Last Updated: Wednesday, August 1, 2012, 10:41
www.24taas.com, मुंबईआजचा ‘झी २४ तास’चा स्पेशल रिपोर्ट वाचल्यानंतर तुम्ही चेहऱ्यासाठी वापरत असलेली ब्यूटी क्रीम खरेदी करणं बंद कराल. आता ती वेळ लवकरच येणार असून, तुम्ही वृद्धत्व रोखण्यासाठी घेत असलेली औषधं खरेदी करणं बंद कराल. आपण आयुष्यभर तरुण दिसावं असं तुमचं जर स्वप्न असेल तर तुमची ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता भारतीय संशोधकांनी शोधून काढलंय असं औषध, जे तुम्हाला वयाच्या सत्तरीतही तरुण ठेवणार आहे.
भारतीय संशोधकांनी ते ‘एन्झाईम’ शोधून काढलंय जे माणसाला चिरतरुण ठेवू शकतं. हिमाचलच्या पालमपूरमधील हिमालय जैव संपदा प्रौद्योगिक संस्थेत कार्यरत असलेले डॉक्टर संजय कुमार यांच्या टीमने हे अनोखं संशोधन केलंय. हिमालयात आढळून येणाऱ्या वनऔषधीतून ते एन्झाईम वेगळं करण्याची कामगिरी त्यांनी केलीय.
इंद्राच्या आप्सरेचं सौंदर्यही तिच्या समोर खुजं भासावं असं मर्लिनला सौंदर्य लाभलं होतं. पन्नासच्या दशकातील या सौंदर्यवतीच्या सुंदरतेची जादू आजच्या तरुण पिढीवरही कायम आहे. जर चिरतरुण राहण्याचं औषध मिळालं असतं तर तरुण्यातील मर्लिन मुनरोला पाहण्याची आजच्या पिढीची इच्छा पूर्ण झाली असती... मधुबालाचं सौंदर्यही तसंच होतं... मधुबालाच्या सौंदर्याने तर भारतीयांना अक्षरश: वेड लावलं होतं... बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना आजही मधुबालाशी आपली तुलना केली जावी असं मनोमन वाटतं असतं. मधुबालाला पाहण्याची इच्छा आजही अनेकांच्या मनात आहे. त्यामागचं कारण म्हणजे मधुबालंचं निखळ सौंदर्य... मधुबालाच्या सौंदर्याची जादूच काही और होती... अभिनेता असो की अभिनेत्री तरुणपणातील आपला आवडता कलाकार पहाण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना असते... त्यांची ती इच्छा पूर्णही झाली असती जर चिरतरुण राहण्याचं औषधी सापडलं असतं तर... खरं तर वृद्धत्वापासून कुणाचीच सुटका झाली नाही... गरीब असो की श्रीमंत वृद्धत्वावर कुणालाच मात करता आली नाही. पण येत्या काही वर्षात मणुष्याला वृद्धवावर मात करता येणार आहे. कारण आता सापडलीय तारुण्य टिकवून ठेवणारी वनऔषधी. चिरतरूण ठेवणारी वनऔषधी म्हातारपणाला जवळ भटकू देणार नाही आणि तारुण्याला दूर जाऊ देणार नाही. विशेष म्हणजे ती वनऔषधी भारतीय संशोधकांनी शोधून काढलीय. हिमाचल प्रदेशातील पालमपूरमध्ये असलेल्या हिमालय जैवसंपदा प्रौद्यागिक संस्थेने ते ‘एन्झाईम’ शोधून काढलयं. या एन्झाईममुळे मनुष्याला वृद्धत्वार मात करता येणार आहे.
रामभक्त हनुमानने लक्ष्मणासाठी जेथून संजीवनी वनऔषधी आणली होती त्याच भूमित ‘सुपर ऑक्साईड डिस्म्यूटेज’ नावाचं एन्झाईम वेगळं करण्यात संशोधकांना यश आलंय. माणसाला चिरतरुण ठेवणारी औषधी हिमालयातील बर्फाच्छादीत लाहौल स्पितीमधल्या कुंजमवासमध्ये पोटोंटटिल्ला या वनस्पतीत आढळून आली आहे. पोटोंटटिल्ला ही वनस्पतीत जंगलात आढळून येते. संशोधकांनी त्या वनस्पतीत ‘ऑक्साईड डिस्म्यूटेज’ नावाचं एन्झाईम शोधून काढलं आहे. त्या एन्झाईममुळे वृद्धत्व रोखलं जातं. IHBT ने केलेलं हे संशोधन प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सायन्स जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध झालं आहे. तसेच आता त्या एन्झाईमचा लहान प्राण्यांवर प्रयोग केला जात आहे. त्यानंतर लवकरच ते औषध वापरात येणार आहे.
