'झी 24 तास'चे फायर ऑडीट - Marathi News 24taas.com

'झी 24 तास'चे फायर ऑडीट

www.24taas.com, मुंबई
 
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या महानगरपालिकांच्या इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा किती सक्षम आहेत, हे पाहण्यासाठी झी 24 तासनं एक विशेष फायर ऑडिट केलं.
 
मुंबई, पुणे, नाशिक कोल्हापूर आणि औरंगाबादमध्ये अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलं. आमच्या बातमीनंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत यावर तातडीने उपाययोजना करणार असल्याचं सांगण्यात आलंय. एक विशेष रिपोर्ट.
 
व्हीओ 1- मंत्रालयात लागलेल्या आगीनंतर मुंबई महापालिकेने सुरक्षेबाबत काय पावलं उचललीयेत याचं ऑडीच झी 24 तासने केलं होतं. याबाबत महापौर सुनील प्रभू यांनी तातडीने दखल घेत पालिकेच्या सर्वच कार्यालयांचं फायर ऑडिट करणार असल्याचं सांगितलंय. तर पालिका कार्यालयातील भंगार सामानही इतरत्र हलविणार असल्याचं आश्वासन महापौरांनी दिली.
 
नाशिकमध्येही महापालिकेचं फायर ऑडिट झी चोवीस तासने सादर केल्यानंतर पालिका प्रशासनही खडबडून जागं झालं. फायर ब्रिगेडसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री घेण्याबरोबरच सध्याच्या फायर सिस्टीमची फेरतपासणी करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी दिलेत. सर्व डेटा संगणकीकृत करून आग प्रतिबंधात्मक स्ट्रॉंग रूम तयार करण्यासाठी आराखडा सादर करण्याचे आदेशही देण्यात आलेत.
 
कोल्हापूरमध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अशा महत्वाच्या इमारतींचं फायर ऑडिट झालंच नसल्याची माहिती पुढे आलीये. झी 24 तासच्या बातमीनंतर कोल्हापूर शहरातील या शासकीय इमारतींचं फायर ऑडिट झालंच नसल्याची कबुली प्रभारी जिल्हाधिका-यांनी दिली.
 
औरंगाबाद महापालिकेत फायर ऑडिट झालंच नसल्याची माहिती झी 24 तासने समोर आणल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. महापौर अनिता घोडेले यांनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतलीये. पालिकेतल्या सर्वच विभागात आग विझवण्यासाठीची यंत्रणा तातडीने बसवण्याचे आदेश महापौरांनी दिलेत. झी 24 तासच्या फायर ऑडिच्या मोहिमेनंतर प्रशासनानं पावलं उचलायला सुरवात केली. अर्थात याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे आणि वेगवानपणे होते याचाही  पाठपुरावा घेतला जाणार आहे.
 
व्हिडिओ पाहा..

First Published: Tuesday, June 26, 2012, 07:53


comments powered by Disqus