Last Updated: Monday, October 3, 2011, 10:44

कपील राऊत झी 24 तास, ठाणेठाण्याच्या नार्कोटेस्ट विभागाने सापाचं विष विकणारी टोळी जेरबंद केलीय. त्यांच्याकडे सापडलेल्या दोन बाटल्यांमध्ये होतं विष.
अंतरराष्ट्रीय बाजारात दोन बाटल्यांची किंमत 4 ते 5 कोटी रुपयांच्या घरात आहे.
एखाद्या माणसाचा जीव घेण्यासाठी या बाटलीतील एक थेंब पुरेसा आहे. अत्यंत विषारी समजल्या जाणा-य़ा कोब्राचं विष या बाटलीच जमा करण्यात आलं आहे..हे विष नाशिकहून विकण्यासाठी आणण्यात आलं होतं..
भारतीय बाजारातही या विषाची किंमत कोटीच्या घरात असल्याचं पोलिसांनी सांगितलय..आरोपींनी हे विष विक्रीकरण्यासाठी नाशिकहून आणलं होतं. मात्र ठाण्यातल्या अमली पदार्थविरोधी पथकाला त्याची खबर लागली आणि या विष तस्करीचा पर्दाफाश झाला.
पोलिसांनी सापळ रचून दोघांना अटक केली आणि त्यांच्याकडं केलेल्या चौकशीनंतर आणखी तिघेजण पोलिसांच्या हाती लागले. विषाने भरलेल्या या बाटल्या पोलिसांनी या आरोपींकडून जप्त केल्या आहेत..
या विषाच्या धंद्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून या तस्करीमागे अंतरराष्ट्रीय टोळीचा हात असल्याचं संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. आरोपी या विषाचा सौदा कोणाशी करणार होते याचा पोलीस कसून शोध घेत आहेत...
पोलिसांनी अटक केलेले आरोपी सधन कुटुंबातील असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलीस या आरोपींकड कसून चौकशी करत असून चौकशीत आणखी काही महत्वाची माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..
First Published: Monday, October 3, 2011, 10:44