Last Updated: Friday, July 13, 2012, 07:43
www.24taas.com, सातारा राज्यातले ऐतिहासिक गड किल्ले ही इतिसाहाची साक्ष देणारी आणि तरुण पिढीसाठी नेहमीच स्फूर्तीदायक राहिलीत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतच त्यांनी उभारलेल्या गड किल्ल्यांची दूरवस्था झालीय. या भर पडली आहे ती प्रतापडाची. प्रतापगडीवरील सूर्य बुरुज ढोसळतोय.
शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असणा-या आणि अफझलखान वधामुळं प्रसिद्ध झालेल्या प्रतापगडावरही पडझड होतेय. या किल्ल्यावरील महत्वाच्या अशा सूर्य बुरुजाकडं दुर्लक्ष झाल्यानं पावसामुळं तो ढासळलाय. इतर अन्य चार बुरुजही शेवटच्या घटका मोजतायत. त्यामुळं शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्ल्याचा वारसा जपणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोकणातील समुद्रातील मूरूज-जंजिरा, विजयदुर्ग, मालवण, जयगड यांच्यासह किनारपट्टीवरील मंडणगड, बाणकोट, रायगड आदी आणि अन्य राजगड, पुरंदर, सिंहगड , फत्तेगड या किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने एक एक भक्कम बुरूज ढासळत आहे.त्यामुळे या किल्ल्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
व्हिडिओ पाहा...
First Published: Friday, July 13, 2012, 07:43