Last Updated: Saturday, June 23, 2012, 08:45
www.24taas.com, मुंबई मंत्रालयाच्या आगीत सुरक्षेचे दावे भस्मसात26 /11 मधून काहीच धडा घेतला नाही ?नेमकं काय चुकलं ? जबाबदार कोण ?महापालिकेतल्या सुरक्षेचं ऑडिटतुमच्या शहरातल्या सरकारी इमारती आहेत का सुरक्षित ? सुरक्षेचे धिंडवडे 
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीतनंतर राज्यातल्या इतर सरकारी इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणांची काय अवस्था आहे? याचं एक विशेष फायर ऑडिट झी 24 तासनं केलं. मुंबई पुणे, नाशिक, कोल्हापूर औरंगाबाद या पाच महापालिकंमध्ये जाऊन आमच्या रिपोर्टसनी तिथल्या यंत्रणांचा आढावा घेतला. तेंव्हा अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलं. ही आग लागली ती केवळ शॉर्ट सर्कीटमुळे आणि फोफावलेली गेली ती नियोजनाच्या अभावामुळे... आग असो वा भुकंप.. कुठल्याच आपत्कालीन गोष्टींसाठीचा प्लॅन बी तयार नसणं ही बाब या निमित्तानं उघड झालीय.. आणि समोर आली ती लालफितीततील हतबलता. मंत्रालयाला लागलेली आग शॉटसर्किटमुळं लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याआधीही आपल्याकडे अनेक ठिकाणी लागलेल्या आगी शॉटसर्किटमुळं लागल्या होत्या. त्यामुळंच प्रत्येक इमारतीमधल्या वीज वहन व्यवस्थेची वेळोवेळी तपासणी होणं गरजेचं आहे. जुने झालेले वायरींग बोर्ड्स याकडं लक्ष देणं गरजेचं आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक इमारतीचा आप्तगकालीन आराखडा तयार असायला हवा. त्यामध्ये आपत्ती येऊ नये आणि आलीच तर काय खबरदारी घ्यायला हवी याचा कृती आराखडा तयार असायला पाहिजे. आगीवर नियंत्रण आणण्यात आलेलं अपयश आणि सुरक्षा यंत्रणेचा उडालेला बोजवारा हे पाहता असा कृती आराखडा मंत्रालयात तयार नव्हता असंच म्हणावं लागेल. राज्याचा गाडा ज्या ठिकाणाहून हाकला जातो त्या मंत्रालयाच्या इमारतीला लागलेली आग विझवता विझवता यंत्रणेच्या नाकीनऊ आले. मंत्रालच्या छज्जावर पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र तिथून प्रत्येक मजल्यावर वेगानं पाणी आणण्याची यंत्रणा नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्रालयातले वेगवेगळे हॉल आणि अन्य खोल्यांचे दरवाजे आत उघडणार आहेत. त्यामुळं बाहेर पडताना लोकांना त्रास होतो. आणि चेंगराचेंगरीनं हाणी होण्याची शक्यता असते. दरवाजे बाहेर उघडणारे असणं गरजेचं आहे. आग प्रतिबंधक साधनांची वेळोवळी चाचणी घेणं गरजेचं आहे. त्याच्याकडं दुर्लक्ष करता कामा नये. तहान लागली की विहीर खोदायची असा प्रकार आपल्याकडं नेहमीच पहायला मिळतो. 26/11 चा हल्ला झाला. त्यानंतर काही दिवस रेल्वे स्टेशन, महत्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय योजले गेले. मात्र थोड्या दिवसातच पहिले पाडे पंचावन्न याप्रमाणे त्याकडं सुरक्षेकडं दुर्लक्ष झालं.

