देव सापडला! - Marathi News 24taas.com

देव सापडला!

www.24taas.com 
 
ब्रम्हांड… अनंत काळापूर्वी निर्माण झालेल्या या ब्रम्हांडाचा अनेक वर्षापासून शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. नेमकी कशी झालीय याची निर्मिती, हा प्रश्न प्रत्येकाला सतावत असतो. अध्यात्म आणि विज्ञान अशा दोन्ही पातळीवर कुतूहल असणाऱ्या विश्वाची निर्मितीवर वैज्ञानिकांनी शिक्कामोर्तब केलंय आणि याच महाप्रयोगातून समोर येतंय ते देवाचं अस्तित्व....
 
‘सर्न’ संस्थेच्या उघडकीस आलेल्या एका व्हिडिओमध्ये ईश्वरी कण सापडल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सर्नच्या शास्त्रज्ञांनी जिनिव्हामध्ये पत्रकार परिषद घेऊन ईश्वरी कण सापडल्यावर शिक्कामोर्तब केलंय. ‘हिग्स बोसोन’ असं त्या कणाचं शास्त्रीय नाव आहे. तब्बल 40 वर्षांच्या अथक संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी सृष्टीच्या निर्मितीचं कोडं सोडवलयं. हिग्स बोसोन म्हणजेच ईश्वरी कणांपासूनच ही सृष्टी तयार झाली असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलयं. सूर्य, चंद्र, तारे सारं ब्रम्हांडाचा मुलभूत घटक म्हणजे हिग्स बोसोनचं आहेत असा ठाम विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय. एव्हढचं काय तर तुम्ही-आम्हीदेखील या ईश्वरी कणांचीच निर्मिती असल्याचं जिनिव्हामधल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय. 40 वर्ष हे संशोधन सुरू होतं आणि तब्बल 111 देशांचे शास्त्रज्ञ या संशोधनासाठी दिवस-रात्र काम करत होते. बिग बँग थेअरीवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये अनेक भारतीय शास्त्रज्ञांचा देखील समावेश होता.
 
काय आहेत 'हिग्स बोसोन'ची वैशिष्ट्यं
 
केसाच्या परिघाइतक्या सूक्ष्म आकाराचा प्रॉटॉनचा झोत प्रकाशाच्या वेगानं लार्ज हॅड्रन कोलायडरच्या निर्वात पोकळीत सोडला गेला. ‘सर्न’मधल्या प्रयोगशाळेतील कॉम्प्युटरवर दोन पांढरे स्पॉट दिसले आणि तिथल्या तमाम शास्त्रज्ञांनी ‘दॅटस इट’चा चित्कार केला. जगभरातल्या आठ हजार शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून अखेर इश्वरीय कणांचा शोध जगासमोर आलाय. अनेक वर्षांची मेहनत आणि अब्जावधी रुपये खर्चून होत असलेल्या संशोधनाच्या रहस्यांचा आता उलगडा होतोय. ब्रम्हांडाच्या निर्मितीवेळी नेमकी परिस्थिती कशी होती? नेमक्या कोणत्या अणूपासून बनलं गेलं हे ब्रम्हांड? याच शोधात गुंतलेल्या शास्त्रज्ञांचा महाप्रयोग आता पूर्ण झालाय. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पीटर हिग्ज, अल्बर्ट आईनस्टाईन आणि भारतीय वैज्ञानिक संत्येद्रज्ञान बोस यांच्या सिद्धांताला मुर्तरूप देण्यासाठी जगभरातल्या शास्त्रज्ञांनी इश्वरीय कणांची सत्यता शोधण्याचा विडा उचलला होता. सर्नमध्ये चाललेल्या या महाप्रयोगाची ४ जुलैला  परिणीती जगासमोर येणार होती,  पण हे घोषित होण्यापूर्वीच सर्नमधून एक व्हीडीओ लिक झाला आणि याच व्हीडीओत गॉड पार्टीकलशी सदृष्य कणांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय.
 
दोन इलेक्ट्रॉनला एकमेकांसोबत प्रकाशवेगानं आदळवण्यात आलं. या प्रयोगाची वारंवार सत्यता तपासली गेली. या प्रयोगात भारतासह जगभरातल्या ८ हजार वैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता. सर्नच्या प्रयोग शाळेत करण्यात आलेला हा महाप्रयोग जमिनीखाली करण्यात आला. वैज्ञानिकांनी या परमाणू महाप्रयोगासाठी प्रोटोनच्या टक्करीवेळी  झालेल्या प्रत्येक बदलाची नोंद ठेवण्यासाठी जगभरात लाखो कॉम्प्युटरचे जाळे निर्माण केले होते आणि याच कॉम्प्युटर ग्रीडमध्ये मुंबईतील भाभा रिसर्च सेंटरचाही समावेश करण्यात आला आणि या स्फोटाच्या निर्मिती प्रक्रियेच्या वेळेच्या बदलाची क्षणक्षणाची नोंदही करण्यात येतं होती आणि यातूनच उलगडलं गेलंय ब्रम्हा़डांचे रहस्य...
 
