Last Updated: Tuesday, July 24, 2012, 00:07
www.24taas.com, मुंबई जिवंतपणी आख्यायिका बनलेल्या सुपरस्टारची आणखी एक कहाणी !एकाकीपणातही कोणी दिली काकाला शेवटपर्यंत साथ ?सुपरस्टारच्या संपत्तीचा मिळणार का 'ति'ला ताबा ?२०० कोटीच्या संपत्तीचा कोण ठऱणार वारसदार ? 'आनंद'ची प्रेम कहाणी 
आराधना चित्रपट सुपरहिट झाल्यावर राजेश खन्ना हे ख-या अर्थाने सुपरस्टार झाले.. आणि याच सुपरस्टारच्या प्रेमात हजारो तरुणी आकंठ बुडाल्या.. कित्य़ेक तरुणींनी सुपरस्टारच्या फोटोसोबतही विवाह केला होता.. अशी कुणाचीही दृष्ट लागावी अस ग्लॅमर लाभलेल्या या सुपरस्टारच्या खाजगी आयुष्यातही अनेक वादळांनी प्रवेश केला होता.. अंजू महेद्रुपासून ही सौंदर्यवादळे निताच्या निमीत्तान आज पुन्हा एकदा चर्चेत आलीय. अनिता अडवाणी यांच्या कायदेशीर नोटीसीनं या सा-या प्रकरणाला एक वेगळच वळण मिळतय. बॉलिवुड सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आशीर्वाद बंगल्यावरुन हा वाद रंगू लागलाय. अनिताच्या म्हणण्यानुसार, आशीर्वाद या बंगल्यात म्युझियम कराव अशी राजेश खन्ना यांची इच्छा होती.. पण अस जरी असलं तरी आपण इतर हक्कासाठी लढू अस म्हणत अनिता यानी या सा-या प्रकरणातला ट्विस्ट कायम ठेवलाय.. आशीर्वाद, सुपरस्टार राजेश खन्ना आणि अनिता अ़डवाणी. या तिन्ही नावांनी केवळ बॉलीवुडमध्येच नाही तर देशभरात अनेक चर्चांना जन्म दिलाय.. कारण यामागे दडलाय कोट्यवधी संपत्तीचा मामला. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या मृत्यूच्या अवघ्या काही तासानंतर अनितानं खन्ना परिवाराकडून होत असलेल्या घुसमटीला वाचा फोडली ...आणि सुपरस्टारच्या मृत्युनंतर समोर आली एक नवी कहाणी... आणि या कहाणीची नायीका बनली अनिता अडवाणी..
राजेश खन्ना यांची मैत्रिण अशी स्वतःची ओळख करुन देणा-या अनितानं, सुपरस्टारच्या मृत्यूच्या अगोदर खन्ना कुटुंबीयांना कौंटूबिक हिसांचार कायद्याअंतर्गत नोटीस पाठवली होती.. राजेश खन्ना आपले निकटवर्तीय असल्याचा दावा करत, आपल्याला आशीर्वाद मध्ये आता स्थान मिळत नसल्याचा खुलासा अनितानं केलाय. आणि या सर्व घटनेनं व्यथित होऊन अनितानं खन्ना परिवांरावर आरोपांची तोफ डागलीय़. राजेश खन्ना रुग्णालयात असताना त्यांना भेटण्यासाठी मज्जाव करण्यात येत होता, असा थेट आरोप अनिताने राजेश खन्ना यांच्या कुटूंबावर केलाय. राजेश खन्ना यांना रुग्णालयातून घरी आणल्यावर आपल्याला आशीर्वाद मध्ये येण्यास मनाई करण्यात आली होती.. त्याचप्रमाणे नातेवाईकानी अपमानास्पद वागणूक दिली असल्याचही अनितानं सांगितलयं. शेवटच्या दिवसात अत्यंत आजारी असणा-या राजेश खन्ना यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं असा दावाही अनिताने केला होता. काकांच्या मृत्यूपूर्वी खन्ना कुटुंबियांनी अनिताला केलं बेदखल. राजेश खन्ना यांच्या मृत्यूपूर्वी अवघे काही तास अगोदर खन्ना कुटूंबानी आपल्याला आशीर्वादमधून बेदखल केल्याचा आरोप अनितानं केलाय.. 8 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीप असल्याचा केला दावा अनितान प्रसारमाध्यमासमोर आपण गेली आठ वर्ष राजेश खन्ना यांची मैत्रिण असल्याचा दावा करत आशीर्वादवर हक्क सांगितलाय.. राजेश खन्ना यांच्या अंतिम यात्रेलाही आपल्याला मुद्दाम डावलण्यात आलं असल्याचं अनितानं म्हणणयं.. अनिताचे आरोप, खन्ना परिवाराचे मौन ..आणि एकूणच वाढत जाणारा संभ्रम यामूळे राजेश खन्नाच्या या मैत्रीणीच्या कहाणीला वेगळे पदर निर्माण झालेयत.. सुपरस्टार राजेश खन्ना.. जिवंतपणीच एक आख्यायिका बनलेल्या या सुपरस्टारची एक नवी कहाणी आता समोर येतेय..
