गाईल्स शील्डमध्ये लहानग्याचा रिकॉर्ड - Marathi News 24taas.com

गाईल्स शील्डमध्ये लहानग्याचा रिकॉर्ड

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईचा मुशीर खान हा लहानगा क्रिकेटर गाईल्स शिल्डमध्ये खेळणारा सर्वात लहान क्रिकेटर ठरला आहे. ११४ वर्षाच्या इतिहासात गाईल्स शिल्डमध्ये खेळणार मुशीर सर्वात लहान क्रिकेटर आहे..मुशिरनं अंजुमन इस्लाम शाळेकडून खेळताना हा विक्रम केला आहे.
 
साडेसहा वर्षांचा ह्या  चिमुरड्याचे  या लहानग्या क्रिकेटरचं नावं आहे मुशिर खान. मुशिर हॅरिस शिल्डमध्ये ४३९ रन्सची विक्रमी खेळी करणाऱ्या सर्फराजचा लहान भाऊ आहे. आता मुशिरनंही गाईल्स शिल्डमध्ये एक नवा विक्रम केला आहे. मुशिरनं गाईल्स शिल्डमध्ये खेळणारा सर्वात लहान क्रिकेटर ठरला. मुंबईत अंजुमन इस्लाम शाळेकडून खेळताना मुशिरनं विक्रम केला. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीविरुद्ध खेळताना गाईल्स शिल्डच्या पहिल्याच मॅचमध्ये मुशिर फारशी कमाल करू शकला नसला तरी यापुढील मॅचसाठी तो सज्ज आहे
 
गाईल्स शिल्डनं भारतीय क्रिकेटरला अनेक दिग्गज प्लेअर्स दिले आहेत. सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर यांनीही गाईल्स शिल्डमध्ये धडाकेबाज कामगिरी केली होती...आता या चिमुरड्याची वाटचाल कशी राहणार याचीच उत्सुक्ता सर्वांना लागली आहे.

First Published: Tuesday, December 13, 2011, 14:01


comments powered by Disqus