भारतीय सैन्यात घुसखोरी - Marathi News 24taas.com

भारतीय सैन्यात घुसखोरी

www.24taas.com, मुंबई
 
सैन्यात हनीट्रॅप करत होत असलेली हेरगिरी.. भारतीय सैन्यातील एक लेफ्टनन कर्नल एका बांग्लादेशी सौंदर्यवतीच्या जाळ्यात साप़डला आणि त्यावर रॉने कारवाई केलीय.. पण हा सारा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीय तर त्या कर्नलचा लॅपटॉपही गहाळ झाला.. आणि त्या लॅपटॉपमध्ये होती सुरक्षेविषयी अतिशय महत्वाची माहीती.. या हेरगिरीचा पर्दाफाश.. भारतीय सैन्यात घुसखोरी.
 
सैन्य़ातील कुठल्याही अधिका-याला ओळखलं जात ते त्याच्या जबाबदारीच्य़ा असलेल्या भानामुळे.. पण याच अतिशय महत्वाच्या गुणावर भारतीय सैन्याच्या एक लेफ्टनन कर्नलच्या कृत्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालय.. एक अधिकारी स्वताच्या मौजेसाठी देशाची सुरक्षा कशी काय धोक्यात आणू शकतो हाच सवाल विचारला जातोय.. आणि हा सवालही त्याचे कारनामे हे रॉने पकडल्यानंतरच जास्त गडद होतोय.
 
सौदंर्यवती बांग्लादेशीय 
पर्दाफाश आहे, भारतीय सैन्यात झालेल्या एका हेरगिरीचा.. भारतीय सैन्याचा एक लेफ्टनन कर्नल परदेशी सौंदर्यवतीबरोबर सापडलाय. आणि विशेष म्हणजे ही सौदंर्यवती बांग्लादेशीय आहे. कर्नलबरोबर हेरगिरी करत असलेल्या या बांग्लादेशीय युवतीचे नाव शिबा असं आहे. शिबा ही लेफ्टनन कर्नलला भेटण्यासाठीच खास भारतात आली होती. शिबा आणि लेफ्टनन कर्नल संजय शांडिल्यमध्ये खास मैत्रीसंबध होते. लेफ्टनन कर्नल संजय शांडिल्य पाकिस्तान ब़ॉर्डरवर सज्ज असलेल्या भारतीय सैन्याच्या १५० व्या तुकडीचा सेकंड इनकमांड आहे. , फेसबूकवरुन सोशल साईटस नेटवर्कवरुन बांग्लादेशी तरुणी शिबाने संजयशी मैत्री वाढवली होती.
 
या शिबाने फेसबुकवरुन कर्नलशी आपली मैत्री घट्ट वाढवली आणि आपल्या जाळ्यात ओढण्यात ती यशस्वी ठरली. कर्नल आपल्या जाळ्य़ात अडकलाय़ य़ाची खात्री होताच शिबानं भारतात येणं नक्की केल. संजय आणि शिबा यांचा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटण्याचे नक्की झालं. पण या दरम्यान संजयला आपल्यावर कुणीतर नजर ठेवतय याची माहीती नव्हती.. कर्नल संजय शांडिल्यच्या प्रत्येक हालचालीवर रॉ या आपल्या गुप्तचर यंत्रणेची नजर होती. पंचताराकिंत हॉटेल मध्ये त्याच्या भेटीच्या दरम्यानं पूर्ण जाळं पसरवण्यात आलं होतं. आणि रॉच्या जाळ्यात कर्नल सापडला.
 
कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरु 
कर्नलला ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरु झालीय.. भारतीय सेनेच्या १५० व्या तुकडीच्या डेप्युटी कंमाटर कर्नल पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी सुरु आहे. पण या सर्वात धक्कादायक गोष्ट आहे,ती म्हणजे कर्नलचा लॅपटॉपही गहाळ झालाय... या लॅपटॉपचा वापर कर्नल संजयबरोबरच रेजिमेंटचे अन्य कमांडिग ऑफिसरही करत असल्याचं समोर येतय.. आणि हिच गोष्ट अतिशय गंभीर आहे कारण या लॅपटॉपमध्ये देशाच्या सुरक्षेबद्दल अतिशय महत्वाची माहिती नोंद होती.
 
या लॅपटॉपमध्ये भारतीय सैन्यानं राजस्थानच्या सिमेवर केलेल्या अनेक युद्ध अभ्यासाच्या नोंदी नमुद आहेत.. आणि या नोंदी भारताच्या नव्या रणनितीसाठी अतिशय महत्वाच्या होत्या.. आणि म्हणूनच या लॅपटॉपचे गहाळ होण हे आता राष्ट्रीय सुरक्षेचा विषय बनलाय.. कारण ती महत्वाची माहिती जर परकीय गुप्तहेरांना सापडली तर भारतीय सैन्यांच्या अथक मेहनतीवर एका क्षणात पाणी पडणारा आहे.. भारतीय सैन्यातील महत्वाची माहीती मिळवण्यासाठी सैन्याच्या अधिका-यावर हनीट्रॅप करण्यात आलं.. या अगोदर सैन्यातला एक कर्नल असाच हनीट्रॅपच्या जाळ्यात सापडला होता. त्यावेळी तो कर्नल बांग्लादेशमध्ये प्रशिक्षणासाठी गेला होता.. त्यालाही शिबानेच आपल्या जाळ्यात फसवलं होतं. आणि म्हणूनच या सा-या प्रकरणावर आता गांभिर्यानं पाहण्याची गरज निर्माण झालीय..
 
