Last Updated: Friday, July 20, 2012, 00:30
www.24taas.com, मुंबई दूरसंचार मंत्रालयाच्या नव्या संकेतानुसार आता देशभरातल्या सा-याच मोबाईल टॉवरवर आता नियंत्रण येणार आहे. १ सप्टेंबर पासून हा निर्णय लागू होणार आहे. मोबाईल टॉवरमधून निघणारं रेडिएशन हे आता ९० टक्यांनी कमी करण्यात येणार आहे. आणि एकूणच हा अहवाल समोर आल्यानं प्रत्येक सर्वसामान्याला दिलासा मिळाला असला तरी हा धोका किती गंभीर होता याचं चित्रही स्पष्ट झालंय.
जर तुम्हीही मोबाईल टॉवरमधून निघणा-या रेडिएशन आणि त्यातून उदभवणा-या आजारांमुळे जर तुम्ही चिंतीत असाल तर आता मात्र तुमच्यासाठी खुषखबर आहे. मोबाईल टॉवरमधून येणा-या रेडिएशनमुळे होणा-या आजारांपासुन सुटका देण्यासाठी आता १ सप्टेंबर पासून नवा नियम लागू होणार नाही. १ सप्टेंबर पासून देशभरात मोबाईल टॉवरमधून निघणा-या रेडिएशन सध्याचं असलेला स्तर कमी करुन ९० टक्यांन घटवण्यात येणार आहे. दूरसंचार मंत्रालयाच्या एक नव्य़ा कमीटीने दिलेल्या सूचनानुसार ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भारतात सध्या रेडिएशन एक्सपोझर लिमिट हे ९.२ व्हॅट प्रति वर्ग मीटर आहे. त्याला नियंत्रित करुन वजा ९२ व्हॅट प्रति वर्ग मीटर करण्यात येणार आहे
जाणकारांच्या म्हणण्यानुसार रे़डिएशन एक्सपोझर लिमीट कमी केल्यामुळे आरोग्यावर विपरीत परीणाम होण्याचा धोका कमी होणार आहे. अस असलं तरी मोबाईल नेटवर्क कंपन्यानी मात्र याला विरोध करण्याचं ठरवलय.. मोबाईल कंपन्याच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रोमॅग्निटिक फिल्ड लिमीट कमी केल्यामुळे लोकांच्या प्रकृतीत लगेचच सुधारणा होणार नसली तरी मोबाईल कंपन्याचे नेटवर्कवर मात्र याचा परीणाम होणार आहे. मोबाईल कंपन्याच्या म्हणण्य़ानुसार सरकारच्या या निर्णयाचा मोबाईल नेटवर्कवर प्रचंड परीणाम होणार आहे. त्याचप्रमाणं मोबाईल फोनची बॅटरीचा टॉकटाईमही कमी होईल. टेलिकॉम ऑपरेटर कंपन्याच्या दाव्यानुसार मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे आरोग्यावर परिणाम होतोय हा निव्वळ अपप्रचार करण्यात येतोय..
आपल्या देशाची रेडिएशन एक्सपोझरची मर्यादा ही रशिया आणि चीनच्या तुलनेत फार प्रचंड आहे. रशिय़ाची रेडीएशन एक्सपोझर लिमीट उणे व्हॅट प्रती मीटर आहे आणि चीनची ०.४ व्हॅट प्रति मीटर आहे. आणि म्हणूनच भारतातला मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा धोका हा चिंतेचा विषय ठरलाय. कधी काळी खुशीचा आणि आनंदाचा संदेश देणारा मोबाईल वास्तवात मात्र आता आजारी पाडू लागलाय. देशभरातल्य़ा एक करो़ड लोकांवर सध्य़ा जे आजाराचं सावट आहे, त्यातील प्रमुख कारण म्हणजे मोबाईलचे टॉवर.. सरकार पण देशातल्या या मोबाईलच्या वाढत्या टॉवरमुळे चिंतेत पडलय..यामागची नेमकी कारण काय आहेत त्यावर नजर.