अगर तुम ना होते अस म्हणत शेवटची साथ आता अलग अलग झालीय. पण जग सौतन समजत राहीली आणि वास्तवात ते होत एक वेगळच अमर प्रेम.. सुपरस्टारच्या आय़ुष्यातली शेवटची मैत्रीण अनिता अडवाणी हिच्याभोवती आता सारा प्रसिद्धीचा झोत फिरु लागलाय.. आजपर्यत दूर राहीलेली अनिता या निमित्तानं ख-या अर्थान चर्चेत आलीय. अनिता अ़डवाणी या नावाभोवती चर्चेचं वलय दिवसेंदिवस वाढू लागलय.. काही दिवसापर्य़ंत सुपरस्टार राजेश खन्ना यांची मैत्रिण एवढीच अनिता अडवाणी हीची ओळख .. मात्र राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर अनितानं केलेल्या मागण्या आणि त्यासंबंधी प्रसार माध्यमांतून सुरू असलेल्या वावड्यांमुळे ही पेज थ्री पर्सनालिटी प्रसिद्धीच्या झोतात आलीय. अनिता अडवाणी ही फिलीपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड मार्कोस आणि इल्मे्डा यांची भाची आहे.. आणि हीच या नावाची पहिली ओळख आहे.. मार्कोस यांच्याभोवती फिलीपाईन्समध्ये प्रंचड राजकीय वलय आहे, तर इल्मेडा यांच्या बुटांच्या कलेक्शमुळे त्या विख्यात आहे..
या सा-या परिस्थीतीत वाढलेल्या अनितानं भारतातला आपला मित्र निवडला तोही सुपरस्टार राजेश खन्ना.. अनिता ही राजेश खन्ना यांची गेली अनेक वर्ष चाहती होती.. सुपरस्टारच्या प्रत्येक अदेवर , प्रत्येक संवादावर ज्या तरुणी घायाळ व्हायच्या त्यातल एक अग्रकमावरच नाव म्हणजे अनिता अडवाणी.. अनितासाठी राजेश खन्ना म्हणजे सबकुछ होते.. अंत्यत वैभवशाली जगण आणि लाखो तरुणींच्या मनात घर करणा-या या सुपरस्टारचं वैयक्तिक आयुष्य मात्र प्रचंड संघर्षाच राहीलय..
डिंपलशी झालेला तिचा विवाह अनेक तरुणीचे हद्य तोडून गेला होता.... राजेश खन्ना आणि डिपंलच्या संसारात दरी पडली आणि हा सुपरस्टार एकटा पडला.. मंदावत चाललेला करीष्मा आणि एकटेपण यामुळे सुपरस्टारच्या आयुष्यात आशीर्वाद या बंगल्याशिवाय दुसरं कोणीच समजून घेणार नव्हत.. आणि याचवेळी राजेश खन्नाची मैत्रीण असलेल्या अनितानं आशिर्वादमध्ये आणि राजेश खन्नाच्या आयुष्यात प्रवेश केला... एकाकी बनलेल्या राजेश खन्ना यांच्या आय़ुष्यात आपण गेली आठ ते दहा वर्ष साथ दिल्याचा दावा अनिता अडवाणी यांनी केलाय.. . एवढच काय तर राजेश यांच्या गेल्या काही दिवसातील आजारपणातही अनिता या रुग्णालयात त्याना भेटायला जात असत. राजेश खन्ना यांची प्रकृती ढासळल्यानंतर मात्र पत्नी डिंपल, मुलगी रिंकी, ट्विंकल आणि जावई अक्षय कुमार अनिताला आशीर्वाद बंगल्यावर येण्यास मज्जाव केला होता. आणि तिथच खरी ठिणगी पडली.. त्यानंतर राजेश खन्ना यांनी जगाला अखेरचा अलविदा केला पण त्या एक दिवस अगोदरच वादळापुर्वीच्या शांततेन अघटित होणार याची जाणीव दिली होती. अनिता अडवाणी यांनी राजेश खन्नाच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदरच आपल्या वकिलांमार्फत नोटीस पाठवली होती.
आपल्याला आशीर्वाद बंगल्यातून हूसकावण्याचा काही लोकांचा डाव असून आपण गेल्या १० वर्षापासून या बंगल्यात राहत असल्याचा दावा या नोटीसीमध्ये करण्यात आला होता. अनिताने या संपत्तीत आपल्याला वाटा हवाय असा दावा केला नसला तरी आशीर्वाद बंगल्यासंदर्भात काही मागण्या केल्या आहेत.. आता या प्रकरणावर कोण आणि कसा पडदा टाकेल हे तर काळच ठरवेल मात्र पुन्हा एकदा सुपरस्टारच्या मृत्युनंतर रंगू लागलीय आनंदची प्रेम कहाणी. आनंद या चित्रपटात एक वाक्य आहे.. जिना तो मुंबईमे, मरना तो मुंबईमे.. कदाचित हेच वाक्य असेल ज्यामुळे चर्चा रंगतेय सुपरस्टारच्या मुंबईच्या संपत्तीचीच, त्याच्या मृत्यूनंतरही..
First Published: Tuesday, July 24, 2012, 00:07