Last Updated: Tuesday, July 17, 2012, 21:00
www.24taas.com, कोल्हापूर कोल्हापूर शहराजवळच्या मोरेवाडी भागात काही तरूणांनी दहशत माजवली होती. रात्री अपरात्री चाकू, तलवारी घेऊन फिरणे, मुलांना आणि लोकांना धमकावत दहशत निर्माण केली जात होती. त्यांना पोलीसांनी कोल्हापूरी हिसका दाखवला.
कोल्हापूर शहराजवळच्या मोरेवाडी भागात बेलगाम झालेल्या तरूणांना पोलिसांनी कोल्हापूरी हिसका दाखवला. गेल्या काही दिवसांपासून तरुणांच्या टोळक्यानं या परिसरात दहशत माजवली होती. रात्री अपरात्री चाकू, तलवारी घेऊन फिरणे, मुलांना आणि लोकांना धमकावत दहशत निर्माण केली जात होती. याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर या टोळक्याला पोलीसांनी चांगलाच कोल्हापूरी हिसका दाखवला. दहशत माजविणा-या तरूणांना मोरेवाडी भागात फिरवून चांगलेच झोडपून काढले. त्यामुळं नेहमीच्या दहशतीला कंटाळलेल्या लोकांनीही समाधान व्यक्त केलंय.
भांडणाबाबत पोलिसांना का माहिती दिली या छोट्या कारणावरून या टोळक्यानं तलवारीनं आणि गजानं मारहाण केली. यातील चार जणांना अटक करण्यात आली असून आणखी तिघांचा शोध सुरु आहे.
पोलिसांचं हे कृत्य कायद्याला धरून नाही. मात्र, ज्यावेळी लोकांच्या मनात भीती निर्माण होते. त्यावेळी त्यांना आधार देण्याचं काम सामाजिक जबाबदारी म्हणून पोलिसांना बजावावं लागतं. त्याच भावनेतून पोलिसांनी या टोळक्याला मोरेवाडीतून फिरवलं आणि लोकांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला.
First Published: Tuesday, July 17, 2012, 21:00