विज्ञानाने शोधला देव ! 
सृष्टीनिर्मीतीचे रहस्य उलगडण्यासाठी  केलेल्या या महाप्रयोगात उच्च ऊर्जाशक्तीचे प्रोटॉन लार्ज हार्डन कोलायडरमध्ये परस्परांना धडकावून जे अंश मिळवले त्यालाच ‘इश्वरीय कण’ असं म्हटलं जातंय. ‘युरोपियन ऑर्गनायझेन फॉर न्युक्लिअर रिसर्च’ म्हणजेच सर्नने विविध देशांच्या मदतीने स्वीस फ्रेंच जमिनीवर हा महाप्रयोग करण्यात आलाय. यातून जे काही हाती लागलंय ते सूक्ष्म असलं तरी त्याचे भविष्यात अनेक दूरगामी परिणाम दिसणार आहेत.
 
एक महाविस्फोट आणि या महाविस्फोटातून निर्माण झालेल्या शेकडो आकाशगंगा... पृथ्वी,चंद्र आणि सूर्य या तिघांभोवती गुरफटलेले आपण सारे... पण, आता मात्र सृष्टीच्या जन्मदात्यापर्यंत पोहोचण्याचं संशोधन वैज्ञानिकांनी शोधून काढलंय आणि वैज्ञानिक याच रहस्यावरुन आता लवकरच पडदा उठवणार आहेत. ज्यामुळे या जगाचा अवघा चेहरामोहरच बदलणार आहे. वैज्ञानिकांनी जर देवाचा शोध लावला असेल तर उर्जेचे महास्त्रोत वैज्ञानिकांच्या हाती लागणार आहे. एका छोट्याश्या उर्जा केंद्रमधून एवढी उर्जा निर्माण होईल की अनेक महानगर एकाचवेळी २४-२४ तास प्रकाशान उजळून निघणार आहे. वैज्ञानिकांना जर हिग्ज बोझोन किंवा इश्वरीय कणांचा शोध लावण्यात संपूर्ण यशस्वी ठरलं तर ते विज्ञानासाठी फार मोठं वरदान ठरणार आहे. कारण याच तंत्रज्ञानाचा वापर करत वाहनांचे मायलेज ताशी शेकडो मैल नाही तर हजारो किलोमीटर वेगानं मोजलं जाणार आहे. याचा अर्थ वाहनांना आकाशातून उडण्याच्या वेगाचं बळ मिळणार आहे.  वैज्ञानिकांना हा देव मिळताक्षणीच संचारक्षेत्रातही  विलक्षण क्रांती होऊ शकणार आहे. नेटच्या स्पीडचे रडगाणं कायमचं मिटणारं तर आहेच. पण त्याचवेळी लाखोपटीनं वाढणाऱ्या या इंटरनेटच्या स्पीडने केवळ जगात कुठेच नाही तर ब्रम्हांडातल्या कोपऱ्यातही संपर्क करु शकणार आहात.
 
बिग बँगची पुनरावृत्ती
खरच देव आहे…? कुणी केलंय हे ब्रम्हांड निर्माण…? यासारखे अगणित प्रश्न प्रत्येकालाच सतावत असतात. अशा प्रश्नांना केवळ अध्यात्माच्या नाही तर विज्ञानाच्या पातळीवर तपासण्याची गरज असते. सर्नच्या या महाप्रयोगानंतर  सृष्टीच्या  निर्मीतीचे रहस्य उलगडणार आहे. गॉड पार्टीकलच्या या रहस्यावरुनच इश्वरी कणांची प्रचंड ताकद जगासमोर येणार आहे. अमेरिकेच्या प़ॉमी न्युक्लिअर रिएक्टर आणि जिनिव्हाच्या सर्न महाप्रयोगात संशोधन करत असलेल्या शास्त्रज्ञांचा हा दावा केलाय, की त्यानी जवळजवळ देवालाच पाहिलयं आणि या शास्त्रज्ञांचा देव आहेत, ते हे अणू... ज्यामुळे अवघ्या ब्रम्हाडांच्या उत्पत्तीचे  रहस्य आता सुटलं जाणार आहे आणि या अणूंचे नाव आहे  हिग्ज ब्रोसोन...
 