मोबाईल फोन..शेकडो कोसांच अंतर मिटवणारा ही आजघडीची सर्वांच्या प्राणप्रिय असलेली वस्तू ..केवळ घर दारच नाही तर जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तुमचा त्या व्यक्तीशी मोबाईलवरुन संपर्क होण आता अवघड राहीलेलं नाही.. पण याच आनंददायी बनलेल्या मोबाईलच्या टॉवरमुळे आता संकटात भर पडतेय. मोबाईल टॉवरच्या रेडीएशनमुळे मानवी आयुष्य अनेक आजारांना निमंत्रण देतंय..
९० कोटी लोकांच्या आयुष्याचा प्रश्न ?जर तुम्हीही या ९० करोड लोकांमधील एक मोबाईल वापरणारे असाल तर सावधान... कारण तुमच्या खिशात, कानात, घरात, ऑफिसात, प्रत्येक ठिकाणी मोबाईलच्या रुपानं हा धोका तुमचा पाठलाग करतोय. जाणकारांच्या म्हणण्यानुसार मोबाईलला सिग्नल देणारे टॉवर हे या संकटाचं खर कारण मानल जातय. आजारी व्यक्तीच्या भागांचे सर्वेक्षण केल्यास मोबाईल टॉवरमधुन होणार रेडिएशन हे धोकादायक आहे.. .गेल्या काही दिवसात मोबाईल टॉवर जवळ राहणा-या अनेक लोकांना वेगवेगळ्या आजाराशी सामना करावा लागण्याचे प्रकार वाढलेयत.. आणि म्हणूनच आता सरकारनं मोबाईलच्या टॉवरवर निर्बंध लावण्याचे सरकारनं नक्की केलय..भारतात वाढत असलेल्या मोबाईलच्या वापराचा आणि टॉवरमुळे होणा-या रेडिएशनला पाहता आता सरकारनं मोबाईलच्या रेडिएशनवर क़डक कायदे करण्याचे नक्की केलय..
भारतात १ सप्टेंबरपासून मोबाईलच्या रेडिएशनचा स्तर ९.२ व्हॅट प्रतिवर्ग मीटरनं कमी होऊन ०.९२ व्हॅट प्रति वर्ग मीटर केल जाईल. .याचाच अर्थ मोबाईलचे रेडीएशन आता जवळजवळ ९० टक्यांन कमी होईल. रेडिएशन कमी केल्यामुळे त्याचा फायदा आता सुमारे ९० कोटी जनतेला फायदा होणार आहे..
मोबाईल टॉवरमधील रेडिएशन कमी केल्यामुळे भविष्यात रेडिएशनमुळे होणारं आजार कमी होण्याची शक्यता आहे. पण मोबाईल कंपन्यानी मात्र याला विरोध करायला सुरुवात केलीय. या नव्या निर्णयामुळे मोबाईल सेवेवर याचा प्रचंड परिणाम होणार आहे. रेडिएशन कमी केल्यामुळे नेटवर्कचे सिग्नल कमजोर होण्याची त्याप्रमाणं मोबाईलची बॅटरी वारंवार उतरण्याचे प्रकार वाढतील अशी भिती नेटवर्क कंपन्यानी व्यक्त केलीय..

मोबाईल रेडिएशनचा स्तर कमी केल्याचे वेगवेगळे परिणाम समोर येत असल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटलय.. पण अस जरी असलं तरी रशिया, चीन आणि पोलंड यासारख्या देशांमध्ये मात्र क़डक कायदे करुन रेडिएशन घटवल्याचे सकारात्मक पडसाद दिसतायत ही बाब अधोरेखित करावं लागतंय.मोबाईल टॉवरमुळे मोबाईलधारकांनाच नव्हे तर वेळप्रसंगी संपुर्ण कुटूंबालाही वेगवेगळ्या आजाराला सामोरं जावं लागतय. मोबाईलमधून बाहेर पडणारे इलेक्ट्रोमेग्नेटिक रेडिएशन मानवी आरोग्यावर प्रचंड परिणाम करतायत.. आणि हा धक्कादायक पण विश्वसनीय खुलासा उघ़ड झालाय तो, इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालात....
