सुनिताची अंतराळवारी - Marathi News 24taas.com

सुनिताची अंतराळवारी

Tag:  
www.24taas.com, मुंबई
 
नाव - सुनीता पांड्या - विल्यम्स
 
वय - ४३ वर्ष
 
घर - ४७० किलोमीटर उंचीवर तयार केलेलं स्पेस स्टेशन.
 
'सुनीता विल्यम्स' हे नाव जगभरात आता गाजतय मूळ भारतीय असेलल्या सुनिताचा तर भारताला मोठा अभिमान आहे. मात्र जगभरातल्या अब्जावधी लोकांमधुन पुन्हा सुनिताचीच का झाली निवड ? सुनिता विल्यम्सच्या खडतर आणि आव्हानात्मक प्रवासावर टाकूयात एक नजर..
 
19 सप्टेंबर 1965 ला मूळ भारतीय वंशाचे न्यूरोएनोटॉमिस्ट दिपक पंड्या यांच्या घरी जन्मलेली सुनीताआधी पासूनच काहिशी वेगळी होती. शाळेत ती कठीणात कठीण फॉर्मुले चटकन सोडवत असे. सुनिताने संयुक्त राष्ट्र नौसेना एकॅडमीतून फिजिक्सची पदवी घेतली आणि नंतर फ्लोरीडातून इंजिनियरींग मॅनेजमेंटची...
 
1987 ला सुनिता नौसेनेत दाखल झाली. तिथं तिला डायविंग ऑफीसरचा दर्जा देण्यात आला आणि नंतर तिची नियुक्ती नौसेना एअरविंग कमांडमध्ये करण्यात आली. अमेरिकेच्या फायटर हेलिकॉप्टरमध्ये तिची काही काळ नियुक्ती होती. आखाती युध्दादरम्यान सुनीताची अनेक महत्वाच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती.
 
नौसेनेची टेस्ट पायलट सुनीता
 
सुनिता विल्यम्सने प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिध्द केलं. इतकंच नाही तर इतरांपेक्षा कैक पटीने सरस असल्याचे तिने दाखवून दिलं. आणि त्याचमुळे तिला हेलिकॉप्टचे टेस्ट पायलट बनवण्यात आलं. सुनीताने अमेरिकन नौसेनेसाठी रोटरी विंग एअरक्राफ्ट टेस्टिंग अंतर्गत अनेक हेलिकॉप्टर्सच्या यशस्वी चाचण्या केल्या. सगळ्यात अत्याधुनिक आणि सर्वोत्तम हेलिकॉप्टर अपाची आणि युएच-60 च्याही चाचण्या तिनं केल्या. 3 हजार तासाहूनही अधिक काळ तिनं हेलिकॉप्टर आणि विमान उडवली आणि ती ही कुठलीही चूक न करता आणि म्हणुनच तिच्या या सुंवर्ण कारकिर्दी कडे पाहूनच तिची फ्लाईट इंजिनियर म्हणुन नियुक्ती करण्यात आली.
 
1998 मध्ये नासात दाखल
 
1998 साली नासात दाखल होताच सुनितानं तिथलं प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण तर केलंच शिवाय या सगळ्या तांत्रिक बाबीतही ती अव्वल ठरली.
 
प्रोजेक्ट NEEMO मध्ये ही सुनीताचा सहभाग
 
समुद्रातल्या सगळ्यात खोल भागात सुनीतानं जास्तीत जास्त दबाव सहन करण्याचं ट्रेनिंग घेतलं. या प्रशिक्षणातही ती पुरूषांपेक्षा अव्वल ठरली ..आणि अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवसी सुनीताने स्पेस शटल डिस्कवरीतून अंतराळात पहिली भारारी घेतली.
 