सुपर ऑक्साईड डिस्म्यूटेज या औषधाकडे लोकांच लक्ष लागलंय. खरंच हे औषध साठ वर्षाच्या वयोवृद्धाला ४० वर्षाचा तरुण बनवणार आहे का? हा प्रश्न आज विचारला जातोय आणि याच प्रश्नाचं उत्तर दडलंय त्या इंजाईमच्या शक्तीमध्ये. एखाद्या ब्यूटी क्रिमच्या रुपाने ते तुमच्या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कसं बनल ब्रम्हांड... कशी झाली पृथ्वीची उत्पत्ती... कसा जन्माला आला माणूस आणि का होतो माणसाचा मृत्यू ... या आणि अशा अनेक प्रश्नाच्या शोधात सर्वसामान्य माणूस नेहमीच भटकत असतो. अशाच काही अनुत्तरीत प्रश्नापैकी एक प्रश्न म्हणजे, कस येतं वार्धक्य... खरंतर म्हातारपण कोणालाच नको असतं आणि म्हणूनच शोध सुरु आहे तारुण्यपणाची अवस्था कायम राखणाऱ्या औषधाचा... माणसाला चिरतरुण बनवणाऱ्या सुपर ऑक्साईड डिस्म्यूटेजच्या इंजाईममधून या साऱ्या गोष्टीला बळकटी मिळालीय.
सुपर ऑक्साईड डिस्म्यूटेज म्हणजे काय?सुपर ऑक्साईड डिस्म्यूटेज हे मानवी शरिरातील महत्वाचं एन्झाईम आहे. अँटी ऑक्सीडन्ट हा सुपर ऑक्साईड डिस्म्यूटेज एन्झाईमचा विशेष गुणधर्म... ते मानवी पेशींना वृद्ध होण्यापासून रोखतं. सुपर ऑक्साईड डिस्म्यूटेजच्या कमतरतेमुळे वृद्धत्वाला सुरूवात होते. वाढत्या वयाबरोबरच चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. पण त्या सुरकुत्या आर्टीफिशियल सुपर ऑक्साइड डिस्म्यूटेजच्या माध्यमातून रोखता येतील, अशी संशोधकांना आशा आहे. त्यामुळे वयाच्या ८० व्या वर्षीही माणूस चिरतरुणच दिसेल. आईएचबीटीच्या वैज्ञानिकांनी मानवी स्टेम सेलवर केलेल्या या प्रयोगाचे चांगले परिणाम समोर आले आहेत. त्वचा तजेलदार होण्यासाठी क्रीम तयार होणार आहे आणि याच क्रिममुळे तारुण्य जास्त काळ टिकणार आहे. केवळ एवढच नाही तर याच एंजाईममुळे खाद्य पदार्थ दिर्घकाळपर्यत ताजे राहू शकणार आहेत. या औषधाचे दूरगामी परिणाम लक्षात घेता आयएचबीटीने या इंजाईमचं अमेरिकेत आपलं पेटंट केलं आहे. एकूणच भारतीय वैज्ञानिकांनी लावलेल्या या विलक्षण शोधामुळे चिरतरुण राहण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे मात्र असं असलं तरी या औषधाला सर्वसामान्य पोहोचण्यासाठी अद्याप बराच कालावधी आहे.
भारतीय संशोधकांनी नुकतेच केलेल्या या संशोधनापूर्वी विदेशातील काही वैज्ञानिकांनी अशाच प्रकारची औषधी शोधून काढल्याचा दावा केलाय. रापामायसिन नावाच्या औषधामुळे माणूस चिरतरूण राहू शकतो असा दावा परदेशी संशोधकांनी केला होता. माणसाचं आयुष्य २३ वर्षांनी वाढवता येत असल्याचं उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगातून समोर आलंय. औषधी गोळी खाल्ल्यानंतर डोकेदुखी जशी काही मिनिटात दूर होते तसंच एखादं औषध खाल्ल्यानंतर तुमचं आयुष्य चक्क २३ वर्षांनी वाढलं तर...
सध्यातरी असं काही चमत्कारीक औषध किंवा वनऔषधी संशोधकांना सापडली नाही पण अशा औषधांचं स्वप्न आता फार दूर नाही. संशोधक अशाच एका चमत्कारीक औषधावर संशोधन करत आहेत. या संदर्भात वैज्ञानिकांनी आता पर्यंत केलेल्या संशोधनात एक महत्त्वाची माहिती त्यांच्या हाती लागली आहे आणि म्हणजे ज्या उंदीरांवर वैज्ञानिकांनी आयुष्य वाढविण्यास मदत करणाऱ्या औषधाचा प्रयोग केला त्यामुळे त्या उंदरांचं आय़ुष्य वाढल्याचं दिसून आलंय. संशोधकांच्या म्हणण्यानुसार या नव्या औषधामुळे माणसाचं आयुष्य चक्क २३ वर्षांनी वाढणार आहे. हे संशोधन सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. माणसाचं आयुष्य वाढविण्याची क्षमता असल्याचं ज्या औषधात आढळून आलंय त्याचं नाव आहे रापामायसीन.
