Last Updated: Wednesday, July 18, 2012, 09:55
================================
भुजबळांचा अजब खर्चाचा, गजब दावासार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे आता विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात छगन भुजबळ यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय.
================================
मैला वाहून नेणा-या प्रथेला आता बंदीमैला वाहून नेणा-या प्रथेला विधिमंडळात विरोध करण्यात आला. सत्ताधारी आणि विरोधकांनी या प्रथेचा निषेध केला.यावेळी ही प्रथा दोन महिन्या बंद करण्यात येईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
================================
आबांनी केला जकात चोरीचा खुलासामुंबई महापालिकेत दररोज कोट्यवधींची जकात चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जकातचोरीचं मोठं रँकेट कार्यरत असल्याची माहिती खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिलीय.
================================

निचरा पाण्याचा की कचऱ्याचा…मुंबई महापालिकेनं राबवलेल्या ‘ब्रिमस्टोवॅट’ प्रकल्पाचा खर्च कसा वाढला याबद्दल चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिलंय.
================================

गृहनिर्माण विधेयक मंजूर… बिल्डरांना वेसनबिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विधानसभेत गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. यामुळं फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना वेसण घालायला मदत होणार आहे.
================================

आबांची कबुली, राज्यात गुन्हे होत नाहीत सिध्दराज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून, हे चिंताजनक असल्याची कबुली खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानपरिषदमध्ये दिली. २०११-१२ या वर्षी हे प्रमाण ८.२ टक्के एवढे कमी असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
================================

‘पल्स पोलिओ’त भ्रष्टाचार, कधी घडणार ‘साक्षात्कार’?धुळे जिल्ह्यात NRHM योजनेत निकृष्ट दर्जोचे साहित्य खरेदी करुन आणि त्याचं बनावट बिल बनवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलाय. यासंदर्भात वर्षभरानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र या समितीतील सदस्य आणि त्यांचा कारभार पाहता हा चौकशीचा फार्स आहे का अशी शंका उपस्थित होते.
================================

‘दादा’ सुटले भन्नाट!ग्रामीण भागात सिंचन क्षेत्रात का झालीय? या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला काय काय सुचू शकतात... पाऊस कमी पडलाय, पाण्याची योग्य साठवणूक झाली नाही, अशी साधीसुधी उत्तरं तुम्हा-आम्हाला सुचतील. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र एक याच प्रश्नावर एक भन्नाट उत्तर सुचलंय आणि तेच उत्तर त्यांनी विधानसभेतही मांडलंय.
================================

आर आर पाटलांचा लागणार कसराज्यातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला गृहमंत्री आर. आर. पाटील आज उत्तर देणार आहेत.
================================

कानडी दडपशाहीचा एकमुखी निषेधबेळगाव महापालिका बरखास्तीचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. वादग्रस्त सीमाभागाबाबत सुप्रीम कोर्टात निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित म्हणून जाहीर करावा, या आशयाचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.
================================

सुनील तटकरेंचा ‘हवाला’शी संबंध?जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वेगवेगळ्या कंपन्यांची स्थापना करून त्यामाध्यमातून हवाला आणि मनी लॉन्ड्रींगचे व्यवहार केल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलाय.
================================
बेळगाव केंद्रशासित करा- मुख्यमंत्र्यांचा ठरावबेळगावसह वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. मुख्यमंत्र्यांच्या ठरावाला सर्वपक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला
================================

सरकार खोटारडं; विरोधकांचा आरोपदुष्काळावरुन विधानपरिषदेत आज पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी उडाली. सरकार दुष्काळाबाबत खोटी माहिती देत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
================================

दुष्काळ निवरणासाठी २ हजार ६२५ कोटीराज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने २ हजार ६२५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलीय. विधानसभेत दुष्काळ स्थितीबाबत झालेल्या जोरदार चर्चेनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी ही घोषणा केलीय.
================================

शरद पवारांनी व्यक्त केली चिंताकाही दिवसांपूर्वी पावसाची फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगून दिलासा देणा-या कृषी मंत्री शरद पवारांनी आता मात्र महाराष्ट्र, कर्नाटकातील कमी पाऊस ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलंय.
================================

राज्यात आता गुटखा बंदीराज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळं राज्यात आता गुटख्याच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी आली आहे.
================================
राज्य सरकार अपयशी – राष्ट्रवादीराज्यात दुष्काळ रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा, घरचा आहेर राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे दिसून आले.
================================

लॉजवर राहणार कॅमेऱ्याची नजर- आबा पाटीलराज्यात असणाऱ्या लॉजवर फार मोठ्या प्रमाणात अनेक अनैतिक गोष्टी घडत असतात. आणि यालाच पायबंद घालण्यासाठी आर. आर. पाटील यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.
================================

================================

क्राईम ब्रँचवर विश्वास नाही – एकनाथ खडसेमंत्रालयाला लागलेल्या आगीची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलीय. क्राईम ब्रँचवर विश्वास नसल्याचंही खडसेंनी यावेळी सांगितले.
================================

================================

माथाडींच्या घराचा प्रश्न: विरोधकांचा गोंधळमाथाडी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरुन मंगळवारी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. घराबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन द्यावं, अशी मागणी विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी केली. या प्रश्नावरुन विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.
================================
स्त्री भ्रूण हत्या: मनुष्यवधाचा गुन्हा होणार दाखलस्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार असणाऱ्यांविरोधात आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार आहे. या संदर्भात राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार आहे. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टींनी विधानसभेत ही माहिती दिलीय.
================================

काँग्रेस आमदारांकडूनच मुख्यमंत्र्यांवर शिंतोडेमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाच्या आमदारांमध्ये असलेली नाराजी पुन्हा एकदा समोर आलीय. कालच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्ष अशोक चव्हाणांना एकटं पाडत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला.
================================
सरकारने मंत्रालयाला आग लावली – खडसेविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या मुद्यावर... आगीच्या मुद्यावर आज विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. घोटाळ्याच्या फाईल्स जाळण्यासाठी सरकारने मंत्रालयाला आग लावल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.
================================

अशोकरावांना हाताची साथ, समर्थक तरीही नाराजमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर अन्याय झाल्याचं काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी मान्य केलंय. तसंच अशोक चव्हाणांच्या मागे उभं राहण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दिलंय.
..================================

पावसाळी आधिवेशनाची सुरूवातच गोंधळानेविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवातच आक्रमक झाली आहे. मंत्रालय आगीच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारकडे चर्चेची मागणी केली. मात्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली.
================================

पावसाळी अधिवेशन होणार वादळीअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालय आगीचा मुद्दा उचलणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला जाईल अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. त्यामुळं विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरूवातीला आगीचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
================================
अधिवेशनातून काही निष्पन्न होईल?मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर सरकारचा कारभार रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असताना आता सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आदर्श घोटाळा, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि राज्यातील भूखंड घोटाळ्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.
================================
व्हिडिओ पाहा..
First Published: Wednesday, July 18, 2012, 09:55