मोबाईलचा दणकट सिग्नल पाहून तुम्ही आनंदून जात असाल तर यावेळेला मात्र विचार करा.. कारण मोबाईलच्या स्क्रिन वर जेवढा जास्त आणि पॉवरफुल्ल सिग्नल म्हणजे तुमच्या जवळ असणा-या मोबाईल टॉवरचे रेडिएशन हे अतिशय स्ट्रॉंग असल्याच लक्षण आहे. पण सिग्नल जास्त आहे म्हणून आनंदून गेला असाल तर त्याचवेळी त्या सिग्नलचा तुमच्या आयुष्यावर होणा-या विपरीत परिणांमावरही आता गंभीरतेनं लक्ष द्या.. देशभरात झालेल्या अभ्यासानंतर दूरसंचार खात्यानं पण हे जाहीर केलय, मोबाईलच्या फोनच्या अतिरिक्त वापरामुळे सुमारे ९० कोटी लोकांना कॅन्सरचा धोका हा सुमारे ४०० पटींनी वाढलाय...
रिसर्चने समोर मांडलेल्या अहवालानुसार मोबाईलच्या रेडिएशनचे विपरीत परीणाम असल्याचे समोर येतय़.. प्रामुख्यानं या मोबाईलच्या रेडिएशनचे महिला आणि मुलांमध्ये अतिशय झपाट्यानं दुष्परिणाम होत असल्याचं आढळून आलय.. शाळा आणि निवासी परिसरात असलेल्या मोबाईल टॉवरमुळे धोका अधिकच वाढलाय.. मोबाईलचं संकट केवळ ब्रेन ट्युमरपर्यंत मर्यादित राहीला नाहीय तर त्याचे शरीरातील इतर अवयवावरही परिणाम दिसून आलाय..
दूरसंचार मंत्रालयाच्या अहवालानुसार मोबाईलच्य़ा अतिवापरामुळे स्मृतीभ्रंशाचा धोका जास्त जाणवतोय.. त्याचप्रमाणं एकण्याची क्षमताही कमी होण्याचे प्रकार वाढतोय. आणि विशेष म्हणजे या अहवलात नमूद केल्याप्रमाणं मोबाईलच्या अतिवापरानं त्वचारोगालाही आमंत्रण मिळतंय.
अहवालात समोर आलेल्या माहीतीनुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदूखी आणि अशक्तपणा वाढल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यायत.. लोकांची सतर्क राहण्याची क्षमताही यामुळे नष्ट होत चाललीय.. केवळ माणसालाच नाही तर मोबाईलच्या नेटवर्कमुळे पशू प्राण्यांनाही त्याचे परिणाम सहन करावे लागतायत.. याच मोबाईलच्या रेडिएशनमुळे घटत जाणारं चिमण्यांचे प्रमाण हे आता जवळजवळ हद्दपार झाल्यात जमा झालय.. आणि एकूणच संकटाचे वाढत प्रमाण पाहूनच सरकारनं आता टॉवरच्या रेडिएशनवर मर्यादा आणण्याचे नक्की केलय.
मोबाईलच्या रेडिएशनमुळे कॅन्सर होत नाही हा दावा सेल नेटवर्क कंपन्या छातीठोकपणे करत असल्या तरी वास्तव काही वेगळचं आहे. मोबाईलच्या रेडिएशनचा परिणाम झालेल्या रुग्णांची परिस्थीती ही आता वाढत चाललीय.. आणि म्हणुनच या सा-या प्रकाराकडे गंभीरतेनं पाहण्य़ाची गरज निर्माण झालीय. घराच्या समोर असणारा हा मोबाईलचा टॉवर आजाराचे कारण बनलाय. जयपूर केसी स्कीम परीसरात राहणा-या संजय कासलीवाल यांना मार्च महिन्यात ब्रेन ट्य़ुमरचा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला. त्याच्या उपचारासाठी भलीमोठी रक्कम खर्च केली. पण या आजारपणात खर्च होत असतानाच, समजल की, त्याचा भाऊ प्रमोद हा देखील कॅन्सरचा शिकार बनलाय.. केवळ एवढच नाही तर त्याच्या पाळीव कुत्र्याच्या पोटातही एक कॅन्सरची गाठ आलीय. यावरील उपचारासाठी त्यांना अमेरिकेला जाण भाग पडलं. आणि म्हणूनच सा-याना हा प्रश्न पडला की एकाच वेळी सा-याना या व्याधीनं कसं पकडलं.. आणि त्यावेळी समोर आलेलं सत्य हे भयानक होतं.

