भ्रष्टाचार उघडकीस आणल्याबद्दल शिक्षा - Marathi News 24taas.com

भ्रष्टाचार उघडकीस आणल्याबद्दल शिक्षा

आशिष आंबाडे, www.24taas.com, चंद्रपूर
 
चंद्रपूर जिल्ह्यात कर्नाटक एमटा कोळसा खाण प्रकऱणात सरकारचा शंभर कोटींचा महसूल बुडाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हे उघडकीस आणणा-या विनोद खोब्रागडे या तलाठ्यावरच निलंबनाची कारवाई झाली आहे.
 
चंद्रपूरच्या कर्नाटका एमटा कोळसा खाणीने  महाराष्ट्र सरकारचा १०० कोटींचा महसूल बुडवल्याचा आरोप आहे. हे बाहेर आणणारे बरांज गावाचे तलाठी विनोद खोब्रागडे यांना निलंबित करण्यात आलंय. कर्नाटका एमटा कोळसा खाण व्यवस्थापनाने अतिरिक्त जमिनीचे उत्खनन करताना वैध सात-बारा प्राप्त केला नाही. त्यामुळे साधारण दीड महिना कंपनीने केलेले उत्खनन अवैध ठरते हे तलाठी खोब्रागडे यांनी वरिष्ठांच्या वारंवार लक्षात आणून दिले. जिल्हयातील वरिष्ठ अधिका-यांनी कोळसा खाण व्यवस्थापनाशी संगनमत करून सरकारचे १०० कोटींचे नुकसान केल्याचं त्यांचे म्हणणे आहे.
 
अखेर शासकीय सेवाशर्तींचा आधार घेत माध्यमांना माहिती पुरविल्याचा ठपका ठेवत खोब्रागडे यांना निलंबित करण्यात आले. याविरोधात विनोद खोब्रागडे न्यायालयातही दाद मागण्याच्या तयारीत आहेत.
 
कर्नाटका एमटा कोळसा खाणीच्या अवैध उत्खननाविरोधात निर्णय देण्यासाठी प्रशासनानं सहा-सहा महिने विलंब लावला. मात्र जिल्हा प्रशासनाने खोब्रागडे यांचे निलंबन मात्र तातडीने केले.  खोब्रागडे यांच्या सारख्या धाडसी तलाठ्यांवर कारवाई करुन सरकारनं इतरांना एक प्रकारे इशाराच दिलाय.
 
 

First Published: Monday, July 16, 2012, 21:33


comments powered by Disqus