अधिका-याचं वागण योग्य आहे का?
भारतीय सैन्यातील एका जबाबदार अधिका-यानं वागण योग्य आहे का याच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालय.. खाजगी आयुष्यात वागू शकतो असं तोकडं समर्थन देणा-याना सैन्याना शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा एवढच त्याच आयुष्य असतं हे विधान अतिशय महत्वाचं आह. आणि यासर्वाच भान विसरुन जर एखादा जबाबदार अधिकारी सैन्य छावण्याना परदेशी मैत्रीणीसाठी सैरसपाटा करण्याचा प्लॅन आखत असेल तर ते फार गंभीर म्हणावं लागेल..
 
फेसबुकसारख्या सोशल नेटवर्क साईटसवरुनही गुप्तचर यंत्रणानी सैन्यात घुसण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधायला सुरुवात केलीय. लेफ्टनन कर्नल संजय शांडिल्य याना असच मोहवण्यात आलय... पण संजयवर हनिट्रॅप करणा-या शिबा या बांग्लादेशी युवतीनं या अगोदरही असाच प्रय़ोग केला होता त्यावेळी त्या सैन्याधिका-यानं वेळीच जबाबदार व्यक्तीपर्यंत माहिती पोहचवल्यानं त्यावेळी हनीट्रॅपचा हा प्रयोग फसला होता..
 
परदेशात पोस्टींगला असताना ISIच्या जाळ्यात अडकणा-या भारतीय सैन्यातील अधिका-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय.. ह्या लेफ्टनंट कर्नललादेखील प्रशिक्षणासाठी ढाका इथल्या स्टाफ कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं होतं.. मात्र सप्टेंबर महिन्याच्या दरम्यानं ISI च्या एका महिला गुप्तहेरानं कर्नलला आपल्या जाळ्यात ओढलं... त्या महिलेनं विवादास्पद फोटोग्राफसच्या मदतीनं कर्नलला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.
 
मात्र प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं समजताच कर्नलने भारतातील हाय कमिशनशी संपर्क साधला... प्रकरणाचं गांभीर्य ओळखून भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिका-यांनी लेफटनंन्ट कर्नलला भारतात परत बोलवून घेतलं... आता गुप्तचर संस्थेच्या मदतीने भारतीय लष्करानं या प्रकरणाचा मागोवा घेण्यास सुरूवात केलीय.. ढाकामधील किती भारतीय सैन्य अधिका-यांवर ISI नजर ठेवून आहे.?.. कोणकोणते अधिकारी ISIच्या निशाण्यावर आहेत ? आणि ISI ने त्या अधिका-यांकडून कोणती माहिती मिळवली आहे..या सा-या प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातोय.. वर्षभराच्या प्रशिक्षणादरम्यान सैन्य अधिकारी आपल्या कुटंबासह ढाक्यात वास्तव्य करतात.. मात्र हा कर्नल लेफटनंन्ट एकटाच असल्यामुळे तो हनीट्रॅपचा शिकार झाल्याचं बोललं जातय...
 
हनीट्रॅपचा प्रकार उघड 
लेफ्टनन कर्नल संजय शांडिल्यमुळे हनीट्रॅपचा प्रकार उघड झाला असला तरी भारतीय सैन्यात या अगोदरही अनेक वेळा हनीट्रॅपचे प्रकार झाल्याचं उघड झालय.. सैन्यातील अनेक रुबाबदार जवानांना सौंदर्यवतीचा वापर करत त्याच्याशी मैत्री वाढवत ही गुप्त माहिती काढण्यात येतेय.. आणि याला साक्ष आहेत इतिहासातील अनेक उदाहरण..
 
भारताच्या सैन्यावर तमाम भारतीयांना नेहमीच प्रचंड अभिमान आणि उत्कट असा अभिमान राहीलाय.. आणि त्याला कारण म्हणजे भारतीया सैन्यात असणारी कडक शिस्तप्रेम आणि जाज्वल्य देशभक्ती.. पण याच सैन्यातही ललनांमार्फत हेरगिरीची बाधा व्हायला सुरुवात झालीय की काय या भितीनं सारेच जण हादरुन गेलेय.. कारण यावेळी भारतीयांमध्ये देशाभिमान तेवत ठेवणा-या भारतीय सैन्य़ाबद्दल संवेदनशिल प्रश्न निर्माण झालाय.
 
