ऑलिम्पिक आणि डर्टी बॉम्ब - Marathi News 24taas.com

ऑलिम्पिक आणि डर्टी बॉम्ब

www.24taas.com, मुंबई
 
ऑलिम्पिकचा सोहळा म्हणजे केवळ खेळाडुंसाठीच नव्हे तर अवघ्या जगासाठी डोळ्याचं पारण फेडणारा आणि प्रत्येक खेळाला सुवर्णमयी करणारा सोहळा असतो.. पण खेळाडुंच्या या महाकुंभमेळ्यावर नजर पडलीय ती दहशतवाद्यांची.. दहशतवाद्यांना ऑलिंम्पिंकवर नाईन इलेव्हनसारखा हल्ला करायचा त्यानी कट आखलाय.. आणि यासाठी त्यानी डर्टी बॉम्बचा प्लॅनही आखलाय.. यावरच  प्राईम वॉचमधून घेतलेला हा वेध, डर्टी बॉम्ब.
 
लंडन ऑलिम्पिक. प्रत्येक खेळा़डूचे स्वप्न असत की, खेळाच्या या महाकुंभामध्ये सहभागी होण्याचे.. यंदा हा महाकुंभ भरणार आहे ब्रिटनमध्ये... लंडन ऑलिम्पिकसाठी ब्रिटनमध्ये लाखो प्रेक्षकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे छोटासा स्फोट देखील फार मोठी आपत्ती निर्माण करु शकणार आहे. आणि म्हणूनच दहशतवाद्यानी कुठल्याही डिटोनेटर स्फोटापेक्षा एकाच वेळी वायुच्या माध्यमाने हजारो लोकांच्या प्राणाचा दुष्मन बनणारा डर्टी बॉम्बचा प्रयोग करण्याचं ठरवलय.
ही तीन दृष्य आहेत जी दृष्य दुर्लक्षित केली गेली आणि खरच दहशतवाद्यांचा कट जर वास्तवात उतरला तर हाहाकार माजेल. वास्तवात रेडिओ एक्टीव्ह डर्टी बॉम्ब हा आण्विक बॉम्ब एवढा मोठा नसला तरी या डर्टी बॉम्बची घातकता तेवढीच भयानक आहे. कारण हा डर्टी बॉम्ब प्राणघातक नसला तरी खेळाच्या सर्वात मोठ्या महाकुंभाला क्षणात विस्फोटाचा महाकुंभ बनवू शकतो.. डर्टी बॉम्बमध्ये कोबाल्ट सीक्सटी, अमेरेसियन टू फोरटी वन, प्लुटोनियम टू थ्रटी एट, सिजीयम वन थ्री सेवन या प्रमाणे अनेक विस्फोटक वस्तूचा समावेश केला जावू शकतो. या वस्तूना वापरुन बॅटरी आणि डिटोनेटरशी जो़डलं जातं.. विस्फोटकाचा स्फोट होताच डर्टी बॉम्बमधली विषारी वायू वातावरणात पसरून सर्व परिस्थिती भयावह बनते.. आणि हा धोका तेवढाच गंभीर आहे.. दिल्लीत काही महिन्यापुर्वी झालेल्या स्फोटावरुन याची भिषणता समजून येईल.
 