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मागील ४० वर्षाच्या संशोधनाचे हे यश आहे. त्यांनी जिनिव्हात सुरु असलेल्या संशोधनात इलेक्ट्रॉन आणि प्रोटोनच्या टक्करीतून हिग्ज ब्रोसोन शोधण्यात यश मिळवलंय. या संशोधनासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च झालाय आणि जगभरातल्या ८ हजार शास्त्रज्ञांनी या अणुंना शोधण्यासाठी  दिवसरात्र कष्ट घेतलेत. सर्न महाप्रयोगातील हिग्ज ब्रोसोन किवा इश्वरीय कणांच्या निर्मितीच्या शोधासाठी ब्रम्हांड स्फोटाची निर्मितीप्रकिया वापरण्यात आलीय. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या निर्मितीवेळी स्फोट झाला होता तशाच पद्धतीचा भूगर्भात स्फोट घडवण्यात आला. लाखो किलोमीटर सेंकद वेगाच्या रोखानं येणाऱ्या प्रोटोनच्या टक्करीतून हा शोध लागला आणि या साऱ्याची तूलना थेट देवाशी करण्यात आली. वैज्ञानिकांनी या प्रोटोन टक्करीचा अभ्यास करण्यासाठी  लाखो कंम्प्युटर्सचं जाळं तयार करण्यात आलं होतं आणि त्याचा एकसंघ अभ्यास करण्यात येत होता.  याची नोंद आणि संशोधनावरुन शास्त्रज्ञांनी इश्वरीय कण शोधण्याचा दावा केलाय. शास्त्रज्ञांनी इश्वरीय कणांचा शोध लावलाय. पण विज्ञान नेहमीच प्रत्येक गोष्टीला १०० टक्के पारखून घेतं... आता फक्त एवढच पाहायचं की, हा उरलेला उणे ‘शून्य शून्य शून्य शून्य पाच’चा फरक कधी संपतोय आणि इश्वरीय कणांची सत्यता जगासमोर कधी येते याची.
 
कथा सृष्टीची निर्मितीची 
सृष्टीच्या निर्मितीचा शोध घेण्यासाठी जमिनीखाली २७ किलोमीटर लांबीच्या सुरुंगात हायड्रोन कोलयडर नावाचे एक महायंत्र तयार करण्यात आले. याचवेळी हिग्स बोसोन या अणूचा जन्म झाला आणि याच अणूतून सृष्टीची निर्मिती झाल्याचा दावा करण्यात येतोय आणि हाच महाप्रयोग अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, भविष्यातील नव्या संशोधनाला... वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार,  काही करोड वर्षापूर्वी ब्रम्हांडातील सर्व तारे आणि ग्रह एकत्र चिकटले होते आणि त्यावेळी एक महाविस्फोट झाला. त्या विस्फोटातून  या ब्रम्हाडांत अनेक सूर्य आणि अगणित ग्रह-ताऱ्यांची निर्मिती झालीय. पण त्या महाविस्फोटापूर्वी नेमकी स्थिती कशी होती? हे आतापर्यंत रहस्य केवळ गूढ बनून राहीलं होतं. हिग्ज ब्रोसोनच्या शोधानं  त्या रहस्याचा आता भेद होवू शकणार आहे. विज्ञानाच्या कसोटीवर हा हिग्ज ब्रोसोन असा रेणू आहे की, ज्याच्यामूळे सारे अणू बनलेत. पण ना त्यात रंग आहेत ना ते दृष्यमान आहे....
 
साठच्या दशकात हिग्ज ब्रोसोनची थिएरी समोर आली होती आणि त्याच वेळी शास्त्रज्ञांना ब्रम्हांडाचे रहस्य  उलगडल्याचा विश्वास मिळाला होता. पण, या थिअरीलाही वास्तवतेचे परिमाण देण्याची वेळ अजून मिळत नव्हती. यासाठी पहिल्यांदा अमेरिकेच्या प्रयोगशाळेत प्रयोग झाला आणि त्यानंतर जिनिव्हाच्या सर्नमध्ये प्रयोग करण्यात आलाय. गेल्या काही वर्षापासून ब्रम्हाडांचे रहस्य शोधण्यात संशोधक व्यस्त आहेत. आता मात्र ब्रम्हाडांचे रहस्य समोर येतंय. शास्त्रज्ञांमध्ये यावरुन मतभेद असले तरी समोर येणारा ब्रम्हाडांचा अभ्यास नक्कीच जीवनाला आणखीनच गतीमान करणारा ठरणार आहे.
 