9 डिसेंबर 2006 सुनीताचं पहिलं उड्डाण
 
सुनितानं अंतराळातल्या स्पेस स्टेशनमध्ये अनेक महत्वाचे प्रयोग केले ज्यात विद्यार्थ्यांना प्रचंड फायदेशीर ठरलेली दोन रेडीओ सिग्नल यंत्रणेचाही समावेश आहे.सुनीता 195 दिवस अंतराळात राहिली आणि परत आल्यानंतर तिने सगळ्या जगाला विशेषतः भारतीयांना आपल्या अंतराळातील विविध शोध आणि प्रयोगाबद्दल महत्वाची माहिती दिली.
 
सुनीताने अंतराळात झेप घेतली तो क्षण अविस्मरणीय असाच होता अंतराळात झेपावणा-या सुनीताच्या चेह-यावरचे भाव आणि तिचा आत्मविश्वास तमाम महिलासाठी प्रेरणादायी आहे. गुजराती जेवणाची शौकीन नासाच्या सुनीता विल्यम्सनं स्पेसक्राफ्टचा ताबा घेतला.
 
प्रचंड वेगानं अवकाशात झेपावणारं स्पेसक्राफ्ट चालवताना या भारतीय मुलीच्या चेह-यावर भीतीचा अगदी लवलेशही नव्हता. सुनिता आपल्या मुलीसोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी सोबत घेवून अतंराळात जातांना अत्यंत खुश होती. रशियाच्या रॉकेटनं आपलं काम चोख बजावताच त्याच्या निर्मात्यांचं तिनं अभिनंदन केलं.
 
एकेकाळी अमेरिकी वायूसेनेची टेस्ट पायलट असणारी सुनीता शुन्य गुरूत्वाकर्षण असणा-या अंतराळात असं यान चालवतेय जे 28 हजार प्रतितास वेगानं पृथ्वीच्या भोवती फिरतंय.
 
सगळं ठीक आहे...मी कंट्रोल घेतला आहे
 
मूळ भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आकाशात झेपावली आणि तिने सगळ ठीक आहे मी कंट्रोल घेतलाय असा संदेश कंट्रोल रूमला पाठवला आणि या मोहिमेसाठी प्राणपणाने कठोर मेहनत करणाऱ्या संपुर्ण टिमनं एकच जल्लोष केला.
 
अंतराळात मी स्पेसक्राफ्टचा ताबा घेतला आहे. .मूळ भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सच्या या संदेशानं तिच्या घरच्यापेक्षा जास्त खुश झाले ते रशिया जपान आणि अमेरिकेचे शास्त्रज्ञ .कारण सुनीतानं मोहिमेची सूत्रं आपल्या हाती घेतल्यानं आता कुठेही चूक होण्याची शक्यता आता नाही या विचाराने ते निश्चिंत झाले होते.
 
१५ जुलैच्या रविवारी सकाळी आठ वाजून 10 मिनिटांनी कजाकिस्तानच्या बैकानूर इथुन सोयुज रॉकेट अवकाशात झेपावले होते. या रॉकेटच्या वरच्या भागात स्पेसक्राफ्ट फिट करण्यात आलं होतं. ज्यात अंतराळवीर सुनीता विल्याम्स आपल्या दोघा सहका-यांसह होती. जवळपास 40 हजार किलोमीटर प्रतितास वेगाने झेपावणा-या रॉकेटने अंतरिक्षात प्रवेश केला जिथं शून्याच्या दहाव्या भागाइतकी गडबडही अपघाताला कारण ठरू शकली असती...आणि त्यामुळेच अंतराळात सुखरूप पोहचल्यावर सुनितानं रशियन रॉकेट निर्मात्यांच अभिनंदन केलं. आणि कंट्रोलरुमधला प्रत्येक जण आनंदान नाचायला लागला.
 