रापामायसिनमुळे वार्धक्यापासून मुक्ती ?उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगाचे परिणाम मोठे उत्सहवर्धक आहे असल्याचं संशोधकांनी सांगितलंय. जास्त वय असलेल्या उंदरांना रापामायसीनचा डोस देण्यात आला होता. त्या डोसनंतर त्यांचं आयुष्य वाढल्याचं आढळून आलं. रापामायसीनचं हे परिणाम चक्रावून सोडणारे आहेत. उंदरांवर करण्यात आलेल्या या प्रयोगाची तुलना माणसाशी केल्यास रापामायसीनमुळे आयुष्याची २३ वर्ष वाढण्याची शक्यता आहे. आयुष्य वाढविण्यात रापामायसीन महत्त्वाची भूमिका बजावणार असलं तरी सध्या हे औषध माणसांसाठी वापरता येणार नाही. पण भविष्यात त्याच्यात काही फेरबदल करुन त्याचा वापर माणसासाठी केला जाण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. हे औषध बाजारात आल्यास माणसाला वृद्धत्वावर मात करता येणार आहे तसेच वयाबरोबरच चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या रोखता येणार आहेत.
माणसाला वृद्धत्व येतं ते त्याच्या शरिरातील जीन्समुळे. वॉशिंगटन युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी जे संशोधन केलंय त्यामध्येही हेच उघड झालं आहे. अमीबा आणि इस्टमध्ये आढळून येणाऱ्या जीवाणूंचा त्यांनी अभ्यास केला असून माणसाला वृद्धत्वाकडं नेहणाऱ्या जीन्सचा शोध त्यांनी लावला आहे. त्या संशोधनामुळे माणसाला चिरतरूण ठेवणाऱ्या औषधाविषयीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. डीएचईए - 25.... जगातील अनेक देशांत हे औषध आज विकलं जातंय. खरंतर एन्टी एजिंग ड्रग्ज म्हणून हे औषध जगभर विकलं जातंय. माणसाच्या शरिरात किडनीवरती असलेल्या एडनलग्लॅम मधून एन्डोस्ट्रोम हार्मोनचा स्त्राव वयाच्या तिशीनंतर कमी होत जातो. ‘डीएचईए -25’ हे औषध त्या हार्मोनचा स्त्राव वाढवते तसेच वृद्धत्वाच्या प्रक्रियेला लगाम लावतं असा दावा औषध निर्माण करणाऱ्या कंपनीकडून केला जातोय. पण डॉक्टरांना मात्र हा दावा मान्य नाही. वृद्धत्वावर मात करण्याचा दावा करणारी अनेक औषधं आज विदेशात मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. पण त्या औषधांचा परिणाम मानवाच्या शरिरावर होताना दिसत नाही. माणूस वृद्ध का होतो आणि त्याचा मृत्यू का अटळ आहे. या प्रश्नाचं उत्तर आजही माणसाला मिळालं नाही. माणसासाठी हे अद्यापही अनुत्तरीत असलेल्या एक कोडंच आहे. अमीबा हा एकपेशीय प्राणी मानला जातो. त्याच्या शरिरात कोणतीच क्लिष्टता नाही पण त्याला कधीच मृत्यू येत नाही आणि त्याला वृद्धत्वही येत नाही. बेकरी पदर्थामध्ये वापरण्यात येणारं इस्टही एक पेशीयच आहे. वॉशिंगटनमधली काही संशोधकांनी इस्टवर संशोधन केलं असून त्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळलं आहे. इस्टमधील २५ असे जिन्स संशोधकांनी शोधून काढले आहे जे वृद्धत्वाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू शकतात. इस्ट प्रमाणेच गोलकृमीमध्येही अशाच प्रकारचे जीव आढळून आले आहेत. खरंतर पृथ्वीवर हे दोन्ही प्राणी वेगवेगळ्या कालावधीत अस्तित्वात आले आहेत. पण असं असतांनाही वयावर नियंत्रण ठेवणाऱ्या त्यांच्यातील जीन्समध्ये कोणताच फरक झाला नाही. ते दोन जीव अस्तित्वात आल्यानंतर कोट्यवधीवर्षांनी मनुष्यप्राणी पृथ्वीवर अस्तित्वात