हेरगिरीच्या कामासाठी खुबीनं वापर 
पण असं जरी असलं तरी ललनांमार्फत सैन्यातील हेरगिरीचा प्रश्न यापुर्वीही अनेकदा उदभवला गेलाय.. पुर्वी सोव्हीयत संघाचं विभाजन झाल्यापासून हा विषारी खेळ खेळण्यास सुरुवात झाली. भारतामधील सौदर्यांच्या बाजारात मागील काही वर्षापासून पूर्व सोव्हीयत देशांमधून खास येणा-या कॉलगर्लचा बोलबाला असतो. अनेक विदेशी गुप्तचर यंत्रणा या कॉलगर्लचा आपल्या हेरगिरीच्या कामासाठी मोठ्या खुबीनं वापर करुन घेतात.
 
विमानतळावर उतरल्यापासून पंचताराकित हॉटेल्समध्ये मोहवून टाकण्यापर्यंत परदेशातील या विषकन्यांची नजर शोधत असते, ती अशाच काही सावजांच्या शोधात.. सावज टिपण्यापेक्षा नेहमीच या विषकन्या सावज ठरवूनच भारतात प्रवेश करतात असंही आता समोर येतात.. आणि याकामाबद्दल त्याना भली मोठी रक्कमही अदा करण्यात येते.. आणि या सा-यात सरकारी अधिक-याना टार्गेट करण्याचं प्रमाणही वाढत चाललय.
 
आपल्या सौदर्यांच्या जाळ्यात अलगद फसवून त्यांच्याकडून अतिशय गोपनीय माहिती काढण्यात या सौदर्य़वंती नेहमीच निष्णात असतात.. या सरकारी अधिका-यांवर सौदर्यांच अस काही जाळं फेकलं जातं की कोट्यावधीच्या संपत्तीच्या मोहानही न फुटणारी महत्वाची रहस्य, ललनांच्या एका इशा-यावर मोकळी होतात, ती ही बिनदिक्कत.. लेफ्टनन कर्नल संजय शांडिल्यच्या या प्रकरणानंतर याला पुन्हा वाचा फुटली असली तरी अशा या प्रकरणांचा इतिहास फार मोठा आहे. सोव्हीयत संघ अस्तित्वात आल्यापासून विदेशी सौंदर्यवतीचा भारतीय सैन्यातील हेरगिरीसाठी वापर होतोय. आणि या हनीट्रॅपमध्ये दुर्दैवानं सैन्यातील काही अधिकारी अलगद फसलेही गेले आहेत.. आणि या सा-या गोष्टींना तार्कीक आधार आहे तो, सोव्हीयत गुप्तहेर मित्रोकीनच्या पुराव्याचा.
 

दस्तएवजांचा केजीबीच्या लायब्ररीमधून चोरी
या महत्वाच्या दस्तएवजांना केजीबीच्या लायब्ररीमधून चोरून आणण्यात तो यशस्वी ठरला होता. याच पुराव्यातून समोर आलेल्या धक्कादायक खुलाशात सोव्हीएत सौंदर्यवती हनीट्रॅपचा वापर १९५० मध्ये करुन फार मोठी हेरगिरी झाली होती. त्यावेळी नेहरु पंतप्रधान होते. मॉस्कोच्या भारतीय दूतावासातील एक उच्चपदस्थ अधिकारी हे एका रशियन सौदर्यवतीच्या जाळ्यात फसले गेले होते. केजीबीच्या फाईलमध्ये या उच्चपदस्थ अधिका-यांचे नाव प्रोकर असं होतं. आणि त्याला आपल्या जाळ्यात ओढणारी ललनेचं नाव नेव्हीयर रोव्हा अस होतं.
 
१९५६ मध्ये मॉस्कोच्या भारतीय दूतावासात आणखी एक उच्चपदस्थहा सोवियत विषकन्येच्या जाळ्यात गुरफटला होता. केजीबीच्या फाईलमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, या रशियन सौदंर्यवतीचे नाव रडार असं होतं. हेरगिरी करणा-या रशियन सौंदर्यवतीच्या जाळ्यात केवळ प्रशासकीय अधिकारीच नव्हे तर, मॉस्कोच्या भारतीय दुतावासातील एक क्लार्कदेखील अडकला होता.. रशियन विषकन्यांचे हनीट्रॅप सोव्हीयत संघापासून ते रशियापर्यंत पसरलय.. सूत्राच्या दिलेल्या पुराव्यानुसार मागील अनेक वर्षात अनेक नेते आणि उच्चपदस्थ अधिका-यांनी गोपनिय माहीती सौद्यांच्या जाळ्यात फसत दिलीय.. या सा-याची सखोल चौकशी होण्याची आज गरज आहे..
 
 
व्हिडिओ पाहा...
 

 

 

 

 

First Published: Thursday, July 12, 2012, 22:59


comments powered by Disqus