सुनीता विल्यम्स अंतराळात जे काम करत आहे. ते काम करण्याची क्षमता जगातल्या सात अब्ज लोकांपैकी काही मोजक्याच लोकांत असते ..हवा आणि गुरूत्वाकर्षणाशिवाय स्पेसक्राफ्ट चालवण्याचं तंत्रज्ञान चालवण्याची क्षमता सुनितामध्ये आहे. सुनिता विल्यम्स सध्या अशा ठिकाणी स्पेसक्राफ्ट चालवतेय जिथं ना हवा आहे ना गुरूत्वाकर्षण. एक छोटी चूकही भारी पडू शकते ...पण सुनीला अशा अवघड परिस्थितीतून मार्ग काढण्याची सवय झालीय आणि हीच तिची खासियत आहे.
 
स्पेशस्टेशन पर्यंत जाण्यासाठी सुनिताचा सहकारी मेलेनचला त्याच्या मुलीनं बाहुली भेट दिली होती. सुनीताच्या नेत्तृत्वाखाली तिनही अंतराळात प्रवेश केलाय. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनाचा सगळा क्रू देखील याची आतुरतेनं वाट पहात होता .. भारताची ही कन्या दुस-यांदा अंतराळात दाखल झालीय. याचा आनंद सगळा देश साजरा करतोय
 
या आधी अंतराळात 195 दिवस घालवलेल्या सुनीताची ही दुसरी अंतराळयात्रा आहे. यावेळी सुनीता महिन्याहून अधिका काळ अंतराळात राहणार आहे. तसंच अनेक महत्वाची माहिती गोळा करणार आहे.
 
सुनीताच्या स्पेसक्राफ्टनं अवकाशात झेप घेतली आणि अंतराळात पोहचण्यासाठी तिच्या यानाला लागले आठ मिनीट मात्र हे आठ मिनीट या मोहिमेसाठी जिवापाड मेहनत करणा-या शास्त्रज्ञाना आठ युगासारखे भासले पण अखेर अनुभवी अंतराळवीर सुनीताचा संदेश आला आणि एकच जल्लोष झाला. साडेसात टन वजनाच्या स्पेसक्राफ्टनं जेंव्हा अंतराळात झेप घ्यायला सुरुवात केली तेंव्हा अमेरिकेपासून रशियापर्यंत आणि भारतासह जगभरातल्या सगळ्यांचाच श्वास काही काळ रोखला गेला होता.
 
मिनिटांचा थरार...
जगातली आजपर्यंतची सर्वात मोठी झेप घेणा-या या स्पेसक्राफ्टला अंतराळात पोहचायला आठ मिनिटांचा वेळ लागला. हाच तो वेळ ज्या वेळेत सर्व शास्त्रज्ञ अत्यंत दक्ष आणि तेवढ्याच तणावाखाली होते. यंत्रात कुठला बिघाड तर होणार नाही ना ? काही बरंवाईट तर होणार नाही ना ? ही भिती त्यांना सतावत होती. कारण यापुर्वीही अशा उड्डाणांच्यावेळी अपघात झालेले आहेत.
 
सुनीताची ही सफर यशस्वी व्हावी यासाठी जगभर प्रार्थना केली जात होती. अमेरिका रशिया आणि भारतातही दुवा मागितली जात होती. उड्डानानंतर तिस-या मिनिटाला सगळ्यांनी काही प्रमाणात सुटकेचा निश्वास टाकला. जेंव्हा स्पेसक्राफ्टमध्ये बसलेल्या सुनिता विल्यम्सचा संदेश आला. रॉकेट पुढं झेपावत होतं. मात्र अजूनही त्याचा पाच मिनिटांचा चित्तथरारक प्रवास बाकी होता. या पाच मिनिटात काहीही होऊ शकत होतं. पाचव्या मिनिटाला दुसरा दिलासा मिळाला.
 
४० हजार किलोमीटर प्रतितास वेगानं रॉकेट अंतरळात झेपावत होतं. अशावेळी थोडी जरी चूक झाली असती तरी संपूर्ण जग हादरुन गेलं असतं. आणि त्याचवेळी एअरक्राफ्टमधून येणारे संदेश बंद झाले.. काही क्षण सगळेच स्तब्ध झाले.. मात्र काही सेकंदातच सुनीताचा आवाज आला...आम्ही सगळे सुरक्षित आहोत...
 
