Last Updated: Saturday, July 21, 2012, 18:32
www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबादच्या बुद्ध लेणी परिसरातल्या पायथ्याशीच वीटभट्टी मालकांकडून खोदकाम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे.
बुद्धलेणी परिसरातील लेणी ही जवळपास दीड हजार वर्ष जुनी आहेत. भारतीय पुरातत्व खात्याच्या कायद्यानुसार या परिसरात २०० मीटरपर्यंत कुठलीही विनापरवानगी खोदकाम किंवा बांधकाम करता येत नाही. मात्र, या परिसरात सर्रास खोदकाम सुरु आहे. या परिसरात हर्सुल तलावाच्या बाजूला वीटभट्ट्या आहेत. त्यामुळे हे वीटभट्टी मालक मुरुमासाठी बेकायदा या परिसराचे खोदकाम करत आहेत. अनेक छोटे डोंगर या वीटभट्टी मालकांनी पोखरून काढलेत. त्यामुळे या संपूर्ण परिसरात मोठमोठे खड्डे निर्माण झालेत.
राजरोसपणे यापरिसरात हा प्रकार सुरू आहे. याबाबत प्रशासनानं तर डोळ्यावर पट्टी बांधून घेतलीय. तर पुरात्तव विभाग ‘आमची सीमा लेण्यांपासून फक्त २०० मीटरची असल्याचं’ सांगत हात वर करत आहेत. मात्र, या खोदकामामुळे या ऐतिहासिक लेण्यांना धोका पोहचू शकतो. डोंगर खचल्यानं लेण्या कोसळू शकतात. मात्र, याचा ना जिल्हा प्रशासन विचार करतंय ना पुरात्तव विभाग... इथली दृश्यं पाहिल्यानंतर तरी प्रशासनाने कारवाई करावी ही अपेक्षा आहे.
आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी इथल्या परिस्थितीचा घेतलेला हा मागोवा...
व्हिडिओ पाहा :
.
First Published: Saturday, July 21, 2012, 18:32