आला आहे. पण माणसातही वयावर नियंत्रण मिळविणारे १५ जीन्स आढळून आले असून तेही त्यांच्या प्रमाणेच आहेत. ते जीन्स इस्ट आणि गोलकृमीतील पोषक तत्वांवरच्या उर्जेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे त्या सेलमध्ये असलेल्या क्रोमझोनमधून टिनोमाई संरचनेतील बदलावर ब्रेक लागतो. टिनोमाईमुळे वय वाढीला मदत मिळते. माणसाच्या शरिरातही अशीच प्रक्रिया होत असते. इस्ट आणि रॅमझोनमधल्या जीन्सची कार्यप्रणाली समजून घेतल्यास माणसाच्या शरिरातील जीन्सची कार्यप्रणाली समजता येवू शकते असं काही संशोधकांचं मत आहे. मनुष्याच्या शरिरातील ती कार्यप्रणाली समजल्यानंतर माणसाच्या वयावर प्रभाव टाकणारं औषधही तयार करता येईल आणि त्यानंतर माणसाला त्या औषधामुळे वृद्धत्व दूर ठेवता येईल. त्यामुळे वृद्धवावर मात करण्याचं तुमचं जर स्वप्न असेल तर ते तुम्हाला पूर्ण करता येईल पण त्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
हिमाचलमधील डॉक्टर संजय कुमार यांच्या टिमनं हे आव्हान पेललंय. हिमाचल प्रदेशच्या वनौषधीनं संपन्न असलेल्या भूभागावर ही वनौषधी सापडलीय आणि विशेष म्हणजे परदेशी संशोधकाच्या चिरतरुण राहण्याच्या दाव्याला आता भारतीय संशोधकानी मात केलीय. माणसालाच नेहमीच तारुण्याचं आकर्षण राहिलंय. याच आकर्षणापायी तरुण राहण्याचा अट्टाहास माणसाला नेहमीच खुणावत असतो आणि याच महत्त्वकांक्षी स्वप्नाला आता लवकरच मूर्तरुप मिळणार आहे. हिमाचल प्रदेशमधील पालमपूरच्या संशोधकानी केलेल्या एका आगळ्या आणि अतिशय महत्वाच्या संशोधनामुळे माणूस आता चिरतरुण राहणार आहे. हिमालय जैवसंपदा प्रोद्यौगिकी संस्थानात हे अतिशय महत्त्वाचे संशोधन करण्यात आलंय. दोन दशकाहून अधिक काळ अतिशय महत्त्वाचं संशोधन जगासमोर आणण्यात या संशोधन केंद्राचा नेहमीच मोठा वाटा राहिलाय. पुष्पविज्ञान, जैवविज्ञान, फळसंशोधन आणि औषधनिर्माण अशा अनेक क्षेत्रात आईएचबीटीनं भरीव कामगिरी केलीय. हिमाचल प्रदेशचा संपूर्ण भूभाग वेगवेगळ्या वनौषधीसाठी प्रसिद्ध आहे. अशाच वनौषधीमधून निवडून खास असं हे औषध वैज्ञानिकांनी तयार केलंय. याच प्रदेशातून सुपर ऑक्साईड डिस्म्यूटेज नावाचं एन्झाईम वेगळं करण्यात संशोधकांना यश आलंय. माणसाला चिरतरुण ठेवणारी औषधी हिमालयातील बर्फाच्छादीत लाहौलस्पितीमधल्या कुंजमवासमध्ये पोटोंटटिल्ला या वनस्पतीत आढळून आली आहे. पोटोंटटिल्ला ही वनस्पतीत जंगलात आढळून येते. संशोधकांनी त्या वनस्पतीत ऑक्साईड डिस्म्यूटेज नावाचं एन्झाईम शोधून काढलं आहे. चिरतरूण ठेवणारी वनऔषधी म्हातारपणावर नियंत्रण ठेवू शकणार आहे. विशेष म्हणजे ती वनऔषधी भारतीय संशोधकांनी शोधून काढलीय. हिमाचल प्रदेशातील पालमपूरमध्ये असलेल्या हिमालय जैवसंपदा प्रौद्यागिक संस्थेने ते एन्झाईम शोधून काढलयं. या संशोधन केंद्राने नेहमीच वेगवेगळी संशोधन करुन आपला वारसा जपलाय. पण आता मात्र परदेशातील संशोधकावर मात करत आपल्या देशाच्या संशोधकाचा ठसा उमटलाय. वृद्धत्वावर मात करणारं औषध शोधून काढल्याचा दावा विदेशातील अनेक औषध कंपन्यांकडून केला जात असला तरी हिमाचल मधील या संस्थेनं लावलेला शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.
.
First Published: Wednesday, August 1, 2012, 10:41