मोबाइल गेला.. त्याबरोबर आवाजही गेला - Marathi News 24taas.com

मोबाइल गेला.. त्याबरोबर आवाजही गेला

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
 
मोबाईल हरवला आणि आवाज गेला. ऐकून धक्का बसला असेल पण हे खरं आहे. पिंपरी चिंचवडमधल्या एका तरुणाच्या बाबतीत असंच घडलंय. मोठ्या हौसेनं नितीननं महागडा मोबाईल घेतला आणि तो चोरीला गेला. त्याचा त्याला एवढा धक्का बसला की त्याचा आवाजच गेलाय.
 
पिंपरी चिंचवडच्या आरोग्य विभागात काम करणा-या नितीन सूर्यवंशी या तरुणाचा आवाज गेलाय. त्याचं कारण ऐकून धक्काच बसेल. नितीननं मोठ्या कष्टानं आणि हौशीनं ३५ हजारांचा मोबाईल घेतला होता. पण त्याच्या घरात चोरी झाली आणि त्याचा मोबाईल चोरीला गेला. या घटनेचा नितीनवर एवढा परिणाम झाला की त्याचा आवाजच गेला.
 
नितीनला जीभ पकडल्याशिवाय बोलताच येत नाहीय. डॉक्टर आवाज परत मिळवून देतील असा त्याला विश्वास आहे. नितीनच्या बाबतीत घडलेली घटना अतिशय दुर्मिळ असल्याचं डॉक्टर सांगतात. आता त्याला परत व्यवस्थित बोलता यावं, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
 

First Published: Tuesday, July 24, 2012, 23:20


comments powered by Disqus