तसा प्रकार याबाबतीत तरी होऊ नये अशी अपेक्षा आहे. आग हि आगच असते..त्याला क्षुल्लक समजण्याच्या नादात ती भडकली गेली आणि अग्नीतांडव पेटलं.. एवढी सुसज्ज यंत्रणा असतानाही आग भडकत गेली आणि चार मजले आगीत होरपळले गेले.. आणि याला सर्वात महत्वाचे कारण ठरलं तो मंत्रालयाच्या प्रशासनाचा सुरक्षेबद्दलचा निष्काळजीपणा महाराष्ट्र राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून हाकला जातो ती ही अवघ्या महाराष्ट्राची मानबिंदू समजली जाणारी वास्तू.. मंत्रालय.. याच मंत्रालयाच्या चार मजल्यांना 21 जूनला दुपारी लागलेली आग 22 जूनच्या सकाळी पर्य़ंत धुमसत होती.. काही क्षणांत लागलेल्या या आगीने मंत्रालयाचे चार मजले आपल्या भक्ष्यस्थानी घेतले. फाइल्स, कागदपत्रांचा गठ्ठा आणि जून्या लाकडी फर्निचर यामुळे आगीचा भडका उडाला होता. आग आटोक्यात येत नव्हती आणि त्याहीपेक्षा म्हणजे नेमकी ही आग विझवावी कशी हे नेमक कुणालाच समजत नव्हती.. 26/11 चा धडा घेतलेल्या प्रशाननाचे डोळे पुरते उघडले नाही हेच मंत्रालयाच्या अग्निकांडानंतर पुन्हा उघड झालय.
ही आग एवढी भिषण होती की, फायरब्रिगेडने शहर, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईमधून 21 फायर इंजिन, 12 वॉटर टॅंकर आणि चार स्नॉर्केल याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न होत होता.. संपुर्ण यंत्रणा सज्ज असतानाही आग विझली ती, स्वताची राक्षसी भुक संपल्यानंतर.. आणि म्हणूनच राज्याच्या सर्वोच्च अशा जबाबदार कार्यालयाला आग लागते आणि सारेच केवळ हतबल पणे पाहत बसले होते.. आगीचा भडका उडाल्यानंतर ही हतबलता मंत्रीमहोदयांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवली. आगीचा भडका उडाल्यानंतर आता प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवल जातय.. मंत्रालयात आग भडकण्यासाठी पुढील गोष्टींमधला गलथानपणा जास्त कारणीभूत ठरला.
1) मंत्रालयाच्या इमारतीचे फायर ऑडीटच झालं नव्हत. 2) फायर ब्रिगेडकडे मंत्रालयाचा नकाशाच नव्हता.. 3) मोकळ्या जांगामध्ये फाईल्सचा अवास्तव साठा करण्यात आला होता.. 4) लाकडी कपाटांनी ठिकठिकाणी अडचणी निर्माण झाल्या होत्या. 5)काही केबिन्स शेजारील जागेचे छोट्या कॅन्टीन्समध्ये रुपातंर करण्यात आल होतं. 6) केंद्रिय उद् घोषणा यंत्रणा नादुरस्त असल्याने सर्वांना वेळीच आगीची सूचना मिळाली नाही.. 
केवळ आगच नाही तर कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थीती आल्यावर काय करावे याच भान नसल्याने आणिबाणीची परिस्थीती निर्माण झाली.. एवढ्या मोठ्या मंत्रालयात आग आटोक्यात आणण्यासाठी कुठलीच सक्षम यंत्रणा नसल्याचा थेट आरोप 9/11 हल्यावेळी कार्यरत असणारे अग्निशमन दलाचे ज्येष्ठ अधिकारी सुरेश देशमुख यांनी केलाय. चुकीच्या पद्धतीचे नियोजन यामुळेच ही आग जास्त भ़डकत गेल्याचा ठपका प्रशासनावर ठेवण्यात आलाय.. त्यातच मंत्रालयावर घिरट्या मारणा-या हॅलिकॉप्टरच्या पंख्याच्या हवेमुळेही आग भडकतच गेली.. या आणि अशा अनेक गोष्टीतून सरकारच्या कारभाराची लकतर वेशीवर टांगली गेलीय.
First Published: Saturday, June 23, 2012, 08:45