दिल्लीत मायापुरीत कोबाल्ट सिक्सटीमध्ये स्फोट झाला होता. त्यावेळी विषारी वायूनं संपुर्ण वातावरणात आपलं साम्राज्य निर्माण केल होतं.. पण त्यावेळी कोबाल्ट सिक्सटीच्या संपर्कात आलेल्या मजूर गंभीर अशा त्वचारोगांला सामोरं जावं लागलं होते, काहीना श्वसनाचा त्रासही झाला होता. अनेकांचे हात पोळले होते.. यातील गंभीर जखमी असणा-या आठपैकी एकाचा मृत्यु झाला होता. कोबाल्ट सिक्सटीमुळे डर्टी बॉम्बची दहशत वाढलीय.. दिल्लीचा कोबाल्ट सिक्सटी फक्त एक दुर्घटना होती असं म्हटल जात.. पण अशा पद्धतीचा डर्टी बॉम्बचा वापर झाला तरी अनर्थ होईल.. डर्टी बॉम्बचा वापर करुन दहशत माजायची हा कट यापुर्वीही आखण्यात आला होता.. सुरक्षा यंत्रणांना २०११ मध्ये अल कायदाच्या ताब्यातल्या या प्लॅनविषयी कुणकुण लागली होती. विकीलिक्सच्या म्हणण्य़ानुसार अल कायदाला रेडिओ एक्टीव्ह युरेनियम आणि प्लुटोनियम हवं होतं त्यासाठी अल कायदानं अनेक प्रयत्नही केल होतं.. त्यावेळी झालेल्या खुलाशात ही शंका अमेरिकेनं यासंदर्भात ब्रिटनकडे माहिती दिली होती असल्याचही उघड झालयं.. कझाकीस्तान, लिस्बेन आणि आफ्रिकामधून रेडिओ एक्टीव्ह युरेनियम मिळवण्यात अल कायदाला अपयश आलं होतं.. आणि हेच नेमक अल कायदाचं दुखण आहे आणि म्हणूनच अल कायदानं आता ऑलिम्पिकमध्ये दहशत माजवण्याचा प्लॅन आखला आहे.
 
अमे्रिकेवरील सव्वीस अकराच्या हल्ल्यातील मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनच्या मृत्युनंतर अल कायदाला पुन्हा एकदा आपलं स्थान पक्क करायचयं.. म्हणून त्यानी आता ऑलिम्पिकला टार्गेट करायचं ठरवलय़.. कारण त्याना ऑलिम्पिकचा खेळ उधळवून स्वताचा डाव खरा करायचाय.. आणि यासाठी खेळाचा हिरमोड करण्यासाठी रचला गेलाय मास्टरगेम.
 
प्रचंड सुरक्षायंत्रणेच्या देखरेखीखाली होत असलेल्या लंडन ऑलिम्पिकवर दहशतीचे सावट कायमच आहे.. लंडन ऑलिम्पिकच्या ठिकाणापासुन काही अंतरावर असणा-या सहा संशयिताला अटक झाल्यामुळे संपुर्ण ब्रिटनवरच आता या निमित्तानं दहशतीचे सावट पसरलयं हे नक्की झालय.. ऑलिम्पिकला अवघे काही दिवस उरले असतानाच दहशतवाद्यांची सुरु झालेली धरपकड यामुळे ही दहशत जास्त पसरत चाललीय..
 
ब्रिटनमधील सोमालियात सापडलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांच्या धरपकडीनंतर आता ऑलिम्पिंकच्या सुरक्षेबद्दल काळजी घेतली जातेय.. सोमालियाच्या चौकशीनंतर या दहशतवाद्यांकडून ब्रिटनमध्ये उलट तपासणी सुरु आहे. या व्यक्तिला ऑलिम्पिंक पार्कमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तरीपण तो एक दोनदा नव्हे तर तब्बल पाचवेळा हा दहशतवादी ऑलिम्पिक पार्कमध्ये गेला होता. सुरक्षा यंत्रणांनी ती व्यक्ती ही ऑलिम्पिक पार्कची रेकी करत होती असा संशय व्यक्त केलाय. लंडनमधील प्रसिद्ध असलेल्या एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार ही व्यक्ती सीएफ नावाची ही अक २४ वर्षीय दहशतवादी व्यक्ती आहे.. आणि हा दहशतवादी सोमालियन दहशतवादी गटाच्या संपर्कात असल्याची माहीतीही सुत्रांनी दिलीय.. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी लंडन ऑलिम्पिंकला आपलं टार्गेट केलय़.. आणि आपल्या माहितीच्या आधारे ब्रिटनच्या एम आय स्पाय या संस्थेच्या माहितीनुसार ऑलिम्पिक पार्कजवळ एक महिलेला आणि सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आलय..
 
दहशतवादी येणार असल्याच्या माहिती मिळाल्यावर चार दिवसापूर्वीच हायवे ब्लॉक करुन एक बसची तपासणीही करण्यात आली. आणि त्याप्रमाणेच काही दिवसापुर्वीच काही संदिग्ध व्यक्तीकडून हत्यारं आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. लंडनमध्ये दोघांच्या अटकेनंतर नाईन इलेव्हन सारखा मोठा कट आखण्याचा प्लॅन उघड झाला होता.
 