महाप्रयोगाला यशस्वी करण्यासाठी हरएक प्रयत्न
हिरोशिमा आणि नागासकीच्या विध्वसांनंतर अणुउर्जेनं फक्त विध्वंस होतो अशा समज असलेल्या जगाला पुन्हा विश्वास देण्याची गरज निर्माण झाली. हिग्ज बोसोन सारखा मूलकण विश्वाच्या सृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा महाप्रयोग यशस्वी झाल्यामुळे विज्ञानाला नवी दिशा मिळेल असा विश्वास वैज्ञानिकांनी व्यक्त केलाय. हिरोशिमा आणि नागासकीचा विध्वंस करणाऱ्या अणुस्फोटाच्या अणूच्या गतिमान उर्जेमुळे तो महाभयानक नरसंहार झाला होता आणि त्यानंतर झालेल्या अभ्यासातून हे समोर आलंय की दोन अणू एकमेकांसमोर आल्यास हिरोशिमा आणि नागासकीपेक्षाही कित्येक पट जास्त ऊर्जा निर्माण होऊ शकते. ब्रम्हांडाची निर्मिती हे देखील महास्फोटचं एक कारण मानलं जातंय. या स्फोटातून एवढी ऊर्जा निर्माण झालीय की, ती आजही अंतराळात उपलब्ध आहे. ब्रम्हाडांचं सर्वात मोठं रहस्य समजून घे्ण्यासाठी  वैज्ञानिकांना हिग्ज ब्रोसोनचा प्रयोग करावा लागणार होता आणि त्यावेळी वैज्ञानिकांना याची पुरती जाणीव झाली होती की, या प्रयोगादरम्यान सेकदांच्या हजाराव्या हिश्यात जरी गडबड झाली तरी साऱ्याचाच विस्फोट होणार होता. सर्नच्या या महाप्रयोगावेळी  वैज्ञानिकांनी साऱ्याची दक्षता घेतली होती. सर्नमध्ये प्रयोगाच्या वेळी वैज्ञानिकांनी आठ अरब उर्जा नियंत्रीत करण्याएवढी क्षमता निर्माण केली होती. यासाठी वैज्ञानिकांनी  जगातील सर्वश्रेष्ठ, जलद आणि सर्वोत्तम अशा कुलींग यंत्रणेचा वापर केला आणि म्हणूनच प्रयोग शाळेत प्रोटोनची टक्कर झाली त्यावेळी त्या उर्जेला नियंत्रणात ठेवणं शक्य झालं.
 
जिनिव्हाच्या या महाप्रयोगावेळी अल कायदाचा एक कटही समोर आला होता. काही दहशतवादी हे या महाप्रयोगाच्या वेळी शास्त्रज्ञ बनून त्या प्रयोगशाळेत हजर राहणार होते. ही माहिती मिळूनही सर्नमध्ये इश्वरीय कणांचा शोध सुरुच ठेवण्यात आला होता. १७५ फूटाखांली झालेल्या या प्रयोगात वैज्ञानिकांनी जगातील सर्वोत्तम असा २७ मैलांचा एक बोगदा तयार करण्यात आला. ज्यामध्ये पोहोचण्यासाठी शास्त्रज्ञांना २७ मैल खाली उतरावं लागायचं. या प्रयोगांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांनी जगभरातले लाखो कॉम्प्युटरचे एक नेटवर्क तयार करण्यात आलं. जेणेकरुन सेकंदाच्या हजाराव्या हिश्यातही चूक राहू नये, यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. यासाठी पाच अब्ज रुपये खर्च करण्यात आला. कारण वैज्ञानिकांचा विश्वास होता की,  या महाप्रयोगातून एक नव्या तंत्रज्ञानासाठी जग सामोरं जाणार आहे. परमाणू महाप्रयोगासाठी अनेक संकट होती. पण शास्त्रज्ञानी  सर्व संकटावर मात करत इश्वरीय कणांचा शोध लावलाय.. इश्वरीय कणांचा मानवी आयु्ष्य आणखान गतिमान करण्यात फायदा होणार आहे. शिवाय पहिल्यादांच एवढी मोठी ऊर्जा नियंत्रीत करण्यावरही वैज्ञानिकांना यश मिळालंय.
 
 

First Published: Thursday, July 5, 2012, 07:08


comments powered by Disqus