रकरणी त्या महिलांनी आता कोर्टात धाव घेतली आहे. त्या दोन महिलांनी केलेल्या आरोपांचं मात्र ढोबळेंनी खंडण केलं असलं तरी या प्रकरणी तक्रारदार महिलांना प्रतिज्ञपत्र सादर कण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे..रेस्टॉरंटवर करण्यात आलेल्या कारावाई मुळे ढोबळे अडचणीत आले आहेत...
First Published: Thursday, June 14, 2012, 23:37