या दहशतवादी हल्यासाठी अल कायदानं नॉर्वेच्या एका युवकाची निवड करण्यात आली होती. आणि तिच्यावर कोणताही संशय येणार नाही अशी काळजीही घेण्यात आली होती. आणि त्यानं काही दिवसापुर्वीचं धर्म परिवर्तनही केलं होतं.. या युवकाला अल कायदानं खास विमान उडवण्याचं आणि विमान अपहरण करण्याच ट्रेनिंगही दिलं होतं.. अल कायद्याच्या या प्लॅन नुसार दहशतवादी युवक हा नॉर्वेचा रहिवासी असल्यामुळे सुरक्षा यंत्रणाची फसगत होऊ शकणार होती. आणि विमानात कोणत्याही अटकावाशिवाय प्रवेश करता येणार होता. आणि हा सारा कट आखण्यात आला होता ऑलिम्पिक स्टेडियमवर स्फोटकांनी भरलेले विमान नेऊन विंध्वस करण्याचा.. पण सतर्क सुरक्षा यंत्रणामुळे हे सारे प्रयत्न निष्फळ करण्यात आलाय.
 
 
27 जुलैपासून लंडनमध्ये क्रीडापटूंचा महामेळा भरणार आहे. 200 देशातील जवळपास 10 हजाराहून अधिक ऍथलिट्स यामध्ये सहभागी होणार आहेत. क्रीडा जगतातील या मेगा इव्हेंटची सारेजजण आतूरतेनं वाट बघतायत. 26 क्रीडा प्रक्रारात 302 इव्हेंट्समध्ये जगभरातील ऍथलिट्स मेडल्ससाठी आपलं नशिब आजमावणार आहेत. आणि नेमकी हीच संधी साधायचीय अल कायदाच्या दहशतवाद्यांना..
 
खेळाचा महाकुंभ सुरु होण्यास आता काही दिवस राहिलेय...जगातील सर्व प्लेअर्स लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेय. काही जणांना सुवर्णपदक मिळवायचय.. तर काही जणांना नवा रेकॉ़र्ड नोंदवायचय.. लंडन ऑलिम्पिंकसाठी आयोजन समितीनं केवळ ऑलिम्पिक पार्कच नाही तर अवघं लंडन सजलय.. संपुर्ण ब्रिटनमध्ये प्रत्येक चेह-यावर ऑलिम्पिकचा आनंद झळकतोय.. ऑलिम्पिकंच्या नियोजनानं सर्वांच डोळे दिपवायचेच यासाठी जबरदस्त नियोजन करण्यात आलयं.. जमिनीवरुनच नव्हे तर आभाळातूनही हा सारा नजारा पाहण्यासाठी अवघं ब्रिटन सज्ज झालयं..
 
मात्र लंडन ऑलिम्पिकचा बिगुल वाजायला आता काहीच दिवस असतानाच दहशतवादी सज्ज झालेय... दहशतवाद्यांनीही नव्या संकटाचा बिगूल वाजवलाय..ऑलिम्पिकपूर्वी मोठा हल्ला करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.. आणि ही अतिशय महत्वाची खबर दिलीय अमेरिका आणि ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनी. गुप्तचर यंत्रणानी दिलेल्या माहितीनुसार लंडन ऑलिम्पिकवर दहशतवादी हल्लाची भीती व्यक्त केलीय.... आणि यासाठी एखाद मोठं विमान हायजॅक करून 9/11 साऱखा हल्ला करण्याच्या तयारीत दहशतवादी आहेत.
 
लंडनवर हल्ला करून जगभरात दहशत निर्माण करण्याचा दहशतवादी संघटनांचा इरादा आहे....त्यामुळे लंडनमध्ये संपूर्ण लंडनमध्ये हाय अलर्टवर आहे.. ऑलिम्पिकच्या सुरळीत पार करण्यासाठी सुरक्षा यंत्रणाही सज्ज झाल्यात.. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अल कायदा पुन्हा सक्रिय झालीय. आणि अल कायदानं यासाठी आपल्या खास प्रशिक्षित दहशतवाद्यांना विमान उडवण्याचं आणि अपहरण करण्याचंही खास ट्रेनिग दिलय.. अल कायदाचा हा प्लॅन तडीस गेला तर प्रचंड मोठा हाहाकार माजेल. कारण त्यावेळी देशविदेशातील क्रीडा रसिकांची प्रचंड उपस्थिती असेल. लंडन ऑलिम्पिकंवर सर्वात मोठ्या दहशतवादी संघटना असणा-या अल कायदाची वाईट नजर प़डलीय.. पण आता सुरक्षा यंत्रणाच्या सतर्कतेमुळे अल कायद्याच्या दहशतवाद्यांच्या सर्व कुटील योजनांचा पर्दाफाश व्हायला सुरुवात झालीय
 