सुनीताच्या स्पेसक्राफ्टचा आत्तापर्यंतचा प्रवास सुखरूप झाला मात्र दीर्घ अनुभव असेलेल्या सुनिताला आता पुढचे चार महिने डोळ्यात तेल घालून आपली मोहिम यशस्वी करायची आहे काय आहेत तिच्या पुढची आव्हाने -
 
पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडताना सुनीताच्या पुढे चार आव्हानं होती. अंतराळात प्रवेश करुन तिनं ती चार आव्हानं लिलया पेलली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुनीता अंतराळात तब्बल चार महिने राहणार आहे. त्यासाठी स्वतःला फिट ठेवण्याचं मोठं आव्हान तिनं आत्तापर्यंत तरी पेललंय. यापुढच्या चार महिन्यात प्रत्येक दिवस आणि प्रत्येक सेकंद तिला डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे.
 
सुनितापुढचं आव्हान - ५
स्पेसक्राफ्ट स्पेस स्टेशनवर उतरवणे
सुनितापुढचं पाचवं आव्हान म्हणजे स्पेसक्राफ्ट स्पेस स्टेशनवर उतरवणं. यामध्ये थोडीजरी चूक झाली तर मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळं प्रत्येक क्षणाला तिला अत्यंत काळजीपूर्व काम करावं लागणार आहे.
 
सुनितापुढचं आव्हान - ६
जपानी बनावटीचं रॉकेट कार्यान्वित करणे
स्पेस स्टेशनवर पोहचल्यानंतर सुनिताला जपानकडून येणा-या रॉकेटला कार्यान्वित करण्याचं आवाहन आहे. यामध्ये सर्वात मोठी अडचण अशी आहे की जपानी रॉकेटमध्ये बसता येणार नाही. त्याच्यावर बाहेरुनच नियंत्रण ठेवावं लागणार आहे.
 
सुनितापुढचं आव्हान - ७
अंतराळात चालणे
सुनिता जेंव्हा पहिल्यांदा अंतराळात गेली होती तेंव्हा तिचा कॅमेरा तिच्या हातातून निसटला होता. त्यामुळं बरीच गडबड झाली होती. त्यावेळी सुनिता थोडी जरी गोंधळली असती तरी मोठा अपघात झाला असता. यावेळीही अंतराळात अत्यंत काळजीपूर्वक चालावं लागणार आहे. या आव्हानाची तिनं जोरदार तयारी केलीय.
 
सुनितापुढचं आव्हान - ८
अंतरळात मॅराथॉनचा विक्रम मोडणे
अंतराळात ज्या ठिकाणी गरुत्वाकर्षण अत्यंत कमी असतं अशा ठिकाणी सुनिताला बरच अंतर चालावं लागणार आहे. कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या ठिकाणी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचं मोठं आव्हान सुनितापुढं आहे.
 
सुनितापुढंच आव्हान - ९
मंगळ आणि चंद्रावरची माहिती गोळा करणे
या दोन्ही ग्रहांवरची माहिती गोळा करण्याचं मोठं आव्हान सुनितापुढं असणार आहे. अशा कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या ठिकाणी मानवाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागेल याचा अभ्यास तिला करावा लागणार आहे.
 
सुनितापुढचं आव्हान - १०
४०० किलोमीटर झेप घेण्याचं आव्हान
सुनिताला पृथ्वीवर परतण्यासाठी ४०० किलोमीटर उंच झेप घ्यावी लागणार आहे. एकेकाळी अमेरिकेकडे असलेली डिस्कवरी नावाची एअरक्राफ्ट सध्या त्यांच्याकडं नाहीत. त्यामुळं पृथ्वीवर उतरण्यासाठी तिला पॅराशूटची मदत घ्यावी लागणार आहे.
 

First Published: Monday, July 16, 2012, 23:30


comments powered by Disqus