संजय आणि प्रमोद दोघेही कॅन्सर वर उपचार घेतायत.. त्यांच्या म्हणण्यानुसार दहा वर्षापुर्वी त्यांच्या घरासमोर चार मोबाईल टॉवर आहेत. आणि त्यांना रेडिएशनच्या धोक्याचा अंदाज येईपर्यंत त्याना आजारानं पक़डलं होतं.. या दोघांच्या आजारपणानंतर आता प्रशासनानं अवैध टॉवरवर कारवाई करण्याला सुरुवात केलीय
देशभरातील स्थानिक प्रशासनानं आता मोबाईल टॉवरवर कारवाई करायला केलीय पण महाराष्ट्रात अजुनही याचे गांभिर्य ओळखले जात नाहीय.. आणि म्हणुनच या धोक्याला कस नियंत्रित करणार हा प्रश्न होता. .मात्र आता थेट सरकारनंच मोबाईलच्या रेडिएशन टॉवरवर कारवाई करण्याचे नक्की केल्यानं काही अंशी का होईना यातून सुटका मिळणार आहे. आज मोबाईलचे टॉवर हा चिंतेचा विषय बनलाय.. याला पहिले कारण आहे ते मोबाईलचे रेडिएशन आणि दूसरं लोकवस्तीत बांधण्यात आलेले अवैध टॉवर... या टॉवरची वाढती संख्या आज गंभीरतेने पाहण्याची गरज निर्माण झालीय
मोबाईलधारक बिनधास्तपणे मोबाईलचा वापर करतायत हे दृष्य जाल तिथ हमखास दिसतचं... प्रत्येक भागात मोबाईलचे टॉवर असल्यानं प्रत्येकाला नेटवर्कही दमदार मिळतचं... आणि म्हणूनच कुठेही गेलात तरी शक्यतो नेटवर्क तुटत नाहीचं.. आणि याला सर्वात मोठं कारण ठरतय़ं ते शहराशहरात आणि सोसायट्याच्या गच्च्यांवर सर्रास उभारले जाणारे हे मोबाईल टॉवर.. उभारल्या गेलेल्या टॉवरपैकी अनेक टॉवर हे दाट लोकवस्ती असलेल्या भागात आहेत. हे टॉवर उभारताना नेटवर्क देणं आणि त्याठिकाणी मोबाईल ग्राहकांची संख्या वाढवणं एवढचं विचार नेटवर्क कंपन्या करतात.. पण हे करताना दाट लोकवस्तीतील मोबाईल टॉवर हे धोकादायक बनलेयत.. ही समस्या केवळ रहीवाशी परीसरातील टॉवर नसून प्रत्येक शहरात वाढले गेलेले अवैध टॉवर हेही चिंतेचे विषय बनले आहेत..
मोबाईल टॉवरच्या मनमानी कारभारामुळे अवैध मोबाईल टॉवरला वारेमाप मोकळीक दिली गेल्याचाचा आरोप ATTD ने केलाय. आणि म्हणूनच मोबाईलधारकांचा धोका वाढलाय. नियमांनुसार शाळा, रूग्णालय, निवासी संकुल, ग्रुप हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारले जावू नयेत.. पण नेटवर्क मिळत नाही या गोंडस नावाखाली मोबाईल कंपन्यानी सर्वत्र ट़ॉवर उभारलेयत.. आणि म्हणूनच टॉवरच्या परिसरातील नागरीकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतय.. एवढच नाही तर मोबाईल टॉवर उभारतेवेळी फायर ब्रिगेड आणि अन्य आवश्यक विभागांची परवानगी घेतली जात नाही. हे बेकायदेशीर टॉवर बहुतांशी असल्याचे वारंवार आढळून आलय.. टॉवरच्या रेडिएशन बरोबरच आता या बेकायदेशीर टॉवर वर कारवाईचा बडगा उगारण्याची आवश्यकता निर्माण झालीय..
First Published: Friday, July 20, 2012, 00:30