 
लिम्पिंकवर कुठल्याही पद्धतीने दहशतवादी हल्ले करायचा हा दहशतवाद्याचा कट आहे तर ब्रिटीश यंत्रणानी शेरास सव्वाशेर बनत सर्व कट उधळण्याची पुर्ण तयारी केलीय.. पाण्यावरुन, आकाशातून, जमिनीवरुन एवढच नव्हे तर सिमेपल्याडहूनही सुरक्षा यंत्रणाची करडी नजर ठेवली जाणार आहे.. आणि ब्रिटीश यंत्रणाची ही सुरक्षा म्हणजे एक चक्रव्युहचं आहे. लंडन ऑलिम्पिक दरम्यान दहशतवाद्यांची काळी छाया असली तरी सर्व घातपाती कारवाया उध्वस्त करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनीही प्रचंड तयारी सुरु केलीय.. कुठल्याही प्रकारच्या हवाई घातपाती हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी लंडनमध्ये सर्व मोठ्या इमारतीवर हवाई हल्ला प्रतिरोध मशीन्स तैनात करण्यात आल्या आहेत. ज्याच्या सहाय्यानं इमारतीच्या रोखानं विमान येत असल्याची माहीती मिळताच आकाशातच त्या विमानाचा स्फोट होईल.
 
लंडन ऑलिम्पिंकच्या दरम्यान प्रत्येक वेळी येणा-या जाणा-या व्यक्तीवर हजारो सीसीटीव्हीची नजर असणार आहे. आणि यावेळी कुठल्य़ाही संदिग्ध व्यक्तीबद्दल जराशीही शंका येताच ब्रिटीश पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा त्याला आपल्या ताब्यात घेण्यास सज्ज असणार आहेत. लंडन पोलिसांच्या याच रणनितीमुळे गेल्या काही दिवसातील सर्व दहशतवादी कारवाया या हाणून पडल्या आहेत.
 
ऑलिम्पिक कारवाई दरम्य़ान ब्रिटीश रॉय़ल नेव्हीच्या युद्धनौका समुद्रात दुरदुरपर्यंत टेहळणी करत असणार आहेत.. कुठल्याही प्रकारच्या धोक्याच्या सज्जतेसाठी असणा-या लंडन पोलिसांनी यासाठी अनेक मॉकड्रीलही केल्या आहेत. ऑलिम्पिकपर्यंत ऱॉयल नेव्ही आणि मिसाईल यंत्रणाही नेहमी सतर्क राहणार आहे. आणि यादरम्यान कुठलीही संदिग्ध धोकादायक मिसाईलची जर बातमी येत असेल तर एका क्षणात ते दुरच नष्ट केलं जाणार आहे. दहशतवादी कुठलीहा कट आखू शकतात हे ध्यानात ठेवून आकाशात सॅटेलाईट मार्फतही नजर ठेवली जातायत.. केवळ लंडन आणि ब्रिटनवर नव्हे तर आजूबाजूच्या प्रदेशावरही सॅटेलाईट मार्फत नजर ठेवली जातेय. ब्रिटन आणि अमेरिकेत कार्यरत असलेले हजारो छोटे सॅटेलाईटहे प्रत्येक विमानाच्या बारीक हालाचालीवरही लक्ष ठेवणार आहेत.
 

ब्रिटनच्या वायुसेनेनंही यासाठी जय्यत तयारी केलीय. संपुर्ण ऑलिम्पिकचा मेळा सुरु असताना दहशतवादी कारवाया मोडून काढण्यासाठी हजारो फुट उंचावरुन सैन्यदळाची विमान फिरत राहणार आहेत. धोक्याची माहिती मिळताच त्या विमानाला घेरण्याची पुर्ण योजना आखण्यात आलीय. आणि गरज पडल्यास ते विमान कोसळण्याचीही कार्यवाही करण्यात येईल.. ब्रिटीश सरकारनं या ऑलिम्पिकसाठी पुर्णपणे सज्ज होतं रणनिती आखलीय. आणि ब्रिटीश यंत्रणाच्या या चक्रव्युहातून दहशतवादी वाचण आता पूर्णपणे कठीण होऊन बसलय..
 
नाईन इलेव्हनचा हल्ला हा केवळ अमेरिकेनेच नाही तर अवघ्या जगानं अनुभवलाय... दहशतवादी कुठल्याही पातळीवर उतरु शकतात. पण दहशतवाद्यानी कुठलीही योजना आखली तरी त्याच्या प्रत्येक कटाला उध्वस्त करण्याची रणनितीही ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणानी आखलीय. ऑलंपिक खेळांच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लंडन पोलिसांनी कंबर कसलीय..त्यांनी आपली सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केलीय.कमर्शियल इमारतीसह रहिवाशी इमारतीच्या परिसरातही सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आलीय.. लंडनमधील मोठमोठ्या इमारती लक्षात घेता पोलिसांनी सावधगिरीची भुमिका म्हणून जमीनीवरुन वर आकाशात मारा करण्यासाठी मिसाईलची व्यवस्था केलीय..लंडनमधील पूर्वेकडील रहिवाशी इमारतीच्या परिसरात पोलिसांनी दोन मिसाईल डिफेन्स सिस्टीम सज्ज करुन ठेवलेयत.ज्या ठिकाणी लंडन ऑलंपिकचे सामने होणार आहेत प्रत्यक्ष त्या ठिकाणाहून चार किलोमीटरच्या रहिवाशी भागात मिसाईल टॉवर लावल्यामुळे रहिवाशांच्या अनेक तक्रारी वाढू लागल्यात.
 

सुरक्षा एजंसीच्या या व्यवस्थेमुळे काही नाराज लोक तर थेट कोर्टात सुध्दा पोहचलेत..मात्र काही लोक असेही आहेत ज्यांना ही सुरक्षाव्यवस्था महत्वाची वाटतेय. लोकांच्या वाढत्या तक्रारींना न जुमानता सरकारने रहिवाशी परिसरात मिसाईल डिफेंस टॉवर लावण्यासाठी परवानगी दिलीय.27 जुलै ते 12 ऑगस्टच्या दरम्यान लंडन ऑलंपिकचे सामने होणार..या लंडन ऑलंपिक सामन्यामध्य़े कोणताही अनुचित प्रकार घ़डू नये असेच सुरक्षाव्यवस्थेचे कसोशीचे प्रयत्न असणार.
 
लंडन ऑलिंपिकवनर दहशतवादाचे सावट आहे. सुरक्षा यंत्रणानीही यापूर्वीच इशारा दिलाय..त्यानंतर संपूर्ण लंडनमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक कऱण्यात आलीय. खेळाचा महाकुंभ सुरु होण्यास आता काही दिवस राहिलेय...जगातील सर्व प्लेअर्स लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेय..लंडनही ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी सज्ज झालेय...मात्र लंडन ऑलिम्पिकचा बिगुल वाजायला आता काहीच दिवस असतानाच,दहशतावादी सज्ज झालेय...ऑलिम्पिकपूर्वी मोठा हल्ला करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.....आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकनं आणि ब्रिटिश एजन्सीजनी लंडन ऑलिम्पिकवर दहशतवादी हल्लाच्या भीती व्यक्त केलीय....एखाद मोठं विमान हायजॅक करून 9/11 साऱखा हल्ला करण्याच्या तयारीत दहशतवादी आहेत...लंडनवर हल्ला करून जगभरात दहशत निर्माण करण्याचा दहशतवादी संघटनांचा इरादा आहे....त्यामुळे लंडनमध्ये संपूर्ण लंडनमध्ये हाय अलर्टवर आहे..ऑलिम्पिकच्या सुरळीत पार करण्यासाठी सुरक्षा यंत्रणाही सज्ज झाल्यात..
 
व्हिडिओ पाहा..
 

 

 

 

 

 

First Published: Tuesday, July 10, 2012, 07:21


comments powered by Disqus